"नॅनो" नंतरची भारताची देणगी - $35 (अंदाजे रू. १५०० रू.) चा काँप्यूटर

बहुगुणी's picture
बहुगुणी in काथ्याकूट
11 Aug 2010 - 11:04 pm
गाभा: 

भारतातील चार आय. आय. टी. ज् (कानपूर, मुंबई, खरगपूर आणि मद्रास) आणि बंगलोरची इंडियन ईंस्टिट्यूट ऑफ सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने ही लक्षणीय निर्मिती केली आहे.

हा जगातील सद्या तरी सर्वात स्वस्त टॅब्लेट संगणक असावा, यात touch screen, wi-fi, full video capability, e-book reader आणि 2 GB मेमरी या सोयी आहेत.

विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री कपिल सिबल यांनी NDTV च्या Gadget Guru या कार्यक्रमात या पुढील वर्षी येऊ घातलेल्या 'सरकारी' निर्मितीची माहिती दिली. सविस्तर माहिती या व्हिडिओच्या पूर्वार्धात मिळेल.

Droid platform वर आधारित असलेल्या या टॅब्लेट पी सी चा functional prototype तयार असून त्याच्या १० लाख units ची निर्मिती पुढील वर्षात होईल अशी सिबल यांनी खात्री दिली.

विद्यार्थ्यांना शैक्षणिक संगणकप्रणाली pre-load करून असे टॅब्लेट्स उपलब्ध करून देणे हा मुख्य उद्देश असल्याचं सिबल यांनी सांगितलं.

Eventually, हा संगणक $२० (अंदाजे १००० रु.) इतक्या कमी किंमतीत पुरवणं शक्य आहे असं श्री. सिबल म्हणतात.

याविषयी आधिक माहिती असेल तर ती या धाग्यावर द्या.

प्रतिक्रिया

शिल्पा ब's picture

11 Aug 2010 - 11:08 pm | शिल्पा ब

मस्त...बाजारात आला कि माझ्या छोटीसाठी घेइन म्हणते..

योगी९००'s picture

7 Oct 2011 - 2:28 pm | योगी९००

तुमची छोटी जर खुपच लहान असेल ..तर तिच्यासाठी हे एक खेळणे होईल..

पण साधारण ७- ८ वर्षाच्या वरील मुलांसाठी उत्तम आहे...ते काहीतरी शिकतील. नाहीतर हे एक खेळणेच होईल..

शानबा५१२'s picture

11 Aug 2010 - 11:12 pm | शानबा५१२

विद्यार्थ्यांना शैक्षणिक संगणकप्रणाली pre-load करून असे टॅब्लेट्स उपलब्ध करून देणे हा मुख्य उद्देश असल्याचं सिबल यांनी सांगितलं

कौतुकास्पद उपक्रम.
१००% यशस्वी व्हावा ही ईच्छा.

पण अमेरीकेप्रमाणे वर्गात स्क्रीनवर शिकवणे,वर्कशॉप्स्,कंडक्टोमीटरसारखी यंत्रे मुलांना हाताळालायला देणे वगैरे सुरु केल तर ह्याची गरज भासणार नाही.

विषयांतरः मुंबईच्या एका प्रख्यात प्राचार्याने(रसायनशास्त्राच्या)एका सेमीनारमधे आपल्याकडल्या 'मागासलेल्या' शिक्षणपद्धतीची उडवलेली खिल्ली आठ्वली.

राजेश घासकडवी's picture

12 Aug 2010 - 4:12 am | राजेश घासकडवी

लवकरच वह्या, पुस्तकं वगैरे घेण्यापेक्षा कॉंप्युटर 'पाटी' घेणं स्वस्त होणारसं दिसतंय. वा. अब्जावधी झाडं वाचतील. मुलांच्या खांद्यावरचं ओझं कमी होईल. गरीबांच्या मुलांच्या हातातही अत्याधुनिक तंत्रज्ञान जाईल. वरती फळ्यावर काहीतरी वाचून एकमार्गी शिक्षण होण्याऐवजी हवी ती माहिती चुटकीसरशी शोधून काढण्याची सोय होईल. या सगळ्याचं किती तोंड भरून कौतुक केलं तरी थोडंच आहे.

आपल्या डोळ्यासमोर क्रांती घडते आहे. या शतकाच्या पहिल्या दशकात सेलफोनने जसा भारत बदलून टाकला तसा पुढच्या दशकांत या कंप्युटरने बदलून जावा अशी आशा.

तंत्रज्ञानाच्या घोडदौडीपुढे नतमस्तक.

सहज's picture

12 Aug 2010 - 6:30 am | सहज

हेच बोल्तो.

श्री. गांधीवादी भारतातले हे चित्र नक्कीच आशादायक, स्फूर्तीदायक आहे कीनै?

अवांतर - अश्या संगणकाबरोबरच, प्रवासी विमान निर्माण, इतर देशांकरता उपग्रह निर्मीती व तो अंतराळात सोडणे याक्षेत्रात भारताने बक्कळ धंदा करावा ही मनोमन इच्छा.

Nile's picture

12 Aug 2010 - 6:33 am | Nile

अगदी हेच. असे होईल यात शंका वाटत नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

12 Aug 2010 - 10:32 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

अतिशय आशादायक बातमी.

मोबाईल फोनमुळे 'क्रांती' होईल हे माझ्या आकलनाच्या पलिकडे होतं. पण दोन आठवड्यापूर्वी नेहेमीच्या भाजीवाल्याकडे भाजी घेत होते तेव्हा तिथे मावशी मेथीची जुडी निवडत होत्या. ४० रुपयांची भाजी घेऊन झाल्यावर त्यांनी लगे हाथ १० रूपयांची निवडलेली भाजीची जुडी मला विकायचा सफल प्रयत्न केला. आणि वर स्वतःची 'जाहिरातही' केली, "ताई, तुम्हाला निवडून भाजी हवी आहे का? माझा मोबाईल नंबर घ्या आणि तासभर आधी कळवून या निवडलेली भाजी घ्यायला!"
पुढच्याच आठवड्यापासून या मोबाईल क्रांतीची कृपा, मी पुन्हा एकदा पालेभाज्या खायला सुरूवात केली आणि भाजीवाल्याने दोन-पाच रूपये जास्त कमवायला!

बहुगुणी, भारतात बनणारा संगणक, भारतातल्या मुलांसाठी वापरला जाणार. तिथे डॉलर्समधल्या किंमती खटकल्या. डॉलर्समधे लिहून नये असं नाही, पण $२० चा संगणक म्हणजे भारतीय रूपयांमधे साधारण हजार रूपये हे ही तिथे लिहीता येईल का?

llपुण्याचे पेशवेll's picture

12 Aug 2010 - 11:42 am | llपुण्याचे पेशवेll

बहुगुणी, भारतात बनणारा संगणक, भारतातल्या मुलांसाठी वापरला जाणार. तिथे डॉलर्समधल्या किंमती खटकल्या. डॉलर्समधे लिहून नये असं नाही, पण $२० चा संगणक म्हणजे भारतीय रूपयांमधे साधारण हजार रूपये हे ही तिथे लिहीता येईल का?
याच्याशी सहमत आहे. आपली पेप्रं सुधा त्या आयपीएल मधे उगा इतके मिलीयन $ वगैरे छापत असतात. सरळ सरळ रुपयात किंमत का नाही लिहीत.

घाटावरचे भट's picture

12 Aug 2010 - 1:56 pm | घाटावरचे भट

वरील सर्वांशी सहमत.

बहुगुणी's picture

12 Aug 2010 - 5:51 pm | बहुगुणी

अदिती, पु पे:

$35/$20 हे मलाही खटकलं (म्हणूनच मी 'अंदाजे १५०० रू.' हे शीर्षकातच टाकलं), पण या डॉलर्स मधील टर्म्स माझ्या नव्हे, तुम्ही ते व्हिडिओज् पाहिलेत तर तुम्हाला इंग्लिश मध्ये बोलणारा news readerच नव्हे तर हिंदीत बोलणारे कपिल सिबल हे देखील 'अमूक-तमूक डॉलर्स' असंच बोलतांना दिसतील. (त्या व्हिडिओ क्लिपवरच्या static शीर्षकातही तुम्हाला हे India's $35 laptop असंच दिसेल.)

मला उपलब्ध असलेल्या वेळात शक्य होतं तितक्या अचूकपणे एक अभिमान वाटावी अशी घटना सर्वांबरोबर मी share केली इतकंच. आणि $35 म्हणजे १५०० रू. हे समीकरण ढोबळमानाने लक्षात घेऊन, $20 म्हणजे १००० रुपयांपेक्षा कमी असावं हे सहज कळेल असं वाटलं.

सहसा, इतक्या क्षुल्लक गोष्टींचा बाऊ करून, शब्दाने शब्द वाढवून, प्रत्युत्तर देत बसणे आणि वेळ वाया घालवणं हा माझा स्वभाव नाही, तसंच वृथा हट्टीपणा करून 'माझंच खरं' असा दुराग्रहही नाही. स्व-संपादनाची सोय असती तर हा किरकोळ बदल स्वतःच करून मी केंव्हाच हा मुद्दा संपवला असता, अजूनही संपादकांनी ही दुरूस्ती केली तर मला आवडेलच. तेंव्हा हा किरकोळ मुद्दा इथेच संपवून आपण या तंत्रज्ञानाविषयी आधिक माहिती धाग्यात देता आली तर पाहू, मुख्य विषयापासून भरकटत जावं हा हेतू तुमच्यासारख्या जुन्या-जाणत्यांचा ऩक्कीच नसणार याची मनोमन खात्री आहे.

भाकीतः भारतातली शिक्षण पद्धती येती शंभर वर्षे दप्तर लहान होऊ देणार नाही.

विषयांतरः
ताई, तुम्हाला निवडून भाजी हवी आहे का?...

पुण्यास, फ.कॉ. रोडवर पी. वाय. वैद्यांनी सुद्धा हि सोय उपलब्ध केली आहे..

खेडूत's picture

8 Oct 2011 - 2:11 am | खेडूत

| पुण्यास, फ.कॉ. रोडवर

त्याचे अचूक नाव गोपाळ कृष्ण गोखले मार्ग...

- खेडूत

शानबा५१२'s picture

12 Aug 2010 - 10:19 am | शानबा५१२

"नॅनो" नंतरची भारताची देणगी

अहो नॅनो लोकं विकत घेणार आहेत्,देणगी कसली?.आणि भारताचा नाही टाटाचा फायदा आहे त्यात.

हे उपकरण विकल जाईल तेव्हा त्यात सर्वच फायदा कमवतील तेव्हा देणगी हा शब्द साफ चुकीचा आहे.

राजेश घासकडवी's picture

12 Aug 2010 - 11:59 am | राजेश घासकडवी

नॅनो ही देणगीच आहे. नॅनोमुळे इतर कंपन्याही आपलं बूड हलवून स्वस्त गाड्या तयार करायला झक् मारत तयार होत आहेत. त्याचा फायदा जगाला आहेच. एक-दीड लाख रुपये किमतीची गाडी विकून जो काही हजार रुपये फायदा टाटा कंपनी मिळवेल त्यापेक्षा कितीतरी जास्त फायदा इतर कंपन्या चार-पाच लाखाऐवजी दीड-दोन-अडीच लाखाच्या गाड्या तयार करण्यामुळे सर्वसाधारण जनतेला होणार आहे. हीच देणगी.

स्वतःच्या खिशातनं मर्यादितच देणगी देता येते. इतर अनेकांना खिसे मोकळे करायला लावले तर ती खरी फायदेशीर देणगी होते. ते इतर जर आपले स्पर्धक असले तर त्यात भन्नाट धंदेवाईक दृष्टीही दिसते. एक भारतीय कंपनी हे करू शकते ही तर फारच मोठी देणगी.

शानबा५१२'s picture

16 Aug 2010 - 12:12 am | शानबा५१२

एक-दीड लाख रुपये किमतीची गाडी विकून जो काही हजार रुपये फायदा टाटा कंपनी मिळवेल त्यापेक्षा कितीतरी जास्त फायदा इतर कंपन्या चार-पाच लाखाऐवजी दीड-दोन-अडीच लाखाच्या गाड्या तयार करण्यामुळे सर्वसाधारण जनतेला होणार आहे. हीच देणगी.

ह्या वाक्याला आपल्याशिवाय कुणाचाच आधार नाहीये अस वाटत.

स्वतःच्या खिशातनं मर्यादितच देणगी देता येते. इतर अनेकांना खिसे मोकळे करायला लावले तर ती खरी फायदेशीर देणगी होते.

आपण काही गफलत करत आहात का?अहो ही कसली देणगी??

का खिसे मोकळे कारायचे..........टाटाचा गल्ला भरायला?

एक भारतीय कंपनी हे करू शकते ही तर फारच मोठी देणगी.

Again sorry,but you please define देणगी....................आपला माल विकुन फायदा कमवायचा ही देणगी की थोडंस नुकसान सिसुन देशाने नागरीकांना काहीतरी द्याव(खुप उशीरा) ही देणगी.

आपण अनुक्रमे धंदा व कर्तव्य ह्या गोष्टींना देणगी म्हणत आहात!

योगी९००'s picture

7 Oct 2011 - 6:24 pm | योगी९००

नॅनो ही देणगीच आहे. नॅनोमुळे इतर कंपन्याही आपलं बूड हलवून स्वस्त गाड्या तयार करायला झक् मारत तयार होत आहेत.
असहमत..नॅनो आल्यामुळे किती कंपन्यांनी आपल्या कारची किंमत कमी केली..? किंवा नविन स्वस्त गाड्या बाजारात आणल्या..?

ज्यांना पहिल्यांदा कार घ्यायची आहे त्यांचा पहिला choice नॅनो कधीच नसतो...ते a-star किंवा i10 पासून सुरूवात करतात...

खुप दिवसांपासुन वाचते आहे या $२० कम्प्युटर बद्दल.
जर अदिती चा अनुभव पुण्यातला असेल तर खरच किती बदल होतोय .
बर्‍याच वेळा, निदान मी तरी, भारतात टेक्नॉलॉजिचा पुरेपुर उपयोग झालेला बघते.
म्हणजे या ठिकाणी वापरली जाणारी गोष्ट डोक वापरुन दुसर्‍या ठिकाणी ही फिट करावी तर ती आपणच!

पाषाणभेद's picture

12 Aug 2010 - 2:46 pm | पाषाणभेद

>>> या ठिकाणी वापरली जाणारी गोष्ट डोक वापरुन दुसर्‍या ठिकाणी ही फिट करावी तर ती आपणच!
हॅ हॅ हॅ म्हंन्जी कापी पेश्ट म्हनायचं का ताई तुमाला?

sagarparadkar's picture

12 Aug 2010 - 3:42 pm | sagarparadkar

कापी पेश्ट नाही हो.
आता बघा गोदरेज हेयर डाय ला बिहारच्या खेड्यापाड्यांतून अचानक मोठी मागणी यायला लागली. म्हणून शोध घेतला तर कळले की तेथील शेतकरी म्हशी रंगवून विकण्यासाठी हा हेयर डाय वापरत होते. कारण काळी कुळ्कुळीत म्हैस पटकन आणि चांगल्या किमतीला विकली जाते ....
असेच एकदा एका कंपनीची वॉशिंग मशीन्स सारखी बिघडतात म्हणून तक्रारी यायला लागल्या. त्या सुद्धा फक्त देशाच्या विशिष्ट भागातूनच. म्हणून शोध घेतला तर असे लक्षात आले की 'त्या' भागातले डेअरी चालक ती वॉशिंग मशीन्स दही घुसळून ताक / लस्सी बनवण्यासाठी वापरत असत. आता बोला, ताई म्हणतात ते खरं आहे कि नाही?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

12 Aug 2010 - 3:44 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

ल्याटरल थिंकीग!

म्हशी काळ्या पाहिजेत आणि माणसं गोरी! ;-)

राघो भरारी's picture

12 Aug 2010 - 6:08 pm | राघो भरारी

जरी ही बातमी आशादायक वाटत आहे तरी मला नाही वाटत की ही idea व्यावहारिक पातळीवर चालेल म्हणून कारण मला आठवते की काही वर्षापूर्वी Simputer नावाचे tablet PC बनवले गेले होते आणि त्याचा पण खूप गाजावाजा झाला होता पण ते व्यवहारिक पातळीवर सपशेल आपटले.

..राघो

ही बातमी तंत्रज्ञान म्हणून नक्कीच आशादायी आहे. नॅनो प्रमाणेच ही बातमी देखील प्रेरणादायी आहे.

कॅलीफोर्नियातील डॉ. विनय देवळालीकर यांनी "P≠NP" नावाचे उत्तर हे संशोधकांना भेडसावणार्‍या प्रश्नाला दिल्याचे वृत्त पण प्रेरणादायी आहे.

बहुगुणी's picture

6 Oct 2011 - 10:35 am | बहुगुणी

दीड वर्षांपूर्वी मी इथे हा धागा टाकला त्या टॅब्लेट विषयी हे पुढचं वृत्त, श्री. कपिल सिबल यांनी आज (पुन्हा एकदा!) याचं सादरीकरण केलं.

सुरूवातीला दाखवलेल्या प्रोटोटाईप आणि आज सादर केलेल्या अंतिम उत्पादनातील फरकांची आधिक विस्तृत माहिती एन डी टी व्ही च्या या वृत्तात आहे.

हैदराबाद येथील डेटाविंड या भारतीय कंपनी तर्फे अँड्रॉईड २.२ OS वर आधारित एक लाख टॅब्लेट्स लवकरच उत्पादित केल्या जातील, विद्यार्थ्यांच्या हातात सरकारी अनुदानासह हे उपकरण रू. १७५० ला पडेल असा अंदाज आहे.

आत्ताच वाचलेल्या बातमिनुसार साधारण नोव्हेंबर २०११ च्या शेवटच्या आठवड्यात ह्या टॅबलेट साठीचे बुकिंग सुरु होतील असा अंदाज आहे, विद्यार्थी सोडुन इतर लोकांसाठी हे उपकरण साधारण ३०००/- च्या आसपास पडेल असा अंदाज आहे.

आपल्या सगळ्यांचेच पुन्हा एकदा अभिनंदन,

अवांतर - बाजाराचा माज उतरवणे हा प्रकार आहे.

आत्मशून्य's picture

6 Oct 2011 - 2:21 pm | आत्मशून्य

चला कूठतरी भारत चिनला टक्कर द्यायचा प्रयत्न करतोय ही फार स्तूत्य गोश्ट आहे... बाकी साक्षात टाबलेट जूलै २०११ मधेच येणार होता तो आला नाही आता त्याचच नामकरण आकाश केलय काय ?

क्रेमर's picture

6 Oct 2011 - 8:13 pm | क्रेमर

हैदराबाद येथील डेटाविंड या भारतीय कंपनी तर्फे ...

डेटाविंड ही कॅनडास्थित कंपनी आहे. बाकीचा जिंगोइजम चालू द्या.

बहुगुणी's picture

6 Oct 2011 - 9:27 pm | बहुगुणी

@क्रेमरः बरोबर आहे, डेटाविंड कॅनडास्थित कंपनी आहे (एन डी टी व्ही च्या वृत्तावरून ती भारतीय असल्याची माझी समजूत झाली होती, त्यात "manufacturing unit in Hyderabad" असा उल्लेख आहे)

या Computerworld मधील लेखावरून असं दिसतं की:

The Aakash tablet has been designed, developed and manufactured by DataWind, in partnership with an educational institution, IIT Rajasthan,......

The design of the product was done by DataWind between its centers in Montreal and India, Tuli said. IIT Rajasthan is coordinating the project, including firming up the specifications, and doing the field testing.....

@५० फक्तः ऑनलाईन बुकींग सुरू झालेलं आहे असं इथे दिसतंय, इतरही बरीच माहिती दिलेली आहे.

पण हे उपकरण म्हणजे फोन देखील आहे का? वरील 'अधिकृत'(?) संस्थळावर And It’s a Phone! असं Features टॅबच्या अखेरीला म्हंटलंय.

क्रेमर's picture

6 Oct 2011 - 9:36 pm | क्रेमर

या प्रकल्पाचे संस्थापक श्री राजा तुळी यांनी इतरही (लो कॉस्ट) डिवाइसेस पुर्वी निर्मिली आहेत. त्यांच्या या नवीन उपकरणाविषयी मी थोडासा साशंक आहे. हा टॅबलेट चांगल्या प्रतिचा असल्यास मला आनंदच होईल. पण मी खरोखरच फारसा आशावादी नाही.

म्हणजे डिझाईन डेव्हलपमेंट हे कंपनीने केले आहे अन आयाटी फिल्ड टेस्टींग करेल. (पुन्हा एकदा आयाटी संदर्भातले जुने तसेच सध्याचे धागे आठवले.)

भारत सरकार अन आयाटी मग उगाचच आपली पाठ थोपटून घेते आहे. सरकारने केवळ मोठी मागणी (बल्क ऑर्डर) दिली (व ही कंपनी तितकीशी नावाजलेली नाही) म्हणून किंमत कमी झालेली आहे तर.

अवांतरः जर ही कंपनी एवढ्या स्वस्त विकते आहे तर खरोखर त्या प्रॉडक्टची खरी किंमत किती कमी असेल. अगदी ५००/६०० रुपये असू शकते.

घाशीराम कोतवाल १.२'s picture

11 Oct 2011 - 12:51 pm | घाशीराम कोतवाल १.२

चला बुवा आपन नोंदणी केली बघु कस आहे ?
गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडुन खाल्ली....

अविनाशकुलकर्णी's picture

10 Oct 2011 - 6:25 pm | अविनाशकुलकर्णी