स्पष्टीकरण

नितिन थत्ते's picture
नितिन थत्ते in काथ्याकूट
29 Jul 2010 - 6:14 pm
गाभा: 

माझ्या http://www.misalpav.com/node/13353 या धाग्यावरील मजकूर आक्षेपार्ह असल्याच्या तक्रारी आल्याच्या कारणाने अप्रकाशित केला गेला होता. परंतु सदस्यांचे माझ्यावर टीका करणारे प्रतिसाद मात्र अप्रकाशित झाले नव्हते. त्यामुळे माझी कोंडी झाली होती. म्हणून संपादक मंडळाला आणि बिपिन कार्यकर्ते यांना विनंती केली असता माझे पुढील प्रमाणे म्हणणे त्या धाग्यावर प्रकाशित केले गेले आहे. परंतु मागे गेलेला धागा वर मात्र आला नाही त्यामुळे माझे आता नव्याने प्रसिद्ध झालेले म्हणणे सदस्यांपर्यंत पोहोचू शकले नाही.

तो धागा वर आणण्याची व्यवस्था करावी अशीही विनंती केली परंतु ते कदाचित तांत्रिक दृष्ट्या शक्य नसावे.

म्हणून त्या धाग्यावर संपादक मंडळाने प्रसिद्ध केलेले माझे म्हणणे येथे प्रसिद्ध करीत आहे.

नितिन थत्ते यांचे स्पष्टीकरण

माझ्या जालीय आयुष्यात मी कुणाची बदनामी केली नाही. जे वाक्य आक्षेपार्ह वाटले तेथेही * चिह्न देऊन तळटीप लिहिली होती. (*शत्रूबाबत असेच म्हणायचे असते अशी पद्धत त्याहीकाळी होती).

लेखाचा मूळ उद्देश "शाहिस्तेखानाची बोटे तोडणार्‍या, आता पराभूत झालेल्या आणि भर दरबारात औरंगजेबाचा अपमान करणार्‍या शिवाजीलाही सर्वशक्तिमान औरंगजेबाने तत्काळ ठार मारण्याचा मार्ग अवलंबला नव्हता" हा मुद्दा ठसवणे हा होता. आणि अफजल गुरू आणि कसाब जिवंत असल्याबद्दल रोज सकाळ संध्याकाळ दु:ख करणार्‍यांसारखेच त्याकाळी कोणी लोक असतील तर त्यांची मुक्ताफळे काय असतील याची कल्पना केली होती.

हा धागा एक दिवस येथे ठेवून नंतर उडवला जावा अशी संपादक मंडळाला विनंती.

प्रतिक्रिया

अवलिया's picture

29 Jul 2010 - 6:49 pm | अवलिया

(*शत्रूबाबत असेच म्हणायचे असते अशी पद्धत त्याहीकाळी होती).

शिवाजी राजांच्या संदर्भात स्वकीयांनी आणि परकियांनी (समकालीन वा ब्रिटिशपुर्वकालिन दस्ताऐवज- जे मराठ्यांच्या इतिहासाची साधने या नावाने जाणले जाते) लिहुन ठेवलेले आहे. त्यात स्वकीयांनी जे काही लिहिले आहे ते स्तुती, त्यांच्या पराक्रमाची वर्णने (कित्येकदा अतिशयोक्त स्वरुपात) तर अपयशांना झाकण्याचे किंवा दुर्लक्षाचे धोरण आहे हे जितके खरे आहे तितकेच शिवाजी महाराजांच्या विरुद्ध असलेल्या शाह्यांचे, पातशहाचे समर्थक, नोंदणीकार इ. शिवाजीच्या पराक्रमाबद्दल तुच्छता, बादशाहाचे कौतुक (कधी कधी अवास्तव) तसेच बादशाहाच्या अपयशाबद्दल मौन वा दुर्लक्ष करत असतात. ख-या इतिहासकाराला दोन्होतुन सारासार विचाराने नक्की काय झाले असेल हे शोधुन काढायचे असते

हे सगळीकडेच असते हा तुमचा जो मुद्दा आहे तो योग्य होता आणि मान्य आहे. पण तुम्ही जे रुपक निवडले त्यात मोठी चुक होती ती ही की शिवाजीच्या स्त्रियांच्या संबंधी, परधर्माच्या पवित्र वस्तुसंबंधी (उदा कुरआन्) तसेच प्रार्थनास्थळांविषयी जो उदार आणि सर्व समावेशक दृष्टीकोन होता त्याची स्वकियांनी तर स्तुती केलीच केली, पण कट्टर विरोधकांनी सुद्धा कधीही त्यांच्याकडे बोट दाखवलेले नाही. त्यामुळे काल्पनिक अशा रुपक कथेत सुद्धा ते अयोग्य ठरते कारण समकालीन शत्रुंनी सुद्धा त्याने असे असे केले हे कुठेच म्हटलेले नाही. सबब रुपकातले ते वाक्य अपमानकारक होते. असो.

इतिहासात जे घडले ते समोर असते पण का घडले, हेतु काय हे मात्र जीवनाचा समग्र अभ्यास करुनच ठरवावे लागते आणि इथे वेगवेगळा अभिप्राय अनेक जण देउ शकतात. तो विचार असतो. त्यामुळे कुणी वाट चुकलेला देशभक्त म्हणु शकतात, कुणी बंडखोर, कुणी स्वतःचे राज्य असावे अशी इच्छा असलेला सरंजामदार, कुणी स्वराज्य संस्थापक, कुणी हिंदवी राज्य संस्थापक, कुणी गोब्राह्मण प्रतिपालक तर कुणी साक्षात रुद्राचा अवतार असे मत मांडु शकतात. हे सर्व विचार आहेत.

विचारांचा मुकाबला विचारांनी करता येतो. विचारांची देवाण घेवाण विचारांनी होवु शकते. विचाराने विचार बदलले जातात.
पण जेव्हा विचार नसतो आणि केवळ अविचार असतो तेव्हा त्याचा मुकाबला विचारांनी कसा करायचा? हा आमच्यासारख्या अल्पमती मनुष्याला प्रश्न पडतो.

दिसला दगड की फास शेंदुर आणि मान देव .. टेकव डोके ... असं वागणारी आम्ही माणसं. स्वच्छ चारित्र्य असणारा, प्रत्यक्षात देवापेक्षाही रयतेची काळजी पोटच्या पोरापेक्षा जास्त आपुलकीने घेणारा राजा युगातुन एखादाच होतो तो आम्हाला लाभला याचा अभिमान बाळगत आम्ही शिवाजीवर देवापेक्षा जास्त प्रेम करतो. त्यामुळे स्वप्नात सुद्धा आम्ही त्याने कधी स्त्रियांवर अत्याचार केले असतील असे मानुच शकत नाही.

त्यामुळे असल्या काल्पनिक कथांना सुद्धा कायम विरोध आणी विरोधच विचाराने.... गरज पडल्यास अविचाराने !

धन्यवाद.

नितिन थत्ते's picture

29 Jul 2010 - 7:01 pm | नितिन थत्ते

मी काय लिहिले होते त्याला कोणी विरोध करणे हे मान्यच आहे.

पण ते माझे मत नव्हते तर एखाद्या काल्पनिक व्यक्तीची बाष्कळ बडबड म्हणूनच ते लिहिले होते. आणि तसे स्पष्ट त्या धाग्यातही म्हटलेच होते.

त्यामुळे जेव्हा माझे म्हणणे पुसले गेले आणि त्यावरची टीका मात्र राहिली तेव्हा मला माझी बाजू नव्याने मांडणे भाग पडले. आणि ते नुसते मागच्या पानावर राहणे पुरेसे वाटले नाही.

संपादकांना त्या वाक्याबद्दल आक्षेप/काळजी/भीती वाटली असेल तर तेवढे वाक्य गाळून बाकीचे लेखन ठेवता आले असते. त्याऐवजी पूर्ण मजकूर अप्रकाशित केला गेला.

>>>मी काय लिहिले होते त्याला कोणी विरोध करणे हे मान्यच आहे.

संपला विषय आणि भांडण. आमचा मुद्दा (विचार) मान्य केला, देव पावला. :)

>>>त्यामुळे जेव्हा माझे म्हणणे पुसले गेले आणि त्यावरची टीका मात्र राहिली तेव्हा मला माझी बाजू नव्याने मांडणे भाग पडले. आणि ते नुसते मागच्या पानावर राहणे पुरेसे वाटले नाही.

सहमत आहे. निदान त्यामुळे मला पण माझे म्हणणे मांडायची संधी मिळाली.

>>>संपादकांना त्या वाक्याबद्दल आक्षेप/काळजी/भीती वाटली असेल तर तेवढे वाक्य गाळून बाकीचे लेखन ठेवता आले असते. त्याऐवजी पूर्ण मजकूर अप्रकाशित केला गेला.

ते तुमचं तुम्ही बघा ब्वा ! सध्या आमचा तह आहे. :)

(तसाही तह पाळण्यात आमच्यापुढे शिवाजीचा आदर्श आहे ;) )

राजेश घासकडवी's picture

29 Jul 2010 - 7:31 pm | राजेश घासकडवी

मी थत्तेंचा मूळ लेख वाचला होता. त्यावर प्रतिसाद टंकत असतानाच तो अप्रकाशित झाला व नंतर वाचनमात्र झाला. म्हणून मी तो प्रतिसाद थत्तेंच्या खरडवहीत टाकला. या लेखामुळे किमान मूळ लेख वाचनमात्र होण्याची, चर्चा अर्धवट राहाण्याची त्रुटी भरून निघाली.

ऑरवेलने १९८४ मध्ये मिनिस्ट्री ऑफ ट्रूथ ची कल्पना केली आहे. सत्य घडवणं, त्याला आकार देणं हे तिचं काम असतं. मला संपादक मंडळाची तुलना मिनिस्ट्री ऑफ ट्रूथ शी करण्याचा थिल्लरपणा करायचा नाही. एकंदरीतच जनमानसिकता सत्याला आकार देते ही प्रक्रिया मिनिस्ट्री ऑफ ट्रूथ सारखीच काम करते असं मला म्हणायचं आहे. संपादक हे कितीही निस्पृह असले तरी या जनमानसिकतेचं त्यांना प्रातिनिधित्व करावं लागतं.

आपला तो बाब्या हे मान्य असलं तरी काही बाब्ये इतके प्रेमाचे असतात की त्यांच्याविषयी इतरांनी खोटेपणानेदेखील त्याला कार्टा म्हटलेलं चालत नाही. त्याला कोणीतरी भूतकाळात कार्टा म्हटलं अशी अफवा आहे असं म्हटल्यानेही राग येतो. दगडफेक वगैरे होते. हमने तो बोसे लिये, तसवीरों के, ख्वाब मे.. असं असलं तरीही आरीज नीले पडतात. आपल्या एखाद्या बाब्याबाबत चांगलं लिहिण्यासाठी, अत्यंत बाष्कळ, प्रक्षोभक शब्दात इतरांना कार्टा म्हटलं तर ते लेखन चालतं. असंच बाष्कळ लेखन करणाऱ्याचं चित्रण (मूळ लेखकाच्या मानसिकतेचं विडंबन करण्यासाठी म्हणून) केलेलं चालत नाही.

-लिखित अक्षर धोकादायक असण्याचे दिवस दोनेक शतकांपूर्वीच गेले. आपण मात्र तोच बागुलबुवा घेऊन बसलो आहे.
-जर थोर मानलेली व्यक्ती देव पातळीवर नसली तर ती शून्य असा टोकाचा विचारही दिसतो. गालबोट चालणार नाही.
-समाजात अशा प्रवृत्ती आहेत की ज्या वरील दोन मुद्यांचा वापर करून गुद्यांवर येतात.
-त्या प्रवृत्तींच्या गुद्यांना आळा घालायला न्यायव्यवस्था असमर्थ आहे.

या सर्व परिस्थितीचा विचार करून मनाला घरं पडतात. ती परिस्थिती तशी आहे याविषयीचे सर्वच उल्लेख नष्ट केले तर?

क्रेमर's picture

29 Jul 2010 - 7:45 pm | क्रेमर

हा धागा एक दिवस येथे ठेवून नंतर उडवला जावा अशी संपादक मंडळाला विनंती.

असे असल्यास प्रतिसाद लिहिण्यात वेळ दवडावासा वाटत नाही.

नितिन थत्ते's picture

29 Jul 2010 - 8:16 pm | नितिन थत्ते

संपादक मंडळाला वाटल्यास हा धागा नंतरही येथे रहायला माझी हरकत नाही,

किमान एक दिवस ठेवावा अशी अपेक्षा आहे म्हणजे पूर्व आणि पश्चिम दोन्ही भागात राहणार्‍यांना वाचण्याची संधी मिळेल.

क्रेमर's picture

29 Jul 2010 - 10:47 pm | क्रेमर

श्री थत्ते यांनी दिलेले स्पष्टीकरण रास्त आहे. मूळ लेखातील (अनेक सदस्यांच्या मते) आक्षेपार्ह वाक्य वगळून लेख पुनर्प्रकाशित केला जावा असे मला वाटते.

टिउ's picture

29 Jul 2010 - 11:15 pm | टिउ

हेच म्हणतो...मी मूळ लेख वाचला नाही, पण लेख अप्रकाशित करुन प्रतिक्रिया तश्याच ठेवणं लेखकावर अन्यायकारक आहे असं वाटतं. अश्याने लेखकाबद्दल गैरसमज होण्याची शक्यता वाढते.
आक्षेपार्ह मजकुर काढुन बाकी लेख ठेवायला हवा होता असं वाटतं. किंवा सगळाच मजकुर आक्षेपार्ह असेल तर धागाच अप्रकाशित करायला हवा होता...

ऋषिकेश's picture

30 Jul 2010 - 4:26 pm | ऋषिकेश

प्र.का.टा.आ.

अर्धवटराव's picture

30 Jul 2010 - 12:10 am | अर्धवटराव

माझा प्रतिसाद नितिनच्या मूळ लेखातल्या एका वाक्यावर होता, तेव्हा तो या धाग्यात नको यायला.
म्हणुन प्र.का.टा.आ.

-अर्धवटराव

विजुभाऊ's picture

30 Jul 2010 - 1:11 pm | विजुभाऊ

लेख अप्रकाशीत केला ते बरेच झाले.
अभिव्यक्तीस्वातन्त्र्याच्या हक्काबाबतीत बोलायचे झाले तर जशी एखाद्याला अभिव्यक्तीचे स्वातन्त्र्य असते तसे ते इतरानाही असते हे ओळखायला हवे,
प्रत्येक सभ्यतेचे काही अलिखीत नियम असतात.
अभिव्यक्तीस्वातन्त्र्याच्या नावाखाली नंगा नाच घालणे एखाद्या देशात चालत असेल तेच दुसर्‍या देशात चालत नाही.
लेख अप्रकाशित करुन प्रतिक्रिया तश्याच ठेवणं लेखकावर अन्यायकारक असू शकेल. पण तेच जर आख्खा धागाच उडवला असता तर लेखकाने त्यावरही आक्षेप घेतला असता.

नितिन थत्ते's picture

30 Jul 2010 - 1:19 pm | नितिन थत्ते

>>लेख अप्रकाशित करुन प्रतिक्रिया तश्याच ठेवणं लेखकावर अन्यायकारक असू शकेल. पण तेच जर आख्खा धागाच उडवला असता तर लेखकाने त्यावरही आक्षेप घेतला असता

संपादकांना खालीलप्रमाणे व्यनि केला होता.

लेख उडवला आहे याला माझी हरकत नाही.

परंतु मी काय लिहिले होते ते दिसत नाही आणि बदनामी केली असे म्हणणारे प्रतिसाद मात्र दिसतात. मला माझे म्हणणे मांडता येत नाही ही स्थिती माझ्यासाठी बदनामीकारक आहे.

म्हणून तो लेख पूर्णपणे उडवावा अशी विनंती.

लेख अप्रकाशित केल्याबद्दल माझे ऑब्जेक्शन नव्हते. लेखच फक्त अप्रकाशित केल्याबद्दल ऑब्जेक्शन घेतले होते.

थत्तेंचा मूळ लेख काही मी वाचला नाही (पण प्रतिसादांवरून काहिसा अंदाज लागला). सबब मूळ लेखावर प्रतिक्रिया देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

बाकी अवलियांच्या आणि विजुभाउंच्या शब्दाशब्दाशी पूर्णपणे सहमत.

जाता जाता: महाराजांचा एकेरी उल्लेख फारच खटकतो. "शिवाजीलाही सर्वशक्तिमान औरंगजेबाने..." किंवा "शिवाजीच्या पराक्रमाबद्दल ..." ऐवजी "महाराजांनाही सर्वशक्तिमान औरंगजेबाने..." किंवा "महाराजांच्या पराक्रमाबद्दल ..." जास्त बरोबर वाटतं.

शिवभक्त

नंदू

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

30 Jul 2010 - 9:01 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

महाराजांचा एकेरी उल्लेख मलातरि खटकत नाही. शिवाजी 'आपला' राजा वाटतो. (मानणारे) देवालाही एकेरी हाक मारतात, आईचा उल्लेखसुद्धा एकेरीच असतो. 'आपल्या' मित्राचा उल्लेख अचानक अहो-जाहो केला तर तो मैत्रीत अपमान किंवा हेटाळणी समजली जाते.

बाकी मूळ लेख, स्पष्टीकरण याबद्दल अळी मिळी गुप चिळी.

पंगा's picture

30 Jul 2010 - 9:16 pm | पंगा

सहमत.

"शिवाजी म्हणतो..." हा ("Simon says..."च्या धर्तीवरचा?) लहान मुलांचा खेळसुद्धा, "बाऽऽऽऽअदब, बाऽऽऽऽमुलाहिजा, गोब्राह्मणप्रतिपालक क्षत्रियकुलावतंस छत्रपती (+ महाराजांची आणखीही जी काही बिरुदे असतील ती) शिवाजीमहाराऽऽऽऽज (की जय!) म्हणतात..." असा खेळावा काय?

(तरीही कोणीतरी "गोब्राह्मणप्रतिपालक"वरून पंगा घेईलच... घेवोत!)

काहीतरीच!

कोणत्याच धाग्याचे नीट वाचन होतच नाही.मिसळीचे चित्र नसणे,नवे प्रतिसाद न दिसणे,नवे धागे व जुने धागे नीट न उमगणे अश्या असंख्य अडचणी येत आहेत.जुने ते सोने हेच खरे... असो अवातंर प्रतिसादाबद्दल माफी असावी.
बाकी नानाशी सहमत.अदितीशी देखिल सहमत.

अप्पा जोगळेकर's picture

31 Jul 2010 - 1:54 pm | अप्पा जोगळेकर

लेख उडवला की प्रतिसाद पण उड्तात का? की ते तसेच राहतात?