लो कॅलरी चिकन बिर्याणी...
साहीत्यः
चिकनः
२ पाऊंड चिकन- स्वच्छ करून धुवून मोठाले तुकडे करुन
३ मोठे चमचे दही
मसाले:
२ चमचे गरम मसाला
१ चमचा हळद
३ चमचे तिखट
२ तेजपत्ते
८-१० मिरे
४-५ लवंगा
३ चमचे आले-लसूण पेस्ट
१ चमचा धणे पावडर
अर्धा चमचा शाहीजीरे
३-४ वेलची
१-२ मोठ्या वेलच्या
२-३ काड्या दालचीनी
खडे मसाले नसतील तर ३-४ चमचे आयता बिर्याणी मसाला वापरला तरी चालेल...
३-४ काड्या पुदीना - बिर्याणीसाठी अगदी मस्ट...
भातः
२ वाट्या बासमती तांदूळ - (मी सोनामसूरी वापरला होता) अर्धा तास आधी नुसतेच धुवून निथळत ठेवावेत.
४ वाट्या पाणी
अर्धे लिंबू
१ टेस्पून तेल/तूप
२ चिमूट शहाजीरे, नसल्यास साधे जीरे
३-४ काळीमिरी
२ लवंगा
१ काडी दालचीनी
२ हिरव्या वेलच्या
१ तेजपत्ता
मीठ
सजावटीसाठी:
२ कांदे बारिक चिरुन १ चमचा तेलात कुरकुरीत भाजून...
३-३ चमचे प्रत्येकी हीरव्या मनूका आणि काजू तुकडा, तव्यावर खरपूस भाजून घ्यावेत.
४-५ पुदीना पाने
१-२ चिमट्या केसर(ऐच्छीक) असल्यास उत्तम
१ वाटी दूध - दूध नको असल्यास पाणी वापरले तरी चालेल.
कृती:
१) एका वाडग्यात चिकन + दही + सगळे मसाले + तिखट + मीठ मिक्स करून २-३ तास चांगले मुरत ठेवावे.
२) तेव्हाच दुधात केसर भिजत घालावे.
३) एका मोठ्या भांड्यात ४ वाट्या पाणी घेउन त्यात तांदूळ, लिंबाचा रस, मीठ आणि मसाले घालून मध्यम आंचेवर शिजत ठेवावे. अंदाजे १५ मिनीटे लागतात.
४) भात शिजत असताना उगाचच ढवळू नये, नाहीतर भात चिकट आणि तुटका बनतो.
५) एका कढईत मुरत ठेवलेले चिकन टाकून मध्यम आंचेवर शिजवावे. अंदाजे २०-२५ मिनीटे लागतात. चिकन अगदी कोरडे करू नये, लागल्यास थोडे पाणी टाकावे.
६) आता शिजलेले चिकन आणि भात थोडे थंड करून घ्यावे. भात परातीत किंवा मोठ्या ताटात उपसून थंड करावा आणि तेव्हाच थोडेसे तेल घालावे म्हणजे चिकट होणार नाही. भाताचे ४ भाग तर चिकनचे २ भाग करावे
७) आता एका खोल भांड्याला किंवा कढईला २-३ थेंब लावून घ्यावे, त्याऐवजी ऑइल-स्प्रे वापरला तरी चालेल.
८) सगळ्यात खाली भाताचा थर घालून घ्यावा. त्यावर चिकनचा थर घालावा.
९) परत भाताचा १-१.५ इंचाचा थर घालावा, त्यावर पुदीना आणि अर्धे काजू-मनूका घालाव्यात.
१०) परत भाताचा हलका थर घालून त्यावर चिकनचा शेवटचा थर घालावा.
११) आता भाताचा शेवटचा थर घालून त्यावर कांदा, बारिक कापलेला पुदीना आणि काजू-मनूका घालाव्यात.
१२) आता रवी किंवा सांडशीच्या टोकाने ५-६ ठिकाणी भांड्याच्या बुडापर्यंत खड्डे करून त्यात केसर घातलेले दूध टाकावे.
१३) सगळ्यात शेवटी घट्ट झाकण लावून १० मिनीटे मंद आंचेवर ठेवून द्यावे.
१४) कांदा-टोमॅटोच्या रायत्यासोबत सर्व्ह करावे.
प्रतिक्रिया
26 Jul 2010 - 10:16 am | प्रभो
आईशपथ......एक नंबर फोटू आहे........खल्लास..
26 Jul 2010 - 10:33 am | दिपक
26 Jul 2010 - 10:33 am | सहज
भूक खवळली.
बाकी फोटो उजव्या रकान्यात घुसत आहेत त्याकरता बहुतेक ६५० विड्थ असलेले फोटो धाग्यात टाकावे लागणार.
26 Jul 2010 - 10:34 am | दिपाली पाटिल
तेच तर...संपादन करता येत नाहीये म्हणून...
26 Jul 2010 - 10:47 am | सहज
संपादनाची सोय हवीच!
साधी साधी गोष्ट चुकल्यामुळे दुरुस्त होईस्तोवर किती रुखरुख लागते याची कल्पना आहे. सिंपल टायपो, सेटींग इ करता संपादकाकडून काम करवून घेणे नको वाटते.
26 Jul 2010 - 8:59 pm | क्रेमर
उत्तम पाककृती.
ही सोय असायलाच हवी. ०.००१% धाग्यांकरता ९९.९९९% धाग्यांवर स्वसंपादनास बंदी घालणे अयोग्य आहे.
26 Jul 2010 - 11:26 am | स्वाती दिनेश
मस्त दिसते आहे बिर्याणी.. एकदम माउथवॉटरिंग!
स्वाती
26 Jul 2010 - 1:04 pm | गणपा
खल्लास!!!!!!!!!!!
एकदम स्वर्गप्राप्ती झाली फोटु पाहुनच.
26 Jul 2010 - 2:44 pm | यशोधरा
पाकृ सुरेख आणि फोटू तर मस्तच!
26 Jul 2010 - 5:14 pm | स्मिता_१३
पाकृ सुरेख आणि फोटू तर मस्तच!
26 Jul 2010 - 3:51 pm | स्वाती२
मस्त! मस्त! मस्त!
26 Jul 2010 - 4:45 pm | कच्चा पापड पक्क...
*****अप्रतिम *****
26 Jul 2010 - 6:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
केवळ जब्रा........!
-दिलीप बिरुटे
26 Jul 2010 - 8:52 pm | पारुबाई
अप्रतिम.....लाजबाब !!!
26 Jul 2010 - 10:28 pm | श्रावण मोडक
आपण कुठं असता? नाही, काय आहे की, अशा पाकृची शिक्षा म्हणजे पदार्थ करून लगेच वाढायला लावणं. ते करण्यासाठी यावं म्हणत होतो. :)
26 Jul 2010 - 10:31 pm | छोटा डॉन
फोटो केवळ जिवघेणा आहे !!!
अस्साच म्हणजे अगदी अगदी अस्साच्चऽऽऽऽ फोटो असणार्या "व्हेज बिर्याणी"ची पाकृ लिहावी ही विनंती.
मस्त आहे च्यायला ...
27 Jul 2010 - 6:04 am | सन्जोप राव
जबरा पाककृती आणि फोटो.
तेजपत्ता साठी तमालपत्र आणि शाही जिरे साठी शहाजिरे असे मराठी शब्द आहेत.
28 Jul 2010 - 12:18 pm | भारतीय
सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुट्लेलं बघुन माझ्या डोळ्यात पाणी आलं हो..! शाकाहार्यांनी काय घोडं मारलय? आता 'शुद्ध शाकाहारी लो कॅलरी बिर्याणी 'येऊ द्या
28 Jul 2010 - 10:24 pm | दिपाली पाटिल
सगळ्यांना धन्यवाद
28 Jul 2010 - 10:28 pm | नितिन थत्ते
धन्यवाद काय?
व्हेज बिर्याणीची कृती कोण लिहिणार?
अवांतरः लो कॅलरी आणि रेड्यूस्ड कॅलरी मध्ये काय फरक असावा? (ह. घ्या)
28 Jul 2010 - 11:08 pm | दिपाली पाटिल
व्हेज बिर्याणी बनवली की लग्गेच पाकृ पण टाकेन...
अवांतरः लो कॅलरी आणि रेड्यूस्ड कॅलरी मध्ये काय फरक असावा? (ह. घ्या)
-- लो-कॅलरी आणि रेड्यस्ड फॅट मध्ये तसा काही ग्रेट फरक नाहीये...
28 Jul 2010 - 10:37 pm | दिपाली पाटिल
व्हेज बिर्याणीसाठी... उभा चिरलेला कांदा, पातळ कापलेला फ्लॉवर् ,मटार् ,फरसबी, गाजर...थोड्याश्या तेलात/तुपात नुसतेच थोडे तपकीरी होइपर्यंत भाजून घ्यायचे, मग वरिलप्रमाणे दही+मसाला, हवा असल्यास एखाद चमचा मसाला वाढवावा... बाकी कृती सारखीच...बाकी गणपाने तर दिलीच आहे व्हेज बिर्याणी....
30 Jul 2010 - 1:49 am | राघव
त्या पाकृ साठी नकोय हो त्यांना, त्या जळ-जळ-जळवणार्या खल्लास फोटूंसाठी हवीये.. ;)
गणपाशेठची पाकृही मस्तच आहे.. त्यात कसला वाद! तुम्ही दोघंही खास खवय्ये आहात. खाऊ घालण्यात लय आनंद मिळतो तुम्हाला.. फोटू बघूनच किती हौसेनं केलंय ते दिसतंय!! :)
राघव
30 Jul 2010 - 9:41 am | फ्रॅक्चर बंड्या
अप्रतिम ..
30 Jul 2010 - 10:44 am | महेश हतोळकर
मलातर वास पण आला!
31 Jul 2010 - 5:18 am | मिसळभोक्ता
चिकन, दही, तांदूळ, दूध...
हे लो कॅलरी कसे बॉ ?
मग, हाय कॅलरी बिर्याणीत काय टाकतात ? ग्लूकोज ?
1 Aug 2010 - 4:23 am | दिपाली पाटिल
हाय कॅलरी बिर्याणीत...तळलेला कांदा, तळलेले काजू-बदाम-मनूका, बासमती, साजूक तूप,भरपूर तेल, फुल फॅट दही वापरतात..
मी जेव्हा पाकृ लिहीली तेव्हा स्व-संपादन नव्हते ना म्हणून हे लिहीता नाही आलं...
1 Aug 2010 - 4:37 am | गणपा
>> मी जेव्हा पाकृ लिहीली तेव्हा स्व-संपादन नव्हते ना म्हणून हे लिहीता नाही आलं...
हे हे हे, अस काय करता दिपाली तै १६ का १८ संपादक आहेत ना त्यांना विनंती करा की :)
ते मदत करतील ना हव ते बदल करायला.
2 Aug 2010 - 2:24 am | दिपाली पाटिल
जाउ देत रे गणपा... एवढ्या-एवढ्याश्या चुका सुधारायला कुठे संपादकांना सांगत बसायचं? त्यापेक्षा स्व-संपादनच दिल्यास बरं होइल...
2 Aug 2010 - 11:47 am | मिसळभोक्ता
हाय कॅलरी बिर्याणीत...तळलेला कांदा, तळलेले काजू-बदाम-मनूका, बासमती, साजूक तूप,भरपूर तेल, फुल फॅट दही वापरतात..
अगा बाबो ! आणि हे सगळे खाऊन लोक जीवंत राहतात ?
10 Sep 2010 - 4:01 pm | Arun Powar
दिपाली, तू चिकन बिर्याणी मधल्या कॅलरीज कशा मोजलीस, ते सांगशील का? कोणते यंत्र वापरले कॅलरी मोजण्यासाठी? ते कुठे मिळते?
10 Sep 2010 - 7:26 pm | विलासराव
बिर्याणी आवडली बरं का.