गाभा:
नमस्कार मित्रहो...
मी वाटाड्या...असाच वाट चुकत असतो..
सध्या वाट चुकुन पुण्यात आलोय. शक्य असलेल्या सर्व मिपाकरांना भेटण्याची इच्छा आहे. ज्यांना शक्य आहे / आवडेल त्यांनी कृपया आपला नंबर व्यनी मधुन पाठवावा. मी संपर्क नक्की करीन. शक्य झाल्यास आपले खरे नावही सांगावे.
धन्यवाद..
- वा
प्रतिक्रिया
8 Jul 2010 - 6:55 pm | टारझन
मी सद्ध्या इटली मधे आहे , इटॅलियन जेवण जेवायची फार इच्छा झाली होती म्हणुन परवाच आयर्लंडवरुन इकडे आलो . पुण्याला येण्याचा योग इतक्यात दिसत नाही ... सॉरी वाटाड्या :(
8 Jul 2010 - 7:05 pm | इनोबा म्हणे
भौ एक काम कर तुझे खरे नाव आणि फोन नंबर व्यनीतुन कळव. मी तुला माझ्या नावासकट एसएमएस टाकतो. ;)
8 Jul 2010 - 7:39 pm | मी-सौरभ
तुमाला लंबर दिल्हा अन तुमी वाट चुकले तर आमचा टाईम खोटी वायचा ;)
-----
सौरभ :)
8 Jul 2010 - 7:49 pm | अवलिया
नाव नंबर व्यनीतुन कळवला आहे, कृपया संपर्क साधणे.
8 Jul 2010 - 7:59 pm | टारझन
लोल , णाण्याने पाध्यांचा णाव आणि णंबर दिल्या आहे अशी शंका वाट्टे =))
8 Jul 2010 - 8:00 pm | अवलिया
चुप..रे ! नाही त्या वेळेला भांडाफोड करतोस... ;)
8 Jul 2010 - 8:16 pm | मी-सौरभ
-----
सौरभ :)
8 Jul 2010 - 9:16 pm | II विकास II
छान कल्पना आहे.
आम्हीही येउ. मस्त कट्टा आयोजित करा.
*पैसे काही देणार नाही*
-----
ज्या दिवशी मराठी आंतरजाल संपादक मुक्त होईल, तो मराठी आंतरजालाचा सुदिन.
8 Jul 2010 - 9:52 pm | विसोबा खेचर
मला भेटण्याकरता म्हणून आज मुद्दामून ठाण्याला आला होतास.. बरं वाटलं रे..
8 Jul 2010 - 10:50 pm | बेसनलाडू
१० जुलैला सायंकाळी ४-७ मध्ये पुण्यात भेटणे शक्य असल्यास कळवावे. मी काही मिपाकरांना त्या वेळेत पुण्यात भेटायचा बेत करतो आहे. नाहीतर ११ जुलैला भेटीचे काही ठरवता येते का ते पाहता येईल.
(वाटसरू)बेसनलाडू
8 Jul 2010 - 11:10 pm | रेवती
या धाग्यावर धागाकर्त्याना अपेक्षित अशी माहिती (इच्छा असल्यास) द्यावी. इतर गोष्टींची चर्चा न केल्यास बरे होइल. अवांतर प्रतिसाद दिल्यानंतर ते अप्रकाशित झाल्यास संपादक मंडळास जाब विचारू नये.
रेवती
9 Jul 2010 - 1:16 am | प्रभाकर पेठकर
१० जुलैला मी लोणावळ्यात वर्षासहलीस जात आहे. संध्याकाळी ७ नंतर यज्ञकर्म उपहारगृह, सहवास कॉर्नर, कर्वे नगर येथे असेन (रात्री १०.३० पर्यंत) माझा भ्रमणध्वनी क्रमांक ९८५०५ ८३००५.
------------------------------------------------------
विवाहित पुरुषाने कितीही नोकर्या बदलल्या तरी त्याचा बॉस एकच असतो.
9 Jul 2010 - 11:10 am | वाटाड्या...
पेठकर साहेब, - यज्ञकर्म जमवीन नक्की...
तात्या : तुमच्याकडे बघवत नाही. परमेश्वर तुम्हाला शक्ती देवो आणि लवकरच चिंता मुक्त करो. भेटून बरं वाटलं. आपल्या स्पेशल विनंतीचा विचार करा. आयुष्यभर ऋण विसरणार नाही.
बेला शेठः १०/११ कधीही चालेल. नंबर पाठवा म्हण्जे भेटु..
सा.सु. सौ: टाईम खोटी होणार नाही. दुसर्याच्या आणि स्वता:च्या टाईमचे महत्त्व आहेच कळलेले.
टार्या: भोचकपणा कमी कर लेका...
इनोबाशेठः कळवतो..
णाणा: कॉल मारतो.
- वाटाड्या...
9 Jul 2010 - 11:18 am | शानबा५१२
मी भाइंदरला राहतो.पुण्याला यायच म्हणजे ६-७ हजारचा खर्च..नाही यष्टीला नाय,माझे शौक पुर्ण करत मी प्रवास करतो.
आपल्याला भेटायची खुप इच्छा आहे पण पैसे नसल्याने हतबल आहे.
तेव्हा मी खाते नंबर देतो,८ हजार पाठवा.तेवढ्यात अॅडजस्ट करीन कसतरी.
भेटु.
_________________________________________________
![]()
''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!!
see what Google thinks about me!
इथे
9 Jul 2010 - 11:39 am | वेताळ
त्याना काय कंबरडं मोडुन घ्यायचे आहे काय?
तु काय थायलंड किंवा फिलिपाईन्स पोरी बरोबर चॅट करतोस कि काय? त्या डायरेक्ट फ्रेंडशिप म्हटले की पैसे मागायला सुरुवात करतात. तसे तुझे झाले आहे.
वेताळ
9 Jul 2010 - 2:42 pm | शानबा५१२
ये तु चुप्प बस ना!.................छंद/आवड जपण्यास माणस कीती खर्च करतात.मला भेटुन त्यांची आवड व माझी गरज(?) भागत असेल तर तुझ्या काय पोटात दुखेल काय?
आम्ही विचाराचे आदानप्रदान करतो..त्याचा फायदा होणार हे निश्चित!
विषयांतर : माझे मित्र मला वाशी व इतर ठीकाणाहुन भेटायला आला होते,तब्बल ८-९ वर्षांनी.............."अरे मी अंधेरीला आहे आता" अस बोलुन कटवल सर्वांना!) :H ;)
एका अनोळखी माणसाला कसे काय भेटता यार तुम्ही!!! आमच्यातला कमी विश्वास म्हणा नाय त अजुन काय आम्ही पार ओशाळुन जातो.
२९४१(ह्यासाठी अणुकेंद्रात या) हा माझा नंबर वरच्या एका सदस्याला मान देण्यासाठी म्हणुन देतो.
_________________________________________________
![]()
''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!!
see what Google thinks about me!
इथे
9 Jul 2010 - 1:28 pm | जिप्सी
९८२३४५७०६० यशोधन जोशी