संताचा केक

दिपाली पाटिल's picture
दिपाली पाटिल in पाककृती
3 Jul 2010 - 2:10 am

नमस्कार मित्रहो,
खालील पाककृती आहे एन्जेल (मराठी शब्द- संत??) चा केक, आणि अजून एक असतो तो सैतानाचा केक (डेव्हील्स फूड केक..)..
मी जेव्हा हे दोन्ही केक पाहीले तेव्हा मला वाटलं एन्जेल फूड केक पांढरा असतो म्हणून त्याला एन्जेल चा केक म्हणतात आणि डेव्हील्स फूड केक काळा (चॉकलेटचा) असतो म्हणून त्याला सैतानाचा केक म्हणतात पण खरं कारण असं आहे की एन्जेल फूड केक मध्ये कॅलरिज फार कमी असतात म्हणजे बटर/लोणी नसतं,तो फक्त अंड्याच्या पांढर्‍या बलकापासून बनतो आणि रंगालाही पांढरा असतो. सैतानाच्या केक मध्ये साहीत्य म्हणजे चॉकलेट्, बटर,मैदा म्हणजे भरपूर कॅलरिज....
तर आज संताचा केक पाहूया...

साहीत्यः
६ अंड्यांचा फक्त पांढरा बलक
३/४ कप पीठीसाखर
१/२ कप मैदा
२ चमचे वॅनिला अर्क
१/४ टीस्पू मीठ
२ टेस्पू लिंबाचा रस
१ टीस्पू लिंबाची किसलेली साल (ऐच्छीक)

ग्लेझिंगः

२ चमचे दही
२ चमचे मध
३ चमचे साखर
१ चमचा लिंबाचा रस

हे सगळं नीट घोटावे आणि थंड करून केकवर ओतावे.

कृती:

१) एका मोठ्या वाडग्यात अंड्याचा बलक घेऊन त्याला इलेक्ट्रिक रवीने किंवा व्हिस्कने पांढराशुभ्र फेस होइपर्यंत घुसळावे.
२) त्यात मीठ्,लिंबाचा रस, किसलेली साल आणि वॅनिला अर्क टाकून अजून २ मिनीटे घुसळावे.
३) आता पिठीसाखर घालून २-४ मिनीटे घुसळावे जेणेकरून स्टिफ पीक्स (मराठी शब्द??) तयार होतील.
४) ओव्हन ३५० डिग्री फॅ. ला प्रीहीट करून घ्या.
५) आता या मिश्रणात मैदा हळूहळून भुरभूरत चमच्याने हळूवार मिक्स करावा...
६) नॉनस्टीक पॅनमध्ये ३५-४० मिनीटे बेक करावा.
७) बेक झाल्यावर एखाद तास थंड होऊ द्यावा मग ग्लेझिंग टाकून सर्व्ह करावा.

टीपा: यात अंड्याचा बलक मैद्यापेक्षा जास्त प्रमाणात असल्याने काही लोकांना अंड्याचा वास येऊ शकतो, त्यासाठी वॅनिला अर्क जास्त टाकावा लागतो.
अंड्याचा बलक उगाचच जास्त घुसळू नये नाहीतर केक फुगत नाही.

प्रतिक्रिया

रेवती's picture

3 Jul 2010 - 2:20 am | रेवती

अरे वा!
फोटू छान!
या केकात बटर नसतं तर छान मऊपणा कसा टिकून राहतो? (ग्लेझिंग हे केक मॉइस्ट ठेवण्यासाठी आहे का?)
कि केक लगेच संपवायचा? अंड्याचा पांढरा बलक वापरल्यानंतर दिपालीताईंनी अंड्याच्या पिवळ्या बलकापासून करण्याचे पदार्थ शिकवल्यास बरे होइल.;)
आता एंजल केकनंतर डेव्हील्स केकची वाट पाहू.:)

रेवती

दिपाली पाटिल's picture

3 Jul 2010 - 2:34 am | दिपाली पाटिल

रेवतीताई,

अंड्याच्या पांढर्‍या बलकानेच केक सॉफ्ट राहतो, जनरली हा केक स्ट्रॉबेरि, ब्लूबेरी सॉससोबत खातात म्हणजे चविष्ट लागतो. ग्लेझींग यासाठी आहे की हा केक नुसता खायला जरा कंटाळवाणा होतो...

हा केक बनवल्यावर मी पिवळ्या बलकापासून मेयोनीज बनवलं...पाकृ टाकेन १-२ दिवसांत...

दिपाली :)

टारझन's picture

3 Jul 2010 - 3:25 am | टारझन

अंड्याच्या पिवळ्या बलकापासून करण्याचे पदार्थ शिकवल्यास बरे होइल.

एका हेल्थ काँशियसच्या तोंडुन हे उद्गार ऐकुन डोळे पाणावले ... तिकडे रंगाजी जिम मधे क्यालर्‍या जाळणार ... आणि इकडे तुम्ही फ्याट्स भरायची तयारी करणार =))

बाकी दिपाली तै .. केक खाऊ ही घाला हो :)

सुनील's picture

3 Jul 2010 - 2:39 am | सुनील

अरे वा! करायलाही सोपा दिसतोय. मस्त!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सहज's picture

3 Jul 2010 - 6:44 am | सहज

मस्त!

बाकी नावावरुन संता बंता आठवले. :-)

नंदू's picture

3 Jul 2010 - 9:35 am | नंदू

बाकी फोटू मात्र एक्दम झक्कास.

शानबा५१२'s picture

3 Jul 2010 - 9:45 am | शानबा५१२

फोटो बघुन त्रास झाला....मी २-३ वेळा केक बनवण्याचा प्रयत्न केला व जेव्हाही एक 'फुगलेला केक' बघायला मिळेल अशी अपेक्षा ठेवली तेव्हा तेव्हा अंड्याची पोळी' दीसली,म्हणुन आता त्या भानगडीत नाही पडत.
पहीला फोटो अतिशय आकर्षक आहे!!!

_________________________________________________
''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!!
see what Google thinks about me!
इथे

फोटोत काय मस्त दिसतोय केक.... मला तर फोटो बेकरीतुन काढुन आणला कि काय ही शंका आहे. :D
पण पहिल्या फोटोत तुमची केळीच्या पानाशी डिश बघुन खात्री झाली कि हा नक्कीच तुम्ही बनवला आहे.
एकदम झक्का$$$$$$$$$स O:) O:) O:) O:) O:) केक
वेताळ

गणपा's picture

3 Jul 2010 - 1:18 pm | गणपा

सहसा केक बनवायच्या भानगडीत पडत नाही , कारण ते आयत्यावेळी दगा देतात.
ओव्हन मध्ये असता ना मस्त फुगलेला दिसतो
आणि बाहेत काढताच एकदम सगळी हवा गुल :(
पण हा एकदम सोप्पा दिसतोय. करुन पहाण्याचा मोह होतोय.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Jul 2010 - 1:24 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आसुरी आनंद झाला गणपाचा प्रतिसाद वाचून! >:) गणपा बल्लवाला जे जमत नाही ते मला जमलेलं आहे तर! ;-)
दिपाली, केक मस्त दिसतो आहे. करून पाहिला असता, पण एकटीसाठी केक काय, साध्या पोळ्याही बनवायला जीवावर येतं.

आणि धाग्याचं नाव पाहून या केकच्या रेसिपीत तू आम्हालाच सरदार बनवणार का काय असं वाटलं!!

अदिती

हुप्प्या's picture

9 Jul 2010 - 4:51 am | हुप्प्या

संताचा केक म्हणण्यापेक्षा सात्विक केक जास्त बरे वाटते. आणि दुसरा प्रकार सैतानाचा केक म्हणण्याऐवजी राजसी किंवा फार राग असेल तर तामसी म्हणता येईल. तमस म्हणजे अंधार हा अर्थ आहेच. असो. पाककलेत भाषाशास्त्राची भेसळ फार नको.

जागु's picture

9 Jul 2010 - 12:02 pm | जागु

सहीच.

यशोधरा's picture

9 Jul 2010 - 1:14 pm | यशोधरा

मस्त गं दिपाली! आणि फोटो कसले मस्त दिसत आहेत केक्सचे!

धनंजय's picture

9 Jul 2010 - 9:42 pm | धनंजय

देवदूताचा केक मस्तच!