काही गावांची नावं विचित्र असतात. ती कशी पडली असावीत असा प्रश्न पडतो. काही दिवसांपूर्वी एक फार चांगलं पुस्तक वाचनात आलं. गिरीश कुबेर यांचं 'हा तेल नावाचा इतिहास आहे' या नावाचं. त्यात इंधनाच्या तेलाच्या इतिहासापासून सध्या त्यावरून सुरू असलेले राजकारण याचे अतिशय माहितीपूर्ण आणि मुख्य म्हणजे रंजक भाषेत विवेचन केले होते. त्यात एक छान माहिती मिळाली. आसाममध्ये असलेल्या दिग्बोई या गावाचे नाव कसे पडले याविषयीची. या भागातून गेलेल्या हत्तीच्या पायाला तेल लागल्याचे ब्रिटिश अधिकार्याला कळले. त्याने त्या भागातील खोदकामाचे हक्क हाती घेतले. मग खोदायला सुरवात झाली. खोदायला अर्थातच स्थानिक माणसे ठेवली होती. तो अधिकारी त्यांना 'डिग बॉय, डिग बॉय' (खण अशा अर्थी) असे म्हणायचा. त्याचेच पुढे डिग्बॉय व दिग्बोई असे पडले. अशी काही माहिती तुमच्याकडे असेल तर जरूर सांगा.
प्रतिक्रिया
30 Apr 2008 - 2:34 am | विकास
ऐकीव माहीती प्रमाणे:
ब्रिटीश अधिकार्याने त्याच्या मोडक्या तोडक्या हिंदी/बंगालीत कापणी करत असलेल्या शेतकर्याला त्या गावाचे नाव विचारले. त्याला वाटले तो "भात कापणी कधी केली" असे विचारतोय. त्यावर त्याने उत्तर दिले, "कल कटा" - त्याचे पुढे कलकत्ता आणि नंतर कोलकोटा झाले...
30 Apr 2008 - 5:53 am | नंदा प्रधान
तो ब्रिटीश अधिकारी चिक्कार उसाचा रस प्यायलेला जनरल डायर होता का? :))
'भात कापणी कधी केली?' असं विचारत होता ना? की तुझ्या गावाचं नाव काय? विचारत होता... आणि तसेही 'कल कटा' नाही हो 'कल काटा' असे म्हणेल तो. पु ना ओकांच्या पुस्तकात वाचलीत वाटतं ही गोष्ट?
30 Apr 2008 - 3:32 pm | अप्पासाहेब
ब्रिटीशांनी जेव्हा तत्कालिन मुंबई बेटांवर वस्ती केली तेव्हा तिथे सारखे भुमीगत सुरुंगांचे (बाँब) स्फोट व्हायचे , पाय ठेवताच धडाम धुम ! अगदि जगणे अशक्य झाले. त्यावेळी तेथील काही हुषार कोळी सायबाच्या मदतीला आले . जेव्हा जेव्हा सायब व त्याची मड्ड्म बाहेर पडायचे त्या त्या वेळी हे हुषार कोळी पुढे चालत चालत हे भुमीगत सुरुंग (बाँब) शोधायचे आणि बाँब दिसताच 'बाँब हैय ' 'बाँब हैय ' असे ओरडुन सायबाला सावध करायचे. त्या काळी हे 'बाँब हैय ' 'बाँब हैय ईतक्या वेळा ऐकायला यायचे कि त्या वरुन त्या सात बेटांच्या त्या समुहाला 'बाँब हैय ' म्हणु लागले , पुढे त्याचे 'बॉम्बे' झाले. सध्याचे त्याचे नाव 'मुंबई'' आहे.
----लै मिसळ खाल्ली कि मुळव्याध होते ---------
30 Apr 2008 - 3:46 pm | लिखाळ
द.ग. गोडसे यांच्या पुस्तकात वाचले होते की नागपूर आणि परिसरात हत्ती असत. तेथे असलेल्या लेण्या आणि गुहाचित्रातून तसेच गणपतीच्या प्रतिमांतून याची सक्ष पटते वगैरे... तर नाग म्हणजे संस्कृतात हत्ती... त्यावरुन हे नागपूर नाव पडले असावे असा कयास. त्या परिसरात नाग हा श्ब्द असलेली अजूनही काही ठिकाणे आहेत म्हणे...
--(स्मरणशील वाचक) लिखाळ.
30 Apr 2008 - 3:52 pm | ठणठणपाळ
लेण्या नव्हे, लेणी.
30 Apr 2008 - 4:02 pm | धमाल मुलगा
हे सगळं नवीनच आहे बॉ आपल्याला.
भोचकगुरुजी, दिग्बोईबद्दल रंजक माहिती आहे. आभार!
आप्पासाहेब, खरंच असं पडलं मुंबईचं नाव बॉम्बे? गंमतच आहे की.
आम्हाला फक्त मुंबादेवीची मुंबई एवढंच ठाऊक.
लिखाळशेठ, धन्यवाद. नागपूरचा हा इतिहास नव्हता बॉ ठाऊक...आम्हाला आपलं डॉक्टरांचं आणि मुंज्यांचं गाव म्हणूनच फक्त माहिती.
-----------
एकूणातच आमच्या जनरल नालिजाच्या नावाने किती उजेड आहे हे आज कळ्ळं!!!!
-(चकित) ध मा ल.
30 Apr 2008 - 4:00 pm | इनोबा म्हणे
मुंबईतील भेंडीबाजाराच्या नावाचीही अशीच गंमत आहे.इंग्रजांचे राज्य असताना या बाजाराच्या मागच्याच बाजूला इंग्रजांची एक छावणी होती. त्यावेळी इंग्रज पत्रव्यवहारातील पत्ता 'बिहाईंड दी बझार' असा लिहीत. त्याचेच कालांतराने भेंडीबाजार झाले.
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे
30 Apr 2008 - 4:33 pm | आर्य
काही गावांच्या नावाचा ईतिहास फार आकर्षक आहे .
ऊदा : अयोध्या - मनू नामक देव शिल्पी (देवांचा ऐक आर्कीटेक्ट ऐकुण १७ आर्कीटेक्ट आहेत) याने अयोध्या नगरीची रचना केली होती. याच्या सभोवती ऊंच अशी तट बंदी, शरयू नदीचे पाट होते. ज्या योगे शत्रुला युध्द करणेच अशक्य होते, म्हणुन - अ युध्दा ईति अयोध्या.
कोल्ल म्हणजे कमळ - मुबलक प्रमाणात कमळ / कोल्ल मिळणारे गाव - कोल्हापुर
(महालक्ष्मी निवासा मुळे हे शक्य वाटते - लक्ष्मीलाही कमळाचीच ऊपमा देतात)
बेंगळुरु (बेंगलोर) - ऐकदा राजा केम्पेगौडा शिकार करीत जंगलात हरवला, दमल्या तहान - भुकेने व्याकुळ झालेल्या त्या राजाला ऐका म्हातारीने खायला बेंग (ऐक प्रकारच्या शेंगा) दिल्या आणि वाट सांगीतली. प्राण वाचल्याची आठवण म्हणुन राजाने ऐक टुमदार शहर वसवण्यास सांगीतले हेच ते आजचे बेंगलोर.
म्हैसुर (मयासुरु)- मया-सुराची रा़जधानी
नाशिक - रामायण काळात राम-लक्षमण-सिता पंचपटीत वस्तव्यास होते, रामाशी लग्नाच्या ईच्छेने आलेल्या सुर्पणखेचे नाक लक्षमणाने कापुन नदीच्या पलीकडे फेकले ती नासिका पडलेले ठिकाण म्हणजेच नाशिक.
महा-अंबा देवी / मुंबा देवी - मुंबई
श्री + नगर = श्रीनगर
अहमदाबाद - मुळ नाव - कर्णावती (सुलतान अहमद शाह ने आबाद केले म्हणुन - अहमदाबाद
कोच्ची - कोह आझि (छोटे बेट) कोचीन - कोच्ची
सोरटी - सोमनाथ - सोम (चंद्राने) शंकराची (नाथ) शापातुन मुक्त होण्या साठी तप केलेली जागा
सहा गल्ली - सांगली
सात - तारा (सात - टेकड्या / डोंगर /दुर्ग) - सातारा
राम + ईश्वर = रामेश्वरम्
विराट नगरी - वाई किंवा भोई लोक वसाहती वरुन - वाई किंवा
वरुण आणि आसी या गंगेच्या उप नद्या होत्या - त्या संगम स्थळाला - वाराणासी
महा + बल + ईश्वर = महाबळेश्वर (शंकराने या राक्षसाला मारले)
भाग्यमठी / भाग्य नगरम् / हैदर + आबाद = हैद्राबाद
बाकीची भाग दोन मध्ये..................................
आपला (गावकरी) आर्य
30 Apr 2008 - 4:34 pm | गजाभाऊ
मुंबईतल्या गीरगाव ला गीरणगाव म्हणायचे पण मग त्याचे गीरगाव झाले.
कारण तिथे गिरण्या होत्या.
:D :D :D :D
30 Apr 2008 - 4:36 pm | विसुनाना
कराड :
पुराण काळात एकदा खूप खूप पाऊस पडून कृष्णा नदीस खूप पूर आला. नदीचे पाणी गावात शिरून सर्वत्र चिखल झाला. तेंव्हा तेथील लोक म्हणू लागले , "काय राड!", "काय राड!" त्याचेच पुढे कराड झाले. ;)
(पुराणात कसलीही वांगी असतात. खरे म्हणजे ऐतिहासिक काळात कराड गावाचे मूळ नाव "करहाटक" असे होते. ते बाजारपेठेचे गाव होते. पुढे करहाटकचे कर्हाड आणि त्याचेच कराड झाले.)
लातूर :
आक्रमणानंतर अल्लाउद्दिन खिलजीने (या गावी तुरीची डाळ खूप होते हे लक्षात आल्याने) आपल्या सरदारास या गावाहून "तूर ला", "ला तूर" असे सांगितले. हेच नाव आजही अस्तित्वात आहे. ;)
(खरे तर ऐतिहासिक काळात या गावाचे नाव 'लट्टलूर' असे होते आणि ती राष्ट्रकुटांची राजधानी होती. चु.भु.द्या.घ्या. अधिक माहितीसाठी श्री. सेतुमाधवराव पगडींचे 'तन्वीश्यामा' हे पुस्तक वाचावे.)
पैठण :
पुराणकाळी ;) गोदातीरावर पायाला चटके बसत असणारा एक सरदार आपल्या भरभक्कम मिश्या पिळत आपल्या हुजर्यावर मोठ्याने गरजला, "पायताण आण पायताण!", "पायताण, पायताण". त्याचेच पुढे पैठण झाले असे म्हणतात.
(खरे म्हणजे ऐतिहासिक काळी या गावाचे नाव ' प्रतिष्ठान' होते आणि ती सातवाहनाची राजधानी होती हे सर्वांना माहित आहेच!)
इचलकरंजी:
पुराण काळी ;) दिवाळी जवळ आल्यावर या गावातील एक मुलगी आपल्या आईच्या मागे लागली, "आई, चल करंजी कर", "आई, चल करंजी कर". परंतु त्यावेळी आई कामात असल्याने तिने लक्ष दिले नाही. तेंव्हा आपली आई आपल्याकडे लक्ष देत नाही असे वाटून ती मुलगी रस्त्यावरून मोठ्याने तसे ओरडत फिरू लागली. तिची चेष्टा करणारी वात्रट मुलेही तेच ओरडत तिच्या मागे लागली. पुढे याच "आई, चल करंजी कर"चा अपभ्रंश होऊन त्या गावाला 'इचलकरंजी' हे नाव मिळाले. ;)
(खरे म्हणजे ऐतिहासिक काळात या गावाचे नाव काय होते ते आढळत नाही, पण एका बंडकालीन नकाशात ते 'इंचल -करलजी' असे आढळले.)
30 Apr 2008 - 4:40 pm | मनस्वी
:))
30 Apr 2008 - 4:51 pm | आर्य
:))
=)) =;
30 Apr 2008 - 10:22 pm | अन्या दातार
कोल्हापुरचा रहिवासी या नात्याने मी कोल्हापुरची मूळ ष्टोरी सांगतो.
पूर्वी येथे कोल्हसुर नावाच्या राक्षसाचा निवास होता. तो महालक्ष्मीचा भक्त होता. देवीने त्याला अभय दिले होते. त्याचा त्याने इतर सर्व राक्षसांप्रमाणेच गैरवापर करत असे. शेवटी सर्व प्रजाजन देवीकडे जाऊन त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. त्यानुसार तिने नंतर त्याचा वध केला. शेवटच्या इच्छेनुसार त्याने या नगराला स्वतःचे नाव द्यायची विनंती केली. म्हणूनच या गावाचे नाव कोल्हापूर असे पडले.
बाकी
कोल्ल म्हणजे कमळ - मुबलक प्रमाणात कमळ / कोल्ल मिळणारे गाव - कोल्हापुर
(महालक्ष्मी निवासा मुळे हे शक्य वाटते - लक्ष्मीलाही कमळाचीच ऊपमा देतात)
ही माहिती पहिल्यांदाच वाचली.
30 Apr 2008 - 10:40 pm | मन
लाहोरः- लव + उरु ( संस्कृत नाव. ""उरु " म्हण्जे "नगरी".)
तर दशरथ नंदन प्रभु श्री रामचंद्र ह्यांचे पुत्र लव्-कुश.
त्यातील लवाने पुढे दिग्विजय संपादन करुन भारताच्या वायव्य आणि पश्चिमेकडे मोठे साम्राज्य उभे केले.
राजधानी म्हणुन नवीन शहर मोक्याचे ठिकाणि वसवले,त्याचे नाव "लव उरु"
कलौघात त्याचे लाहोर झाले.
(संदर्भः- पाकिस्तान सरकारची अधिकृत संकेत स्थळ आणि पाकिस्तानी टुरिझम कंपन्यांचे संकेत स्थळ)
मुम्बइ वर १६-१७ व्या शतकात ताबा होता पोर्तुगिजांचा.
(नंतर ती ब्रिटिशांना मिळाली ती त्यंच्या राजाच्या लग्नात्,आंदण म्हणुन.)
पोर्तुगाल भाषेत "उत्तम बंदर" म्हणजे "बाँ बैय्या".
त्याचे पुढे अपभ्रष्ट रुप बनले "बंबई".
(मूळ निवासी कोळी बांधव त्याला पुर्विपासुन "मुंबई"च म्हणायचे.मुम्बा + आई )
लखनौ= लक्ष्मण पुर.
दशरथ नंदन प्रभु श्री रामचंद्र ह्यांचे अनुज लक्ष्मण ह्यांनी वसवलेले शहर म्हणजे लक्ष्मण पुर.