हे मासे १ इंचाच्या आसपास असतात. दिसायला अगदी मोत्यासारखे चकचकीत असतात. पण ह्यांना खवल असतात. ही खवले काठायची व डोके आणि शेपुट काढायचे. निवडायचा थोडा त्रास असतो. हे मासे छोटे असतात पण खुप चविष्ट असतात. ह्याच्या मध्ये मधला काटाही असतो.
ही निवडलेली मोदकं
साहित्य :
१ वाटा भिळजे
८-१० लसूण पाकळ्या
हिंग, हळद,
१ चमचा मसाला
थोडा चिंचेचा कोळ
थोडि चिरलेली कोथिंबीर
चवीपुरते मिठ
तेल
क्रमवार पाककृती:
प्रथम तेलावर लसणाची फोडणी द्यायची. मग त्यावर हिंग, हळद, मसाला, घालून परतुन भिळजे घालावे. लगेच हलक्या हाताने परतायचे मग चिंचेचा कोळ टाकायचा, मिठ टाकायचे, कोथिंबीर टाकायची. ह्याला गॅस मंद ठेवायचा नाहीतर भिळजे मासे भांड्याला चिकटून तुटतात. उकळी येउन २-३ मिनिटे झाली की गॅस बंद करायचा.
हेच मासे मिठ, मसाला, हिंग, हळद, लाउन तळताही येतात.
मोदकाचे सुके
प्रतिक्रिया
21 Jul 2010 - 1:36 pm | सहज
एन्चोव्ही म्हणायचे ना हे?
21 Jul 2010 - 1:45 pm | मराठमोळा
हा प्रकार माहित नव्हता,
पण ते ईवलेसे गोंडस मासे पाहुन त्यांना खायचा जीव होणार नाही. :(
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
21 Jul 2010 - 1:47 pm | गणपा
आज एकादशी आहे म्हणुन ,
नाहीतर आजच करुन परत एकदा फोटु टाकला असता ;)
मी मात्र कैरी/आंबोशी/खारातला आंबा जे उपलब्ध असेल त्या सोबत भरपुर कांदा घालुन करतो.
21 Jul 2010 - 6:25 pm | श्रीयुत संतोष जोशी
मस्त आहे. दिवस चुकला
हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
22 Jul 2010 - 10:56 am | जागु
हो दिवस चुकला हे खर आहे. पण कधी पासुन टाकायची होती वेळच मिळत नव्हता. काल वेळ मिळाला म्हणून टाकली.