गाभा:
माझी एक मैत्रिण भारतातून अमेरिकेत शिकण्यासाठी येणार आहे. ती Arnold & Marie Schwartz College of Pharmacy and Health Sciences,Brooklyn, New York येथे शिकणार आहे. विद्यार्थी म्हणून रहाण्याच्या दृष्टीने कोणती जागा योग्य ठरेल?
रहाण्याच्या खर्च, जायला-यायला लागणारा वेळ, सुरक्षितता ह्या सगळ्या गोष्टींचा ( इतर कोणते महत्वाचे मुद्दे असल्यास सांगावे) विचार करता न्यूयोर्क की न्यू जर्सी मधे राहणे जास्त सोईचे पडेल? न्यूयोर्क / न्यू जर्सी मधे कोणत्या भागात राहता येईल? मिपाकरांनी कृपया योग्य मार्गदर्शन करावे.
संपादकीय टिपण्णी: येथे मार्गदर्शनाची विनंती केली असताना देखील अनेक अवांतर प्रतिसाद आले होते. ते सर्व अप्रकाशीत केले आहेत. कृपया याची नोंद घ्यावी.
प्रतिक्रिया
31 Jul 2010 - 11:44 am | Nile
पर्या तुला स्थळ नाही आलेलं, लागला लगेच नेहमीची रेकॉर्ड सुरु करायला.
त्या भागाची फारशी माहिती नाही पण बरेच मित्र जर्सीतुन ये-जा करतात इतके माहीत आहे. अगदीच काही मदत मिळाली नाही तर मी तिथल्या मैत्रिणीशी संपर्क करुन काही मदत करता येईल का हे पहातो. (सद्ध्या ती तिथेच आहे याची खात्री नसल्याने आश्वासन देत नाही)
31 Jul 2010 - 12:03 pm | llपुण्याचे पेशवेll
ब्रूकलिन? लई डेंजर आहे बॉ. जरा जपून राह्यला सांगा. रहायला न्यू जर्सीच चांगलं पण रोजचा प्रवासाचा खर्च फार येईल. जर कॉलेजच्या आवारात हॉस्टेल वगैरे असेल तर ठीक आहे. तरीपण ब्रूकलीन डेंजरच आहे.
31 Jul 2010 - 9:31 pm | आमोद शिंदे
सदर कॉलेजमधे शिकणार्या विद्यार्थ्यांना संपर्क करुन माहिती काढणे उत्तम. इथे अपुर्या माहितीवर अनावश्यक माहिती मिळू शकते. त्यापेक्षा तिथल्याच सिनीयर विद्यार्थ्यांना संपर्क करावा. इंडीयन स्टूडंट असोशिअन वगैरे असेल तर उत्तम.
1 Aug 2010 - 12:29 am | विकास
इथे अपुर्या माहितीवर अनावश्यक माहिती मिळू शकते.
पूर्ण सहमत!
सदर कॉलेजमधे शिकणार्या विद्यार्थ्यांना संपर्क करुन माहिती काढणे उत्तम....
सहमत!
त्यापेक्षा तिथल्याच सिनीयर विद्यार्थ्यांना संपर्क करावा. इंडीयन स्टूडंट असोशिअन वगैरे असेल तर उत्तम.
खात्री नाही. :( पण प्रयत्न जरूर करावा.
काही सर्वसाधारण सुचना:
1 Aug 2010 - 12:22 pm | मृण्मयी दीक्षित
सानिका जा पण अकोमोडेशनची संपूर्ण माहिती घेऊन नंतरच जा कारण तिथे जर काही व्यवस्थित नसेल तर पुढे प्रोब्लेम्स उद्भवतात.
u must doubly sure about accommodation....
is there anything please ask………….