टिव्ही मालिकांमध्ये नेहमी पाहिले जाते, सर्व कलाकार चप्पल बूट घालूनच घरात वावरतात. याचे नक्की कारण कळेल काय ?
हिंदी मालिकांचे अनुकरण करुन राठी मालिकांमध्येही ही सवय वाढत आहे असे दिसते.
मालिकांचा इतका सुळसुळाट झाला आहे आणि काही मेगामॅरेथॉन मालिकामध्ये एकच कॅरेक्टर वेगवेगळे अॅक्टर्स करतात त्यामुळे कुठे नवीन संधी मिळताच "चपला घालायच्या आणि चालु लागायचं"ह्या प्रकारात वेळ जायला नको म्हणुन चपला घालुनच फिरत असतील बापुडे!
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
मालिकेतल्या अभिनेत्री/ अभिनेत्यांचे कपडे आजकाल चांगले असतात त्यांची शोभा चांगल्या कलाकुसरीच्या चपलांनी वाढते म्हणून ते चपला घालत असावेत. माझ्या काही (महाराष्ट्राबाहेरच्या) मैत्रिणींकडे सर्रास बाहेर वापराच्या चपला स्वयंपाकघरापर्यंत घालतात. पार्टीच्यावेळेस तर अतिशय सुंदर चपला असतात.
हा दोन ओळींचा धागा ठिक आहे पण त्यावर लक्ष आहे. 'चपलांचा' धागा पुढे भरकटू नये याची काळजी सर्वांनी घ्यावी.
किती उकडत असेल घरात चपला/बूट घालून. पाय उबून निघत असतील २४ तास काहीतरी घालून. घरात चपला घालायच्या आणि मग नवीन फ्याडं काढायची हिरवळीत अनवाणी फिरायचं वगैरे..... निद्रानाश आणि मधुमेहावर चांगलं म्हणून.
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
मोज्यांच्या वासाने हळूहळू सगळेच बेशुद्ध पडतील म्हणून बूट तसेच ठेवण्याचा बूट निघाला असावा! ;)
('महाभारत' मालिकेतले सैनिक पॅरॅगॉनचे बूट घालून लढताना बघितलेले आठवले! ;)
मालिकांचे सोडून द्या...! मालिकेत असलेल्या चपला,साड्या,कपडे, केशभूषा, यांना नंतर चांगला भाव येतो, ती फॅशन बनते.
बाकी, कळत्या-नकळत्या वयात घरात चप्पल घालून वावरणे कधीतरी ते प्रतिष्ठेचे लक्षण वाटायचे. आमच्या शेणाने सारवलेल्या घरात तर चपलांचा प्रश्नच नव्हता. आता जराशा कळत्या आणि परिस्थिती बदललेल्या वयात कळते की 'कोटा फरशी' थंडीच्या दिवसात खूप गार पडते, तेव्हा घरात चप्पल आवश्यक आहे. इतर फरश्यांचे माहिती नाही. इतरांची कारणेही माहिती नाही. पण साले संस्कार असे अजूनही आडवे येतात की, पायाचे तळवे घरात थंड पडतात पण आम्ही कोणीच अजून घरात चप्पल वापरत नाही. :)
प्रतिक्रिया
28 Jun 2010 - 4:45 pm | अवलिया
कुणीतरी प्रेमाने दिलेल्या चपला असतील तर आयुष्यभर जपुन ठेवाव्या वाटतात.
झोपतांना पण चपला घालुनच झोपतात.
तुम्हाला नसावा अशा चपला मिळण्याचा अनुभव म्हणुनच प्रश्न पडला.
--अवलिया
28 Jun 2010 - 5:01 pm | II विकास II
तुम्हाला नसावा अशा चपला मिळण्याचा अनुभव म्हणुनच प्रश्न पडला.
>> गेल्या त्या चपला, राहील्या फक्त आठवणी.
असो.
-----
ज्या दिवशी मराठी आंतरजाल संपादक मुक्त होईल, तो मराठी आंतरजालाचा सुदिन.
28 Jun 2010 - 4:47 pm | सुनील
स्टेजवरचे खिळे लागू नयेत म्हणून रे भौ!! तुला शंका फार!! ;)
Doing what you like is freedom. Liking what you do is
happiness.
28 Jun 2010 - 4:57 pm | Dipankar
मालिके़तील प्रेक्षणीय स्थळे सोडुन चपला कशाला बघाता राव
28 Jun 2010 - 5:00 pm | II विकास II
राठी मालिकांमध्येही
????
-----
ज्या दिवशी मराठी आंतरजाल संपादक मुक्त होईल, तो मराठी आंतरजालाचा सुदिन.
28 Jun 2010 - 5:00 pm | कानडाऊ योगेशु
मालिकांचा इतका सुळसुळाट झाला आहे आणि काही मेगामॅरेथॉन मालिकामध्ये एकच कॅरेक्टर वेगवेगळे अॅक्टर्स करतात त्यामुळे कुठे नवीन संधी मिळताच "चपला घालायच्या आणि चालु लागायचं"ह्या प्रकारात वेळ जायला नको म्हणुन चपला घालुनच फिरत असतील बापुडे!
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
28 Jun 2010 - 5:38 pm | रेवती
मालिकेतल्या अभिनेत्री/ अभिनेत्यांचे कपडे आजकाल चांगले असतात त्यांची शोभा चांगल्या कलाकुसरीच्या चपलांनी वाढते म्हणून ते चपला घालत असावेत. माझ्या काही (महाराष्ट्राबाहेरच्या) मैत्रिणींकडे सर्रास बाहेर वापराच्या चपला स्वयंपाकघरापर्यंत घालतात. पार्टीच्यावेळेस तर अतिशय सुंदर चपला असतात.
हा दोन ओळींचा धागा ठिक आहे पण त्यावर लक्ष आहे. 'चपलांचा' धागा पुढे भरकटू नये याची काळजी सर्वांनी घ्यावी.
रेवती
28 Jun 2010 - 5:49 pm | शुचि
किती उकडत असेल घरात चपला/बूट घालून. पाय उबून निघत असतील २४ तास काहीतरी घालून. घरात चपला घालायच्या आणि मग नवीन फ्याडं काढायची हिरवळीत अनवाणी फिरायचं वगैरे..... निद्रानाश आणि मधुमेहावर चांगलं म्हणून.
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
28 Jun 2010 - 5:51 pm | प्रियाली
घरात एसी असेल तर कशाला उबतील पाय आणि थंडीत तर सर्रास घालाव्याच चपला पायांत.
आणि घरात कुठे हिरवळ असते अनवाणी फिरायला? ;)
28 Jun 2010 - 5:40 pm | मी-सौरभ
-----
सौरभ :)
28 Jun 2010 - 5:44 pm | बिपिन कार्यकर्ते
काय हे शैलेश राव... मालिका बघताना लक्ष चप्पलांवर? लक्ष्मणाचे अवतार दिसता की... ;)
अवांतर : रेवतीकाकूंशी सहमत.
बिपिन कार्यकर्ते
28 Jun 2010 - 5:53 pm | II विकास II
काय हे शैलेश राव... मालिका बघताना लक्ष चप्पलांवर? लक्ष्मणाचे अवतार दिसता की... Wink
=)) =))
कार्यकर्तेकाकांशी सहमत.
----
ज्या दिवशी मराठी आंतरजाल संपादक मुक्त होईल, तो मराठी आंतरजालाचा सुदिन.
28 Jun 2010 - 5:47 pm | वेताळ
मालिकात चपला व बुट घालुन वावरत असावेत.
मागे एका धाग्यात एका सदस्यांना चर्च खुप आवडत होते,त्याचे कारण काय तर चर्च मध्ये चपला घालुन जाता येत असे.
वेताळ
28 Jun 2010 - 6:00 pm | चतुरंग
मोज्यांच्या वासाने हळूहळू सगळेच बेशुद्ध पडतील म्हणून बूट तसेच ठेवण्याचा बूट निघाला असावा! ;)
('महाभारत' मालिकेतले सैनिक पॅरॅगॉनचे बूट घालून लढताना बघितलेले आठवले! ;)
(सँडलधारी)चतुरंग
28 Jun 2010 - 6:07 pm | चिरोटा
:D चोप्रा म्हाभारतात एकदा मारुति-८०० लोकांना दिसली होती.
P = NP
28 Jun 2010 - 6:38 pm | धमाल मुलगा
आम्हीतर एकता कपूरच्या (तीनंच नवं म्हाभारत काढलं होतं ना मध्यंतरी?) महाभारतात भिष्म तरुणपणीच्या काळात नदीवर जात असतानाच्या वाटेवर एका झोपडीच्या छतावर 'टाटा स्काय'ची परात लावलेली पाहिली होती राव!
28 Jun 2010 - 8:34 pm | नितिन थत्ते
हॅ हॅ हॅ.
ती संजय साहेबांच्या लाईव्ह टेलिकाष्टसाठी लावलेली होती. संदर्भ नानाला विचारा.
नितिन थत्ते
28 Jun 2010 - 6:34 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मालिकांचे सोडून द्या...! मालिकेत असलेल्या चपला,साड्या,कपडे, केशभूषा, यांना नंतर चांगला भाव येतो, ती फॅशन बनते.
बाकी, कळत्या-नकळत्या वयात घरात चप्पल घालून वावरणे कधीतरी ते प्रतिष्ठेचे लक्षण वाटायचे. आमच्या शेणाने सारवलेल्या घरात तर चपलांचा प्रश्नच नव्हता. आता जराशा कळत्या आणि परिस्थिती बदललेल्या वयात कळते की 'कोटा फरशी' थंडीच्या दिवसात खूप गार पडते, तेव्हा घरात चप्पल आवश्यक आहे. इतर फरश्यांचे माहिती नाही. इतरांची कारणेही माहिती नाही. पण साले संस्कार असे अजूनही आडवे येतात की, पायाचे तळवे घरात थंड पडतात पण आम्ही कोणीच अजून घरात चप्पल वापरत नाही. :)
-दिलीप बिरुटे
[प्रामाणिक]
28 Jun 2010 - 9:54 pm | विसोबा खेचर
हो, बहुतेक श्रीमंत लोकं घरातही जळ्ळ्या त्या चपला घालून वावरतात. घरात कसल्या हो चपला? अनवाणी वावरा की! अर्थात, हा ज्याच्यात्याच्या इच्छेचा प्रश्न..
28 Jun 2010 - 7:17 pm | टारझन
व्वा ! फारंच प्रामाणिक पणे लिहीलंय !! अत्यंत रोचक विषय :)
अवांतर : रेवती च्या प्रतिसादाची दखल घेतली आहे :)
28 Jun 2010 - 8:28 pm | पुष्करिणी
सगळी पात्र कायम कुठेतरी समारंभाला जायच्या तयारीत असल्यासारखे नटून थटून असतात, मग चप्पल्-बूट का नकोत?
पुष्करिणी
28 Jun 2010 - 9:03 pm | Nile
च्यायला आधीच फालतु आणि फाफटपसारा असलेल्या सोप्स मध्ये जर फुटेज 'चपला काढताना' या सिन मध्ये घालवले तर साला काय अर्थ आहे??
-Nile
28 Jun 2010 - 9:15 pm | नितिन थत्ते
=)) =)) =))
एक चप्पल काढली की त्या फ्रेमला ढढॅक ढढॅक ढढॅक अशा पार्श्वसंगितासह स्टिल करून तीन तीन वेळा.
मग दुसर्या चपलेसाठी तसेच. चप्पल काढतानाचे इतर पात्रांचे चेहरे वगैरे.....
नितिन थत्ते
28 Jun 2010 - 10:04 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मग बूट का नकोत? "नाड्या" सोडायची दहा मिनीटं होतील .. त्यातून त्या कूट असतील तर आणखीनच धम्माल ;-)
अदिती
28 Jun 2010 - 10:15 pm | राजेश घासकडवी
आणि जर नाड्या सापडल्या नाहीत तर? कधी कधी होतं असं.
28 Jun 2010 - 10:20 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
तर नाडी शोधायचा एक आख्खा एपिसोड ठेवता येईल ना!!
अदिती
28 Jun 2010 - 10:29 pm | Nile
एकच? तुम्ही कधीच मराठी शीरीयल बनवु शकणार नाही, सोडुन सोडा.
-Nile
28 Jun 2010 - 10:52 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
म्हणूनच मी मराठी शीरीयल आणि शिणुमा दोन्ही बनवत नाही.
अदिती
28 Jun 2010 - 11:00 pm | पंगा
तसेही शिर्यल क्काढण्याक्करिता आवशक्क ते मूलभूत क्क्वालिफिक्केशन आपल्याक्कडे नाही.
त्याक्करिता प्रथम आपले नाव/आयडी बदलून 'क्तीन-क्चौदा क्विक्क्षिप्त कदिती' असे क्करावे लागेल.
त्यामुळे, नाही बनवत तेच ठीक्क.
- पंडित गागाभट्ट.
28 Jun 2010 - 11:02 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
ही केकता कपूर आता कराठी कालिका, आपलं मराठी मालिकाही बनवायला लागली का काय?
अदिती
28 Jun 2010 - 11:10 pm | पंगा
...अजूनपर्यंत बनवत नसेल, तर आज ना उद्या बनवेलसुद्धा.
शेवटी पैशासाठी क्कोण क्काय क्करेल, क्काय सांगावे? मराठी शिर्यलसुद्धा क्काढतील. (आम्ही आपला फारम्युला सांगितला.)
बाय द वे, केकत्ता कपूर नव्हे. केकता क्कपूर. शुद्धलेखनाचे बाबतीत असा हलगर्जीपणा क्क्षम्य नाही.
- पंडित गागाभट्ट.
28 Jun 2010 - 11:11 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
=)) =)) =))
कालू द्या ... आपलं चालू द्या! पण तुम्ही तुमचा कार्मुला, आपलं फार्मुला नीट जपून ठेवा हो, पेटंट मिळवून चार पैसे गाठीस पडतील.
अदिती
28 Jun 2010 - 11:18 pm | पंगा
क्कारण क्फारमुला, क्त्यावरचे क्पेटंट क्वगैरे क्सगळे केकता क्कपूरचे काहे, कामचे क्नाही. (काम्ही क्तो क्फारमुला कापल्याला क्सांगितला, कितकेच.) क्त्यामुळे कामच्या क्गाठी क्चार क्पैसे क्लागण्याची क्शक्यता क्शून्य.
केवढे क्बोलून क्झाल्यावर, क्स्वतःलाच 'क्ब्लेस क्यू!' कसे क्म्हणून काम्ही क्खाली क्बसतो.
- क्पंडित क्गागाभट्ट.
28 Jun 2010 - 11:09 pm | Nile
तसे करण्यास काहीच हरकत दिसत नाही, फारसा फरकही नाहीए (नावात हो!).
-Nile
28 Jun 2010 - 10:11 pm | शिल्पा ब
काय वाटेल ते चाललेलं असतं मालिकेत आणि तुमचं लक्ष आपलं चपलेकड !!!
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
28 Jun 2010 - 11:05 pm | पंगा
सामान्य माणसाचा कल आपल्याला जे समजत नाही त्याकडे दुर्लक्ष करून ज्याबद्दल काही समजते, त्यावर ध्यान देण्याकडे असतो.
मालिकेत जे काही वाटेल ते चाललेले असते, ते सामान्य प्रेक्षकाच्या आकलनापलीकडचे असते.
चपलांचे तसे नाही. चपला बहुतांश सामान्य प्रेक्षकाच्या आकलनात फिट्ट बसू शकतात.
प्रक्रिया समजून घ्या. मग कशाचेही आश्चर्य वाटणार नाही.
- पंडित गागाभट्ट.
29 Jun 2010 - 12:44 am | शेखर काळे
चपला बुटांचे ?
मालिकेतल्या प्रत्येक वस्तुमागे काहीना काही कारण असते असे ऐकले आहे ...