गरमागरम धिरडे आणि चटणी

केशवसुमार's picture
केशवसुमार in पाककृती
31 Jul 2010 - 6:56 pm

प्रोजेक्ट गोलाइव्ह होऊन ४ आठवडे झाले.. प्रॉडक्शन सिस्टिम बर्‍यापैकी स्थिर झाली आहे. विशेष असे काही काम नाही त्यामुळे हा विकांत ही धमाल करता येणार, हे काल प्रॉडक्शन कॉल नंतर नक्की झाले.. दिवस अखेरच्या टीम मीटिंगमध्ये उद्या सकाळी ११ वाजता पॅराग्लायडींगला जायचे असा बेत पक्का केला.. मागच्या आठवड्यातल्या "पेद्रो दि गावा"च्या चढाईचे फोटो बघून ह्या वेळेस अजून ५-६ जण बेतात सामील झाले.. सगळा कार्यक्रम पार करून दुपारी जेवायला कधी मिळणार माहिती नाही.. त्यामुळे ब्रंच करण्यावाचून गत्यंतर नसणार हे कालच समजले होते.. ब्रंचला काय करावे विचार चालू होता तेव्हा ब्राझीलमधले शेवटचे दोन आठवडे शिल्लक आहेत त्यामुळे भारतातून आणलेला शिधा संपवता येईल असा एखादा पदार्थ करावा हे नक्की झाले
चला तर मग साहित्य लिहून घ्या.. B)
साहित्य:
सर्व साहित्य ८-१० धिरड्यां पुरेल ह्या हिशोबाने दिले आहे..
१ भांडे तांदूळ, १/२ भांडे उडीद डाळ, १/४ भांडे हरभरा डाळ, १/४ भांडे मूग डाळ
१ लहान कांदा
१ टोमॅटो
१-२ लसुणाच्या पाकळ्या
१/२ टेबल चमचा कांदालसूण मसाला
लाल/हिरव्या मिरच्या तुमच्या ऐपती नुसार
मीठ, कोथिंबीर आवडीनुसार
जिरे पूड, धणे पूड, हळद, तेल(ह्या. प्र. कि. ते मा. न. त. आ. स्व. पा. ठे. ला. ना. अ. स. )
चटणीचे साहित्य
१वाटी डाळ
१/२ ओले खोबरे
थोडा बारीक चिरलेला कांदा
लाल/हिरव्या मिरच्या तुमच्या ऐपती नुसार
मीठ, साखर, कोथिंबीर आवडीनुसार
कृती :
आदल्या दिवशी संध्याकाळी तांदूळ आणि डाळी स्वच्छ धुऊन ३-४ भांडी पाण्यात ४-५ तास भि़जवत ठेवा.
भिजवलेले तांदूळ आणि डाळी मिक्सर मधून रवाळ वाटून घ्या.

कांदा, टोमॅटो, मिरच्या, कोथिंबीर आणि लसूण बारीक चिरून घ्या.

बारीक चिरलेले कांदा, टोमॅटो, मिरच्या, कोथिंबीर आणि लसूण रवाळ पिठात मिसळा. त्यात कांदालसूण मसाला, जिरे पूड, धणे पूड, हळद, चवी नुसार मीठ घालून ढवळा. झाली धिरड्याची तयारी

चटणीचे साहित्य मिक्सर मध्ये थोडे पाणी घालून वाटून घ्या.. आवडी नुसार चटणीला कढीलिंबाची फोडणी द्या..

गॅसवर तवा ठेवा.. आणि धिरडी घालायला सुरवात करा..

धिरड्याच्या कडेने थोडे तेल सोडा.. झाकण घालून ठेवा.. ३-४ मिनिटांनी धिरडे उलटून दुसऱ्या बाजूने भाजा(? ).
झाले गरमागरम धिरडे आणि चटणी तयार..

पुढे काय हे तुम्ही सगळ्यांनी ओळखले असेलच..
४-५ धिरडी हाणली आहेत..मुखशुद्धीला शेंगदाण्याची चिक्की.. (ब्राझीलमध्ये अगदी आपल्या भारतात मिळते तशी चिक्की मिळते पण फोटो काढण्या इतकी ही शिल्लक राहत नाही..; ) )
बरं चला आता पळतो पॅराग्लायडींगला जायचे आहे..

प्रतिक्रिया

अवलिया's picture

31 Jul 2010 - 6:59 pm | अवलिया

जबरा हो केसुशेट...

च्यायला केसुशेटमुळे पाकृ विभाग भलताच फार्मात आलेला आहे... लगे रहो.. :)

चतुरंग's picture

31 Jul 2010 - 7:04 pm | चतुरंग

धिरड्यांवर चढाई आवडली! ;)

(पॅराग्लायडिंगचा लेख आणि फोटू कधी येणार ह्याची वाट बघतोय! :? )

(पॅरा)चतुरंग

वाहव्वा!!
छान बेत! (झाझिकी च्या फोटू नंतर )हे फोटू पाहून आज (दुसर्‍यांदा )इनो घेणार.

ऋषिकेश's picture

31 Jul 2010 - 7:35 pm | ऋषिकेश

हैच्च!!
मज्जा आहे बॉ एका माणसाची! :P

मस्तच हो केसु.
खाली तळटीप टाकायला विसरलात का की मी आय टी तला आहे ;)

केशवसुमार's picture

2 Aug 2010 - 3:54 pm | केशवसुमार

गणपा तुला मित्र म्हणावे का....
लेका आयटी मध्ये माला खाली आय टीतला असे लिहीयला सांगतो!!
खाली आय टीतला असे लिहीले तर ते दुसरे आय टी वाले आयटे सॉरी आयते येतील ना घरला..
(आयटी ला घाबरणारा सरळ, साधा ;) )केशवसुमार

शाल्मली's picture

31 Jul 2010 - 11:52 pm | शाल्मली

छान दिसत आहेत तुमची पेश्शल पौष्टिक धिरडी..

आता दोन आठवड्यानी पुण्यात येणार का? म्हणजे धिरडी, रव्याचे थालिपीठ, मसाला मसूर असा बेत करायला हरकत नाही ;)

निखिल देशपांडे's picture

31 Jul 2010 - 11:54 pm | निखिल देशपांडे

मस्त हो केसु..

मस्त कलंदर's picture

31 Jul 2010 - 11:58 pm | मस्त कलंदर

व्वा:... अजून एक मस्त पाकृ.
अजून फूडप्रोसेसर दुरूस्त होऊन मिळाला नाही... आल्यावर कंटाळा नाही आला तर हेही करून पाहातेच.. (मनात आलं, केलं या धर्तीचे काही असले की पटकन होऊन जातं. नाहीतर आज भिजत घाला, उद्या सकाळी वाटा, संध्याकाळी करा असले प्रकार करण्यचा लैच कंटाळा आहे)

जाता जाता: फोटू काढताना हात हलला की क्काय.. सगळेच धूसर दिसताहेत मला...:)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Aug 2010 - 11:53 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

तू इकडे ये गं, दोघी मिळून खाण्यापिण्याची मस्त ऐष करू या आणि फोटू टाकून केसुंना जळवू या!

केसु, भारी पाकृ! पण फोटोग्राफी ना बा जमली तुम्हाला या वेळेस!! ;-)

केशवसुमार's picture

1 Aug 2010 - 7:21 pm | केशवसुमार

लोकांची जळजळ होते, म्हणून पिकासाने फोटू धूसर करायची खास सोय केली आहे.. ;)
(धुसर)केशवसुमार
आमच्या संगणकांवर व्यवस्थित दिसतात बा!

>(ह्या. प्र. कि. ते मा. न. त. आ. स्व. पा. ठे. ला. ना. अ. स. )

इथे काही शुद्धलेखनाच्या सुधारणा किंवा वाचकाला कळेल असं काहीतरी लिहिणं अपेक्षित आहे का?

फोटो काहीसे इंप्रशनिस्ट पेंटींग्जसारखे वाटतात...

बाकी पाककृती मस्त असणार याबाबत वाद नसावा.

अजून येऊ द्यात.

(फार विचार न करता प्रतिसाद देणारा) राजेश

केशवसुमार's picture

1 Aug 2010 - 7:30 pm | केशवसुमार

(ह्या. प्र. कि. ते मा. न. त. आ. स्व. पा. ठे. ला. ना. अ. स. )आधिक माहिती साठी हा धागा वाचावा

फोटो काहीसे इंप्रशनिस्ट पेंटींग्जसारखे वाटतात...
पिकासाची कृपा.

रतन's picture

1 Aug 2010 - 12:57 pm | रतन

मस्तच आहे. मला लहानपणी ऐकलेली कथा आठवली.

एकदा एका व्यक्तीने (पत्नीला न घेता, एकटाच) सासुरवाडीला गेला असता तिथे त्याने धिरडे खाल्ले. साहेबाना धिरडे फारच आवडले. आपल्या बायकोलापण असाच पदार्थ करायला लावायचा म्हणून त्याने धिरड्याचे नाव विचारून घेतले.

चालत येताना (त्या काळात मोटारी नसल्याने ) तो धिरड्याचे नाव घोकत येत होता. वाटेत छोटा नाला लागला. नाल्यावरून लाम्ब उडी मारल्यानन्तर त्याच्या तोन्डातून "हायशा" असा समाधानकारक शब्द निघाला. मग काय, स्वारी "हायशा...........हायशा" करीत पुढे निघली.

घरी आल्यानन्तर त्याने बायकोला "हायशा" करायला फर्मावले. बायकोने बापजन्मात कधी "हायशा" नावाचा पदार्थ ऐकला नव्हता किवा खाल्ला पण नव्हता. बिचारी रडू लागली. बायकोला "हायशा" नावाचा पदार्थ येत नाही म्हटल्यावर पतीमहाशयानी बायकोला काठीने झोडपुन काढले.

हा गोन्धळ ऐकुन आजुबाजूवाले लोक जमा झाले. आता नवरोबा पण थोडे शान्त झाले होते. एक म्हातारी बया म्हणाली की बघा मारुन मारुन बायकोच्या पाठिचे अगदी धिरडे करुन टाकले आहे.

धिरड्याचे नाव ऐकुन नवरोबानी जागेवरुन उडी मारली आणि म्हणाला "च्या मारी. धिरडेच ते. धिरडे बनव आज... धिरडे बनव"

रश्मि दाते's picture

1 Aug 2010 - 3:29 pm | रश्मि दाते

मस्त उद्या करावि का?

श्रावण मोडक's picture

1 Aug 2010 - 7:32 pm | श्रावण मोडक

१५ दिवस राहिले. ;)

केशवसुमार's picture

1 Aug 2010 - 7:57 pm | केशवसुमार

मोडकशेठ,
भा.पो. :D

मिसळभोक्ता's picture

2 Aug 2010 - 10:58 am | मिसळभोक्ता

१५ ऑगस्टला सॅनफ्रान्सिस्कोला आहात तर. कळवा.

केशवसुमार's picture

2 Aug 2010 - 7:05 pm | केशवसुमार

तुमच्या गावाला नेक्स्ट टाईम.. ह्या वेळेस माफी असावी..
केशवसुमार

दिपाली पाटिल's picture

2 Aug 2010 - 10:10 am | दिपाली पाटिल

मस्त पाकृ... पण (ह्या. प्र. कि. ते मा. न. त. आ. स्व. पा. ठे. ला. ना. अ. स. ) म्हणजे काय???

परिकथेतील राजकुमार's picture

2 Aug 2010 - 1:16 pm | परिकथेतील राजकुमार

केसु शेठ आजपासुन मिपा तुम्हाला देउन टाकली !

केशवसुमार's picture

2 Aug 2010 - 7:07 pm | केशवसुमार

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार.
(आभारी)केशवसुमार.