गाभा:
असे का होत असावे?
कुणाचे बोबडे बोल चुचुवाणी म्हणून कौतुकाने वापरले जातात. कुणा कार्ल्यान्चे चे टंकीत धागे (अशुद्ध मराठी म्हणून?) एकामागून एक प्रतिबंधीत होतात.
कुणी प्रविनभप्कर आक्रोश करतात "तुमच्या प्रतिसादावर आनि लेखनावर का हो नाही कोणी बोट ठेवत ?????? तुम्ही तर खुप जिव्हारी लागनारे लिहीता .. तरी त्यावर लोक हसतात ,, आम्ही समजुन सांगन्याच्या भाषेत लिहील तरी ते वाद घालतात .. "
कुणाच्या वाचनीय कथा तीन-चारशे वाचनांनंतर देखील कोरड्या रहातात. त्याचवेळेस पाचकळ धाग्यांवर शतके ठोकली जातात.
असे का होत असावे?
कार्ट्यांना लाडके बाब्ये कसे बनता येईल?
प्रतिक्रिया
5 Aug 2010 - 3:34 am | गणपा
जास्त सविस्तर प्रतिसाद देण्या एवढा मी मोठा नाही, पण
याच कारण माझ्या मते त्या सदस्याने स्वत:बद्दल तयार केलेल पहिल इंप्रेशन असाव. कधी कधी २-३ दिवसात ते त्याच्या पुढील सकारात्मक बदलांनंतर बदलत ही असतं.
आणि
या बद्दल म्हणाल तर नो कमेंट्स :)
पण अश्या लेखकांनी धीर सोडुनये स्वांतसुखाय लिहित रहावे. मायबाप वाचक आज ना उद्या दखल घेतीलच. :)
5 Aug 2010 - 3:35 am | मीनल
मिपावर कुठल्या धाग्यावर किती प्रतिक्रिया येतिल काही सांगता येत नाही.
काही पाचकळ धाग्यांवर शतके ठोकली जातात. सर्वच नाही .हे खरे!
कुणाच्या वाचनीय कथा तीन-चारशे वाचनांनंतर देखील कोरड्या रहातात. हे मात्र नेहमीचेच!
काही चांगल्या कवितांना ही भरपूर प्रतिसाद मिळतात. सर्व चांगल्या कवितांना नाही मिळत प्रतिसाद.
ज्याची त्याची मर्जी! दुसरे काय?
परंतु शतकी पाचकळ प्रतिक्रियांपेक्षा लेखातील गुण -दोष दाखवणारे १/२ प्रामाणिक प्रतिक्रिया अधिक मोलाच्या.
हो की नाही?
5 Aug 2010 - 6:26 am | अरुण मनोहर
>>शतकी पाचकळ प्रतिक्रियांपेक्षा लेखातील गुण -दोष दाखवणारे १/२ प्रामाणिक प्रतिक्रिया अधिक मोलाच्या.<<
पण इतिहासात नोंद फ्क्त शतकांचीच होते. टी आर पी च्या जमान्यात क्वान्टीटी वीन्स ओव्हर क्वालीटी .
5 Aug 2010 - 3:39 am | रेवती
अंशत: सहमत आहे.
नविनच आलेल्या सदस्यांचे पुरते ऐकून न घेता दोन दिवस बराच गोंधळ माजला.
काहीवेळा सॉरी म्हणून झाल्यावर मग मात्र त्यांनी तलवार उपसली.
प्रत्येकाचं असं वाईट रूप बघितल्यानंतर, संपादकांना नावं ठेवून मग सगळे शांत झाले आहेत किंवा शांत झाल्यासारखे वाटत आहेत. अनेक जुन्या सदस्यांनी स्वत:च्या आक्रस्ताळ्या प्रतिसादांकडे परत एकदा पाहणे आवश्यक होते हे मला तरी चारदा वाटून गेले. कधीकधी नाही लेख आवडला तरी कुस्तीसाठी धाग्यावर गेलेच पाहिजे असे नाही. सौम्य शब्दात प्रतिसाद देवून दूर राहणे दोन दिवसात भल्याभल्यांना जमलेले नाही (सदस्यांची नावे घेणार नाही.).
आता नविन सदस्यांनीही पाळावयाचे काही (अलिखित)नियम आहेत. सदस्यत्व मिळेपर्यंत आपण एक नियमीत वाचक असलो म्हणजे मिपाबद्दल सगळी माहिती आहे असे समजायचे कारण नाही. इथे येवून आधी प्रतिसाद द्यायला सुरुवात करावी असे सुचवते (माझेच ऐका असा हेका नाही......त्याचा उपयोगही नाही.). हळूहळू नेहमीच्या येण्याजाण्यातला मेंबर झालात कि प्रतिसाद देताना आपलेपण वाटतो (वाटतोच असेही नाही.). आता माझेच लेखन दिव्य असले तरी लाजेकाजेखातर काही मित्र मंडळी देतात बापडी प्रतिसाद!;)
नविन घरात आल्यावर आधी जरा रुळायला दुसर्याला व स्वता:ला अवकाश द्यावा असे म्हणणे आहे.
5 Aug 2010 - 3:45 am | मिसळभोक्ता
एक उपाय. नवीन सदस्यांना प्रवेश देताना, हजर सदस्यांपैकी अर्ध्यांची परवानगी घेणे आवश्यक आहे, असे केले तर ?
5 Aug 2010 - 3:49 am | पंगा
कोणत्या क्षणी हजर असलेल्या सदस्यांची?
आणि ते 'हो' किंवा 'नाही' नेमके कशाच्या आधारावर म्हणणार? काही आगापीछा?
की 'अडम् तडम् तड्तङ् बाजा' पद्धत? त्याचा नेमका काय फायदा?
5 Aug 2010 - 3:50 am | मिसळभोक्ता
की 'अडम् तडम् तड्तङ् बाजा' पद्धत?
आमच्या कडे "आदा पादा कोण पादा, दामाजीचा घोडा पादा..." असे म्हणून नवीन सदस्यांची निवड होते.
5 Aug 2010 - 3:52 am | पंगा
डायलेक्टचा फरक.
5 Aug 2010 - 5:01 am | विकास
नवीन सदस्यांना प्रवेश देताना, हजर सदस्यांपैकी अर्ध्यांची परवानगी घेणे आवश्यक आहे,
वरील वाक्यात "सदस्य" म्हणण्याऐवजी "आयडी" म्हणले तर जास्त योग्य ठरेल.
5 Aug 2010 - 6:21 am | अरुण मनोहर
खूप समजूतदार आणि समतोल प्रतिसाद.
5 Aug 2010 - 3:49 am | मिसळभोक्ता
सर्वप्रथम अभिनंदन.
कार्ट्यांचे बाब्ये कसे होतात, याविषयी पुरेसा विदा नाही.
परंतु, एक दोन केसेस सांगतो.
प्रभुमास्तर प्रथम मिपावर लिहिते झाले, तेव्हा ते आमचे फेवरीट कार्टे होते. (क्रिप्टीकपणाची हद्द) आता फेवरीट बाब्या आहेत.
संजोपराव मनोगतावर "गण गण गणात बोते" म्हणत अवतीर्ण झाले, तेव्हाचे तुम्हाला आठवते का ?
पण एक सांगतो,
सतत वैचारीक दिवाळखोरी दाखवून कोणी कार्ट्याचा बाब्या होत नाही.
5 Aug 2010 - 5:18 am | शुचि
त्यांच्या लेखापेक्षा त्यांचा प्रतिसाद त्या लेखावरचा सुरेख आहे.
"मी कुणाची माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही कारण मी इतरांइतकाच स्वतःच्या विचारांचा आदर करतो" अशा प्रकारचा काहीसा. मला नीट आठवत नाही.
Terrific attitude! Very appealing.
5 Aug 2010 - 6:54 am | आमोद शिंदे
>>सतत वैचारीक दिवाळखोरी दाखवून कोणी कार्ट्याचा बाब्या होत नाही.
मग त्यासाठी सतत दुसर्याच्या आनंदावर विरजण घालावे लागते का? विरजणाच्या खाली कोणत्या हिरव्या जखमा आहेत ते माहित नाही बॉ!
5 Aug 2010 - 6:59 am | शिल्पा ब
तुम्ही का एकदम तलवार उपसून राहिले हो? सहजच विचारलं ..
5 Aug 2010 - 7:14 am | आमोद शिंदे
छे हो मी कुठला तलवार उपसतोय! जिथे तिथे वैचारीक प्रतिसाद देणार्यांना हिणवणे. विचारजंत असे संबोधणे आणि वर हिर॑व्या नोटांच्या खालच्या जखमा वगैरे मेलोड्रामा इ.इ. एकदम बाहेर आले इतकेच.
संपादकांना अयोग्य वाटल्यास माझा प्रतिसाद उडवण्यास हरकत नाही.
5 Aug 2010 - 7:08 am | प्रियाली
स्वतःचे नाव विसरलात वाटतं. मनोगतावर तुम्ही आमचे हुकमी जोक्कर (सॉरी कार्टे) होतात. ;) पण नंतर तुम्हीही बाब्या झालात. (बाबा झालात असे म्हणणार होते चुकून पण मनोगतावर आल्यावर तुम्ही बाबा झालात असे म्हटले तर वैनी मारायच्या) ;)
5 Aug 2010 - 3:49 am | शुचि
"सर्व मंडळींना मोड आले आहेत बहुतेक" असली वाक्य नवीन लोक लिहीतात तेव्हा ते काय अपेक्षा करतात जुन्या लोकांकडून? ही कोणती भाषा आहे?
बाब्या आणि कार्टी रहणारच. You have to carve a niche. Noone owes you nothing here. It's a jungle.
वैचारीक प्रभुत्व सिद्ध करा. कोणी अडवलय?
5 Aug 2010 - 3:51 am | मिसळभोक्ता
"सर्व मंडळींना मोड आले आहेत बहुतेक" असली वाक्य नवीन लोक लिहीतात
ती रावणी पिठल्याची पाककृती वाचून ज्यांनी ज्यांनी प्रयोग केला, त्यांना खरेच मोड आले आहेत. पटत नसेल तर विचारा.
5 Aug 2010 - 4:10 am | Nile
सदर काथ्याकुट हा कच्चा इतिहास अन अभ्यासाचा अभाव याचे एक सुंदर उदाहरण आहे असे नम्रपणे नमुद करु इच्छितो.
एकच वाक्य दोन वेगळ्या लोकांनी बोललं तर अर्थ वेगळा का लागतो हे थोडासाही अभ्यास असणार्यास सांगावे लागु नये.
असो, बाकी सद्ध्याच्या 'पाटा' पिचावर शतक ठोकण्याचा हा एक प्रयत्न आहे की काय असा विचार उगाचच मनाला चाटुन गेला. तरी लेखकाला शुभेच्छा.
5 Aug 2010 - 5:49 am | अरुण मनोहर
अभ्यासु आणि विचारवंतांची ह्या विषयी काय मते आहेत हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न आहे. वर मिसळभोक्ता म्हणतात- "कार्ट्यांचे बाब्ये कसे होतात, याविषयी पुरेसा विदा नाही."
पण थोडी सांगोपांग चर्चा झाली, आणि त्यातून एखादा तरी कार्टा "बाब्या" बनला, तर काय हरकत आहे?
बाकी पाटा पिचवर देखील शतके ठोकायला मॅच फिक्सींग करावे लागते असे ऐकीवात आहे. त्यामुळे तुमच्या शुभेच्छा वाया जाणार की काय असे वाटते. तरीही भावनेसाठी धन्यवाद.
5 Aug 2010 - 11:15 am | Nile
मुळात तो कार्टा का बनला ते पहा. सगळेच येणारे कार्टेही बनत नाहीत अन बाबे ही बनत नाहीत. इथे प्रत्येकजण स्वतःला स्वतःच घडवत असतो.
खरं की काय? म्हणजे सद्ध्या तुमच्या कार्ट्यांनी मारलेली शतके मॅच फिक्सींग होती तर? :-)
5 Aug 2010 - 11:56 am | अरुण मनोहर
आमची कार्टी कोणती ती नावे देखील सांगून द्या, आम्हालाही नवीन माहिती कळेल. पण त्या आधी त्या कार्ट्यांची परवानगी मात्र घ्या हं.
5 Aug 2010 - 4:20 am | शिल्पा ब
आम्ही इथे नवीनच असल्याने काहीच माहिती नाही...पण लेख आवडला.
5 Aug 2010 - 6:04 am | मदनबाण
कुणाच्या वाचनीय कथा तीन-चारशे वाचनांनंतर देखील कोरड्या रहातात. त्याचवेळेस पाचकळ धाग्यांवर शतके ठोकली जातात.
ह्म्म्म्...दुसरा कुठला उद्योग नसावा या मंडळींना किंवा तिरपे प्रतिसाद लिहण्यास दुसरा एखादा धागा सापडत नसावा !!! ;)
मनोहरपंत काही आयडींचे फस्ट्रेशन इतके वाढलेले असते की ते असलेच उद्योग करण्यासाठी इथे येतात !!! काही जण प्रमाणाच्या बाहेर आत्मकेंद्रीत झालेले असतात... नुसती बुद्धी आणि सर्टीफिकेट असले म्हणजे त्या व्यक्तित संस्कार देखील असायला हवेत असे थोडेच आहे ? ;)
बाकी लेडी बाब्या बद्धल तुमचे विचार काय आहेत ते जाणुन घ्यायला आवडेल... ;) तिला बाबी म्हणावे काय ?
5 Aug 2010 - 6:23 am | अरुण मनोहर
अशा बाबीं विषयी लिहीले तर ........ (.. चा उपयोग मिपावर नव्याने शिकलो. तो करून पहात आहे.........)
5 Aug 2010 - 6:34 am | मदनबाण
(.. चा उपयोग मिपावर नव्याने शिकलो. तो करून पहात आहे.........)
हा.हा.हा... ;)
5 Aug 2010 - 6:49 am | आमोद शिंदे
तुमच्या भावनांशी पूर्ण सहमत आहे. सैपाक वगैरे धाग्यावर आलेले ८५+ प्रतिसाद हेच सांगतात.
5 Aug 2010 - 8:28 am | चतुरंग
वरती रेवतीने जे मुद्दे मांडलेत त्याच्याशी मी सहमत आहे त्यामुळे ते पुन्हा सांगत नाही.
त्याव्यतिरिक्त - स्वतःला कोणत्या प्रकारचे लिखाण जमते ह्याचाही अंदाज घ्यायला हवा असे वाटते. मी जर उद्या पाककलेवर लिहायला लागलो तर प्रतिसादांचे शतक कदाचित होईलही पण वेगळ्या प्रकारच्या प्रतिसादांचे! ;)
तसेच प्रतिसादांच्या संख्येवरुन धाग्याचे महत्त्व ठरतेच असे नाही. उदाहरण द्यायचे झाले तर मी रामदासांचे देईन. त्यांचे लिखाण बघा, प्रतिसादांचे शतक एकाही लेखाला नाहीये परंतु लिखाणातला अस्सलपणा इतका की वर्ष दीडवर्षांनतर अजूनही लिखाण आठवत राहते. 'काटेकोरांटीची फुलं' ह्या लेखाला मोजून ७४ प्रतिसाद आहेत, शतक नाहीच पण दर्जा? क्या केहेने!!! एकेक शब्द, एकेक वाक्य काळजात घुसतं ते कायमसाठी!! तस्मात प्रतिसादांच्या संख्येवर जाऊ नका. हिरे हे मोजकेच असतात आंणि कोळशाच्या खाणीतच सापडतात! :)
चतुरंग
5 Aug 2010 - 9:51 am | सविता
'काटेकोरांटीची फुलं' चा दुवा दिल्याबद्दल.......
-सविता
5 Aug 2010 - 10:06 am | विंजिनेर
सुंदर नेमका प्रतिसाद.
दर्जेदार लिखाणानी पदार्पणातच आदर मिळवणारे अनेक लेखक मिपावर आहेत - मिपाची प्रकृती जाणून घेण्यासाठी नवख्या लेखकांना काही वानगीदाखल उदाहरणे:
स्मृतीगंध वाले वामनसूत, खटाउची नोकरीवाले जयंत बर्वे (हे हल्ली कुठे हरवलेत कोण जाणे), एअरपोर्टवाले बहुगुणी. प्रतिसादाची लांबी वाढत जाईल पण यादी संपणार नाही :)
तेव्हा क्वालीटी डेफिनेटली काउंटस्
5 Aug 2010 - 9:43 am | सुत्रधार
बाब्या आणि कार्ट हे कदाचित न सम्पणार .... पण लेख तर नविन लोक वाचन करणार.चतुरन्ग याच्याशी सहमत
5 Aug 2010 - 10:34 am | अर्धवट
आयला, एवढ होउन, नाव घेउन पण, चुचु नाय इकडे...
चुचु कॉलींग चुचु... चुचु कमिन..
5 Aug 2010 - 11:29 am | अवलिया
अरुणजी खुपशा गोष्टी तुम्हाला माहित नाही अजुन.
5 Aug 2010 - 11:37 am | अरुण मनोहर
अज्ञानात सुख असते असे म्हणतात. पण ते इथे लागू नसावे.
असो.
माझ्या मूळ धाग्याचा उद्देश- >>असे का होत असावे?
कार्ट्यांना लाडके बाब्ये कसे बनता येईल?<<
काही अपवाद सोडता, बरेच प्रतिसाद कर्ते विसरले बहुदा. पण इथे हे होतेच. त्याची तयारी ठेवली होती.
5 Aug 2010 - 11:29 am | समंजस
मनोहर साहेब, हे त्रिकालाबाधीत सत्य आहे आणि ते राहणारच :)
जुने असलेल्यांनी येणार्या नव्यांची रॅगींग घेणे ही तर फार जुनी आणि जवळपास प्रत्येकच संस्थेत कमी-अधिक प्रमाणात होणारी/चालणारी प्रथा आहे. त्याला जालीय संस्था किंवा व्यासपीठं तरी का म्हणून अपवाद ठराव्यात :)
ही प्रथा आहे तशी मान्य करणे किंवा असं होउ शकतं ही अपेक्षा तरी ठेवणे म्हणजे त्रास होत नाही.
नवीन सदस्यांनी ह्या गोष्टींची मानसीक तयारी ठेवणे आणि आपले लेख/प्रतिसाद ह्या वर लक्ष केंद्रीत करणे हे मला वाटतं जास्त चांगलं. कालांतराने सदस्य नविन न राहता जेव्हा जुना होईल तेव्हा आपसूकच बरेचसे बदल झालेले असतील जे सदस्याला नक्कीच चांगले असतील.
काही चांगल्या नसलेल्या धाग्यावर येणारे भरपूर प्रतिसाद आणि काही चांगल्या असलेल्या धाग्यावर येणारे फार कमी प्रतिसाद या बद्दल नक्की काही सांगणे कठिण आहे. माझं स्वतः च असं निरीक्षण आहे की चांगल्या नसलेल्या धाग्यावर येणारे भरपूर प्रतिसाद हे त्या धाग्याशी कमी संबंधीत असतात. हे सहसा प्रतिसाद आणि उपप्रतिसाद यांच्या साखळ्या असतात ज्यांचा बरेचदा प्रत्यक्ष धाग्याशी, धाग्याच्या विषयाशी कमी संबंध असतो. या मुळे जरी त्या धाग्यांच्या प्रतिसांदानी शंभरी ओलांडलेली असली तरी धागा प्रवर्तक आणि वाचक यांना किती उपयोगी असतात हे सांगणे कठीण आहे. [धागा प्रवर्तकाचा उद्देशच जर धाग्या पुढे कसंही करून शंभराचा आकडा लावायचा असेल तर जास्त न बोलणेच योग्य :) ]
या उलट चांगल्या धाग्यावर येणारे प्रतिसाद हे जरी कमी असले तरी सहसा त्या धाग्याशी, धाग्याच्या विषयाशी संबंधीत असतात ज्या मुळे धागा प्रवर्तक तसेच वाचक यांना काही तरी चांगलच सापडतं.
[अवांतर: मागील काही दिवसातल्या गोंधळा बद्दल तर काही बोलायलाच नको :) होळीच्या शिमग्याची आठवण झाली :) नविन काय आणि जुने काय सर्वांनीच मनसोक्त गोंधळ घालून घेतला]
5 Aug 2010 - 4:28 pm | बद्दु
खरं बोललात. तुमचे निरिक्षण बरोबर आहे.
5 Aug 2010 - 1:26 pm | शेखर
>>कार्ट्यांना लाडके बाब्ये कसे बनता येईल?
सगळेच कार्टे लाडके बाबे झाले तर जॉर्ज थॉरवेल ला त्याचे म्हणणे मागे घ्यावे लागेल.
5 Aug 2010 - 1:30 pm | पक्या
अरूण जी, कंपूबाजीचा ही थोड्या फार प्रमाणात परिणाम होत असेल.
लेखनात दम नसला तरी लेखकाच्या नावामुळे काही काही प्रतिसाद पडतात. हे बरेचदा पाहिले आहे.
काहि काहि चांगले लेख व कविता यांचा प्रतिसादाचा आकडा ०च्या पुढे जात नाही. (फार तर १-२ च्या पुढे जात नाही.) पण काही ठराविक जुन्या लोकांनी पाचकळ पणा केला तरी त्यांच्याशी संबंधित लोक भरभरुन प्रतिसाद देतात. अर्थात ही तकार नाहिये एक निरीक्षण आहे.
5 Aug 2010 - 1:49 pm | पद्माक्षी
सहमत
5 Aug 2010 - 1:37 pm | परिकथेतील राजकुमार
श्री. मनोहर आपण चुचुचे येथील लिखाण देखील वाचले असावेत अशी आशा करतो. त्या लिखाणाचा आणि तिच्या चुचुवाणीचा दुरदुरचा देखील संबंध जोडता येत नाही. बाकी जेंव्हा चुचुच्या चुचुवाणी वरुन सगळ्यांनी गंमंत उडवली तेंव्हा तीने देखील अतिशय मोकळेपणानी त्या सगळ्याला दादा दिली. त्याचाच परिणाम म्हणजे चुचुच्या खरडवहीत तिच्यासारखेच लिहायची फॅशन आली. चुचुच्या समंजसपणा आणि खेळकरपणामुळे ती सहजगत्या मिपापरीवारात सामावली गेली. तिच्या चुचुवाणीवर टिका झाली तरी तिने ती हसत खेळत घेतली. नविन धागे काढुन ती गळे काढत बसली नाही का कुणाला दोष दिले नाहीत. त्यामुळे इथे तुम्ही केलेली तुलना अतिशय चुकीची आहे.
माझेच उदाहरण घ्याल तर मी मिपाचा सदस्य झाल्या दिवशी पहिला लेख टाकला त्यावर १००+ प्रतिसादांचा पाऊस पडला. अगदी पहिल्या दिवसापासून मला मी इथे नविन आहे असे कधीही जाणवले नाही :) "ए भाड्या खफ वर ये" हि पहिलीच खरड माझ्या मते मी जेव्हा सहजतेने घेतली तेंव्हाच मिपाकर बनुन गेलो ;)
नो कॉमेंटस.
आमच्या नानबा आणि गुर्जीच्या भाषेत सांगायचे तर लेखकानी लेख लिहुन प्रकाशीत केला कि "कृष्णार्पणमस्तु" म्हणुन मोकळे व्हावे. पुढे त्या लेखनाचे भविष्य वाचकांच्यावर सोपवून द्यावे.
सहज बनवता येईल हो.
ए मुलांनो ह्यापुढे मनोहर काकांच्या कथेतुन कुठलेहीजालीय अर्थ न काढत बसता त्यांच्या हितोपदेशी कथांना प्रतिसाद देणे चालू करा बर ! ( ह. घ्यालच)
5 Aug 2010 - 1:50 pm | अवलिया
हा ४९
5 Aug 2010 - 1:51 pm | अवलिया
हा ५०
अरुणजी प्यार्टी हवी... ५० प्रतिसाद मिळाले
5 Aug 2010 - 1:54 pm | Nile
म्हंजे ते हे बाबे झाले का कार्टे हो अवलियाजी?
5 Aug 2010 - 1:57 pm | अवलिया
मनुष्य स्वत:ला मुक्त समजेल तर तो मुक्त असतो बद्ध समजेल तर तो बद्ध असतो, हा सर्व मनाचा खेळ आहे असे हभप उंटावरबसुनप्रवासकर बिकाबाबा बिनगणवेषधारी यांचे म्हणणे आहे.
5 Aug 2010 - 2:01 pm | तिमा
हल्ली काही प्रतिक्रियांना फारच भपकारा येऊ लागला आहे.
- ति. घाणघाणे
5 Aug 2010 - 2:49 pm | वेताळ
लोक संध्याकाळी ठोसुन सकाळी तसेच मिपावर येत असावेत.
पण ह्याला माणुसघाणेपणा म्हणावा काय?
5 Aug 2010 - 4:03 pm | मृत्युन्जय
कुणाच्या वाचनीय कथा तीन-चारशे वाचनांनंतर देखील कोरड्या रहातात. त्याचवेळेस पाचकळ धाग्यांवर शतके ठोकली जातात.
कितीही वाचनीय कथा असतील तरी प्रतिसाद तसे कमीच येतात. हा आता तुम्ही एखादा वादग्रस्त मुद्दा मांडला तर कदाचित खोर्याने प्रतिसाद येतील.
बाकी वाचनीय धाग्यांबद्दल बोलत असाल तर लेख चांगला असेल तर प्रतिसाद नकी येतात. बरा असेल तर कदाचित फारसे येणार नाहीत. भिक्कार असेल तर प्रचंड येतील.
माझा पण लेख भिकार तुझा पण लेख भिकार पण तुला मात्र भरपुर प्रतिसाद येतात. असे का? हा प्रश्न पडत असेल तर मात्र बरोबर आहे. काहीवेळेस मैत्रीखातर भिकार लेखांना पण प्रतिसाद द्यावे लागतात.
मी स्वतः भिकार लिहितो त्यामुळे माझ्या लेखाला फारसे प्रतिसाद येत देखील नाही. पण एवढी मात्र माझी खात्री आहे की उद्या एखादा चांगला लेख लिहिला तर किमान २५-३० प्रतिसाद नक्की येतील. अहो जिथे काटेकोरांटीची फुले १०० प्रतिसाद नाही बघु शकला तिथे बाकी लिख कितीही चांगला असेल तर त्याची काय कथा?
एकुणात काय की:
१. लेख खरोखर चांगला असेल तर काही चांगल्या प्रतिक्रिया नक्की येतील.
२. लेख ठीकठीक असेल तर ५-१० प्रतिक्रिया येतील पण कोणी नाऊमेद करणार नाही.
३. लेख खास नसेल तर दुर्लक्ष होइल.
४. काही वादग्रस्त विधान केले किंवा उगाचच कोणावर टीका केली किंवा लोकांना आपला फारसा परिचय नसताना मिपा किंवा इथले सदस्या यांच्या नावाने गरळ ओकली तर मात्र लेख सुपरहिट होईल. आपल्याला अशी प्रसिद्धी हवी आहे का हे ज्याचे त्याने तपासुन पहावे.
तळटीपः माझा पण लेख भिकार तुझा पण लेख भिकार पण तुला मात्र भरपुर प्रतिसाद येत्तात. असे का? या प्रश्नावर मात्र जास्त विचार करु नका. मानवी प्रवृत्ती आहे ती मित्रांना प्रोत्साहन देण्याची.
5 Aug 2010 - 8:07 pm | आम्हाघरीधन
प्रति धागालेखक,
त्याचे काय आहे जो पर्यंत आपण मिसळपाव वरिल प्रस्थापितांचा विश्वास संपादित करत नाहीत (उदा. एखाद्या पाणचट विषयावर ...+११११११११११% अथवा अतिशय उत्तम लेख... अश्या स्वरूपातिल प्रतिसाद देत त्यांच्या हो ला हो म्हणत नाहीत ) तोवर तुम्च्या किण्वा अजुन कुणा प्रविन भ्प्कर च्या लेखाला केराची टोपली दाखविनारे इथे संपादका सहित मोठी मंडळी मुबलक प्रमाणात आहेत.. यावर एकच पर्याय.. तुमचे स्वतःचे संकेतस्थळ सुरु करा अन्यथा शांत रहा...
खोटेच खोटे लई लई मोठे म्हणणार्यांकडुन काय अपेक्षा करणार... :==)
5 Aug 2010 - 10:47 pm | शाहरुख
लेट देम अर्न !
हल्लीच बघितलेली एक गोष्ट..विलासरावांच्या परदेशवारीच्या पहिल्या भागात (ज्यात बहूतेक फक्त फोटो आणि २-४ मोडकी तोडकी वाक्यं होती) काहींच्या प्रतिक्रिया होत्या की "आज 'हा' हवा होता" वगैरे.....पुढच्या भागात जसे लेखन सुधारले तसे त्याच लोकांच्या प्रतिक्रिया बदलल्या आणि कौतूक केले...विलासरावांनी स्वतःच्या बळावर तो बदल घडवून आणला.
प्रविनभप्कर, लिव्ह रे तू दाबून !
5 Aug 2010 - 10:54 pm | रेवती
शाहरूखभाईंशी सहमत!
विलासरावांनी प्रतिक्रिया खूपच खेळीमेळीने घेतल्या आणि बदल घडवून आणला.
उगीच दंगा नाही केला.
5 Aug 2010 - 11:09 pm | पक्या
प्रतिक्रिया मिळाल्या तर लेखनात बदल घडवायचा की नाही हे लेखकाला ठरवता येईल. पण मिळाल्याच नाहित तर?
ह्याचे उत्कृष्ठ उदाहरण म्हणजे - विनायक रानड्यांची 'नशीब' ही लेख मालिका
( http://misalpav.com/node/11291 - प्रतिसाद शून्य
http://misalpav.com/node/11032 - प्रतिसाद - १ - एवढा मोठा वाचनीय लेख लिहून फक्त जूस चा फोटो छान आहे असा.)
नशीब ही लेखमालिका सुंदरच होती. वाचनिय होती. विनायकरावांचे लेखन ही सराईत लेखकासारखे होते ,
अनेक ठिकाणी त्यांच्या धाडसाचे कौतुक करण्यासारखे लेखात प्रसंग वर्णिलेले होते पण लेखमालिका दुर्लक्षित राहिली. पण त्याच काळात अनेक पाचकळ लेखांवर मात्र भरपूर प्रतिसाद आलेले.
5 Aug 2010 - 11:15 pm | शाहरुख
वर शुचि ताईंनी म्हटले आहेच...
Noone owes you nothing here. It's a jungle.
6 Aug 2010 - 12:27 am | पक्या
>>आपण तरी कुठे दिलाय रानड्यांना प्रतिसाद ?
मी मुद्दामच त्यांच्या लेखनाचा जिथे माझा प्रतिसाद आहे ते दुवे दिले नाहीत. उत्खननाची हौस असेल तर करुन पहावे म्हणजे मी त्यांच्या लेखमालिकेतील लेखनावर प्रतिसाद दिले की नाही ते कळेल.
काही कामानिमित्त जालावर सलग २-३ दिवस लॉग इन केले नाही तर त्यावेळी प्रतिसादा अभावी जे धागे मागे जात असत ते वाचावयाचे राहून गेले असे असू शकते.
कित्येक वेळा ० किंवा (१-२) प्रतिसाद असलेले त्यांचे धागे मी प्रतिसाद देऊन वर आणले होते. पहिला उद्देश हा की लिखाणाची तारिफ आणि दुसरा असा की वाचनिय धागा वर राहिल्याने लोकांच्या दृष्टीस पडून लोक कदाचित प्रतिक्रिया देतील.
5 Aug 2010 - 11:16 pm | पुष्करिणी
सहमत. मलाही खूप आवडली होती 'नशिब' लेखमालिका .
5 Aug 2010 - 11:18 pm | Nile
आपण असं करुया, ज्यांना ज्यांना प्रतिसाद नाही मिळालेत त्या सगळ्यांना घेउन एक शोकस्भा आयोजीत करुयात, काय म्हंता?
च्यायला, ह्या प्रतिसादांनी लोकांना पार येडं केलंय राव. इथे काय सगळे एकत्र ठरवुन प्रतिसाद देतात किंवा देत नाहीत असे म्हणायचे आहे काय?
6 Aug 2010 - 12:48 am | शिल्पा ब
कदाचित मी मिपावर येण्याच्या आधीची मालिका असेल...मला हि मालिकाच माहिती नव्हती...आता वाचेन.धन्यवाद.
बऱ्या, वाईट कशा का होईना लोकांनी प्रतिक्रिया दिल्या तर लेखकापर्यंत पोहोचतात...अजिबातच काहीच प्रतिक्रिया नाही म्हंटल्यावर वाईट वाटणे, हिरमोड होणे स्वाभाविक आहे.
6 Aug 2010 - 2:08 am | रेवती
माझ्या माहितीप्रमाणे त्यांची ही लेख मालिका याआधी दुसरीकडे प्रकाशित झाली होती.
ती त्यावेळी वाचून झालेली होती. पुन्हापुन्हा प्रतिसाद देणे कंटाळवाणे ठरले असते.