उदाहरणार्थ पांडुरंग सांगवीकर, चांगदेव पाटील.

कापूसकोन्ड्या's picture
कापूसकोन्ड्या in काथ्याकूट
28 Jun 2010 - 11:55 pm
गाभा: 

प्रिय मिपाकरांनो,
नमस्कार,
१५ जुलै २०१० ची वाट पहा. तब्बल एकतीस वर्षे वाट पाहून झाल्यावर "हिंदू एक समृध्द अडगळ" येत आहे.
भटकळांचे प्रकाशन आणि प्रत्यक्ष भालचंद्र नेमाडे.
लेखकराव व्वा क्या बात है!!

त्यांचा साने गुरूंजींचा फॅनपणा, देशी भाषेची आग्रही मागणी, कोसला, बिढार्,झूल सारख्या कादंबर्‍या, आणि त्यांची कित्येक वादग्रस्त विधाने (उदाहरणार्थ -अमुक अमुक लेखक त्यांच्या घरी आरामखुर्चीत बेडकासारखे पडले होते) आम्हा मित्रांच्या टोळक्याला वादावादी साठी खुप विषय मिळाले होते. साधारण अठ्ठ्याहत्तर ते ऐंशी

--( त्या वेड्या वयात जे काही प्रस्थापित ते ते वाईट अशी मानसिक धारणा झाली होती हा 'त्या ' कादंबर्‍यांचा परिणाम असावा.) असो.
अठ्ठ्याहत्तर ते ऐंशी या दोन तिन वर्षामध्ये आम्ही मित्रानी कित्येक शब्द फॅशन म्हणून वापरत होतो. (उदाहरणार्थ--उदाहरणार्थ, कारा, लेखकराव).
त्यांचे टीका स्वयंवर ग्रंथ फारसा भावला नाही. किंवा समजला नसावा.
खरी उत्सुकता अशी-
=======================
१. साधारण सातशे पाने तीन खंड,
२. किंमत फक्त ६५० रू.
३. समृध्द अडगळ म्हणजे एक्झॅक्ट्ली काय ह्याची उत्सुकता
४. एकतीस वर्ष संशोधन काय केले असेल?
५. थोडा काळजीचा मुद्दा- अराजकीय पक्ष (रा.स्व.सं,म.म.,बभाब्रास ,विहींप अशांनी विरोध करावाअशी काही उपद्रवमुल्य असलेली विधाने आणि विशेषतः महाबळेश्वर सा स अध्यक्षाचे अनुभव पाहता).
अराजकिय म्हणजे राजकिय नसलेले. त्याचा अराजक शी काहीही संबंध नाही.
--------------------------------------------------------
प्रिय वाचक,लेखक, प्रकाशकांना हार्दिक शुभेच्छा!

प्रतिक्रिया

प्रियाली's picture

29 Jun 2010 - 12:02 am | प्रियाली

उपक्रमावरील आलेल्या एका प्रतिसादातून आताच ऐकले आणि यूट्यूबवर पाहिले की नेमाडे म्हणतात - राजवाड्यांनी ज्ञानेश्वरीची मूळ प्रत गायब केली. याला खरेच काही पुरावे आहेत की नेमाडे फेकताहेत?

बिपिन कार्यकर्ते's picture

29 Jun 2010 - 12:22 am | बिपिन कार्यकर्ते

माझ्या मते नेमडे फेकत असावेत... (बहुधा नेहमीप्रमाणे ;) ) ... माझ्या माहितीप्रमाणे पू. सोनोपंत दांडेकरांनी ज्ञानेश्वरीची शुद्धप्रत तयार केली आहेच. आणि केवळ विश्वास ठेवायचा मामला असल्याने (कारण नेमाड्यांकडेही ठोस पुरावे नसावेतच) तर माझा विश्वास पू. सोनोपंतांवर अधिक आहे.

अर्थात, हा प्रतिसाद किंवा यातली विधाने सिद्ध करण्याजोगे पुरावे, माझ्याकडे नाहीतच.

बिपिन कार्यकर्ते

अडगळ's picture

29 Jun 2010 - 1:47 am | अडगळ

दुर्गाबाईंच्या एका मुलाखतीत पण असेच वाचल्याचे आठवते कि राजवाड्यांनी मूळ कागद्पत्रांची काही वेळा फेरफार केली आहे.

भडकमकर मास्तर's picture

29 Jun 2010 - 12:54 am | भडकमकर मास्तर

सगळ्यांशी सहमत...

अवांतर : आता म्याच सुरू होणार..
जागा पकडा

रामपुरी's picture

29 Jun 2010 - 1:23 am | रामपुरी

हिंदू एक समृध्द 'अडचण' कि 'अडगळ'???

शुचि's picture

29 Jun 2010 - 1:31 am | शुचि

http://www.dnaindia.com/lifestyle/report_brahmins-hindutva-have-ruined-h...

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

कापूसकोन्ड्या's picture

29 Jun 2010 - 7:46 am | कापूसकोन्ड्या

चुकी ची दुरूस्ती केली आहे. रामपुरी चे आभार

विनायक पाचलग's picture

29 Jun 2010 - 11:11 am | विनायक पाचलग

ही कादंबरी काही ठिकाणी आत्ताच उपलब्द्ध आहे असे समजते
..
लोकसत्तात काही भाग वाचले ,
फारसे समजले नाही
असो

विनायक पाचलग
वाँट टु टॉक

विजुभाऊ's picture

29 Jun 2010 - 11:37 am | विजुभाऊ

नेमाडे हे त्यांच्या नको इतक्या स्पष्तवक्तेपणासाठी कुप्रसिद्ध आहेत.
त्यांच्या पुस्तकानी मराठीत एक वेगळा प्रवाह आणला. मराठी भाषेला बाष्कळ शैलीदार अलंकारीक अवघडलेपणातून बाहेर काढले याचा प्रत्य आजही येतो. कोसला आजही तितकीच भावती जितकी ती ८० च्या दशकात वटली होती. इंटरनेटमुळे त्यातले संदर्भ थोडे धूसर झाले असतील कमालीच्या स्पर्धात्मक युगामुळे त्यातला पांडुरंगसांगवीकर आज अधूनमधून धेयवादी झाला असेल. पण कोसलाने त्यावेळेस प्रस्थापितांना धक्के दिलेत ते मानायलाच हवे.
त्यांचे विचार मन्य होत नसतील पण त्यातील वस्तुस्थिती नाकारता येत नाही.
"हिंदू एक समृध्द अडगळ" चा काही भाग म टा मध्ये छापून आला होता. तो वाचल्यावर हे पुस्तकदेखील कोसलाप्रमाणे बर्‍याचजणांच्या पगड्या उडवून लावेल हे नक्की

पाषाणभेद's picture

29 Jun 2010 - 7:35 pm | पाषाणभेद

उदाहरणार्थ कोसला वाचली अन आता परत दुसर्‍यांदा पारायण करतो आहे. त्यात पांडूरंग एकदा उदाहरणार्थ नापास होतो याचा उल्लेख आहे का? बाकी हे मस्तच.

बाकी पांडूरंगाचे उदाहरणार्थ विचार प्रस्थापितांना धक्के देणारे असतात. प्रा. गुणे ला तर कसला उखडवतो! अगदी बेडूक बनवतो तो. तो गावात आल्यानंतर मात्र थोडा बुळा बनतो असे वाटते. सुरेश बापटाची अन त्याची मैत्री मात्र 'वेगळ्याच' वळणावर गेली असावी असे उदाहरणार्थ राहून राहून वाटते. (आठवा ते दोघे वेताळाच्या टेकडीवर गेल्यानंतरचे त्याचे विचार: "शेवटी दोघा पुरूषांना पाह्यजे तितकं जवळ येता येत नाही. एकमेकांत शिरता येत नाही. शरीरानं सगळी गोची करून ठेवली आहे.") हे ही एक उदाहरणार्थ भलतंच.

The universal symbol for diabetes
मधुमेहा विरुद्ध लढा

माझी जालवही

तिमा's picture

29 Jun 2010 - 7:06 pm | तिमा

साहित्यप्रेमींच्या जगात फक्त दोनच प्रकार आहेत. 'उदाहरणार्थ ----

एक : नेमाडपंथी
दोन : आणि इतर

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|