आरं आरं आबा आता वर्डप्रेस डॉट कॉमवर

उग्रसेन's picture
उग्रसेन in काथ्याकूट
12 Jul 2010 - 8:19 pm
गाभा: 

सामान्य जनतेपर्यंत पोचायचा मार्ग महाराष्ट्राचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी निवडला हाये.
जनतेशी संवाद साधता यावा म्हून त्यायनी आबा पाटील्स ब्लॉग या नावाने ते वर्डप्रेस डॉट कॉमवर हजर झाले हायेत. ही एक चांगली सुरुवात झाली हाय असे वाट्टे.

आबा म्हणत्यात ''जनतेपर्यंत पोचण्याचा सोपा आणि कोणतेही हितसंबंध नसलेला, आणि गटबाजीला वाव नसलेला मार्ग म्हणून मी हे आधुनिक तंत्रज्ञान आता निवडले आहे. याच भावनेतून आज हा ब्लॉग मी तुमच्यासमोर आणतो आहे.''

मिपाकरांना आबाच्या नव्या धोरणाबद्दल काय वाट्टे ?

प्रतिक्रिया

शानबा५१२'s picture

12 Jul 2010 - 8:24 pm | शानबा५१२

क माहाती नही पण विश्वास नाही बसत की हे ते पाटील आहेत!

त्यांच्याकडून अशी साइट व तीही वर्डप्रेसवर??????

माझ्या कार्यालयाचा पत्ता : गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय , पहिला मजला , रूम नंबर - १०८, विस्तारित इमारत , मंत्रालय - मुंबई – ३२.
माझ्या कार्यालयाचे दूरध्वनी: ०२२ - २२०२७१७४
माझ्या घराचा पत्ता: ’चित्रकुट’, रतिलाल ठक्कर मार्ग , मलबार हिल, मुंबई.
माझ्या घराचे दूरध्वनी: ०२२ – २३६३१५०५

पण हे वाचल्यावर विश्वास व्हायला सुरवात होतेय.

_________________________________________________
''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!!
see what Google thinks about me!
इथे

उग्रसेन's picture

12 Jul 2010 - 8:27 pm | उग्रसेन

वर्डप्रेसडॉट कॉम म्हणल्यावर माहाबी इस्वास नै बसला.
पण वरच्या पत्यामुळंच इस्वास बसला.

त्यायला मिपाचं आमंत्रण द्यायला पाह्यजेन काय म्हणता ?

बाबुराव :)

शिल्पा ब's picture

12 Jul 2010 - 8:32 pm | शिल्पा ब

मी लोकसत्तात का इसकाळ कुठेतरी वाचलं होतं कि त्यांनी ब्लॉग सुरु केलाय म्हणून...ठीक आहे.
यामुळे काय समस्या सुटणार आहेत का? चालायचच.

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

अविनाशकुलकर्णी's picture

12 Jul 2010 - 9:09 pm | अविनाशकुलकर्णी

शरद रावांना पाटिल साहेब व यशवंतरावा समवेत दाखवुन आबा काय सुचवु पहातात?

आळश्यांचा राजा's picture

12 Jul 2010 - 9:54 pm | आळश्यांचा राजा

महत्त्वाची गोष्ट आहे. कदाचित ते स्वतः ब्लॉग लिहित वाचत नसतीलही. पण एखादा सहायक ठेवला असेल. लोकांचा फीडबॅक त्यांना थेट मिळू शकतो. दुसर्‍या कुठल्याही माध्यमात हे शक्य नाही. येत्या काही वर्षांमध्ये ब्लॉगिंग हे केवळ शहरी भागात मर्यादित राहील असे वाटत नाही. इंटरनेट हे मोबाइल फोनसारखे स्वस्त आणि सर्वव्यापी व्हायला फार काळ वाट बघायची गरज नाही. या परिस्थितीत हे पाउल उचलणारा हा महाराष्ट्रातला पहिलाच मंत्री. त्यांचे अभिनंदन आणि ब्लॉगविश्वात स्वागत!

लोकांच्या प्रतिसादांवर ते काय ऍक्शन घेतात यावरुन अर्थातच त्यांची सिन्सीरिटी दिसून येईल. तोपर्यंत अभिनंदन करायला कुणाचीच हरकत नसावी!

आळश्यांचा राजा

महेश हतोळकर's picture

13 Jul 2010 - 4:54 pm | महेश हतोळकर

असेच म्हणतो.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 Jul 2010 - 5:52 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

राजेसाहेबांचा उत्तम प्रतिसाद.

अदिती

चिरोटा's picture

12 Jul 2010 - 10:44 pm | चिरोटा

मराठी नेते जागे होता आहेत म्हणायचे.राज्य सरकारने स्वतःची ब्लॉग साइट बनवून मंत्र्यांनी त्यावर ब्लॉग बनवले असते तर काही अर्थ होता.आता ट्विटरवर एक उघडा खाते.आणि तंबाखूचा बार भरला की ट्वीट करा सगळ्याना.
P = NP