चकलीची एक जग्गात भारी आठवण... वाचाच!

जाई अस्सल कोल्हापुरी's picture
जाई अस्सल कोल्हापुरी in पाककृती
3 Aug 2010 - 6:01 pm

...चकलीच्या आठवणीनं डोळ्यात पाणी आलं.
इथे आल्यावर चकली खायची इच्छा झाली ,म्हणतात ना विनाशकाले विपरित बुद्धि.
इथल्या एका दुकानामध्ये मूरक्कू नावाचा चकलीचा दक्षिण भारतिय चुलतभाऊ दिसला. हौस आणि हव्यासापोटी घरी घेऊन आले.
घरी येऊन मस्त चहा बनवला आणि बसले ते मुरक्कू घेऊन.
बोटांनी तुकडा मोडायचा प्रयत्न केला तर काही तुटेना..
मग आणखी पुढचा गाxव पणा केला आणि सरळ तोंडात टाकली.
तरिही तो मुरक्कू दाद देइना तर सोडुन द्यावा ना विषय,पण नाही. हावरटपणा!
त्यापुढचा गाxवपणा+ कुडुम कुडुम खायला सुरुवात केली. एक दोन सेकंद चर्वण केले.आणि पहिल्याच तुकड्यात खडा आला. तोंडातल्या तोंडात जिभेनी शोधायचा प्रयत्न केला.आता तरी काढुन टाकावा की नाही तोंडातुन?
नाही.... तो मुरक्कु आता तोंडात भिजला होता त्यामुळे त्यातले जे काही तिखट मीठ होते ते बरे लागत होते.
जिभेनी परत प्रयत्न केला इकडे तिकडे घोळवला . काहीही जिभेशी आलं नाही.
म्हटंलं असेल काहीतरी मसाला किंवा तांदुळ/डाळ काहीतरी...
शिकस्त करुन परत कुडुम कुडुम करुन कचकचणारा मुरक्कुचा घास गिळुन टाकला.
नंतर मात्र नाही हातात घेतला बरं का.मस्त चहा घेतला.
थोड्या वेळानी सवयीप्रमाणे खळखळून चुळ भरली...तेंव्हा लक्षात आलं कि तोंडात कुठेतरी पोकळी आहे.एक विचित्र फीलींग येतं ना दातात काहीतरी अडकल्यावर्..तसंच काहिसं.पण इथे पोकळी होती.
दिवा लावला आणि नीट पाहिलं तर दाढेचा चक्क एक तुकड गायब झाला होता. अरे अरे त्या आठवणीने आत्ता सुद्धा दात सळसळतात माझे.
आणि कहर म्हणजे...माझ्याच दाढेचा तो तुकडा मी 'तांदुळ किंवा मसाल्याचा तुकडा' समजुन कडा कड खाल्ला होता.
मग पुढ्चे सगळे सोपस्कार. भारतातली फेरी planned असल्याने रूट कॅनॉल करणे,कॅप बसवणे वगैरे प्रकार तिथे झाले.
पण ती कवळीतोड चकली चांगलीच तोंडात मारुन गेली.
हाहाहा आताशा जर्रा बरं वाटतंय. स्वतःचा गाxवपणा confess केल्यावर!
मि.पा.वर एखादं सदर सुरु करायला हरकत नाही ना? confession box नावानी!
बर्‍याच गोष्टीबद्दल आपल्याला पश्चातबुद्धी होत असते.ते जोपर्यन्त बाहेर पडत नाही तोपर्यन्त मळमळ् होत राहते.
... वमन कक्ष हे नाव अगदी योग्य होइल ना?

प्रतिक्रिया

परिकथेतील राजकुमार's picture

3 Aug 2010 - 6:05 pm | परिकथेतील राजकुमार

आपण परदेशात असता हे वाचुन आनंद झाला.

ह्याचसाठी केला होता अट्टाहास...

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

3 Aug 2010 - 6:20 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

काय रे हे? शोभतं का तुला हे असलं वागणं ?
एवढी दर्द भरी दास्ताँ सांगितली ती राहिली बाजुला...याचसाठी केला होता का अट्टाहास म्हणे!
असं काहीतरी वागता तुम्ही म्हणुन तुम्हाला कुठं न्यायची,कोणाला ओळख करुन द्यायची सोय नाही. ;)

का रे परा? शाळेत असताना कधी सारांशलेखन किंवा रसग्रहण केलं होतंस का?
अर्थाचा अनर्थ करण्यात पहिला लंबर येइल तुझा.
नोबेल देउया तुला!

परिकथेतील राजकुमार's picture

3 Aug 2010 - 6:22 pm | परिकथेतील राजकुमार

अर्थाचा अनर्थ करण्यात पहिला लंबर येइल तुझा.

त्या पुण्याईवरच तर मिपावर तग धरुन आहे ;)

बाकी आपण वापरलेल्या 'लंबर' ह्या शब्दाने डोक्यात काही ट्युबलाईटस पेटल्या.

स्वछंदी-पाखरु's picture

3 Aug 2010 - 6:31 pm | स्वछंदी-पाखरु

अहो नोबेल ना ते .... हुशार आणि अनर्थाचा अर्थ करणार्‍यांनाच दीला जातो.....

त्याला ह्या वेळेस ना मुरक्कू द्या......

बर मग तुमच्या कवळीतली ती उघड्लेली खिडकी खूप छान दिसते हं.......

मेघवेडा's picture

3 Aug 2010 - 6:07 pm | मेघवेडा

वमन कक्ष!

=)) =))

चालू द्या.

स्वछंदी-पाखरु's picture

3 Aug 2010 - 6:13 pm | स्वछंदी-पाखरु

मी ह्याच प्रकाराला मिक्सर मधुन पण फिरवुन पाहिले... च्यायला भांड्यातल्या सगळे पाते वाकले आहेत.

परत बायकोने लाखोलि वाहिलि ती तर वेगळीच "माझ्या माहेरातून आणला होता हा मिक्सर......."

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

3 Aug 2010 - 6:32 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

ते पाकीट तसंच्या तसं टाकुन दिल. गार्बेज शूट जवळ एक-दोन मांजरं नेहमी खेळत असतात. त्यानी ते पाकिट पळवलं. जे मांजर ते पाकिट घेउन पळालंय ना ते अजुन परत आलेलं नाहीये. ;)

ते भारतात एका दंतचिकित्सकाकडे गेले आहे.... रूट कॅनॉल करणे,कॅप बसवणे वगैरे प्रकार करण्यासाठी.....

लिखाळ's picture

3 Aug 2010 - 6:37 pm | लिखाळ

छान.. मजेदार अनुभव..
इकडे आल्यावर म्हणजे कुठे? भारतामध्ये बसून आम्ही 'इकडे' म्हणजे 'तिकडे' समजतो.. अर्थातच अमेरिका.. त्यातून म्हणजे बे-एरिआ...
हल्ली हल्ली मध्यपूर्वेकडे अधूनमधून लक्ष जाते खरे..

आणि दाढेचे तुकडे पडायला काहिही निमित्त पुरते असा माझा अनुभव आहे. माझ्या दाढेचा तुकडा एकदा क्रॉंयसॉ (हे कसे लिहावे? तोच तो मऊ फ्रेंच ब्रेड) खाताना पडला होता. हो.. मी लंडनमध्ये फिरत होतो .. तो राणीचा राजवाडा आहे ना.. बकिंमहॅम पॅलेस, त्याच्याच बाहेर :)
(तात्पर्य : माझे विदेश भ्रमण आणि खादंती या माहितीची देवाणघेवाण.. इतकेच :) )
ह. घ्या. हे. सां. न. ल.

आपण ढ च्या जागी x वापरले आहे असेच इतर देवनागरी अक्षर आणि रोमन अक्षरांची यादी द्याल का?

अस्सल कोल्हापुरी कां बरे?
बाटग्या ढिगभर कांदे खातो म्हणतात...

मुरक्कू आय.टी. वाल्या बाईने बनवला होता कां? :p :-p :tongue:

प्रभो's picture

3 Aug 2010 - 7:27 pm | प्रभो

>>वाचाच!
कोदांची आठवण झाली...ते पुढे प्रतिसाद द्या असेही लिहित. =))

नखं खाणारे लोक ऐकले होते .... स्वतःचे दात खाणारे तुम्हीच पहीले ;)

पक्या's picture

4 Aug 2010 - 1:15 am | पक्या

मजेशीर अनुभव.

पर्नल नेने मराठे's picture

4 Aug 2010 - 10:44 am | पर्नल नेने मराठे

अग आदिल किवा रघुवंशीमधे मिळतात चकल्या....

कुंदन's picture

4 Aug 2010 - 10:45 am | कुंदन

चुचु कडुन शिका चकल्या/शिरा इ...

गौरीदिल्ली's picture

4 Aug 2010 - 3:47 pm | गौरीदिल्ली

मुरक्कू आय.टी. वाल्या बाईने बनवला होता कां? :)
हाहाहा