.... लहानपणी आपल्यातल्या बहुतेक सगळ्यांनीच हि गोष्ट ऐकली असेल....
... जेंव्हा गोष्ट ऐकायची इच्छा व्हायची आणि घरातल्या कोणत्या तरी मामा कडे (कारण असल्या गोष्टी सांगण्यात मामा लोकांचाच उत्साह जास्त असतो) गोष्टीची फर्माईश व्हायची...तेंव्हा मामा सुरू व्हायचा...
....कापुसकोंड्याची गोष्ट सांगु का?.....मग ते पुढलं कधिही न संपणारं गुर्हाळ चालु व्हायचं...
मामा : कापुसकोंड्याची गोष्ट सांगु का?....
मी : सांग...
मामा : सांग काय म्हणतीस्....कापुसकोंड्याची गोष्ट सांगु का?
मी : सांग ना रे मामा...
मामा : मी : सांग ना रे मामा...काय म्हणतीस? .कापुसकोंड्याची गोष्ट सांगु का?
...........
.........
......
.. हे संपायचच नाही....
.....मला खरच जाणुन घ्यायची इच्छा आहे...कि कोण आहे हा कापुसकोंड्या...आणि...काय आहे त्याची ती गोष्ट?
......मि.पा.वर कोणाला माहिती असेल तर क्रुपा (हे कसं नीट लिहायचं ते ही सांगा) करा माझ्यावर..
.....नाहीतर पिंडाला कावळा शिवणार नाही हो माझ्या.....!
कापुसकोंड्याची गोष्ट....... म्हणजे नक्की कोणती गोष्ट
गाभा:
प्रतिक्रिया
29 Jul 2010 - 12:54 pm | अवलिया
पाध्येंना माहित आहे कापुसकोंड्या कोण ते.
फक्त आता पाध्ये कोण ? हा प्रश्न विचारु नका. ;)
29 Jul 2010 - 1:04 pm | जाई अस्सल कोल्हापुरी
:)
29 Jul 2010 - 12:57 pm | नितिन थत्ते
पिंडाला कावळा शिवणार नाही काय म्हणता ? कापुसकोंड्याची गोष्ट सांगू?
=))
29 Jul 2010 - 12:59 pm | विजुभाऊ
मि.पा.वर कोणाला माहिती असेल तर क्रुपा (हे कसं नीट लिहायचं ते ही सांगा) करा माझ्यावर..
कृपा = K +shift R + u +P +aa
.....नाहीतर पिंडाला कावळा शिवणार नाही हो माझ्या.....!
पिंडाला चांगला आंबेमोहोराचा भात असेल तर कावळा लवकर शिवतो पिंडाला. असे समस्त अखील महाराष्ट्रा कावळेसेने ने ठरवले आहे
29 Jul 2010 - 1:01 pm | अवलिया
नाही. आंबेमोहोर भातापेक्षा चांगले आंबट दही असेल तर जास्त लवकर शिवतो.
29 Jul 2010 - 1:11 pm | Nile
अरे अरे असे भांडु नका. तुम्ही म्हणाल ते तुमच्या तुमच्या वेळेला ट्राय करु आपण, ठीके?
29 Jul 2010 - 1:17 pm | जाई अस्सल कोल्हापुरी
...... हे उत्तर माझ्या एका आगाउ भावाने....योग्य वेळी छापुन एका आगोचर आजोबांचे तोंड मस्त बंद केले होते.... तुमच्या वेळी तसे "बांधु" म्हणुन.....!
...झकास!
29 Jul 2010 - 2:10 pm | अवलिया
घ्या.. तुझ्याचसाठी सांगत होतो.. तुला दही आवडते ना?
29 Jul 2010 - 10:04 pm | Nile
गल्लत होते आहे का?
ते विरजणवाले काका वेगळे. वयाचे परिणाम का? ;-)
29 Jul 2010 - 5:12 pm | स्वछंदी-पाखरु
आमच्या कडे असलेल्या अगदी शुद्ध कावळ्यांकडुन सर्वप्रकारांच्या पिंडाला स्पर्श करुन मीळेल**.
**- दर हा वय, नाते व मृतकाच्या ईछा प्रमाणे लागु पडेल...
जाई बाई तुमच्यासाठी कोणता राखवुन ठेऊ??? कावळा कि..... डोमकावळा...?????
29 Jul 2010 - 1:02 pm | नितिन थत्ते
प्र का टा आ
29 Jul 2010 - 1:21 pm | जाई अस्सल कोल्हापुरी
म्हण्जे काय?..... खु के त ब हो...
(खुलासा केला तर बरे होइल)
29 Jul 2010 - 1:24 pm | Nile
म्ह ते गो सां ना आ.
(म्हणजे ते गोष्ट सांगत नाही आहेत) ;)
त्यांनी गोष्ट लिहली पण मग प्र(तिसाद) का(ढुन) टा(कला) आ(हे)
29 Jul 2010 - 1:22 pm | जाई अस्सल कोल्हापुरी
म्हण्जे काय?..... खु के त ब हो...
(खुलासा केला तर बरे होइल)
29 Jul 2010 - 1:40 pm | डावखुरा
एक होता कापुसकोंड्या... तो......,......,...,.....
.
.
.
जाउद्या हो खुप कंटाळा आला आहे...नंतर कधी तरी.....
चा.प्र.शु.
(चांगल्या प्रतिक्रियांसाठी शुभेच्छा)
29 Jul 2010 - 2:28 pm | परिकथेतील राजकुमार
=)) =))
आमचा एक परममित्र MCK याहु ग्रुप वर 'कापूसकोंड्या' ह्या नावाने कथा लिहायचा त्याची आठवण झाली.
=)) =))
29 Jul 2010 - 3:52 pm | मितभाषी
आमचा एक परममित्र MCK याहु ग्रुप वर 'कापूसकोंड्या' ह्या नावाने कथा लिहायचा त्याची आठवण झाली.
>>>>>..
पर्या ह्यो कोन्ता गुरुप हे.
29 Jul 2010 - 3:55 pm | परिकथेतील राजकुमार
मराठी चावट कथा =))
29 Jul 2010 - 3:06 pm | कार्लोस
हि फक्त काल्पनिक कथा आहे
विदर्भ मधिल शेतकर्यना विचारा तेच छान उत्तर देतिल
29 Jul 2010 - 3:08 pm | शुचि
हा कापूसकोंड्या सेल्फ आयटरेटीव्ह, सेल्फ अडाप्टीव्ह अल्गॉरीदम मधे फसलेला, युगानुयुगे जन्म घेत फिरणारा अतृप्त (AT+shift RUPT) जीवात्मा आहे. याला मुक्तीसाठी कोण्यातरी जबर्या गुरुची गरज आहे.
31 Jul 2010 - 2:28 am | पंगा
बिच्चारा! याची कहाणी संपत तर नाहीच, पण सुरूसुद्धा होत नाही. आणि तरीही मस्तपैकी लूपमध्ये अडकवतो - ऐकणार्यालाही, आणि सांगणार्यालाही.
31 Jul 2010 - 5:08 am | मिसळभोक्ता
स्वतः कापूसकोंड्याच जर कापूस कोंड्याची गोष्ट सांगत असेल, तर ती रिकर्सिव्ह होईल, आयटरेटिव्ह नाही. सेल्फ आयटरेटिव्ह अशी कोणतीही संकल्पना नाही. तसेच सेल्फ अडाप्टिव्ह देखील नाही. अल्गॉरिदम अडाप्टिव्ह नसतात. ह्यूरिस्टिक असतात. बाकी चालू द्या.
29 Jul 2010 - 4:31 pm | भारतीय
कापुसकोंड्या .. फक्त कोल्हापुरात होता काय? आम्हाला नाही बॉ भेटला कोणी कापुसकोंड्या ..
29 Jul 2010 - 5:37 pm | जाई अस्सल कोल्हापुरी
....... मी सांगू का तुम्हाला?
.... कापूसकोंड्याची गोष्ट?...मला गोस्ट म्हायती ऐ ..ती बी आरधी....... त्यो कोन हाये.....कुटं र्हातु...काय खातू...पोटापान्याचा उद्येग काय.....तेचा पत्त्या काय्....त्यो फकस्त कोलापुरातच का आला होता....तुमानी का न्हाय भेटला..... हे का...य बी ठावं न्हाय.....!
...... पाध्ये काकांना माहिती आहे... ते व्यक्तिगत रित्या ओळखतात म्हणे त्याला! (असे एका मुरलेल्या मि.पा.करानी सांगितले आहे). पाध्ये काका कोण? हे विचारू नका असाही मौलिक सल्ला दिला आहे.
...तुम्हाला पाध्येकाका महिती आहेत का हो?
...असेल तर सांगा..!
(नवख्या व्यक्तिंना वाटाड्या मिळतो का हो या मि.पा.राज्यात?)
30 Jul 2010 - 2:23 pm | भारतीय
पाध्येकाका फक्त मुरलेल्या मिपाकरांनाच दर्शन देतात म्हणे.. मी काय अजून मुरलो नाय ईथे.. माझ्या आधी तुम्हीच मुराल, तेंव्हा पाध्येकाका भेटल्यास मलाही सांगा.. कसे दिसतात, काय घालतात, काय खातात वगैरे... कापुसकोंड्या त्यांना कुठे भेटला.. त्यांनी त्याला कोल्हापुरातच का नेले, बाकी महाराष्ट्रावर अन्याय का केला असे खुप प्रश्न विचारा त्यांना..
29 Jul 2010 - 5:47 pm | मेघवेडा
लेख आवडला. जाईबाई असंच काय काय मस्त मस्त लिहीत राहा! :)
29 Jul 2010 - 7:02 pm | प्रभो
असेच म्हणतो.....
परममित्र टारोबाची आठवण झाल्याने डोळे पाणावले.. ;)
30 Jul 2010 - 12:17 am | स्वाती फडणीस
अगदी खात्रीने नाही.. पण
मला असं वाटतं..की....
कापुसकोंड्या म्हणजे पिंजारी तो कापुस पिंजुन धागा धागा मोकळा करतो.. तशी शब्द आणि शब्द पिंजून काढणारी / काढणार्याची गोष्ट, म्हणजे कापुसकोंड्याची गोष्ट.
30 Jul 2010 - 4:41 pm | जागु
मला माहीत आहे. पण पुर्ण आठवत नाही. उद्या सांगेन विचारुन.
30 Jul 2010 - 5:16 pm | कापूसकोन्ड्या
वा छान गोष्ट आहे की