इंद्रवज्र : माहिती हवी आहे.

महेश हतोळकर's picture
महेश हतोळकर in काथ्याकूट
25 Jun 2010 - 4:27 pm
गाभा: 

आजच्या म.टा. मध्ये इंद्रवज्राबद्दल वाचले. नवीनच माहिती वाटली. कोणाला याबद्दल आजून माहिती आहे का? म.टा. मध्ये फारच त्रोटक दिले आहे. जोडीला फोटोही असतील तर आजूनच मस्त.

प्रतिक्रिया

अरुंधती's picture

25 Jun 2010 - 7:04 pm | अरुंधती

तुम्हाला हवी असलेली माहिती देऊ शकेल :

http://simple.wikipedia.org/wiki/Rainbow

http://hi.wikipedia.org/wiki/%E0%A4%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%...

गूगल मध्ये जाऊन round rainbow / circular rainbow असा शोध घ्या. अजून माहिती मिळेल.

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

महेश हतोळकर's picture

28 Jun 2010 - 7:02 pm | महेश हतोळकर

Google मध्ये काही फोटो मीळाले. माहिती पण मीळाली पण आजून वाचली नाही.

अप्पा जोगळेकर's picture

25 Jun 2010 - 8:02 pm | अप्पा जोगळेकर

आठ वर्षांपूर्वी बारावीच्या सुट्टीत असताना मी जेंव्हा डोंगरात फिरायला सुरुवात केली तेंव्हा हरिश्चंद्रगडला मी इंद्रवज्र पहिले होते. लोक ते पाहण्यासाठी अक्खी हयात घालवतात. माझ्या सुदैवाने पहिल्या व्हिजिटमधेच पाहायला मिळाले. कोकणकड्यावर उभं राहायच . खाली खोल दरी त्यातून ढग वर येतात आणि मागून सूर्य आणि रिमझिम पाऊस. गोल सप्तरंगी आकार तयार होतो (थोडक्यात गोलं इंद्रधनुष्यच) आणि त्याच्या आत आपल्या स्वतःच्या सावल्या पाहता येतात. सही असतं.

दत्ता काळे's picture

26 Jun 2010 - 11:08 am | दत्ता काळे

तीन वर्षापूर्वी ऑगस्टमध्ये हरिश्चंद्रगडावरच्या कोकणकडयातल्या दरीमध्ये मी इंद्रवज्र बराचवेळ पाहीलं. विशेष म्हणजे ते दरीत खाली दिसंत होतं. ते पहात असताना तुमची सावली इंद्रवज्राच्या बरोबर मध्यभागी अंधुकशी दिसते, हे अजून एक वैशिष्ठ्य. इंद्रवज्र हा योग काहीसा दुर्मिळ आहे, त्याला डोंगरदर्‍यातूनच भटकंती करावी लागते.

दत्ता काळे's picture

26 Jun 2010 - 11:12 am | दत्ता काळे

माझ्याकडे खूप फोटो आहेत, पण ते तितकेसे स्पष्ट नाहीत, कारण दरीतले ढग, धुकं.

मी ऋचा's picture

26 Jun 2010 - 5:08 pm | मी ऋचा

सहा सात वर्षांपुर्वी राखीपोर्णिमेला आमच्या घरी नागपुरला सूर्याभोवती सप्तरंगी वर्तुळ बघितले होते... पण ते इन्द्रवज्र होते का ते नक्की नाही सांगता येणार.

मी ॠचा

र॑गुनी र॑गात सार्‍या र॑ग माझा वेगळा !!

पुष्करिणी's picture

28 Jun 2010 - 8:21 pm | पुष्करिणी

मीपण पाहिलय डोंगरावरून...अप्रतिम दिसतं

पुष्करिणी

simplyatin's picture

29 Jun 2010 - 3:49 pm | simplyatin

simplyatin's picture

29 Jun 2010 - 3:54 pm | simplyatin

simplyatin's picture

29 Jun 2010 - 3:56 pm | simplyatin
महेश हतोळकर's picture

29 Jun 2010 - 11:54 pm | महेश हतोळकर

अप्रतीम अनुभव! हे पहाण्यासाठी वर्षातला कोणता काळ योग्य असतो? पावसाळा की हिवाळा? म.टा. च्या दुव्यानुसार अती उंचीची ठीकाणे यासाठी आवश्यक असतात. ही ठीकाणे कोणती? कृपया आजून इतरही माहिती असेल तर द्या.

रम्या's picture

30 Jun 2010 - 1:23 pm | रम्या

आपलीच सावली इंद्रवज्रामध्ये (म्हणजे ढगांवर) पडणे काही पटत नाही.जर प्रकाशाचा स्त्रोत एखाद्या वस्तू पेक्षा मोठा असेल तर त्यावस्तूची सावली फार अंतरापर्यंत पडत नाही. अंतरानुसार ही सावली हळू हळू लहान होत जाते आणि नंतर पुर्णपणे नाहीशी होते. म्हणूनच उंच उडणारे पक्षी, आकाशातील विमाने यांची सावली जमिनीवर पडत नाही. विमान कमी उंचीवर असेल तर मात्र त्याची सावली अनुभवता येते. इतकच काय तिसर्‍या चौथ्या मजल्याचा गच्चीवर कठ्ड्याचा बाजूला उभे असल्यास खाली जमीनीवर आपली सावली दिसत नाही.

इंद्रवज्रामध्ये दिसणारी कदाचित सावली नसावी, प्रकाशाचा दुसरा काही तरी खेळ असावा.

आम्ही येथे पडीक असतो!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

30 Jun 2010 - 1:30 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

इंद्रवज्राच्या बाबतीत ढग आपल्या खूप जवळ आल्यामुळे जिथे सावली पडत आहे, तो पृष्ठभाग आपल्या जवळ येतो, त्यामुळे सावली दिसत असावी. आपलं आणि सूर्याचं अंतर इथे महत्त्वाचं नसून आपलं आणि जिथे सावली पडते आहे तिथलं अंतर महत्त्वाचं आहे.

तुम्ही जे पक्षी, विमानं यांचं उदाहरण दिलं आहेत ते योग्यच आहे. पण विमान जमिनीच्या जवळ असताना विमानाची सावली दिसते तसंच इथेही होत असावं.

अदिती

रम्या's picture

30 Jun 2010 - 1:23 pm | रम्या

आपलीच सावली इंद्रवज्रामध्ये (म्हणजे ढगांवर) पडणे काही पटत नाही.जर प्रकाशाचा स्त्रोत एखाद्या वस्तू पेक्षा मोठा असेल तर त्यावस्तूची सावली फार अंतरापर्यंत पडत नाही. अंतरानुसार ही सावली हळू हळू लहान होत जाते आणि नंतर पुर्णपणे नाहीशी होते. म्हणूनच उंच उडणारे पक्षी, आकाशातील विमाने यांची सावली जमिनीवर पडत नाही. विमान कमी उंचीवर असेल तर मात्र त्याची सावली अनुभवता येते. इतकच काय तिसर्‍या चौथ्या मजल्याचा गच्चीवर कठ्ड्याचा बाजूला उभे असल्यास खाली जमीनीवर आपली सावली दिसत नाही.

इंद्रवज्रामध्ये दिसणारी कदाचित सावली नसावी, प्रकाशाचा दुसरा काही तरी खेळ असावा.

आम्ही येथे पडीक असतो!