करा कविता : स्पर्धा

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in काथ्याकूट
16 Jul 2010 - 11:50 am
गाभा: 

मिपावर बरेच लोक शब्दांचेखेळ करण्यात माहीर आहेत
खाली काही शब्द आहेत. ते वापरून एखादी चारोळी / तीनोळी / अनेकोळी करा
ओळी मर्यादा किमान एक आणि कमाल पंधरा. एका ओळीत किमान तीन शब्द असावेत.
सर्वात आषयघन लिहिणारास त्याच्या खरडवहीत एक सुंदर प्रशस्तिखरड देण्यात येईल.

हटके ,फटके ,लटके ,झटके ,मटके, मिटके ,कुटके ,कटके ,रटके ,टोटके, चटके, पटके , गुटके , फुटके
यातील काही शब्द इतरभाषीक असतील किंवा काही शब्दाना दोन अर्थ असतील. या पैकी जास्तीत जास्त शब्दांचा वापर करून कविता लिहायची आहे. ( ओळी आणि इथे दिलेले शब्द यांचे प्रमाण विचारात घेतले जाईल )

चला मित्रानो मयत्रीणीनो सुरुवात करुया

प्रतिक्रिया

अवलिया's picture

16 Jul 2010 - 12:06 pm | अवलिया

लिहिता जरा हटके,
पडले अधिकारीक फटके,
रागावुन विचारता लटके ,
दिले धोरणाचे झटके,
वाजवु नका रिकामे मटके,
जो भी बोलना बोलो मुंह मिटके ,
नही तो रख देंगे तुम्हे कुटके,
हातापायावर असे दिले चटके,
बसलो शांत खाउन दोन गुटके,
काय करु नशीबच फुटके

--अवलिया

शेखर's picture

16 Jul 2010 - 12:25 pm | शेखर

_/\_

गणपा's picture

16 Jul 2010 - 2:45 pm | गणपा

जबरान नान्या.

सागर's picture

16 Jul 2010 - 12:10 pm | सागर

विजुभाऊनी सुचवलेले शक्यतो सर्व शब्द वापरुन केलेला हा एक प्रयत्न

माझी प्रिया हटके ,
लावते मला फटके ,
मी तिला लटके ,
कमरेचे तिच्या झटके ,
पाहुनि मी मटके,
मारी डोळे मिटके ,
ती मला कुटके ,
म्हणून मी सटके, ( येथे कटके चे सटके केले)
प्रेम केले रटके ,
फाटले आभाळ टोटके,
बसले प्रेमभंगाचे चटके,
पडले जरी पटके ,
खाऊनी मस्त गुटके
नशीब माझे फुटके
भांडेच त्याचे गळके ;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Jul 2010 - 12:54 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

तुम्हाला ते गाणं माहित्ये का?
लटका दिखा हमने झटका लगा दिया तुमने टॅडा, हो तुम को टडा
मटका के चल दिया हम तो, खटका हुआ है क्यूं तुम को, टॅडॅ, ओ तुम को टॅडॅ

अदिती

ज्ञानेश...'s picture

16 Jul 2010 - 1:02 pm | ज्ञानेश...

मलाही हेच गाणे आठवले ! :)

मेघवेडा's picture

16 Jul 2010 - 2:19 pm | मेघवेडा

'टॅडा/टॅडॅ' हा त्या गीतातलाच एक शब्द आहे हे आज कळलं! ;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Jul 2010 - 2:28 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आणि हे म्हणे कानसेन! :p

अदिती

नेहमी आनंदी's picture

19 Jul 2010 - 12:26 pm | नेहमी आनंदी

हटके हटके चटके,
लटके ,झटके ,पटके
मटके, मिटके ,टॊटके
कुटके ,कटके ,रटके , ,
गुटके , फुटके :T :T

मराठमोळा's picture

19 Jul 2010 - 1:49 pm | मराठमोळा

मला तर सलमानच्या "प्यार किया तो डरना क्या" मधल
तुमपर हम है अटके यारा
दिल भी मारे झटके
क्यो की तुम हो हटके.

हे गाणं आठवलं, पुर्ण गान्यात विजुभाऊंना जवळपास हवे ते सगळे "टके" आहेत.

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

विनायक प्रभू's picture

19 Jul 2010 - 5:17 pm | विनायक प्रभू

=)) =)) =))

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

21 Jul 2010 - 12:30 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

..कोल्हापुरी मिसळ.....चव तिची हटके
....आठवण जरी आली ना ,तरी जीभ मारते मस्त मिटके
....चरचरीत रस्सा,मटकी,वर कांदा कोथिंबीर लिंबू मारके..
आठवतात ते रविवार आणि .....मिसळ कोल्हापुरी हटके..

..खोबरे,कांदा,तीळ....,गरम मसाला कुटके...
मिसळीत घातला असतो ....वाट वाटके-वाट वाटके...
वास खमंग..कुरकुरीत फरसाण...मस्त शेव आणि वर तर्री चे तरंग..
.....मस्सालेदार......चट्टकदार ..झणझणित ...मिसळ कोल्हापुरी हटके

..छोटीशी जागा,७-८ टेबले आणि कोपऱ्यातले ते मटके फुटके...
...जागा मिळवण्यासाठी धडपड......भांडण,वादावादी आणि अर्वाच्य शाब्दिक फटके
....फक्त 'मिसळीसाठी'...लोकांचा एवढा दिमाग सटके?
...अहं...अरे असतेच तशी ती ...मिसळ कोल्हापुरी हटके!

..गरम मिसळ....जिभेला बसतात मस्त चटके ..
...मसालेदार चवीने .....तोंडभर तिखट तिखट झटके
...रविवारची सकाळ...किंवा असोत उशिरा पर्यंतची ती नाटके..
.. पोट्,मन्,आणि मन कस ..'त्रुप्त' करते...मिसळ कोल्हापुरी हटके

१५ ओळीन्ची मर्यादा.....एका ओळीने ओलान्डली आहे...
माफीची चुकी असावी....आपल्..चुकीची माफी असावी.. ;)

उमराणी सरकार's picture

22 Jul 2010 - 2:44 am | उमराणी सरकार

चोरगेंची आठवण आली बघा!!
उमराणी सरकार

न करा चिंता असाल सुखे| सकळ अरिष्टे गेली दु:खे

दुनियेचे खाता फ़टके

मेंदूस लागती झटके

चल काम करुया हटके

विसरून नशीब हे फ़ुटके!

पायाला आपुल्या चटके

नाही हाती काही मटके

कर्जाचे लक्तर लटके

पण आगे बढुया रटके !

भले रस्त्यावर कुणी पटके

अगणित काटे - कुटके

जगणार ना गुटके - कटके..

जग जिंकू खुदको मिटके !!

प्रीती.

हिने सदस्यनाम घेतलं आहे पण अजून तिला काही पोस्ट करता येत नाही आणि ख.व ची सोय सुद्धा मिळाली नाही आहे. संपादक, प्लिज जरा बघता का?

तिच्या सदस्यनामा साठी मला व्य.नि करावा.

-एक.