गणित

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in काथ्याकूट
9 Jul 2010 - 8:31 am
गाभा: 

"खुप दिवसाने भेटतोयस रे".
खराय.
" तुला एक प्रश्न विचारायचाय"
विचार.
"तु स्वतः ला काय समजतोस"?
माणुस
"आर्थिक चौकटी बद्दल बोलतोय"
अस का? अं.... मध्यम मध्यम वर्गिय.
"जरा सविस्तर सांग बघु."
खाउन पिउन सुखी. पण बँक बॅलन्स, ओल्ड एज इन्वेस्ट्मेंट्स वगिरा वगिरा काही नाही. घरात खर्च होते त्याच्या जवळपास उत्पन्न. वर्षाअखेरीस बॅलन्स शीट जमते. कधी थोडीफार शिल्लक. कधी नाही. सापशिडीचा खेळ.
"म्हणजे माझ्यासारखेच"
बर मग?
" ही पोझीशन तुला तुझ्या गुणवत्तेला बुद्धीमत्तेला अनुसरुन आहे का"?
आता हे काय नविन?
"नाही रे. तु मला कायम म्हणतोस. माझ्या बुद्धीमत्तेचा निट वापर केला असता तर मी खुप कमाउ शकलो असतो. पण गेली २५ वर्षे मी ते कधीच करु शकलो नाही".
बर मग?
"आज अचानक ह्या वयात एक कलाटणी मिळाली. सर्व चित्रच पालटले.
उत्पन्न तिप्प्ट झाले. मुलीच्या लग्नाची व्यवस्था झाली. म्हातारपणाची काळजी मिटली".
बर मग?
"आज मी अचानक सगळ्याच्या गळ्यातल्या ताईत बनलो. बायको, मुलगी ह्यांच्या नातेसंबधात अगदी लक्षणीय फरक पडला. कधी फारशी न बोलणारी मुलगी आता माझी वाट बघते जेवायला. बायको डबा करुन देते. अचानक लग्नानंतरची दोन वर्षे पुन्हा जगतोय"
चांगले आहे की. ह्यात प्रॉब्लेम काय आहे तुला?
" मी तोच. काही ही बदल नाही. मग प्रश्न असा की घरामधला माझा पुरुष म्हणुन मान हा माझ्या उत्पन्नाशी संबधीत आहे का?Is My position in my family directly proportional to my income"?
गणित कसली सोडवतोयस. मिळतेय ते घे आणि गप्प बस की. मला ह्या प्रश्नाचे उत्तर माहीत नाही.

प्रतिक्रिया

प्रकाश घाटपांडे's picture

9 Jul 2010 - 8:47 am | प्रकाश घाटपांडे

मला वाटल एमएलएम चे महत्व येतय कि काय लेखात?कलाटणी मिळायला अस काय झालं?
समाजात काय नि कुटुंबात काय तुमचे उपयुक्तता मूल्य ( वा उपद्रव मूल्य) असल्यासच तुम्हाला किंमत असते.तुम्ही दखलपात्र असता.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

खुसपट's picture

9 Jul 2010 - 6:53 pm | खुसपट


सर्वे गुणा:कांचनंआश्रयन्ते हे कुटुंब आणि समाज ह्या दोघांनाही सारखेच लागू पडते. माझ्या स्वतःच्या बाबतीत मात्र माझ्या पत्नीने आमची घर नीट न चालण्यासारखी परिस्थिति होती तेव्हाही माझा आत्मसन्मान ठोकरला नव्हता.उलट पुन्हा चांगले उभे कसे रहाता येइल यासाठी सर्व प्रयत्न केले.अनेकवेळा गणिताचे उत्तर माहीत असते,पण सोडवण्याची रीत कळत नसते. आपली रीत ईतरांना ( त्यांच्यापेक्षा वेगळी असल्याने ) चुकीचीच वाटत असते. पुस्तकी गणितापेक्षा व्यावहारीक गणित नीट जुळवता व सोडवता यावे लागते. पंचांग पाहून भविष्य सांगणार्‍या पंडीतालाही जैतूनबीच्या खाणावळीत केवळ भविष्य सांगून जेवायला मिळत नाही. तिथे पैसेच मोजावे लागतात. कुटुंबातील सर्वांचे विचार एकसारखे असू शकत नाहीत. एकाच्या ध्येयवादापायी सर्व कुटुंबाची फरपट होताना दिसते, ती सर्वांनी का स्विकारायची ? हे अवघड गणित जोपर्यंत दुसर्‍याला सोडवायचे असते तोपर्यंत ठीक असते. एरवी प्रत्येकाचे गणित (परिस्थितिचे) वेगळेच असते,रीत सारखीच असली (सर्वमान्य ) तरी उत्तरेही( आर्थिक स्थिति ) वेगळीच असतात.
व्यवहाराचे गणित न जमलेला आणि तरीही समाधानी असलेला - खुसपटराव

सहज's picture

9 Jul 2010 - 8:56 am | सहज

गणीत विषय तसा नावडताच!

त्यामुळे गणीत सुटले की आनंद होतोच मग तो आनंद आजुबाजुला ओसंडतो तसेच नेहमी अवघड गणीत सोडवणारा महान वाटतो, जादुगार वाटतो. त्यामुळे गणीततज्ञाबद्दल आदर सर्वत्र दिसून येतो.

असो इतरांना मग कॅल्युलेटर घेउन भागवावे लागते.

:-)

वेताळ's picture

9 Jul 2010 - 9:30 am | वेताळ

मग प्रश्न असा की घरामधला माझा पुरुष म्हणुन मान हा माझ्या उत्पन्नाशी संबधीत आहे का?

हे गणित जवळ जवळ ९०% बरोबर आहे.
वेताळ

विंजिनेर's picture

9 Jul 2010 - 10:19 am | विंजिनेर

मास्तर डू नॉट ओव्हरसिंप्लिफाय रिअल लाईफ गणितस व्हाईल स्टेटिंग इट. नॉट व्हॅलिड.

विनायक प्रभू's picture

10 Jul 2010 - 6:43 am | विनायक प्रभू

अ‍ॅम आय डुईंग दॅट?
इन दॅट केस टेक इट इझी बॉस.

राजेश घासकडवी's picture

9 Jul 2010 - 10:34 am | राजेश घासकडवी

कदाचित पैशाची चिंता मिटल्याने तुमचाच किरकिरा स्वभाव बदलून तुम्ही आनंदाने, प्रेमाने गप्पा मारायला लागला असाल. त्याने प्रचंड फरक पडतो.

किंवा पैसा मिळायला लागल्याने तुम्ही आता चांगले कपडे, छान परफ्यूम, डिओ, टूथपेस्ट वगैरे वापरायला लागला असाल. अंगाला घाण वास येत असेल तर कोण तुमच्याशी प्रेमाने वागेल, नाही का?

गणितात न सांगितलेल्या गोष्टींचा देखील कधी कधी विचार करावा लागतो. आयुष्याच्या, नात्यांच्या गणितात तर नेहेमीच. विंजिनेर तेच म्हणत आहेत असं वाटतं.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

9 Jul 2010 - 10:39 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

गरीब घरातली मुलं बापावर प्रेम करत नाहीत किंवा नवरा गरीब आहे म्हणून बायको नीट वागत नाही असं सगळ्या घरांत दिसत नसावं.
किंवा राजेश म्हणत आहे त्याप्रमाणे या माणसाच्या मनोवृत्तीतही फरक पडला असेल, जास्तीच्या पैशामुळे!

अदिती

मिसळभोक्ता's picture

9 Jul 2010 - 10:04 pm | मिसळभोक्ता

अदितीताई,

असल्या कादंबर्‍या वाचणे सोडा.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

10 Jul 2010 - 12:01 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

मी आत्तापर्यंत दोनच कादंबर्‍या वाचल्या आहेत, कार्ल सेगनची 'कॉन्टॅक्ट' आणि राम पटवर्धनांची 'पाडस'! आता सांगा, कोणती नसती वाचली तर असा विचार केला नसता?

अदिती

शानबा५१२'s picture

9 Jul 2010 - 10:38 am | शानबा५१२

प्रश्नाच उत्तर प्रत्येक कुटुंबाच्या विचारसरणीवर अवलंबुन आहे.
काही लोक दुसरा कीती कमवतो ह्यावरुनच व्यक्तीची कींमत करतात.
पण एक सांगावस वाटत की,जर बुद्धीचा योग्य वापर केला तर पैसा कमवण फार कठीण नाही.अगदी शिक्षण न घेता,संयम व जिद्द महत्वाची.चांगला सल्ला होता ना?

इट्स ओके,यु आर वेलकम!

_________________________________________________
''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!!
see what Google thinks about me!
इथे

विजुभाऊ's picture

9 Jul 2010 - 10:56 am | विजुभाऊ

मग प्रश्न असा की घरामधला माझा पुरुष म्हणुन मान हा माझ्या उत्पन्नाशी संबधीत आहे का?Is My position in my family directly proportional to my income"?

या वाक्यातला पुरुष हा शब्द काढला तर किती फरक पडतो.
माझ्या मते तुमची घरातली किम्मत ही तुम्ही घरातल्या लोकाना किती आर्थीक शारीरीक मदत करता यापेक्षाही त्यांच्या निर्णयक्षमतेसाठी किती मदत करु शकता यावर अवलंबून असते.
अवांतरः वपुंच्या पंतवैद्य या कथेचा नायक आठवला

अवलिया's picture

9 Jul 2010 - 11:43 am | अवलिया

माझ्या आवडीच्या एका स्तोत्रातले श्लोक.

वयसि गते कः कामविकारः शुष्के नीरे कः कासारः।
क्षीणे वित्ते कः परिवारो ज्ञाते तत्त्वे कः संसारः ।।

असो.

स्पंदना's picture

9 Jul 2010 - 2:12 pm | स्पंदना

घासकडवींचा मुद्दा ही विचारात घेण्या जोगा.
कुटुंबाची बांधणी कश्याप्रकारे आहे त्यावर सार अवलंबुन, समजा, देव न करो, पण तुमच हे उत्पन्न थांबल, तर? मग परत या सार्‍यांच वागण पुर्वी सारख होणार?
स्वतःचा अनुभव विचाराल तर काडी काडी न आम्ही कमवल.
ते कमवत असताना जो एकमेकावर विश्वास , अन स्नेह होता, त्या आठवणीन आज भरपुर असुनही होत नाही इतका आनंद वाटतो .
"तुझ्या मुळ शक्य झाल" अस अगदी सहज बोलल जात.
पैसा असो वा नसो कुटुंबाला हवा असतो तो भावनिक आधार अन एकमेकांसाठी आदर्..अगदी मुलांच्या प्रति ही.

शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते

चतुरंग's picture

9 Jul 2010 - 4:55 pm | चतुरंग

हे जरी खरं असलं तरी व्यवहारी जगात पैसा लागतोच, तो ही पुरेसा. पैशाच्या चणचणीतून सुरुवातीपासूनच वाट काढावी लागण्याने आप्तांच्या संबंधात फरक पडू शकतो. नवरा-बायकोंचं स्वाभिमानी असणं, एकमेकांना साथ देणं ह्याच बरोबर पैसा मिळवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न होतात की नाही हेही महत्त्वाचे आहे. मुलांसाठी खंबीर आणि निर्णयक्षमता असलेले आई-बाप मिळणे फार महत्त्वाचे. त्या जोरावर ती त्यांचा आत्मविश्वास मिळवू आणि टिकवू शकतात. आणि अशी मुले मग फक्त बाकी चार न मिळालेल्या गोष्टींवरुनच आई-बापांची किंमत करत नाहीत.

वरती राजेशचे म्हणणेही संयुक्तिक आहे.

चतुरंग

यशोधरा's picture

9 Jul 2010 - 5:20 pm | यशोधरा

चतुरंगांचा प्रतिसाद खूप आवडला आणि पटला.

स्वाती२'s picture

10 Jul 2010 - 7:38 pm | स्वाती२

सहमत!

शुचि's picture

9 Jul 2010 - 5:55 pm | शुचि

असं काही नसतं. चतुरंग यांचा प्रतिसाद आवडला.
इतक्या "बेस" पातळीवर सगळे जात नाहीत. कर्त्या पुरुषाचं पुरुषपण त्याच्या योग्य निर्णयक्षमतेत, न्यायक्षमतेत , सुजाण वागण्या-बोलण्यात, आदर्श व्यवहारात प्रतिबिंबीत होतं. पैसा हो आहे जरूर महत्त्वाचा मुद्दा आहे पण इतर देखील तितकेच महत्त्वाचे मुद्दे आहेत.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

आनंद घारे's picture

9 Jul 2010 - 9:49 pm | आनंद घारे

अचानक परिस्थितीत बदल झाल्यामुळे पूर्वी जाळणार्‍या विवंचना नाहीशा झाल्या असतील आणि त्यामुळे घरातले एकंदरीत वातावरण उल्हसित झाले असेल. मध्यमवर्गीयांना जन्मापासून मिळालेल्या शिकवणीनुसार वायफळ खर्च न करता घर चालवल्यास ही आर्थिक आणि कौटुंबिक परिस्थिती काही दिवस चालेलही. पण हातात पैसे आले आहेत म्हणून ते उधळायची चटक जर लागली तर मात्र तिप्पट काय दहापट पैसे मिळाले तरी कोणीही समाधानी होणार नाही आणि जे आहे यापेक्षा काय काय नाही त्याचा विचार करू लागेल आणि त्याबद्दल पुन्हा कुटुंबप्रमुखालाच जबाबदार धरले जाईल.
तेंव्हा सावध रहा. हे गणित पूर्णपणे आणि कायमचे सुटले असे गृहीत धरू नका
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/

धनंजय's picture

11 Jul 2010 - 4:53 am | धनंजय

जेन ऑस्टेनच्या "सेन्स अँड सेन्सिबिलिटी" कादंबरीमध्ये दोन लग्नवयाच्या बहिणी एकमेकांशी बोलत असतात "पैशांनी कौटुंबिक सुखात काय फरक पडतो?"
पैकी एलेनोर ही "सेन्स" (विवेकी) आणि मारियान ही "सेन्सिबिलिटी" (भावुक). [होय. त्या काळात "सेन्सिबिलिटी" शब्दाचा असा अर्थ होता.]

(Marianne...) "What have wealth or grandeur to do with happiness?"
"Grandeur has but little," said Elinor, "but wealth has much to do with it."
"Elinor, for shame!" said Marianne, "money can only give happiness where there is nothing else to give it. Beyond a competence, it can afford no real satisfaction, as far as mere self is concerned."
"Perhaps," said Elinor, smiling, "we may come to the same point. YOUR competence and MY wealth are very much alike, I dare say; and without them, as the world goes now, we shall both agree that every kind of external comfort must be wanting. Your ideas are only more noble than mine. Come, what is your competence?"
"About eighteen hundred or two thousand a year; not more than THAT."
Elinor laughed. "TWO thousand a year! ONE is my wealth! I guessed how it would end."
"And yet two thousand a-year is a very moderate income," said Marianne. "A family cannot well be maintained on a smaller. I am sure I am not extravagant in my demands. A proper establishment of servants, a carriage, perhaps two, and hunters, cannot be supported on less."

मारियान : संपत्ती आणि भव्यदिव्यपणाचा सुखी असण्याशी काय संबंध?
एलिनोर म्हणाली : भव्यदिव्यपणाचा फारसा संबंध नाही. पण संपत्तीचा खूप संबंध आहे.
"छीऽ. काय ग एलिनोर!"मारियान म्हणाली, "सुख द्यायला दुसरे काहीच नसले, तर मग कदाचित संपत्तीमधून सुख मिळाले तर मिळाले. एकदा का पुरेशी ऐपत असली, तर त्यानंतर संपत्तीमधून कुठलेच समाधान आपल्यापुरते नाही मिळू शकत."
एलिनोर हलके हसून म्हणाली, "कदाचित अजूनही आपण दोघी एकाच मुद्द्यावर येऊ. तुझी पुरेशी ऐपत आणि माझे वैभव म्हणजे एकच गोष्ट आहे, अशी माझी कल्पना आहे. आणि तितके नसले, तर बाह्य सुखसोयींची कमतरता भासेल, असे आपण दोघी म्हणू. फक्त, तुझे विचार माझ्यापेक्षा उदात्त आहेत. सांग तर - तुझी पुरेशी ऐपत म्हणजे किती?"
"वर्षाला अठराशे-दोन हजार पौंड - त्यापेक्षा जास्त नको."
एलिनोर मोठ्याने हसली. "वर्षाला दोन हजार! माझ्या लेखी एक हजार म्हणजे संपत्ती आहे! आपला वाद कसा संपेल हे मला माहीतच होते."
"काही म्हटले तरी वर्षाला दोन हजार म्हणजे मध्यम मिळकत आहे," मारियान म्हणाली. "त्यापेक्षा कमी मिळकतीत कुटुंब ठीकठाक चालवू शकणार नाही. चांगले घरदार स्थापायचे म्हणजे नोकरचाकर, एक घोडागाडी - किंवा दोन घोडागाड्या - शिकारी नोकर... हे सर्व कमी पैशांत व्हायचे नाही."

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Jul 2010 - 3:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>घरामधला माझा पुरुष म्हणुन मान हा माझ्या उत्पन्नाशी संबधीत आहे का?
उत्पन्न आणि मान यांचा नक्कीच संबंध आहे.
बाकी, ग्लास पाण्याने भरलेला की अर्धा रिकामा यासारखे वरील काही प्रतिसादही वाचनीय आहेत.

-दिलीप बिरुटे

रेवती's picture

11 Jul 2010 - 11:45 pm | रेवती

मिळतेय ते घे आणि गप्प बस की. मला ह्या प्रश्नाचे उत्तर माहीत नाही.
तुम्हाला याचे उत्तर माहित नसले तरी चालेल अशी भक्कम साथ सौ. काकूंची आहे. या बाबत सल्ला घेण्यास आपल्या मित्राला त्यांच्याकडेच पाठवावे.

रेवती