गाभा:
अगदी अलीकडेच दहावी बारावीच्या परीक्षा संपल्या. या परींक्षांदरम्यान चालणाय्रा कॉपी प्रकाराकडे पाहीले की परीक्षा नेमक्या कशासाठी घेतल्या जात असतात याबाबत संभ्रम निर्माण होतो. कित्येक ठिकाणी परिक्षाकेंद्रावर शिक्षकच यात सामिल असतात. तसे करण्यास त्यांनी नकार दिला तर त्यांना अनेक जीवघेण्या धमक्यांना सामोरे जावे लागते हे मी अगदी जवळुन अनुभवले आहे. अशा परीक्षांनी नेमके कुणाचे व कसे भले होणार आहे हे कितीही काथ्याकुट केला तरी समजत नाही. हे सर्व थांबविण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवा असे कितीही वाटले तरी आपण काहीच करु शकत नाही ही भावना किती भयंकर असते नाही?
प्रतिक्रिया
28 Apr 2008 - 2:54 pm | कलंत्री
भावनाताई,
या विषयावर या वर्षी आपल्याला काम करायचे आहे. कॉपी अथवा "स्वाध्याय शत्रुत्व स्पर्धा" मराठीला रसतळास नेईल याबद्दल शंका नाही.
आपल्या भावनेला आणि चिंतेला एखाद्या कृतीचे स्वरुप द्या. सर्व सहकार्य नक्कीच मिळेल.
मिसळपाववर हा विषय पाहुन बरे वाटले.
आपला,
द्वारकानाथ कलंत्री
4 May 2008 - 1:10 am | श्रीमंतपेशवे
या परींक्षांदरम्यान चालणाय्रा कॉपी प्रकाराकडे पाहीले की परीक्षा नेमक्या कशासाठी घेतल्या जात असतात याबाबत संभ्रम निर्माण होतो.
भावना तुमच्या विचारांशी मी अगदी सहमत आहे.
आजकाल सर्वच ठिकाणी नकलांचे प्रमाण बोकाळले आहे. परिक्षाकेंद्रात दादागिरी करणार्यांचे आताशा खुपच फावते आहे.
शिक्षक स्वताच्या बचावासाठी या दादागिरीला बळी पडु लागले असतील तर परिक्षापध्दतीतील हवा निघुन जाईल.
या विषयाला मिसळपाव मधुन वाचा फोड्ल्याबद्द्ल अभिनंदन!
विषयाला थांबवु नका पुढील अनुभव लिहा.
4 May 2008 - 8:09 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पदवीच्या परीक्षेसाठी एका सेंटरवर चीफ ( सहकेंदसंचालक ) म्हणुन एका गावात गेलो होतो.
आम्ही नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांची झडती घेतो,सर्व नकला काढून घेतो. तरी काही ना काही शिल्लक राहतेच.
(विद्यार्थीनी अशा वेळेस विद्यार्थीमित्रांसाठी धावून येतात. )
खरे तर वर्गावरील पर्यवेक्षकाने ठरवले तर नकला होऊच शकत नाही. या वेळेस पहिल्यांदा विविध राजकीय संघटना आम्हाला भेटण्यासाठी आल्या आणि ग्रामीण भागातील महाविद्यालय आहे, तेव्हा फार टाइट करु नका असे धमकावण्याचा प्रयत्न केला. अर्थात आम्ही भीक घातली नाही तो भाग सोडुन द्या !!!
पण नकलांचे प्रमाण चिंताजनकच आहे. विद्यार्थी परीक्षेला जातांना अपेक्षीत खरेदी करतो आणि थेट परीक्षागृहात जातो.
पाने फाडण्याची सुद्धा तसदी तो घेत नाही. असो.......याला अनेक घटक जवाबदार आहेत. पण नकलांचे प्रमाण कमी व्हायलाच पाहिजे असे वाटते.
4 May 2008 - 7:23 pm | कुंदन
पुर्ण शिक्षणपध्दतीचीच गोची करून ठेवली आहे शिक्षण सम्राटांनी.....
(शिक्षणपध्दतीची काळजी वाटणारा ...)
कुंदन
4 May 2008 - 8:56 pm | वाचक
नक्कल होते ह्याचे कारण त्या एकाच दिवसाच्या उत्तरांवर संपूर्ण वर्षाचे भवितव्य अवलंबून ठेवणे हे होय
पाश्चात्य देशात (किंवा भारतातील IIT, IIM) , सर्व वर्षातील विविध प्रकारच्या चाचण्या, तोंडी परिक्षा, गृहपाठ ह्या सगळयांचा विचार अंतिम गुणतालिकेत केला जातो. म्हणूनच कुठल्याही एका परिक्षेत नक्कल करुन फारसा काहीच फायदा होत नाही.
म्हणून नक्कल टाळण्यासाठी मूलभूत बदल होणे गरजेचे आहे.