पालक पनीर कोफ्ता करी
कोफ्त्यासाठी साहित्य : पालक दोन गड्ड्या, दोन हिरव्या मिरच्या, ७-८ पाकळ्या लसूण, तीन टेबलस्पून कॉर्नफ्लोअर, मीठ चवीनुसार, पनीर - १५० ग्रॅम, तळणासाठी तेल.
From Drop Box
ग्रेव्हिसाठी साहित्य : आलं १ इंच, लसूण ५-६ पाकळ्या, दोन हिरव्या मिरच्या, २ कप टोमॅटो प्युरी, ३ टेबल स्पून तेल, चार हिरवे वेलदोडे, सहा लवंगा, एक तमालपत्र, १ टेबल स्पून लाल तिखट, १ टी स्पून गरम मसाला, मीठ चवीनुसार, १ टी स्पून कसुरी मेथी, फ्रेश क्रीम १/२ कप
कृती :-- एका पातेल्यात टोमॅटो बुडतील एवढे पाणी घेऊन उकळावे. त्या उकळत्या पाण्यात टोमॅटो घालून १० ते १५ मिनिटे उकळावे. ग़ॅस बंद करून १० मिनिटे तसेच ठेवावे. नंतर टोमॅटोची साले काढून मिक्सरमध्ये फिरवून त्याची प्युरी करून घ्यावी.
From Drop Box">
आलं, लसूण पेस्ट करून घ्यावी. हिरवी मिरची बारीक चिरून घ्यावी.
पालकाची पाने काढून स्वछ धुवून घ्यावीत. दुस-या पातेल्यात पाणी उकळून त्यात पालकाची पाने घालावीत. २ ते ३ मिनिटे तशीच ठेवून नंतर एका चाळणीत काढून घ्यावीत. त्यावर लग़ेचच गार पाणी घालावे म्हणजे पानांचा रंग तसाच राहतो. पाणी निथळल्यावर पालक बारीक चिरून घ्यावा. लसूण बारीक चिरून घ्यावा. नंतर एका बाउलमधे चिरलेला पालक घेउन त्यात चिरलेली मिरची, चिरलेला लसूण आणि कॉर्नफ्लोअर घालून मळून घ्यावे. त्याचे एकसारखे भाग करून घ्यावे.
From Drop Box
पनीर किसून त्यात चवीपुरते मीठ घालून मळून घ्यावे. त्याचे छोटे गोळे करून घ्यावे.
From Drop Box
पालकाची पारी करुन त्यात पनिरचा गोळा घालून बंद करावे.
From Drop Box
अशाप्रकारे तयार झालेले कोफ्ते तळून एका प्लेटमधे ठेवावेत.
From Drop Box
नंतर एका कढईत तेल गरम करुन त्यात तमालपत्र, वेलदोडे आणि लवंगा घालाव्यात. नंतर आलं, लसूण पेस्ट घालून परतून घ्यावे. चिरलेली हिरवी मिरची घालून परतावे.
From Drop Box
नंतर त्यात टोमॅटोची प्युरी घालावी. लाल तिखट घालावे. गरम मसाला, मीठ आणि एक कप पाणी घालून ढवळून १० मिनिटे उकळावे.
From Drop Box
गॅस बंद करुन कसुरी मेथी घालून १० मिनिटे तसेच ठेवावे. नंतर त्यात क्रीम घालावे. ग्रेव्ही तयार झाली.
From Drop Box
वाढायच्या वेळी बाउलमधे आधी ग्रेव्ही घालावी. कोफ्ते दोन भाग करून घालावे. कोफ्ते घातल्यानंतर पुन्हा गरम करू नये.
From Drop Box
(पाककृती- सौ.ज्योती पळसुले. फोटो- चिंतामणी पळसुले.)
प्रतिक्रिया
7 Aug 2010 - 5:46 pm | पुष्करिणी
वा वा, लज्जतदार ,चविष्ट दिसतेय एकदम; आणिपनिर एकदम विकपॉइंट आहे . करून पहायला हवी लवकरच..
7 Aug 2010 - 5:48 pm | मदनबाण
चिंतामणीराव... अहो पनिर पाकृ म्हणजे आपला लयं जिव्हाळ्याचा इषय !!!
पाकॄ वाचली नाही;नव्हे वाचण्याची गरज नाय कारण,फोटुच सर्व काही सांगुन जात आहे... :)
(पनिर प्रेमी)
7 Aug 2010 - 5:53 pm | परिकथेतील राजकुमार
वाह एकदम हिरवीगार पाकॄ.
ज ह ब र्या !!
7 Aug 2010 - 6:02 pm | मीनल
उकळत्या पाण्यातल्या टोमॅटोचा फोटो काय मस्त आहे.
ही पाकृ संजिव कपूरची सिग्नेचर डिश आहे.
7 Aug 2010 - 6:16 pm | मितान
लाजवाब डिश दिसतेय.. नक्की करून बघणार. :)
7 Aug 2010 - 6:32 pm | परिकथेतील राजकुमार
चालेल तुम्ही नुसतीच बघा. खायला आम्हाला बोलवा ;)
7 Aug 2010 - 6:44 pm | वेताळ
असली डिश बनवायला काही हरकत नसावी.
आता सोमवार पासुन अश्या शाकाहारी डिश अजुन येवु द्या.
7 Aug 2010 - 6:46 pm | चित्रा
छान पाककृती आहे!
दिसतेयही खास.
7 Aug 2010 - 7:53 pm | गणपा
पाकृ आणि फोटो दोन्ही जबरा!!!!
7 Aug 2010 - 9:20 pm | स्वाती दिनेश
पाकृ आणि फोटो दोन्ही जबरा!!!!
हेच म्हणते,
स्वाती
8 Aug 2010 - 5:47 am | सहज
पाकृ आणि फोटो दोन्ही जबरा!!!!
हेच म्हणतो
8 Aug 2010 - 6:13 am | बेसनलाडू
(सहमत)बेसनलाडू
7 Aug 2010 - 9:38 pm | बहुगुणी
पाहूनच भूक लागली राव! साहित्य आणून करेपर्यंत धीर नाही, आता जवळपास कुठे मिळते का पहायला हवं!
(त्या टोमॅटो प्युरीचा रंग नंतर एकदम ब्राऊन कशाने झाला? कसूरी मेथीमुळे का?)
8 Aug 2010 - 11:34 am | चिंतामणी
त्यात क्रिम मिसळ्यावर रंग बदलतो. (लाल छटा कमी होते)
8 Aug 2010 - 1:07 am | प्रभो
मस्त!!
8 Aug 2010 - 6:49 am | रेवती
मस्त, छान, भारी!!!
पायरीपायरीने केलेले मार्गदर्शन आवडले.
पांथस्थ साहेबांची आठवण आली.
बर्फाच्या पाण्यातले टोमॅटोज छान दिसताहेत.
दिपालीने अशीच पाकृ दिली होती वाटते.
नक्की आठवत नाही.
8 Aug 2010 - 11:44 am | शानबा५१२
अव्वल!!!!!!!!
पण पालकातले सत्व पार निघुन जाणार!
8 Aug 2010 - 12:01 pm | अर्धवट
उत्तम
8 Aug 2010 - 4:49 pm | अवलिया
काय बोलु?
8 Aug 2010 - 7:23 pm | अरुंधती
सह्ही आहेत फोटो! पनीर + पालक कोफ्ते x टोमॅटो प्युरी + क्रीम = खाद्यसमाधी!! :-)
9 Aug 2010 - 10:47 am | मनि२७
पाकृ साठी खूप मेहनत घेतलेली दिसतेय....
bowls पण छान आहेत(काचेचे...) आणि फोटो पण...
झाक्क्क्कास्स्स photography आणि पाकृ सुद्धा...!!!!
मनि..
9 Aug 2010 - 10:58 am | sneharani
मस्त पाककृती...!
करून बघायलाच हवी!
9 Aug 2010 - 4:01 pm | झक्कास...
पालक पनीर चा वेगळा प्रकार दिसतोय.
खाण्यालायक असेल तर सांगा.
भन्नाट दिसत आहे
6 May 2011 - 12:15 pm | डावखुरा
ओ काका लय भारी पाककृती दाखवलीत....
आईची डोकेदुखी आता वाढणारे...
.
6 May 2011 - 11:55 am | डावखुरा
प्रकाटाआ