तो अजस्त्र पक्षी उंचावरची निळाई सोडुन अलगद ढगांच्या दुलईत शिरला तेव्हाच लक्षात आले की उतरायची वेळ जवळ आली. मस्तपैकी जांभई देत जरा आखडलेले अंग ताणले आणि मांडीवरचा कॅमेरा सटकता सटकता वाचला. संध्याकाळ होत आली होती. कॅमेरा हाती लागताच विचार चमकला, चला संधी मिळाली तर आज उडता सूर्यास्त टिपावा! मी कॅमेरा सज्ज करुन ढग पार व्हायची आतुरतेने वाट पाहु लागलो. मात्र आणखी थोडे खाली येताच भ्रमनिरास झाला. आज मळभ होते, आकाशात ढगांचे राज्य होते. सूर्यनारायण आज दर्शन द्यायला राजी नसावेत. अचानक काळ्या ढगांचा पडदा किंचितसा उसवला आणि झरोक्याला इंद्रधनुष्यी छटा देत सूर्यनारायण हळूच डोकावले आणि परत गायब झाले. तो क्षण मी अर्थातच टिपला
आणखी खाली येताच एक अनोखे दृश्य पाहावयास मिळाले. आमच्या विमानाच्या उंचीहून किंचित खालच्या अंगाला ढगांचे पुंजके विखुरले होते. आकाश आभ्राच्छादित होते आणि सूर्य आकाशात नाही तरी खाली जमिनीवरच्या खाचरांमध्ये प्रतिबिंबीत झालेला होता.
मग डोक्यात नवे खूळ आले. न दिसला तरी हरकत नाही आज सूर्यास्त टिपायचा तो प्रतिबिंबाचाच. मग मी सरसावून बसलो आणि त्या प्रतिबिंबाचा पाठलाग करु लागलो.
जरा पुढे येताच एका खाचरात त्याचे प्रकाशमान प्रतिबिंब पूर्णरुपात दिसले आणि अर्थातच मी ती संधी साधली आणि तो प्रकाशगोल टिपला
आता विमान जमिनीच्या रोखाने वेगात झेपावले होते. खालचे दृश्य स्पष्ट दिसू लागले होते. खाली असलेल्या एका महाकाय उड्डाणपूलाच्या बाजुला असलेल्या जलाशयात मी पूर्णबिंब टिपणार तोच मला हुलकावणी देत सूर्यनारायण एका कडेला निसटले.
अखेर चाके सुवर्णभूमिच्या धावपट्टीला टेकण्यापूर्वी लगतच्या विस्तिर्ण जलाशयात मला पूर्ण प्रतिबिंब अलगद सापडले
प्रतिक्रिया
25 Feb 2008 - 7:06 pm | मीनल
25 Feb 2008 - 7:13 pm | स्वाती दिनेश
उडता,बुडता अग्निगोल केवळ अप्रतिम!स्वाती
25 Feb 2008 - 7:14 pm | धनंजय
विमानातून ही दृश्ये नेहमी मन मोहतात. तुम्ही ही चित्रे टिपण्याचा प्रयत्न केला याबद्दल कौतुक वाटते. (नाहीतरी तुमची चित्रे आवडतात, हे वेगळे काय सांगावे?) परंतु ही चित्रे जमणे अतिशय कठिण. टिपायचे काय तर खिडकीतून जे दिसेल ते, आणि तेही क्षणभरच! शिवाय खिडकीच्या दुहेरी काचांवरची पुसट प्रतिबिंबे टाळायची तुम्ही घेतलेली काळजी म्हणजे ++. पण खरे सांगावे, तर मजा नाही आली.
25 Feb 2008 - 7:53 pm | प्रभाकर पेठकर
खल्लास, श्री. सर्वसाक्षी, एकूण धडपड कौतुकास्पद.
पण तुम्ही टेक्निकल सिक्रेट्स (लेन्स, स्पीड, ऍपरचर वगैरे वगैरे) शेअर करीत नाही, ह्याचे वाईट वाटते.
25 Feb 2008 - 8:04 pm | सुधीर कांदळकर
भास्कर ते गगनराज.....
हजारो शब्द जे व्यक्त करू शकत नाहीत ते एक चित्र व्यक्त करते. शब्द मुके होतात.
झकास. मान लिया.
असेच अनेक येऊद्यात.
25 Feb 2008 - 8:16 pm | प्राजु
कवितेते सुर्याला ठेवून सर्वसाक्षी असे तुमचे जे वर्णन केले ते सर्थकी लागले... :)
- (सर्वव्यापी)प्राजु
25 Feb 2008 - 9:00 pm | विसोबा खेचर
साक्षीदेवा,धन्य आहे तुझी! चित्रे आणि वर्णन केवळ अप्रतिम...!
आकाश आभ्राच्छादित होते आणि सूर्य आकाशात नाही तरी खाली जमिनीवरच्या खाचरांमध्ये प्रतिबिंबीत झालेला होता.
हे चित्र तर लाजवाब...!
आपला,(भास्करप्रेमी) तात्या.
25 Feb 2008 - 9:22 pm | चतुरंग
कॅमेर्याच्या माध्यमावरची तुमची हुकुमत वाखाणण्याजोगी आहे. उडत्या विमानातून, खिडकीवरचे प्रतिबिंब टाळून अचून चित्र पकडणे केवळ कौतुकास्पद!
चतुरंग
25 Feb 2008 - 11:50 pm | ऋषिकेश
दुसरे चित्र लाजवाब :).. खूप खूप आवडले.. बाकी चित्रेही मस्त आहेते हे वेसांनल-ऋषिकेश
28 Apr 2008 - 10:52 am | खट्याळ मुलगा...
खुपच छान ...
सर्व चित्रं कौतुकास्पद आणि दाद देण्या जोग॑ आहेत...
=D>
28 Apr 2008 - 10:53 am | खट्याळ मुलगा...
=D>
28 Apr 2008 - 6:37 pm | नारदाचार्य
बास्स. सलाम तुमच्यातल्या या कलाकाराला.