गोंयाचो आणिक महाराश्ट्राचो पयलेसान घनिश्ट संबंद आसा. गोंयाचेर पोर्तुगालान राज केले तरी गोंयांत कोणी "म्हाराज" म्हळे, जाल्या कोणूय शिवाजी म्हाराजूत सजमता. खंयच्याय देवळाची जत्रा आसली तर नाटक केन्नाय शिवाजी म्हाराजाचेच आसता. गोंय आणिक कोकण किते विंगड नात.
गोंयान महाराश्ट्राक कितले कलाकार दिलेत, मेजपाक गेल्यार बुकां भरतली. बाकीबाब बोरकर घेयात, ना जाल्या दिनानाथ मंगेशकर घेयात. महाराश्ट्रांतल्या जायत्या लोकांचे देव गोयांत आसात.
गोंय मुक्त करपाचे सत्याग्रह महाराश्ट्रासान येताले. गोंय मुक्त जाले तेन्ना वीस वरसां गोयांत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे सरकार लोकान वेचून दिले. मगो सरकारान गोंय महाराश्ट्रांत विलीन करपाचो प्रयेत्न केलो. मात ताका यश मेळूं ना. राजकारणाचे तुमी-आमी कितें घेवप?
मिसळपाव वाचपी लोकांक म्हजो हो जाब - गोंय, ताजी संस्क्रुती, ताजी भास, तुमका आपली दिसता मूं? ही संस्क्रुती एक अशे तुमका दिसता काय विंगड म्हणून दिसता?
प्रतिक्रिया
30 Apr 2008 - 6:02 am | नंदा प्रधान
बाबारे आमाला समजल असं काहीतरी लिव की!
30 Apr 2008 - 6:38 am | पिवळा डांबिस
गोंय, ताजी संस्क्रुती, ताजी भास, तुमका आपली दिसता मूं?
आरे पापयां, दिसता रे दिसता!
अरे गोंय म्हळ्यार किते समजोली रे ही लोकां!!
त्या भाऊसायब बांदोडकरान किती प्रयत्न केले म्हणान सांगू तुका! पण मतदानान, शिंदळीच्यान, सालो घात केलो रे...:(
आंवशीक खावंक व्हरान, अरे आसां म्हणतत की इगर्जींतून हुकूम गेले की रे की सेपरेट स्टेट ठेवूक व्हयां. आमची लोकां निजान रवली रे...:(
दुख्खी:
पिवळो डांबिस
30 Apr 2008 - 11:54 am | सुनील
त्या भाऊसायब बांदोडकरान किती प्रयत्न केले म्हणान सांगू तुका! पण मतदानान, शिंदळीच्यान, सालो घात केलो रे...
आंवशीक खावंक व्हरान, अरे आसां म्हणतत की इगर्जींतून हुकूम गेले की रे की सेपरेट स्टेट ठेवूक व्हयां. आमची लोकां निजान रवली रे...
दुख्खी:
सेपरेट स्टेटचा श्रेय जाता जॅक सिक्वेराक. साष्टीकारांनी भरभरून मते दिली आनि उत्तर गोंयकार रावले निजून ... सुशेगाद !!!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
30 Apr 2008 - 8:33 am | मुक्तसुनीत
तुमची भाषा मला बोलता येत नाही , पण तुम्ही लिहीलेला शब्द नि शब्द समजला.
गोंय, ताजी संस्क्रुती, ताजी भास, तुमका आपली दिसता मूं? ही संस्क्रुती एक अशे तुमका दिसता काय विंगड म्हणून दिसता?
अहो , हे काय विचारणे झाले का ? गोव्याची संस्कृती नि भाषा यात आपलेपणा न दिसला तरच नवल ! गोव्याकडच्या कितीतरी गोष्टी आहेत , माणसे आहेत , संगीत आहे , काव्य आहे , दैवते आहेत ज्यांनी महाराष्ट्राला शताकानुशतके समृद्ध केले आहे. गोवा नि महाराष्ट्र ही भावंडेच ! या मधे जरासुद्धा किंतु नको !
30 Apr 2008 - 8:44 am | प्रभाकर पेठकर
गोव्याकडच्या कितीतरी गोष्टी आहेत , माणसे आहेत , संगीत आहे , काव्य आहे , दैवते आहेत, पाककृती आहेत ज्यांनी महाराष्ट्राला शताकानुशतके समृद्ध केले आहे.
30 Apr 2008 - 9:09 am | मुक्तसुनीत
तुम्ही आहात खरे दर्दी ! :)
30 Apr 2008 - 8:40 pm | धनंजय
दिवाळिएन एक दिस सगळे जेवण फोवांचे करतात. फोडणी-फोव, दूद-फोव, नाल्ल-फोव... कितलेशे माका यादऊय येना. तुका ताजो क्रिती येता जाल्या दी - उपकार जाताले.
कोकणी जेवण रुच्चीक, नी?
30 Apr 2008 - 9:58 am | मदनबाण
गोव्याची संस्कृती नि भाषा यात आपलेपणा न दिसला तरच नवल ! गोव्याकडच्या कितीतरी गोष्टी आहेत , माणसे आहेत , संगीत आहे , काव्य आहे , दैवते आहेत ज्यांनी महाराष्ट्राला शताकानुशतके समृद्ध केले आहे. गोवा नि महाराष्ट्र ही भावंडेच ! या मधे जरासुद्धा किंतु नको !
अगदी हेच म्हणतो....
(फेणी ची चव कशी असते) या विचारात पडलेला.
मदनबाण
30 Apr 2008 - 9:04 am | चतुरंग
गोवा आणि महाराष्ट्राच्या संबंधांवर मला एक शीघ्रकाव्य स्फुरले -
गोव्याच्या मातीत| कलाही आहेत|
भरुन वहात| कणांकणां||
नाटक वा गाणे| 'मंगेशा'चे देणे|
आपण ते घेणे | सर्वथैव||
कविताही सार | 'बाकीबाब' थोर|
इतरही फार | कवीगण ||
शिल्प किंवा चित्र | वाटते पवित्र|
कलाकार मित्र | जन्मा येती||
महाराष्ट्र्-गोवा | बंधुभाव हवा |
जपून ही ठेवा | रत्नखाण ||
चतुरंग
30 Apr 2008 - 9:06 am | मानस
फारच सुरेख ......
30 Apr 2008 - 9:10 am | मुक्तसुनीत
ऐसेचि म्हणितो.
30 Apr 2008 - 8:41 pm | धनंजय
सोबीत पदां
+१
30 Apr 2008 - 10:09 am | विसोबा खेचर
वा रंगा,
सुरेख कविता...!
तात्या.
30 Apr 2008 - 9:17 am | चित्रा
हे पण प्रमाणभाषेसंबंधी का?
अवांतर - विंगडचा अर्थ बघू गेले तर मायक्रोसॉफ्टचे हे पान मिळाले!
http://www.microsoft.com/downloads/render.aspx?displaylang=kok&content=help
30 Apr 2008 - 9:34 am | विकास
मला कोकणी ऐकायला आवडते. पण वाचायलापण (आज) आवडली. तुमच्या (आपल्या - म्हणजे आमच्यापण) गोव्याच्या संगीत कला अकादमीच्या एका छान तब्बलजींची दोन आठवड्यांपूर्वी गाठ पडली होती. त्यांचे उत्तम तबलावादन हे दुसरे मूळचे गोवेकर - पं. प्रभाकर कारेकरांना साथ देण्यासाठी होते.
बा़की असेच लिहीत जा... फक्त कोकणीत कविता वगैरे सावकाशीने करा... घाई नाही! :-)) (ह. घ्या.)
30 Apr 2008 - 9:37 am | मुक्तसुनीत
....यांचा थोडा परिचय करून दिलात तर उत्तम होईल. या भाषेमधे कसल्या कसल्या साहित्यिक परंपरा आहेत , कसकशा प्रकारचे लिखाण झाले/होते वगैरे गोष्टी ऐकायला आवडेल.
30 Apr 2008 - 11:33 am | आनंदयात्री
लेख सुंदर, वेगळा, आवडला.
धनुदादाने कोकणी साहित्याची ओळख करुन द्यावी असे वाटते.
कोकणी मधे लिहल्यावर सर्वसामान्य मराठी माणसाला समजणार नाहीत अशा शब्दांचे अर्थ खाली एका सुचीमधे द्यावेत असेही वाटले. (उदा. विंगड)
30 Apr 2008 - 9:47 am | विसोबा खेचर
सुरेखच लिहिलं आहेस...साला, आपल्याला पण गोवा लै आवडतं!
तुझ्या या लेखामुळे कधी काळी एका मैत्रिणीसोबत तीन दिवस कलंगुट बीचवर राहिलो होतो ते सुंदर दिवस आठवले! मस्तपैकी कलंगुट बीच, सकाळ संध्याकाळ मासळीचं जेवण, उंची मद्य! साला खूप मजा आली होती! त्या तीन दिवसात साला आपण 'जिवाचं गोवा' केलं होतं! :)
अजूनही असेच कोकणी भाषेच्या गोडीतले लेख येऊ द्यात. खूप मौज वाटते वाचायला. साला, बोलीभाषेची गोडी काही औरच! :)
आपला,
तात्या मंगेशकर.
30 Apr 2008 - 2:43 pm | प्रभाकर पेठकर
कधी काळी एका मैत्रिणीसोबत तीन दिवस कलंगुट बीचवर राहिलो होतो
एका नवीन लेखाची बीजे ह्या वाक्यात आहेत. वाट पाहू....
1 May 2008 - 6:14 am | विसोबा खेचर
एका नवीन लेखाची बीजे ह्या वाक्यात आहेत. वाट पाहू....
हा हा हा! सवडीने ती ष्टोरीही लिहीन.... :))
आपला,
(गोव्यात यथेच्छ मौजमजा केलेला) तात्या.
30 Apr 2008 - 11:34 am | विसुनाना
गोव्याच्या कोंकणी बोलीभाषेतला हा लेख आवडला. ;)
असेच येऊ द्या.
अवांतर :
माझे वडील अनेक वर्षांपूर्वीची तीनचार वर्षे गोव्यात नोकरीला होते. तेंव्हाचा प्रसंग. भाषेशी संबंधित आहे म्हणून देतो-
ते प्रथमच तिथल्या खानावळीत गेले असता त्यांना 'निस्त्याक की शिवराक' या प्रश्नाला तोंड द्यावे लागले.
त्यांनी विचार केला की 'निस्त्याक' म्हणजे नुस्ते आणि 'शिवराक' म्हणजे शिवराळ असे असावे.
(पर्यायाने निस्त्याक म्हणजे शाकाहारी आणि शिवराक म्हणजे मांसाहारी असे ते समजले.)
(जातधर्म म्हणून नव्हे तर खिशाला परवडेल म्हणून) त्यांनी निस्त्याक सांगितले आणि समोर आली ती सुरमई!
त्या दिवसापासून गोव्यात ते कधीच शिवराळ/क जेवले नाहीत.
नुस्ते निस्त्याकच निस्त्याक! :)
30 Apr 2008 - 11:16 pm | भावना
गोवा ! फारच सुंदर ठिकाण.
आम्ही आत्ता एक महिन्यापूर्वी च जाउन आलो. धमाल मजा आली भटकायला !
सोबत एक विनोदी अनुभवही आला. बागा बीचजवळील एका हॉटेलात उतरलो होतो .
सगळीकडे मजा आली पण खाण्याचे तुफान हाल झाले. आम्ही पड्लो शाकाहारी त्यात पाण्याविना इतर
पेय कुणाला चालत नाही .मग काय कोणत्याच हॉटेलात आमची ऑर्डर लवकर पूर्ण करण्यार आली नाही.
आमच्या मागुन आलेले कितीतरी जण पित व नंतर खात बसायचे. आम्ही मात्र.........
म्हणुन म्हणावे वाटते,
'प्यावे' त्याने निश्चित गोव्याला जावे . आणि न प्यावे त्याने ....
ते तुम्हीच ठरवा !!!
1 May 2008 - 3:01 am | पिवळा डांबिस
गोव्याची मजा लुटायला आपण मांसाहारी वा 'पिणारा' असण्याची अजिबात जरूर नाही...
सगळीकडे मजा आली पण खाण्याचे तुफान हाल झाले. आम्ही पड्लो शाकाहारी त्यात पाण्याविना इतर
पेय कुणाला चालत नाही .मग काय कोणत्याच हॉटेलात आमची ऑर्डर लवकर पूर्ण करण्यार आली नाही.
आमच्या मागुन आलेले कितीतरी जण पित व नंतर खात बसायचे. आम्ही मात्र.........
भावनाजी, हा तुमचा वैयक्तिक अनुभव असल्याने आम्ही त्याचा आदर करतो. कारण वैयक्तिक अनुभवावर असहमत होण्याचा प्रश्नच नसतो.
म्हणुन म्हणावे वाटते,
'प्यावे' त्याने निश्चित गोव्याला जावे . आणि न प्यावे त्याने ....
ते तुम्हीच ठरवा !!!
याच्याशी मात्र असहमत!!
गोव्याची फेणी प्रसिद्ध आहे आणि इतरही मदिरा तिथे (एक्साईज टॅक्स नसल्याने) मुंबई-पुण्यापेक्षा स्वस्त मिळते हे खरे आहे. पण 'न पिणार्याने' गोव्याला जाण्यापूर्वी विचार करावा असा अर्थ तुमच्या वरील वाक्यांतून ध्वनित होत आहे. हे तितकेसे खरे नाही. गोव्यात सर्वत्र पाणी मुबलक मिळते. इतर सर्व सॉफ्ट्-ड्रिंक्सही मिळतात. स्थानिक सोडा घालून केलेले लिंबू-सरबत ही तर गोव्याची खसियत आहे हे तुम्हाला माहिती दिसत नाही. अहो गोव्यात लाखो लहान मुले आणि हिंदू स्त्रिया रहातात, ते सर्व काय 'पिणारे' असतात काय?
तीच गोष्ट मांसाहाराची! गोव्यात मासळी चांगली मिळते यात दुमत नाही. पण अगदी बांद्यापासून ते थेट मडगांवपर्यंत सर्वत्र शाकाहारी अन्न मिळते! अहो गोव्याच्या फणसाच्या, वालीच्या शेंगांच्या आणि भोपळ्याच्या फुलांच्या भाज्यांचा तर जवाब नाही. गोव्यांत अनेक शाकाहारी ब्राम्हण पिढ्यानपिढ्या रहातात व ते मांसाहार करीत नाहीत हो...
गोव्यात असंख्य मोठी-मोठी देवस्थाने आहेत, तिथे काय मांसाहारच चालतो असे आपल्याला वाटते काय? उगाच काहीतरी...
मला वाटते की तुम्हाला गोव्याला जाण्यापूर्वी नीट माहिती मिळाली नसावी. विशेषतः ट्रॅव्हल एजन्सीकडून मिळणारी माहिती ही नेहमीच एका छापाची असते. पण तुम्ही जर पूर्ण शाकाहारी असाल तर तुम्ही अधिक चौकशी करून त्याप्रमाणे हॉटेले वगैरे निवडणे योग्य नव्हते काय?
गोवा हे टुरिस्ट स्टेट आहे. तुमच्या सामान्यीकरणाने (जनरलायझेशन) ने इतर लोकांचा गैरसमज होण्याची शक्यता आहे. गोव्याचा पुत्र असल्याने आपल्या भूमीची उगीच बदनामी होऊ नये म्हणून वरील लेखनप्रपंच!
चू.भू.द्या.घ्या.
1 May 2008 - 6:30 am | भाग्यश्री
अगदी सहमत! गोव्यात जायला पिणारे अथवा मांसाहारी खाणारेच असले पाहीजेत असं मुळीच नाही...(असाल तर चांगलच आहे म्हणा!)
डिसेंबर मधे आम्ही गेलो होतो, तेव्हा कधी न मिळाल्यासारखं जेवलो होतो, इतकं सुंदर जेवण मिळालं आम्हाला! शाकाहारी,मांसाहारी दोन्ही! ...(काय बटर नान,चिकन होतं राव! अजुन चव येतीय जिभेवर!! ) गोवा आम्हाला सर्वप्रथम जेवणासाठी, सुंदर बीच साठी, आणि बीच शॅक्स साठी आठवते! सॉफ्ट ड्रींक, पाणी वगैरे काहीच मिळालं नाही तुम्हाला हे पटायला अवघड जातय हो भावना...
2 May 2008 - 2:58 pm | काळा_पहाड
भावनाजी का आमच्या गोयेंकराक चिडवताय ?
गोवा हे टुरिस्ट स्टेट आहे हे तुम्हाला आता पटले असेलच.
अहो जाण्यापूर्वी थोडा अभ्यास नको का करायला ? तुम्ही आपले गेले जेवायला ! ते काय सोप्प आहे ? एवढे सारे टुरिस्ट येत असतात. कुणाकुणाची बडदास्त ठेवणार हॉटेलवाले तरी ? आता तुम्ही विनोदी अनुभव म्हणुन तुमचा अनुभव सांगितलात खरा पण आमची मंडळी जरा संवेदनशील आहेत. उगाच वाटले ना त्यांना की तुम्ही गोव्याची नकारात्मक प्रसिद्धी करताहात म्हणुन. अहो, योग्य हॉटेल न निवडणे ही तुमची चूक नाही का ? त्यात हॉटेलवाल्यांवर राग धरण्यात काय हंशील ?
4 May 2008 - 12:47 am | श्रीमंतपेशवे
सॉफ्ट ड्रींक, पाणी वगैरे काहीच मिळालं नाही तुम्हाला हे पटायला अवघड जातय हो भावना...
अहो भाग्यश्रीताई,
भावनाताई म्हणतात,'' आम्ही पड्लो शाकाहारी त्यात पाण्याविना इतर
पेय कुणाला चालत नाही ."
याचा अर्थ "पाणी वगैरे काहीच मिळालं नाही " असा होत नाही.
आणि कुणाचाही वैयक्तीक अनुभव आपल्याला मान्य करायला म्हणजे पटवून घ्यायला हवा . नाही का?
4 May 2008 - 10:00 am | पिवळा डांबिस
पाण्याविना इतर पेय कुणाला चालत नाही ."
याचा अर्थ "पाणी वगैरे काहीच मिळालं नाही " असा होत नाही.
मग याचा दुसरा काय अर्थ होऊ शकतो?
4 May 2008 - 11:04 pm | भाग्यश्री
आपण असं गृहीत धरू की मी वाचायला चुकले.. आणि त्यांना पाणी मिळाले(अर्थात ते मिळायलाच पाहीजे!)
पण शाकाहारी अन्न मिळाले नाही हे नाही ना पटत..
असो..तुम्ही म्हणता तसं तो त्यांचा वैयक्तीक अनुभव होता. प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो त्यामुळे मी पुढे काही बोलत नाही..
5 May 2008 - 6:41 am | पिवळा डांबिस
तुम्ही म्हणता तसं तो त्यांचा वैयक्तीक अनुभव होता.
त्यांचा वैयक्तिक अनुभव आम्ही वर स्वीकार केला आहेच.
आमचा आक्षेप फक्त गोव्याला जायचं असेल तर "पिणारा" पाहिजे, न पिणार्यांनी विचार करावा या जनरलायझेशनवर होता...
असो. आम्हाला जे सांगायचय ते वर सांगितलं आहेच, तेंव्हा आमच्यापुरता हा विषय संपला....
4 May 2008 - 3:29 pm | धनंजय
गोंयात न्हयों आसात, बांय आसात. ताजेन नितळ उदक मेळटा. ते उदक पिल्या उपकरता.
कोंकणाभाशेन गोयांत माड आसात. नाल्ला उदक पिउपाक रुच्चीक.
गोंयांत सोफ्ड्रिंका, सोडा फॅक्ट्र्यो आसात.
फोंडे प्रासाचेर हांव केन्नाय अर्द-पाव लिटर उसा रस पी, तोय गोंयान लोक पिता.
गोंयात आर्ल्याची बिएर मेळटा, काजी आणिक नाल्लाची फेणी मेळटा. पुणून रोज जेवपा खातीर, तान लागली म्हूण हेर पेयांच लोक पिता. कोण बेबदो जालो तरी दिसांत इल्लेशे तरी उदक पिता.
5 May 2008 - 10:15 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
डॉ.धनंजय,
गोमांतकी एक बोली भाषा असुन तीची मुख्य भाषा मराठीच होती असे वाचून असल्यामुळे गोमांतकी लोकांची बोली ऐकायला आवडतेच पण वर अनेक प्रतिसादात वाचायलाही मजा आली.
आता आपल्या प्रतिसादात मला बिएर, फेणी, जेवपा,तान, इतकं कळलं आणि गोव्यात पोहचल्यावर मराठी माणसाला या पेक्षा दुसरे काय हवे असेल. :)
अवांतर : पोर्तुगीज लोकांशी आणि पुढे राजवटीशी गोमांतकी लोकांचा अगदी १५ व्या शतकापासुन संबध आला होता तो केवळ राजकीय नव्हे तर धार्मिकही होता. भाषेत अनेक शब्दांबरोबर सांस्कृतिक आदान-प्रदानेही झाली असतील त्याचे लेखन कुठे आणि कोणत्या पुस्तकात वाचायला मिळेल.