कट्टा ईन कॅलीफोर्निया

मराठमोळा's picture
मराठमोळा in काथ्याकूट
11 Aug 2010 - 2:31 am
गाभा: 

नमस्कार मंडळी,

पुढच्या आठवड्यात मी सॅन फ्रॅन्सिस्को मधे महिन्या-दोन महिन्यासाठी काही कामानिमित्त येणार आहे, अनायासे ओळखी पाळखीचा धागा निघाला होताच म्हणुन हा प्रपंच. तर आमच्या कंपनीने मला दोन महिन्यासाठी उसा मधे पाट्या टाकण्यासाठी बोलावले आहे, नंतर कदाचित मी एखाद्या वर्षासाठी ऑस्ट्रेलिया ला जाईन.

मग मनात विचार आला की आपल्या बे एरिआमधल्या लोकांना भेटावं, आठवणी सोबत राहतील. :) . एक वीकांत माझ्या काकाच्या घरी (फ्रिमोंट मधे) करण्याचे ठरवुन एखादा वीकांत मिपाकरांसोबत कट्टा करण्याची ईच्छा आहे. श्रावण पाळत नसल्याने कट्टा सामिष+पेयपान असा माझ वैयक्तीक आग्रह. (आय लाईक बार्बेक्यु + व्हिस्की/बीयर) ;)
कट्टा सात्विक असला तरी काहीही हरकत नाही. :)

असो,
तर कॅलिफोर्निया मधल्या मिपाकर बंधु-भगिनींना विनंती आहे की तुमच्या ह्या छोट्या आंतरजालीय मित्राला तुम्हाला भेटण्याची एक संधी द्यावी. :)
वैयक्तीक माहिती द्यायची असल्यास कृपया व्यनी करावा.

( ह्या धाग्यावर खेळीमेळीचे हलके-फुलके विनोद असणारे प्रतिसाद देण्यास कदाचित संपादकांची हरकत नसावी. ) :)

छान अनुभवाच्या अपेक्षेत,
मराठमोळा

प्रतिक्रिया

शुभेच्छा.
वृत्तांत आणि छायाचित्रं जरूर डकवावीत.
मी २००५ मधे रिचमंड ला होते आता सध्या पूर्वेच्या किनार्‍यावर.

बेसनलाडू's picture

11 Aug 2010 - 2:45 am | बेसनलाडू

आल्यावर नक्की संपर्क साधा. व्यक्तिगत निरोप केला आहे.
(कट्टेकरी)बेसनलाडू

बबलु's picture

11 Aug 2010 - 4:33 am | बबलु

अरे वा ! भेटू की.
कट्ट्याला सदैव तय्यार.

(मट्टेकरी) बबलु [लाडूकावळा]

दिपाली पाटिल's picture

12 Aug 2010 - 2:38 am | दिपाली पाटिल

हे हे हे लाडूकावळा...

नाटक्या's picture

11 Aug 2010 - 5:28 am | नाटक्या

फ्रिमाँट म्हणजे आमच्या अगदी गावात येताय. नक्कीच करू कट्टा आणि तुम्ही म्हणता तसा अगदी बार्बेक्यू आणि कॉकटेल सहित...

मराठमोळा's picture

11 Aug 2010 - 11:32 am | मराठमोळा

कॅलिफॉर्निया मधे मिपाकर कमी आहेत की काय?
मला वाटलं होतं १०-१५ नक्की असतील.. :) असो....

बेसनलाडू's picture

11 Aug 2010 - 11:38 am | बेसनलाडू

सगळ्यांनीच प्रतिक्रिया दिल्या नाहीयेत अजून त्यामुळे आकडा कमी वाटतो आहे.
(कमीजास्त)बेसनलाडू

बिपिन कार्यकर्ते's picture

11 Aug 2010 - 12:35 pm | बिपिन कार्यकर्ते

यायचा प्रयत्न करेन..... :D

( ह्या धाग्यावर खेळीमेळीचे हलके-फुलके विनोद असणारे प्रतिसाद संपादकांनीसुद्धा देण्यास कदाचित इतर सदस्यांची हरकत नसावी. ;) )

चतुरंग's picture

11 Aug 2010 - 4:33 pm | चतुरंग

अरे क्यालिफोर्नियाला जातोच आहेस तर इकडे बॉस्टनला एक टप्पा टाकून मलाही घेऊन चल! ;)

(टप्पेकरी)चतुरंग

ब्रिटिश टिंग्या's picture

11 Aug 2010 - 4:39 pm | ब्रिटिश टिंग्या

मा.* संपादक हे असले टप्पे टाकण्याचे धंदे करतात हे पाहुन एक मिपाकर म्हणुन शरम वाटली!

मा = माननीय

म्हणून टाकलेला आहे हे लक्षात येऊ नये ह्याची कीव वाटली! ;)

(संपादक म्हणून टाकलेले टप्पे अदृश्य असतात ह्याची गा.* टिंग्या ह्याने नोंद घ्यावी!)
गा = गावकरी

नंदन's picture

11 Aug 2010 - 1:00 pm | नंदन

बेष्ट हो, राक्याभौ. इथून अंमळ लांब आहे बे एरिया, पण त्या वीकांताला शक्य होत असल्यास जमवण्याचा प्रयत्न करतो. कधीचा ठरतोय बेत? तूही जर कधी दक्षिण कॅलिफोर्नियात (लॉस अँजेलिस/सॅन डिएगो) चक्कर मारणार असशील तर कळव.

ब्रिटिश टिंग्या's picture

11 Aug 2010 - 4:21 pm | ब्रिटिश टिंग्या

नक्की करुयात कट्टा! :)

विनायक प्रभू's picture

11 Aug 2010 - 4:30 pm | विनायक प्रभू

येतो

ब्रिटिश टिंग्या's picture

11 Aug 2010 - 4:32 pm | ब्रिटिश टिंग्या

कळव्यात नाही काय्......उसात आहे कट्टा ;)

ईन्टरफेल's picture

11 Aug 2010 - 8:42 pm | ईन्टरफेल

उसात नाय वो उसाच्या फडात आसल कट्टा माचिस ?

पिवळा डांबिस's picture

11 Aug 2010 - 10:12 pm | पिवळा डांबिस

तुम्ही लोकं तारीख नक्कि करून जाहीर करा...
त्या तारखेला जमलं तर (म्हंजे काकूने सोडलं तर!!!) येईन...

बबलु's picture

12 Aug 2010 - 12:14 am | बबलु

अलभ्य लाभ.

पिवळ्या शेवंती (आय मीन... डांबिसशेठ) :) चे पाय बे एरियाला लागण्याची शक्यता आहे तर. :) :)

बेसनलाडू's picture

12 Aug 2010 - 12:14 am | बेसनलाडू

(स्वागतोत्सुक)बेसनलाडू

क्रेमर's picture

11 Aug 2010 - 10:13 pm | क्रेमर

कट्टयाला शुभेच्छा.

राजेश घासकडवी's picture

12 Aug 2010 - 12:27 am | राजेश घासकडवी

निश्चित भेटू.

बेसनलाडू's picture

12 Aug 2010 - 12:30 am | बेसनलाडू

परवाच्या (गप्पाटप्पा (याला काही लोक उगीचच चर्चा म्हणतात!)+खाद्यपेय)कट्ट्याचा सचित्र वृत्तांत आल्यास मराठमोळ्यास कॅलिफोर्नियातल्या बे एरियातील दंगलखोरांचा चांगला अंदाज येईल, याची यानिमित्ताने घासकडवी गुरुजींना समस्त कट्टेकर्‍यांच्या वतीने आठवण करून देत आहे.
(स्मरणशील)बेसनलाडू

राजेश घासकडवी's picture

12 Aug 2010 - 1:33 am | राजेश घासकडवी

काही तांत्रिक कारणाने फोटो वर चढत नव्हते, आता ते मोकळे झाले असले तरी वृत्तांत लेखन चालू आहे. दरम्यान तुम्हा सर्वांना मी आठवण करून दिली होती तिचं काय झालं? अं अं..?

बेसनलाडू's picture

12 Aug 2010 - 1:45 am | बेसनलाडू

लक्षात राहण्याजोगे/ठेवण्याजोगे जे असेल ते सगळे वृत्तांतात यावेच/येईलच ;)
(स्मरणशील)बेसनलाडू
सचित्र वृत्तांतात काय यावे नि काय येऊ नये याबद्दलचे मत कळवण्याचीच आठवण करून दिली होतीत ना/का गुरुजी?
(विसराळू)बेसनलाडू

>>तुम्हा सर्वांना मी आठवण करून दिली होती तिचं काय झालं?
तिचं म्हणजे कोणाचं ? हे कळले की लगेच कळवू, कसे ?? (ह. घेणे). :) :) :)

राजेश घासकडवी's picture

12 Aug 2010 - 4:03 am | राजेश घासकडवी

तिचं म्हणजे कोणाचं ? हे कळले की लगेच कळवू, कसे ??

काय राव, तुम्ही आम्हाला विचारताय? त्या दिवशी 'सध्या तरी आम्ही बॅचलर' असं नाक वर करून कोण सांगत होतं? हे वेड पांघरून पेडगावला जाणं झालं. असल्या गोष्टी निकोटीनपेक्षा वाईट असतात हे वैनी शिकवतील बरंका... :) येऊ देत त्यांना.

हे क्यालफोर्न्याचे लोक ममोला पार बिघडवुन टाकणार ब्वॉ! ;-)

बबलु's picture

12 Aug 2010 - 1:50 am | बबलु

दोनदा आल्यामुळे प्रकाटाआ.
.

नंदन's picture

12 Aug 2010 - 3:00 am | नंदन

बरीच मंडळी जमणार असं दिसतंय. लाँग वीकेंडनंतरच्या शनिवार/रविवारी जमेल का?

बेसनलाडू's picture

12 Aug 2010 - 3:09 am | बेसनलाडू

तेव्हा गणपती आहे. किती जणांना जमेल शंकाच आहे; पण आम्ही कधीही तयार असतो. बाप्पांच्या पूजेअर्चेचे, जेवणाखाण्याचे जमवून वेळ झाल्यास कट्टा जमवता येईल. मराठमोळे साहेब इतक्या उशीरापर्यंत इकडे असतील की नाही हेही पहावे लागेल.

दिपाली पाटिल's picture

12 Aug 2010 - 9:54 pm | दिपाली पाटिल

तशी बाकी कामं आहेत पण प्रयत्न नक्की करेन...वेळ आणि ठिकाण कळवा... तुम्ही आपले खानदेशातले ना?

मराठमोळा's picture

12 Aug 2010 - 11:40 pm | मराठमोळा

>>तशी बाकी कामं आहेत पण प्रयत्न नक्की करेन...
नक्की या

>>वेळ आणि ठिकाण कळवा...

२७, २८, २९ ऑगस्ट यापैकी कोणतीही तारीख मला चालण्यासारखी आहे. बाकी कट्टेकरी मिपाकरांच या तारखांबद्दल काय मत आहे, कृपया कुणीतरी पुढाकार घेऊन (ऑर्गनायझर होवुन) तारीख नक्की करा.

>>तुम्ही आपले खानदेशातले ना
हो हो मुळ खान्देशच. पण गेल्या तीन पिढ्यांपासुन पुणेकर आहोत. :)

नाटक्या's picture

12 Aug 2010 - 11:48 pm | नाटक्या

शनिवार २८ ऑगस्टच सोईची वाटते (शालीवाहन शके १९३२ श्रावण कॄ. चतुर्थी, पण त्या दिवशी चतुर्थीही आहे आणि श्रावणी शनिवार सुध्दा सुरू आहे तेव्हा ) किती लोकांना चालेल? मी कोणत्याही दिवशी काहीही खातो आणि पितो, आपल्याला काय बी प्राब्लेम न्हाय!!.

बेसनलाडू's picture

12 Aug 2010 - 11:58 pm | बेसनलाडू

असल्याने कट्टास्पेशल नेहमीचे खाणे-पिणे मला (आणि माझ्या बेटर हाफ ला) चालायचे नाही. संकष्टीला संकष्टीपेश्शल लागते ;)
(गणेशभक्त)बेसनलाडू
रविवार २९ ऑगस्ट तारीख नक्की झाल्यास कट्टास्पेशल खाण्यापिण्याची मजा लुटता येईल.
(पर्यायसूचक)बेसनलाडू

नाटक्या's picture

13 Aug 2010 - 2:27 am | नाटक्या

२९ ला करून टाकू च्याXXX, हाय काय नं नाय काय!!!

मराठमोळा's picture

13 Aug 2010 - 12:02 am | मराठमोळा

>>शालीवाहन शके १९३२ श्रावण कॄ. चतुर्थी, पण त्या दिवशी चतुर्थीही आहे आणि श्रावणी शनिवार सुध्दा सुरू आहे तेव्हा
बापरे!!!
नाटक्याशेट,
पण त्यावेळी भारतीय वेळेनुसार रविवार सुरु झालेला असेल ना? :P

>>मी कोणत्याही दिवशी काहीही खातो आणि पितो, आपल्याला काय बी प्राब्लेम न्हाय!!.
एक नंबर. आपल्याला बी काय बी प्रॉब्लेम नाय. ;)

मुक्ता's picture

13 Aug 2010 - 3:52 am | मुक्ता

शनिवार २८ ऑगस्ट, संकष्टी चतुर्थी आहे. बे एरियात साह्त्रावर्तन आहेत. रविवार २९ ऑगस्ट चालेल