एथिकल हॅकींग म्हणजे काय?
हॅकींग म्हणजे पानावर प्रवेश निषीद्ध असलेल्या ठिकाणी वावर करणे ह्याला हॅकींग म्हणतात एवढे समजते. संगणक शास्त्रातील ज्ञानाचा उपयोग
करुन पासवर्ड शोधुन काढणे हे पण हॅकींग मधे मोडत असावे.
पण हे एथिकल हॅकींग म्हणजे काय?
बर्याचदा हॅकर हा शब्द वाईट अर्थाने वापरला जातो. हॅकींगसाठी संगणक आणि ऑपरेटींग सिस्टीम (मराठी शब्द?) तसेच नेटवर्कींग प्रोटॉकॉल्स अथवा एखाद्या अॅप्लिकेशनची इंत्यंभूत माहीती लागते.. प्रावीण्य लागते. बहुतेक वेळा या ज्ञानाचा वापर वाईट हेतूने करतात (जसे पासवर्ड शोधून बँकेच्या खात्यात ढवळाढवळ करणे इ. इ. इ.) पण याच ज्ञानाचा वापर त्याच बँकेने आपली सुरक्षीतता वाढवण्यास केला तर त्याला म्हणतात एथिकल हॅकिंग.
म्हणतात ना चोराच्या वाटा चोराला ठाऊक, तसेच एक हॅकर कसा सुरक्षा व्यवस्थेवर घाला घालेल हे दुसरा हॅकरच सांगू शकेल. बर्याचश्या मोठ्या कंपन्यांमध्ये संगणकाची सुरक्षा वाढवायला आणि त्याची काळजी घ्यायला असे हॅकर जमातीतले लोकच कामावर ठेवले असतात.
हे एथिकल हॅकर बर्याचदा हॅकिंग होत असताना हॅकरचाच संगणक हॅक करून त्या हॅकरचा माग काढतात आणि त्याला कायद्याच्या स्वाधीन करायला मदत करतात. अनेक वेळा अशा हॅकरवरचे आरोप सिद्ध करण्यासाठी ज्या प्रकारच्या तज्ञांची गरज लागते तेव्हाही हे एथिकल हॅकर (यालाच व्हाईट हॅट हॅकर असाही शब्द प्रचलीत आहे) कायदेतज्ञांना आणि पोलिसांना मदत करतात.
मी अशा बर्याच एथिकल हॅकर्सना ओळखतो. त्यांच्याकडून हॅकींगच्या गमती ऐकण्या सारख्या असतात....
महत्वाचा प्रश्न असा की त्यातील तांत्रीक बाबी समजवताना माझ्या तोंडाला फेस येईलच पण ज्यांना संगणकातील तांत्रीक बाबी समजत नाही त्यांच्याही तोंडाला फेस येईल. (त्यापेक्षा तोंडाला कॉकटेल आलेले केव्हाही बरे). बघा चालेल का? चालणार असेल तर एखाद्या वेगळ्या धाग्यात टाकता येतील..
- नाटक्या
(अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)
हा भारतीय मुलगा एक हॅकर होता आणि त्याने बर्याच उपद्व्यापांनंतर एक पुस्तकच लिहिले 'दि अनॉफिशिअल गाईड टु एथिकल हॅकिंग'!
हे पुस्तक प्रसिद्ध आहे. मी वरवर चाळले आहे पण मला स्वतःला सॉफ्टवेअर मध्ये एवढी गती नसल्याने फार पुढे गेलो नाही.
अंकित फादिया इथिकल शिकला असला तरी इंटेलीजंट आहे का नाही माहित नाही :)
त्याने लिहिलेल्या पुस्तकातले अनेक उतारे हे एका पाकिस्तानी हॅकरच्या हॅकिंग कोर्स बुक मधुन जसेच्या तसे उचलेले होते. त्याच्या पुस्तकातले उतारे आणी त्यानी ज्या पुस्तकातुन ते उचलले त्यातले उतारे मध्ये एका ऑर्कुट कम्युनिटीवर स्कॅन करुन टाकण्यात आलेले होते. जर लिंक मिळाली तर पुरवतोच. तोवर हि माहिती वाचायला अंकित फॅन्सना आवडेल ;)
बाकी सध्या फिशिंग, इ-मेल हॅकींग हे लहान मुलांचे खेळ बनत चालले आहेत. एक तास मनापासुन शिकायची तयारी असेल तर संगणकाचे आणि आंतरजालाचे जुजबी ज्ञान असलेले कोणीही फिशींग का होईना आरामात शिकु शकेल. (येथे फिशिंग शिकणे अपेक्षीत आहे, फिशींग पेजेस बनवणे नाही)
मिसळपाव व्यवस्थापनाची परवानगी असल्यास थोडी अधिक माहिती अथवा शिकवणी देण्यास आवडेल ;) अर्थात नाटक्या गुर्जींयेवढी आमची पात्रता आणी तयारी नाही, पण जुजबी ज्ञान पुरवायला नक्कीच आवडेल.
हो ना. त्यांना निषिद्ध पान कोणते अपेक्षित आहे ते कळणे मुष्किल आहे. त्यात परत पिवळे का हिरवे हे ठरवणे अजून अवघड.
बाकी हा परा पोचलेला हॅकर दिसतो आहे. :)
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे
Phoenix
याची दोन-तीन पुस्तके वाचली.. त्यात बरेचसे हॅकींग विन्डोज ९८ वरती होते.. विन्डोज ९८ ही सुरक्षिततेच्या दृष्टीने टुक्कार होती हे सांगायला कुणा अंकित फाडियाची गरज नाही.. उतारे दुसरीकडून उचलले आहेत हे मी इतरत्रही वाचले होते..
त्याचे दोन सेमिनार्स अटेंड केले होते.. त्यातही त्याने अगदी प्राथमिक गोष्टी (उदा. लिनक्स वरून फ्रॉम फिल्ड वापरून आपण कुणाच्याही नावे इमेल कसा पाठवू शकतो, काही कोड टाईप केल्याने मोबाईलमधली माहिती कशी मिळते) अशाच गोष्टी दाखवल्या होत्या.. आणखी शंका विचारल्यास पुस्तक विकत घ्या एवढेच उत्तर तो देत होता..
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
मिसळपाव व्यवस्थापनाची परवानगी असल्यास थोडी अधिक माहिती अथवा शिकवणी देण्यास आवडेल
व्यवस्थापनाचं माहित नाही... मला तरी आवडेल वाचायला. मागे आम्ही एक तास देऊ केला होता आमच्या अमूल्य वेळातून. तुम्ही फारसे शिकवले नाही. फक्त, लवकरच एक पुस्तक लिहिणार आहे त्यात वाच असेच म्हणत होता सारखे.
हे पुस्तक कोणाकडे पीडीएफ स्वरुपात आहे का? असेल तर कृपया मला ई-मेल पत्त्यावर sonerisagar@gmail.com पाठवा अथवा इथेच दुवा दिलात तरी चालेन. मी उतरवून घेईन...
प्रतिक्रिया
16 Jun 2010 - 10:47 pm | नाटक्या

17 Jun 2010 - 1:24 am | संदीप चित्रे
संगणक प्रणाली !
एथिकल हॅकिंगबद्दल थोडक्यात पण महत्वाची माहिती दिलीस रे नाटक्या. मी इथे थोडी माहिती टंकायला आलो पण तुझा प्रतिसाद बघून काम वाचले :)
17 Jun 2010 - 1:29 am | नाटक्या
संदीप,
शब्द माहीती होता पण आयत्या वेळेला म्हणतात ना तसले काहीसे झाले. तुझ्या कडे आणखी काही माहीती असल्यास टाक, नक्कीच मा़झ्या माहीतीत भर पडेल...
- नाटक्या
(अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)
17 Jun 2010 - 2:19 am | भडकमकर मास्तर
त्यांच्याकडून हॅकींगच्या गमती ऐकण्या सारख्या असतात....
अहो हे नुसतं वाक्य लिहून जळवू नका .. एखादी तरी लिहा की...
(उत्सुक) भडकमकर मास्तर
17 Jun 2010 - 2:33 am | चतुरंग
नुसतं एक वाक्य टाकून गंमत बघत बसताय होय?
सांगा, सांगा किस्से सांगा!
(किश्श्यातला)चतुरंग
17 Jun 2010 - 3:42 am | नाटक्या
महत्वाचा प्रश्न असा की त्यातील तांत्रीक बाबी समजवताना माझ्या तोंडाला फेस येईलच पण ज्यांना संगणकातील तांत्रीक बाबी समजत नाही त्यांच्याही तोंडाला फेस येईल. (त्यापेक्षा तोंडाला कॉकटेल आलेले केव्हाही बरे). बघा चालेल का? चालणार असेल तर एखाद्या वेगळ्या धाग्यात टाकता येतील..
- नाटक्या
(अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)
17 Jun 2010 - 10:47 am | आनंदयात्री
चालेल चालेल !!
तुम्ही येउद्या फक्त !!
-
आंद्या
17 Jun 2010 - 11:58 am | नंदन
सहमत आहे. किस्से (आणि कॉकटेल्सही) येऊ द्या अजून :)
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
17 Jun 2010 - 12:13 pm | वेताळ
चार कॉकटेल मध्येच आम्हाला विसरु नका. कॉकटेलचे प्रकार बरेच आहेत अजुन.
वेताळ
16 Jun 2010 - 10:47 pm | शिल्पा ब
आणी हे हॅकींग कसे करता येते?
(जिज्ञासू) शिल्पा
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
16 Jun 2010 - 11:11 pm | चतुरंग
हा भारतीय मुलगा एक हॅकर होता आणि त्याने बर्याच उपद्व्यापांनंतर एक पुस्तकच लिहिले 'दि अनॉफिशिअल गाईड टु एथिकल हॅकिंग'!
हे पुस्तक प्रसिद्ध आहे. मी वरवर चाळले आहे पण मला स्वतःला सॉफ्टवेअर मध्ये एवढी गती नसल्याने फार पुढे गेलो नाही.
चतुरंग
16 Jun 2010 - 11:28 pm | टारझन
अंकित फादिया चं लै नाव ऐकलं होतं खरं इंजिनियरींगला असतांना , इंटेलिजंट आहे फार स्साला !
हल्ली काय कारतो कुणास ठाऊक ...
बाकी मिसळभोक्त्याशी सहमत
- (मिथिकल हॅकर) टारोबा ट्रॅकर
17 Jun 2010 - 1:07 pm | परिकथेतील राजकुमार
अंकित फादिया इथिकल शिकला असला तरी इंटेलीजंट आहे का नाही माहित नाही :)
त्याने लिहिलेल्या पुस्तकातले अनेक उतारे हे एका पाकिस्तानी हॅकरच्या हॅकिंग कोर्स बुक मधुन जसेच्या तसे उचलेले होते. त्याच्या पुस्तकातले उतारे आणी त्यानी ज्या पुस्तकातुन ते उचलले त्यातले उतारे मध्ये एका ऑर्कुट कम्युनिटीवर स्कॅन करुन टाकण्यात आलेले होते. जर लिंक मिळाली तर पुरवतोच. तोवर हि माहिती वाचायला अंकित फॅन्सना आवडेल ;)
अंकितचे रहस्य
बाकी सध्या फिशिंग, इ-मेल हॅकींग हे लहान मुलांचे खेळ बनत चालले आहेत. एक तास मनापासुन शिकायची तयारी असेल तर संगणकाचे आणि आंतरजालाचे जुजबी ज्ञान असलेले कोणीही फिशींग का होईना आरामात शिकु शकेल. (येथे फिशिंग शिकणे अपेक्षीत आहे, फिशींग पेजेस बनवणे नाही)
मिसळपाव व्यवस्थापनाची परवानगी असल्यास थोडी अधिक माहिती अथवा शिकवणी देण्यास आवडेल ;) अर्थात नाटक्या गुर्जींयेवढी आमची पात्रता आणी तयारी नाही, पण जुजबी ज्ञान पुरवायला नक्कीच आवडेल.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
17 Jun 2010 - 1:12 pm | टुकुल
तुझ्याच प्रतिसादाची वाट पाहत होतो..
पण मास्तर कुठल हॅकिंग म्हणतायेत ते काही कळत नाही.
--टुकुल
17 Jun 2010 - 1:19 pm | परिकथेतील राजकुमार
त्यांचे हॅकींग समजण्यासाठी लागणारे बौद्धीकबळ फक्त वात्स्यायनाकडे असावे असे वाटते ;)
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
17 Jun 2010 - 2:18 pm | llपुण्याचे पेशवेll
हो ना. त्यांना निषिद्ध पान कोणते अपेक्षित आहे ते कळणे मुष्किल आहे. त्यात परत पिवळे का हिरवे हे ठरवणे अजून अवघड.
बाकी हा परा पोचलेला हॅकर दिसतो आहे. :)
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे
Phoenix
17 Jun 2010 - 4:06 pm | मस्त कलंदर
+१ सहमत..
याची दोन-तीन पुस्तके वाचली.. त्यात बरेचसे हॅकींग विन्डोज ९८ वरती होते.. विन्डोज ९८ ही सुरक्षिततेच्या दृष्टीने टुक्कार होती हे सांगायला कुणा अंकित फाडियाची गरज नाही.. उतारे दुसरीकडून उचलले आहेत हे मी इतरत्रही वाचले होते..
त्याचे दोन सेमिनार्स अटेंड केले होते.. त्यातही त्याने अगदी प्राथमिक गोष्टी (उदा. लिनक्स वरून फ्रॉम फिल्ड वापरून आपण कुणाच्याही नावे इमेल कसा पाठवू शकतो, काही कोड टाईप केल्याने मोबाईलमधली माहिती कशी मिळते) अशाच गोष्टी दाखवल्या होत्या.. आणखी शंका विचारल्यास पुस्तक विकत घ्या एवढेच उत्तर तो देत होता..
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
17 Jun 2010 - 4:12 pm | सहज
>आणखी शंका विचारल्यास पुस्तक विकत घ्या एवढेच उत्तर तो देत होता..
हे असेच कोणतरी म्हणल्याचे कुठेतरी इथेच वाचल्यासारखे वाटतेय :P
पहले इस्तमाल करे फिर विश्वास करे!!
17 Jun 2010 - 4:27 pm | प्रमोद देव
हे असेच कोणतरी म्हणल्याचे कुठेतरी इथेच वाचल्यासारखे वाटतेय
केला इषारा जाता जाता.
घाटपांडेकाका जपून बरं का. हल्ली हे सहजराव लै फार्मात हैती.
17 Jun 2010 - 4:43 pm | बिपिन कार्यकर्ते
मिसळपाव व्यवस्थापनाची परवानगी असल्यास थोडी अधिक माहिती अथवा शिकवणी देण्यास आवडेल
व्यवस्थापनाचं माहित नाही... मला तरी आवडेल वाचायला. मागे आम्ही एक तास देऊ केला होता आमच्या अमूल्य वेळातून. तुम्ही फारसे शिकवले नाही. फक्त, लवकरच एक पुस्तक लिहिणार आहे त्यात वाच असेच म्हणत होता सारखे.
बिपिन कार्यकर्ते
17 Jun 2010 - 4:45 pm | अवलिया
अरे मी तर दिवसभर बसलो होतो.. पण काही बोलतच नव्हता ****
--अवलिया
17 Jun 2010 - 2:28 pm | मितभाषी
बाकी मिसळभोक्त्याशी सहमत
>>>>>
टार्या तुला मिभो कुठे दिसला?
मला तरी नाही दिसला.
उडाला वाटते.
असो!.
17 Jun 2010 - 3:16 am | भाग्यश्री
हो.. अंकित फादियाचे सेमिनार्स असायचे आमच्या कॉलेजात..
तेव्हा त्याने सेल फोन कसा हॅक करायचा सांगितले होते ..
नाटक्या यांनी चांगली माहिती दिली आहे.
17 Jun 2010 - 10:23 am | सागर
हे पुस्तक कोणाकडे पीडीएफ स्वरुपात आहे का? असेल तर कृपया मला ई-मेल पत्त्यावर sonerisagar@gmail.com पाठवा अथवा इथेच दुवा दिलात तरी चालेन. मी उतरवून घेईन...
धन्यवाद,
सागर
16 Jun 2010 - 11:16 pm | विनायक प्रभू
हार्डवेअर हॅकींग पण असते?
16 Jun 2010 - 11:23 pm | चतुरंग
हार्डवेअर हॅकिंगच आहे.
इस्रायलची 'मोसाद' ही उच्च दर्जाच्या हार्डवेअर हॅकिंगसाठी प्रसिद्ध आहे.
चतुरंग
16 Jun 2010 - 11:41 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
आपल्या प्रतिसादामुळे श्री. बिपिन कार्यकर्ते आठवले.
(पळा आता!)
अदिती
16 Jun 2010 - 11:26 pm | विनायक प्रभू
चांगले सायकिअॅट्रीस्ट पण एथिकल हॅकर म्हणायला हरकत नाही.
16 Jun 2010 - 11:26 pm | विनायक पाचलग
गाडी मार्गावर आली ...
विनायक पाचलग
वाँट टु टॉक
17 Jun 2010 - 10:45 am | यशोधरा
>:)
16 Jun 2010 - 11:27 pm | शुचि
:)
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
16 Jun 2010 - 11:29 pm | चतुरंग
लिहा की मग 'दि अनऑफीशिअल गाईड टु सायकॉलॉजिकल हॅकिंग!' ;)
चतुरंग
16 Jun 2010 - 11:34 pm | नाटक्या
क्रिप्टीक की काय म्हणतात ते हेच का हो? तरीच म्हटलं मास्तरांनी इतका सरळ प्रश्न कसा विचारला!!!!
- नाटक्या
(अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)
16 Jun 2010 - 11:35 pm | प्रियाली
क्रिप्टिक लेखन हॅक करून त्याचा अर्थ स्पष्ट करणारे आहे का इथे कोणी?
16 Jun 2010 - 11:52 pm | अभिज्ञ
क्रिप्टिक लेखन हॅक करून त्याचा अर्थ स्पष्ट करणारे आहे का इथे कोणी?.
हा हा हा.
बेक्कार टाकलात.
:)
अभिज्ञ.
16 Jun 2010 - 11:54 pm | इनोबा म्हणे
केसू'ना कॉन्टॅक्ट करा. ते बर्याच गोष्टींचा भांडाफोड करतात म्हणे.
17 Jun 2010 - 7:40 am | सहज
मास्तरांच्या लेखनशैलीचे धोरण सांगणारे प्रकटन आवडले. :-)
मास्तरांनी केलेली सर्व्हीस अजुन कोणी परतावुन लावलेली दिसत नाही आहे. त्यामुळे मास्तर त्यांच्या पद्धतीचा खेळ करायला मोकळे आहेत असे समजायचे काय?
17 Jun 2010 - 10:20 am | विनायक प्रभू
गॉट ईट
17 Jun 2010 - 2:00 pm | अवलिया
छान !
दुसरे काय बोलणार?
मास्तरच्या ऐवजी इतर कुणी सदर काकु टाकला असता तर .....
असो.
चालायचेच नाही का?
--अवलिया
17 Jun 2010 - 2:12 pm | II विकास II
सदर प्रतिसाद संपादित करून खालचे प्रतिसाद उडवण्यात येत आहेत. सदर सदस्याने कधी ना कधी तरी विधायक काम करावे. नेहमीच काड्या कशाला?
- संपादक
17 Jun 2010 - 2:33 pm | मितभाषी
दंगेखोर मंडळींना ताबडतोब बाहेर हाकला. >:)