अवलिया को गुस्सा क्यो आता है ?

परिकथेतील राजकुमार's picture
परिकथेतील राजकुमार in काथ्याकूट
3 Jul 2010 - 4:03 pm
गाभा: 

काल संध्याकाळी दुकान बंद करायला घेतले आणि तेव्हड्यात फोन वाजला. बघतो तर चौपाटीवरच्या बारच्या म्यानेजरचा फोन.

"हॅलो परा साब जल्दी आओ यार, इधर तुम्हारा दोस्त नाना राडा कर रहा है, वेटर को गालीया दे रहा है "

मी डोक्याला हात लावला आणि चौपाटीकडे धावलो. साला चौपाटीचे रंग रुपच बदलून गेले आहे आजकाल हे जाणवुन गेले. चौपाटी अजुनच झगमगायला लागली होती. ह्यावेळी चौपाटीवर तरुणाईचा उत्साह जाणवण्यागत वाढला होता, एका कडेला मोठा स्क्रीन लावुन त्यावर फुटबॉलच्या मॅचेस दाखवल्या जात होत्या. साला क्राउड एकदम खेचला गेला होता तिकडे. काही जुने चेहरे गायब होते तर काही गायब झालेले जुने चेहरे पुन्हा दिसायला लागले होते. इकडे तिकडे बघता बघता एकदाचा बार मध्ये जाउन पोचलो.

अंधारात नजर सरावली आणि एका कोपर्‍यात विषण्णपणे बसलेला अवलिया दिसला, बाजुलाच आमचा बारचा म्यानेजर देखील बसला होता.

"आओ सेठ, देखो ये क्या लफडा किया. वेटरने सामनेका प्लेट उठाया तो वेटर को गालिया देना लगा. बोलता है "मेरा लेख कायको उडाया?" अब गलतीसे प्लेट उठा लिया वेटरने, इतना गुस्सा कायको करनेका ? सब राडा कर दिया.

"नान्या लेका किती पेग ढोसले ? काय झालय काय तुला?" मी नाना शेजारी बसत म्हणालो. नजर खिडकी बाहेरच्या चौपाटीकडे भिरभिरतच होती.

"आपण चौपाटी सोडुन चाललो आता. आता इकडे मन नाही लागत." नाना शून्यात नजर लावुन बोलला.

"काय नाटके करतो रे नान्या ? असे झाले काय तुला ? साला इतकी वर्षे ह्या चौपाटीवर एकत्र राहिलो, दंगा केला, मजा लुटली आणि तु असा एकदम सोडून जाणार ?"

"आपली गरज नाही राहिली आता चौपाटीला परा. जरा कुठे दुकान उघडले की अतिक्रमणवाले येतात आणि सगळा माल जप्त करुन नेतात. परत का जप्त केला ते पण सांगत नाहीत. दुकान उघडायचीच चोरे झालीये आता मला."

"काय बोलतो नाना ? अरे पण इन्स्पेक्टर पाध्येंशी सेटलमेंट झाली होती ना तुझी ?"

"सोड रे ! साप म्हणावा आपला पण 'अतिक्रमणवाला' म्हणू नये आपला" नाना एका दमात पेग संपवुन मोकळा झाला.

माझी नजर अध्ये मध्ये बाहेरच भिरभिरत होती.

"पर्‍या भाड्या, इकडे लक्ष दे तु ! बाहेर काय फुफाटा शोधतो का आता ?" नाना वैतागला.

"नान्या यार आपला चौपाटीवरचा फुगेवाला दिसत नाही रे आजकाल ? आणि तो धनुष्यबाण विकणारा कुठे गेला?"

"खी खी खी फुगेवाला आजकाल परिस्थीतीने नाडला गेलाय. आता तो गोग्गोड म्हातारीचा कापूस विकतो." नाना डोळे मिचकावत म्हणाला.

"नान्या लेका तुझे येवढे जुने दुकान असुन माल जप्त कसे काय करतात बॉ ? मानसीक रीत्या अल्पवयीन असणार्‍यांची दुकाने धो धो चालतात, मग तुझ्याशी काय प्रॉब्लेम आहे ?"

"काय कळत नाही रे परा. मला म्हणतात की नाना तु चौपाटीचे वातावरण गढुळ करतोस म्हणुन" नाना अंमळ हळवा झाला असावा.

"खी खी खी मग साल्या तु तुरटी का विकायला सुरुवात करत नाही ? ते जाउदे.. तु आता सरळ जप्त न होणारा माल विकायला सुरुवात कर बरं !"

"तो काय असतो ? डिटेलमध्ये बोल."

"चल नान्या तु भी क्या याद करेगा, कागद पेन घे तुला लिस्ट देतो बनवुन !" ह्या माझ्या उच्चाराबरोबर वातावरण निवळल्याचे ओळखुन बारचा म्यानेजर टेबलावरुन ऊठला. "अबे ए, परा साब को एक कागज देनेको बोल ना जल्दी.. और साथ मै पेनभी भेज फटाफट..!" जाता जाता त्याने हुकुम सोडला.

"हा नान्या घे लिहायला..."

मालाचे नाव - मालाचा प्रकार

१) मकर राशीत शिरलेल्या शनीचा आणि कर्केत आलेल्या बुधाचा इतर राशींवर होणारा परिणाम = माहितीपुर्ण लेख.

२) अंतर्वस्त्रांचे बाह्यसौंदर्य = महितीवजा अनुभवकथन.

३) सुई-दोर्‍याशीवाय शर्टाला बटने कशी लावावीत = अनुभव कथन + सल्ला.

४) लवकरच लग्न होणार आहे त्यामुळे काही काळातच बायको जेंव्हा गरोदर होईल तेंव्हा तिला सरकारी दवाखान्यात अ‍ॅडमीट करावे का खाजगी ? आजकाल घरी सुईणी वगैरे येतात का ? ते कितपत सुरक्षीत असते ? = काथ्याकूट + मदत हवी आहे.

५) माझा अमेरीकेतला मित्र आणि त्याच्या बायकोचे पगारावरुन होणारे वाद = अनुभव कथन

६) माझ्या भाच्याने मला मी त्याला एक कागदी नाव करुन दाखवल्यावर वेगवेगळ्या प्रकारचे ५० कागदी पक्षी, १०० नक्षीकामे कशी करुन दाखवली, आजकालची स्मार्ट पिढी इ. इ. - अनुभवकथन + आस्वाद

७) माझ्या खोलीच्या खिडकीतुन दिसणर्‍या भाजीच्या स्टॉलवरील विविध रंगी आकर्षक भाज्या = कलादालन.

८) माझ्या बाथरुम मध्ये पोपडे उडालेल्या भिंतीवर पाणी पडुन निर्माण झालेले विविध मनमोहक आकार = कलादालन.

९) 'आज सकाळ मध्ये आलेली फलाना-फलाना बातमी' हि कोणी वाचली का ? अजुन किती अधोगती होणार आहे भारताची ??? = काथ्याकूट.

१०) मी संगणकाचा माऊस साफ करायला कसा शिकलो = प्रकटन + अनुभवकथन.

११) "पिपात मेले ओल्या उंदिर " ह्या कडव्यात नक्की कोणते छंद आहेत ? हि गझल आहे का कविता ? = छंदशास्त्र + काथ्याकुट.

१२) शरिराला नक्की अपायकार काय असते ? आत्ममैथुन का हस्तमैथुन ? = मदत हवी आहे.

१३) कुठल्याही चित्रपटाबद्दल १५/२० वाक्ये आणि त्याच्या अध्ये मध्ये ५/१० फोटु = चित्रपट परिक्षण.

"म्हणजे तु करतो तसे ??" नान्याचा हलकटपणा जागृत झाला...

मी काहीएक सडेतोड उत्तर देणारा येवढ्यात माझा फोन वाजला. फोनवरील संभाषण संपताच मी ताडकन उभा राहिलो.

"नान्या चल मी पळतो रे आता.."

"अरे पर्‍या पण लिस्ट अर्धवट राहिली ना. कुठे चालला येवढ्या घाईत ? "

"डोन्रावांचा फोन होता.. दुकानच उडवले म्हणतायत माझे....."

प्रतिक्रिया

शेखर's picture

3 Jul 2010 - 4:17 pm | शेखर

खपलो =))

घाशीराम कोतवाल १.२'s picture

3 Jul 2010 - 4:27 pm | घाशीराम कोतवाल १.२

हॅ हॅ हॅ

नान्या घाबरु नको आपण अतिक्रमित चौपाटीच बनवु नविन फ्क्त तुझ्यसाठी बर!
तिकडे अतिक्रमण विभाग नसेल आणि अतिक्रमणवाला ईन्स्पेक्टर पण नसेल :)) :)) :))

______________________________
संपादक
घाश्या कोतवाल
भुर्जीपाव डॉट कॉम

गणपा's picture

3 Jul 2010 - 4:20 pm | गणपा

हा हा हा मस्त चीमटे घेणारा लेख आवडला.
हे दुकान उडुने यासाठी शुभेच्छा!!!! ;)

मितभाषी's picture

3 Jul 2010 - 4:31 pm | मितभाषी

'आज सकाळ मध्ये आलेली फलाना-फलाना बातमी' हि कोणी वाचली का ? अजुन किती अधोगती होणार आहे भारताची ??? = काथ्याकूट.

=)) =))

लै भारी पर्‍या. चालु दे.
.
.
.
.
.
भावश्या
---------------------------------
लेख प्रतिक्रिया लिहिणार | खाडकन डिलीट होणार ||
"ते" सखेद फाट्यावर मारणार | निश्चितच ||

(अव्लिया यांजकडुन साभार)

मितालि's picture

3 Jul 2010 - 4:23 pm | मितालि

:))
छान लिहिलं आहे.. लई भारी..
(म्ह्टलं हा लेख पण उडवायच्या आधी प्रतिक्रिया देऊन घ्यावी...) :D

श्रावण मोडक's picture

3 Jul 2010 - 4:35 pm | श्रावण मोडक

रिकामा दिसतोय आज!!!
ते शीर्षक तेवढे बदला. सध्याचे काही पटत नाही. थोडासा रुमानी हो जाये वगैरे काही टाका... ;)

वेताळ's picture

3 Jul 2010 - 4:46 pm | वेताळ

अतिक्रमण वाले डोजर घेवुनच फिरत आहेत आजकाल. जरा कुठे दुकानदार गायब झाला कि उचल त्याचा माल असेच काही चालु आहे. :D
२) अंतर्वस्त्रांचे बाह्यसौंदर्य = महितीवजा अनुभवकथन.
ह्यावर नाना एकादा लेख टाका. :D
पराभाऊ एकदम जबरा.......

वेताळ

सुप्रिया's picture

3 Jul 2010 - 4:47 pm | सुप्रिया

मस्त चिमटे घेतले आहेत.

रेवती's picture

3 Jul 2010 - 5:33 pm | रेवती

वा! मजा वाटली लेख वाचून!
मालाची लिस्ट म्हणून लेखांचे प्रकार दिले आहेत ते चांगले आहेत पण वस्तूंची नावे सुचली असती तर आण्खी मजेदार लेख झाला असता.

रेवती

मस्त कलंदर's picture

3 Jul 2010 - 5:40 pm | मस्त कलंदर

हा हा हा..
शेवट तर भारीच रे!!!

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Jul 2010 - 5:55 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

उडवून उडवून उडवणार कोण, डानराव! डानराव!!

अदिती

Nile's picture

3 Jul 2010 - 6:03 pm | Nile

डान्याच्या... आपलं ... डान्राव अमर रहे!

-Nile

सहज's picture

3 Jul 2010 - 6:03 pm | सहज

=))

खत्री लेख!

शेवट अल्टीमेटच!!!

छोटा डॉन's picture

3 Jul 2010 - 6:21 pm | छोटा डॉन

=))

चालु द्यात, पराच्या 'नाना आणि चौपाटी' ह्या विषयाला वाहिलेल्या लेखांना इथे "चांगले" म्हणायची पद्धत आहे म्हणे !
असो, खुप छान लेख हो ...

------
(दुकानतोड्या) छो.टा. खैरनार

विकास's picture

3 Jul 2010 - 6:35 pm | विकास

+१

बाकी अवलीयांना बॉस्टनच्या किनारपट्टीवर दुकान हलवायचा प्रस्ताव देणार होतो, पण मग त्यांना अनिवासी भारतीयांना नावे ठेवता येणार नाहीत... ;) म्हणजे त्यांचे, असून अडचण नसून खोळंबा असे काही तरी होणार :(

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Jul 2010 - 11:07 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

"(दुकानतोड्या) छो.टा. खैरनार" ऐवजी डॉ. ना. छाटणार कसं वाटेल?

(राको) अदिती

टारझन's picture

3 Jul 2010 - 8:23 pm | टारझन

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
बाजार उठला !!

|| बाजार ||
ज्या दिवशी पाध्ये नानाला समजुन घेतील तो जालावरचा नानाचा अंतिमदिन.

शरिराला नक्की अपायकार काय असते ? आत्ममैथुन का हस्तमैथुन ? = मदत हवी आहे.
अंतर्वस्त्रांचे बाह्यसौंदर्य = महितीवजा अनुभवकथन.

ख प लो

नरेशकुमार's picture

26 Jan 2011 - 7:12 pm | नरेशकुमार

अहो स्पा,
नाही काळात एकेकाला.
एवढ हसायचं काय त्यात ?


शरिराला नक्की अपायकार काय असते ? आत्ममैथुन का हस्तमैथुन ?

तुमच्याकडे याचे उत्तर आहे काय ? असेल तर द्या इथे लगेच

दशानन's picture

3 Jul 2010 - 8:38 pm | दशानन

ह ल क ट !

भोचक's picture

3 Jul 2010 - 9:38 pm | भोचक

सहमत.

(भोचक)
जाणे अज मी अजर

II विकास II's picture

3 Jul 2010 - 9:11 pm | II विकास II

"खी खी खी फुगेवाला आजकाल परिस्थीतीने नाडला गेलाय. आता तो गोग्गोड म्हातारीचा कापूस विकतो." नाना डोळे मिचकावत म्हणाला.

>> दुसर्‍याच्या अडचणीवर हसल्याची प्रवृत्ती प्रशासकांना आवडत नसावी.
असो.
नानाला शुभेच्छा.

चतुरंग's picture

3 Jul 2010 - 10:52 pm | चतुरंग

अजून तरी जप्त होण्याजोगा माल किंवा कचर्‍यात टाकण्याजोगी वेष्टने दिसली नाहीयेत!! ;)

(चौपाटीवरच्या वाळूत बुद्धीबळं खेळणारा)चतुरंग

Pain's picture

3 Jul 2010 - 11:46 pm | Pain

=)) =)) =)) =)) =))

II विकास II's picture

3 Jul 2010 - 11:48 pm | II विकास II

विद्रोहीच जेव्हा प्रस्थापित होतात

असे काही तरी नाव हवे.

इंटरनेटस्नेही's picture

4 Jul 2010 - 1:10 am | इंटरनेटस्नेही

परिकथेतील राजकुमार यांचा हा लेख सर्वांगसुंदर परिपुर्ण आहे.
हसुन हसुन पुरेवाट झाली!

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =)) =))
=)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

--
इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.

सुधीर काळे's picture

4 Jul 2010 - 9:06 am | सुधीर काळे

+१. मस्त लेख!
------------------------
सुधीर काळे
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचा दुवा: http://tinyurl.com/234ku9g (प्रकरण नववे)

बिपिन कार्यकर्ते's picture

4 Jul 2010 - 9:13 pm | बिपिन कार्यकर्ते

छान लेख !

बिपिन कार्यकर्ते

विजुभाऊ's picture

5 Jul 2010 - 10:43 am | विजुभाऊ

बिपीन काकांशी सह्मत.
छान लेख्.पण आत्ता सुरू झाले म्हणून जरासावरून बसतोय तोच लेख संपलेला.... ( बहुतेक डॉन भाईंचा फोन वाजलेला असणार म्हणून संपवलेला)

प्रभो's picture

6 Jul 2010 - 6:45 pm | प्रभो

=)) =)) =))

पर्‍या, भारी रे..

ashvinibapat's picture

26 Jan 2011 - 7:14 pm | ashvinibapat
चिंतामणी's picture

26 Jan 2011 - 7:35 pm | चिंतामणी

जुना न वाचलेला लेख "स्पा"ने वर काढल्याबद्दल धन्यवाद.

त्याच्यामुळे वाचायला मिळाले आणि मग ह.ह.पु.वा.

=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))

(पण जाता जाता एक किडा वळवळा. "स्पा"ने आज हा लेख वर काढायचे कारण काय असावे????? :-/)
:-/
(विचारात पडलेला) चिंतामणी

प्रीत-मोहर's picture

26 Jan 2011 - 9:52 pm | प्रीत-मोहर

ऐसाच बोल्ती है

ब्रिटिश टिंग्या's picture

27 Jan 2011 - 12:21 pm | ब्रिटिश टिंग्या

हॅ हॅ हॅ