आमच्या मार्लिसकाकू हानोफरच्या, त्यांच्याकडे कॉफीला गेलो असताना त्यांनी हा फर्मास केक केला होता. इतका अलवार केक होता की लग्गेच त्यांच्याकडून पाकृ घेतली आणि घरी आल्यावर प्रात्यक्षिके झालीच.
अदितीबै दुर्बिटणे येथे आल्या असताना हाच केक केला होता.
साहित्य-
२५० ग्राम पिठीसाखर, ५ अंडी, २ चमचे वॅनिला अर्क, १/४ लिटर आयर लिक्युअर (एग लिक्युअर),
१/४ लिटर तेल/बटर (मी बटर वापरले परंतु मार्लिसकाकूंनी तेल वापरुन केलेला केकही अप्रतिम होता.)
१२५ ग्राम मैदा, १२५ ग्राम आरारुट/पोटॅटो स्टार्च, ४ चहाचे चमचे बेकिंग पावडर,चिमूटभर मीठ
कृती-
पीठीसाखर,अंडी, वॅनिला अर्क एकत्र करणे व भरपूर फेटणे. त्या मिश्रणात २५० मिली एग लिक्युअर, २५० मिली तेल किवा २५० ग्राम बटर पातळ करुन घालणे व हलक्या हाताने फेटणे.
मैदा+ बेकिंग पावडर+ पोटॅटो स्टार्च एकत्र करणे, त्यात चिमूटभर मीठ घालणे व हे एकत्र करुन वरील मिश्रणात घालणे.
१७५ अंश से. वर ३० मिनिटे बेक करणे व नंतर १५० अंश से वर २५ ते ३० मिनिटे बेक करणे.
विणायची सुइ किवा सुरी केकच्या पोटात खूपसून पाहणे जर मिश्रण चिकटले नाही तर केक झाला आहे असे समजावे.
केक झाला असला तरीही ३/४ मिनिटे तो अवनमध्येच राहू देणे.
नंतर जाळीवर काढून घेणे व गार झाल्यावर तुकडे करणे.
प्रतिक्रिया
13 Jul 2010 - 10:43 pm | केशवसुमार
कशी आहे हे चव घेतल्या शिवाय सांगणार नाही..
(सुचक)केशवसुमार
अदितीबै दुर्बिटणे येथे आल्या असताना हाच केक केला होता.
हा उल्लेख केला नसता तरी चाल्ले असते असे वाटून गेले..;)
(जळका)केशवसुमार
14 Jul 2010 - 9:34 am | छोटा डॉन
केसुशेठशी सहमत.
ह्याहुन अधिक काही बोलण्यासारखे रहात नाही ;)
केकचा फोटो मात्र दिसला नाही ;)
काही प्रॉब्लेम आहे का ?
------
छोटा डॉन
14 Jul 2010 - 9:57 am | Nile
आम्हाला तर लेखच दिसत नाहीए तर फोटो कुठुन दिसणार?
-Nile
14 Jul 2010 - 12:15 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
केक अतिशय सुंदर, चविष्ट आणि =P~ yummy होता. माझंच दुर्दैव की मी स्वातीताईकडे पोहोचल्यावर लगेचच तो चाखला नाही. मी याचा संपूर्ण दोष, अगदी कोकणस्थांना लाज वाटेल येवढे, गोऽडमिट्ट केक्स खायला घालणार्या डचांना देते. पण आमच्या (वर्षानुवर्षांच्या ;-) ) मैत्रीला जागून स्वातीताईने तो केक दुसर्या दिवशीच काढला ... स्वातीताई इन अॅक्शनः
अर्थात, केक खाताना फोटो काढण्याची आठवण कशी होणार?
स्वातीताई, केक अगदी मस्त होता ... फार गोड, चिकट, तेलकट नाही ... अगदी बरोब्बर ... अगदी एवढा मस्त केक होता की मिपा माझ्या मालकीचं असतं तर लगेच तुला देऊनच टाकलं असतं. ;-)
ज्यांना हा फोटो आणि रेसिपी दिसत नाहीये त्यांनी त्यांचे चष्मे बदलायची वेळ आली आहे!
अदिती
13 Jul 2010 - 10:49 pm | चतुरंग
आता मला शेंगेन वीसा मिळाल्याचाच व्यनि तुम्हाला येईल याची खात्री बाळगा!! :B
(चातक)चतुरंग
13 Jul 2010 - 10:51 pm | प्रभो
मस्तच!!!
14 Jul 2010 - 2:08 am | गणपा
=P~ =P~ =P~ =P~ =P~ =P~ =P~ =P~
14 Jul 2010 - 2:33 am | रेवती
मार डाला!
फोटू भारी!
या वेळी साहित्य थोडं वेगळं आहे.
म्हणजे बटर ऐवजी तेल चालतय, किंवा आरारूट वगैरे.
केक तर मस्तच दिसतोय!
रेवती
14 Jul 2010 - 9:26 am | दिपाली पाटिल
छान आणि मस्त फ्लफी दिसतोय केक...
दिपाली :)
14 Jul 2010 - 9:29 am | सहज
केकावली!
स्वातीताईच्या केक पाकृचे एक पुस्तक निघेल आता!
14 Jul 2010 - 9:44 am | ऋषिकेश
वा! ही केकची 'केका' आवडली ;)
अवांतरः जंगलात मोर नाचला याचं कहिच दु:ख नसतं हो.. पण तिथले हौशी पर्यंटक त्या मोराचे फोटो काढातात.. मी मोर पाहिला म्हणून इतरांसमोर येऊन स्वतःच नाचतात.. चिडवतात.. मग मात्र तो मोर न पाहिलेल्यांना, मोराचा फोटो बघुन सुखावण्यापेक्षा तो आपण न पाहिल्याचेच दु:ख होते.. माझ्यसारखे ;) आता एकदा फ्राफ्रूच्या जंगलात गेलेच पाहिजे :P
ऋषिकेश
------------------
माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: खट्टा मिठा
14 Jul 2010 - 12:22 pm | श्रावण मोडक
आह्ह... मित्रा, अवांतरातील मुख्य प्रतिसाद वाचून काढला. बास्स. नेमके लिहिलेस आणि तेही अगदी सहज हजरजबाबीपणे.
हे स्वादि(ष्ट) धागे आम्ही वाचत(च) राहू. तुम्ही लिहित रहा!
14 Jul 2010 - 1:04 pm | विसोबा खेचर
सुंदर पाकृ..
14 Jul 2010 - 9:43 pm | बोका
स्वातीताई,
आयर लिक्युअर (एग लिक्युअर) हा काय प्रकार आहे ?
15 Jul 2010 - 11:18 am | स्वाती दिनेश
एगलिक्युअर- अंडंमद्य :)
हे अंडे+ साखर+ ब्रँडी यांचे साधारण कस्टर्डच्या पोताचे असते.
उगम- सुरीनाम मधील डच.
अधिक माहितीसाठी-
http://en.wikipedia.org/wiki/Advocaat
स्वाती
15 Jul 2010 - 11:39 am | पिवळा डांबिस
आमच्या इकडे अंडं अगदी म्हणजे अगदीच चालत नाही....
तुमच्याकडे शाकाहारी नाही का काहीसं?
:)
15 Jul 2010 - 8:19 pm | Nile
शी बाई, अंड घालता तुम्ही केकात! नकोच ब्वॉ मग! ;)
-निळा कोल्हा
-Nile
15 Jul 2010 - 8:42 pm | यशोधरा
बरं झालं एक खाणारं तोंड कमी झालं! मला पाठव गं केक स्वातीताई :)
15 Jul 2010 - 1:04 pm | जागु
स्वाती मस्तच मला तर केकचा वासपण येतोय गोड.
15 Jul 2010 - 3:34 pm | स्वाती२
व्वा! मस्तच!
15 Jul 2010 - 11:46 pm | नंदन
एग्-झिलरेटिंग :)
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
7 Aug 2010 - 9:25 pm | ललिता
हॅलो स्वाती :)
आताच बेक केला केक.... अप्रतिम रेसिपी.....
"Ein herrlich feuchter Kuchen!"
7 Aug 2010 - 9:35 pm | स्वाती दिनेश
आता धागा वर आलाच आहे तर धन्यवादवून घेते सर्व खवय्यांना,:)
तेव्हा सर्वांनो, मनापासून आभार!
आणि ललिताताई, फोटू कोठे आहे?
स्वाती
8 Aug 2010 - 1:03 am | ललिता
मला जमत नाही ग फोटू वगैरे.... किंवा आळशी आहे त्याबाबतीत :(