तों.पा.सु का ?

जागु's picture
जागु in काथ्याकूट
4 Aug 2010 - 11:27 am
गाभा: 

आठवले का शाळेचे दिवस ?

प्रतिक्रिया

शेखर's picture

4 Aug 2010 - 11:35 am | शेखर

मी. अ. त. अ. म. आ. अ.
(मीठ असते तर अजुन मजा आली असती)

आता झाडावरच कसे मिठ लावायचे आवळ्यांना ?

सेपरेट फुटु टाका मीठाचा पण....

मस्त कलंदर's picture

4 Aug 2010 - 12:06 pm | मस्त कलंदर

शाळेतले दिवस खरेच आठवले. आणि अशी आवळ्यांनी लगडलेली आवळी पण खूप दिवसांनी पाहिली..
वालचंदला असताना संगणक विभागासमोरच चिंचांचे झाड होते, त्यामुळे चारही वर्षे कोवळ्या चिंचा, गाभुळलेल्या चिंचा, पिकून लाल-चॉकलेटी झालेल्या चिंचांचा लुल्फ उठवला. पहिल्या वर्षाला बेसिक सिव्हिल इंजिनिअरिंगची प्रॅक्टीकल्स करताना ग्राउंड भोवतालच्या चिंचा आणि सिव्हिल ड्रॉईंग हॉलच्या मागचे मोरावळे खाताना खाल्लेला सरांचा ओरडाही अजून आठवतोय. मन एकदम भूतकाळात गेलं!!!

मराठमोळा's picture

4 Aug 2010 - 12:07 pm | मराठमोळा

पुण्यात लक्ष्मी रोडला आवळ्याच्या सिझनमधे तिखट मीठ लावलेले आवळ्याचे काप मिळतात १०रुपयाला १०० ग्रॅ.
छान लागतात.

>>आठवले का शाळेचे दिवस ?
हम्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म

बाकी कुणाला कोणते दिवस आठवतील हे सांगणे अवघडच. ;)

गौरीदिल्ली's picture

4 Aug 2010 - 12:12 pm | गौरीदिल्ली

मस्त कलन्दर......... आवळे काही कमी होते ज्यात तुम्ही अजुन ह्या कोवळ्या चिंचा, गाभुळलेल्या चिंचा, पिकून लाल-चॉकलेटी झालेल्या चिंचां सगळ्या गोष्टीन्ची भर टाकली....

मी ऋचा's picture

6 Aug 2010 - 12:03 pm | मी ऋचा

+१ मस्त कलंदर तैचा निषेध निषेध निषेध!

पांथस्थ's picture

4 Aug 2010 - 12:13 pm | पांथस्थ

>>आठवले का शाळेचे दिवस ?

आवळा/चिंचेचे डोहाळे लागतात. त्यामुळे स्त्री वर्गाला शाळेचेच काय पण गेलेले दिवसही आठवत असतील :)

मिठ आणि मसालाही लावुन पण छान लागतात. ह्याचे मी एकदा सरबत केले होते. चटणीही करतात ह्याची कैरीच्या चटणी सारखी.

सुप्रिया's picture

4 Aug 2010 - 3:28 pm | सुप्रिया

वॉव्. खरच् तोंडाला पाणी सुटले.
चटणीही करतात ह्याची कैरीच्या चटणी सारखी.
चटणीचीपण रेसिपी येऊ दे.

सुप्रिया ओल खोबर, हिरवी मिरची, आवळ्याचा गर सुरीने कापुन, मिठ मिक्सरमधुन काढायच. झाली चटणी.

अनिता's picture

4 Aug 2010 - 10:27 pm | अनिता

गेले ते दिवस गेले :)

आमच्या शाळेत / भोवताली अशी झाडे नव्हती. आम्ही झाडे लावली, पण ती फळझाडे नव्हती :(

स्पंदना's picture

5 Aug 2010 - 10:07 am | स्पंदना

रेसिपी कमी आहेत म्हणुन आता फोटो टाकुन हाल करतेय .

अपर्णा अग भरपुर रेसिपी आहेत पण इथे फोटो लोड करायचा कंटाळा येतो. आधी फ्लिकर मध्ये टाकायचा मग इथे लोड करायचा. लवकर डायरेक्ट लोड झाला पाहीजे फोटो.

आव्ले हा तस पहिल तर आम्च्या वर्गातिल मुलिन्चा वेअक्पोइन्त्त.मध्ल्यसुत्तित सग्ल्य तुतुन पदय्च्य अव्ल्यवर