गाभा:
राम राम मंडळी
सध्या आंब्याचा सीझन चालु आहे. बाजारात अनेक त-हेचे आंबे दिसत आहेत. काही आंबे पाट्यांमधे असतात तर काही गाड्यांवर असतात. दुकानात मांडलेले असतात तर काही रस्त्यावर. काही पिकलेले काही कच्चे. काही गोड तर काही आंबटतुरट. काही चोखायचे तर काही कापायचे. काही झडप घालुन घेण्यासारखे तर काही हळुवार कोमलतेने हाताळायचे. एक ना अनेक हजारो प्रकार. काहींना हापुस म्हणतात, तर काहींना पायरी. काही तोतापुरी तर काही केशर. काही गावठी तर काही संकरित. आकारही किती विविध असतात. काही मुठीत बसतात तर काही दोन्ही हातात पण मावत नाहीत. आंब्याचा बाजार बघतांना कळतच नाही कोणता घ्यावा ते?
मंडळी सांगा बरे जरा तुमच्यापैकी कुणी जाणकार असेल तर आंबा कसा निवडावा? कोणत्या वेळी कोणता आंबा चांगला फलदायी असतो ? वगैरे वगैरे..
आपलाच
(आंबाप्रेमी) नाना
प्रतिक्रिया
14 Jun 2010 - 3:58 pm | योगी९००
पावसाळ्यात पण आजून आंबे मिळतात?
मला रत्नागिरीचा कलमी हापूस खुप आवडतो..त्या आंब्याचा शेपच मला खुप आवडतो..खाण्यापेक्षा हाताळायलाही चांगलाच वाटतो..
तसे बाकी बरेच आंबे मी खाल्लेत..देवगड, वलसाड..पण रत्नागिरीपुढे सगळेच फिके वाटतात..वलसाड आंबे मुंबईत खुप प्रसिद्ध आहेत...आपल्या मराठी आंब्यापेक्षा हे गुजराती आंबेच लोकांना जास्त आवडतात असे दिसते..
अवांतर :
परदेशात पाकिस्तानी आंबे पण दिसतात...पण.खुपच मोठ्ठे असतात...त्यामुळे कधी try नाही केले.. बाकी इतर देशांच्या आंब्याविषयी काही कल्पना नाही.
खादाडमाऊ
14 Jun 2010 - 4:14 pm | अवलिया
अजुन पाउस सुरु झालेला नाही. परंतु वळवाच्या सरी कोसळल्यामुळे आंब्याचे भाव (किंमत) कमी झालेली आहे, जी माझ्यासारख्या अल्प उत्पन्न (केवळ भारतीय रुपयांमधे, भारतीय लोकांना सेवा देवुन मिळणारे उत्पन्न) असलेल्यांना आता परवडु शकते. त्यामुळे अधिक माहितीसाठी चर्चा प्रस्ताव टाकला :)
बाकी गुजराती आंब्याविषयीचे निरिक्षण "रोचक" आहे.
--अवलिया
15 Jun 2010 - 2:20 pm | भारद्वाज
कोण म्हणतं असं? काहीतरीच.....
14 Jun 2010 - 4:08 pm | प्रकाश घाटपांडे
आंब्याचा आकार- हाताळता येईल एवढाच असावा.
आंब्याची किंमत- आपल्या खिशाला परवडेल एवढीच असावी
आंब्याची चव- चोखल्यानंतर दीर्घकाळ रेंगाळणारी आंबटगोड असावी
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
14 Jun 2010 - 4:17 pm | अवलिया
छान प्रतिसाद
--अवलिया
14 Jun 2010 - 4:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>आंब्याचा आकार- हाताळता येईल एवढाच असावा.
ऑ ? तुम्ही कोणत्या आंब्याबद्दल बोलताय ? ;)
-दिलीप बिरुटे
[चावट]
14 Jun 2010 - 4:23 pm | अवलिया
हेच हेच ते असले मिडलाईफ क्रायसिस असलेले संपादक साध्या सरळ वाक्यात चावट अर्थ शोधतात आणि माझे साधे, सरळ, सज्जन, भोळे लेख आणि प्रतिसाद खाडकन उडवतात.
निषेध !
--अवलिया
14 Jun 2010 - 4:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
एक्स्ट्रेमली सॉरी....!
-दिलीप बिरुटे
[खाली मान घालून उभा असलेला]
14 Jun 2010 - 4:29 pm | अवलिया
इटस ओके...!
--अवलिया
(संपादक दिलीपचा मित्र)
14 Jun 2010 - 4:29 pm | बिपिन कार्यकर्ते
[खाली मान घालून उभा असलेला]
कोपर्यात की बेंचवर? ;)
बिपिन कार्यकर्ते
14 Jun 2010 - 9:59 pm | टारझन
छाण चाल्लय हो बिपिन- बिरुटेंच @@
बाकी बिपीनराव , तुमचे मित्र संपादक काय म्हणतात ? ह्या प्रकारच्या धाग्यांना कंटाळुन त्यांनी आज झाडु बरा नाही फिरवला ? !!
- (अश्वत्थामा) टारझन
15 Jun 2010 - 1:07 am | शिल्पा ब
कोण रे ते संपादकांना त्रास देतंय? उडवा त्याची प्रतिक्रिया...
तुम्च चलु द्या हो...आमचेच भय संपत नाही आजकाल..
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
14 Jun 2010 - 4:36 pm | गणपा
वाटलच होतं हा नान्या असच म्हणणार की दोष तुमच्या नजरेत आहे.
म्हणुन मगाशी स्वसंपादित केलेली प्रतिक्रिया आता परत टाकत आहे. :D
नानबा आपली प्रतिभा अश्या फुटकळ काकु वर का घालवतोयस.
(स्वगतः साला हा नाना कधी कधी अगदी भारी लिहुन जातो आणि मध्येच कुठे पाणी वाहवत जाते कळत नाही.)
.
14 Jun 2010 - 4:39 pm | अवलिया
>>>वाटलच होतं हा नान्या असच म्हणणार की दोष तुमच्या नजरेत आहे.
अरेच्या तुम्ही तर ज्योतिषीच झाले की... ;)
>>>म्हणुन मगाशी स्वसंपादित केलेली प्रतिक्रिया आता परत टाकत आहे. Big Grin
धन्यु :)
>>>नानबा आपली प्रतिभा अश्या फुटकळ काकु वर का घालवतोयस.
अरेच्या मग मला काही माहित नसले तर मी ते विचारायचे पण नाही का ?
>>>(स्वगतः साला हा नाना कधी कधी अगदी भारी लिहुन जातो आणि मध्येच कुठे पाणी वाहवत जाते कळत नाही.)
स्वगत माझ्या संगणकावर नीट दिसले नाही रे... जरा जीमेलवर पाठव काय लिहिले ते.
--अवलिया
14 Jun 2010 - 4:55 pm | II विकास II
हेच हेच ते असले मिडलाईफ क्रायसिस असलेले संपादक साध्या सरळ वाक्यात चावट अर्थ शोधतात आणि माझे साधे, सरळ, सज्जन, भोळे लेख आणि प्रतिसाद खाडकन उडवतात.
>> श्री नाना, तुझे उडवलेली लेख आणि प्रतिक्रिया कुठे मिळतील वाचायला?
तो घोड्याचा लेख वाचायचा आहे.
14 Jun 2010 - 5:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>श्री नाना, तुझे उडवलेली लेख आणि प्रतिक्रिया कुठे मिळतील वाचायला?
नानाचे उडवलेले लेख आणि प्रतिसाद नाना एका नव्या संकेतस्थळावर टाकणार आहे . ज्या संकेतस्थळावर संपादक नसतील, जिथे नुसत्याच काड्या काड्या करायच्या आणि नुसत्याच काड्या काड्या असलेली सदस्य नावे असतील. अशा संकेतस्थळाच्या शोधात नाना आहे अशी अशी आमची नाडीपट्टी दाखवते आहे. :)
-दिलीप बिरुटे
14 Jun 2010 - 5:14 pm | II विकास II
म्हणजे ३ आय डी नक्की.
बाकी तुमच्या नाडीत नानाचे संकेतस्थळ कसे?
-----
ज्या दिवशी मराठी आंतरजाल संपादक मुक्त होईल, तो मराठी आंतरजालाचा सुदिन.
22 Jun 2010 - 5:08 pm | आनंद७३
:S म्हणजे नेमके काय ?
14 Jun 2010 - 4:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नाना, पावसाच्या दिवसात आंबे खाऊ नये असे म्हणतात. [हाल होतात] 'केसर’ आणि 'हापूस' रसासाठी. कापून खायचा तर 'तोतापरी' आणि 'निलम' असे माझे मत आहे. नाना, माझ्या आजोळी आजोबा आज्जी बरोबर मी गावठी शाक असलेली कैर्या काढायचो, जमा करायचो. त्या कैर्या आढीला ठेवल्या की त्या पीकलेल्या आंब्याची चव काय सांगू...! काळाबरोबर आजोबा आज्जी गेले आणि वार्या वावधनात मळ्यात असलेली आंब्याची झाडेही...:(
-दिलीप बिरुटे
14 Jun 2010 - 4:16 pm | अवलिया
दिलीपशेट
अजुन पावसाने जोर धरला नाही म्हणुन मजा करुन घेत आहे.
आजोळच्या आठवणींचा असाच एक कप्पा मनात जपुन ठेवला आहे. गेले ते दिन गेले हेच खरे...
--अवलिया
14 Jun 2010 - 4:20 pm | गणपा
.
14 Jun 2010 - 4:21 pm | अवलिया
..
14 Jun 2010 - 4:23 pm | सहज
गणपाशी सहमत
हा नान्याला म्हणे जर्मन भाषेत लिहून दिले होते कोणीतरी २ रुच्या नोटेवर - mangoes für das Leben. घेतले नाहीत. आता रडत असतो एका संस्थळावरुन दुसर्या संस्थळावर
14 Jun 2010 - 4:29 pm | आंबोळी
सहजराव ,
त्याच नोटेच्या मागे Saft frisch engen mangoes असेही लिहिले होते.
आंबोळी
14 Jun 2010 - 4:21 pm | महेश हतोळकर
..
14 Jun 2010 - 4:47 pm | II विकास II
चिरुन खायला बदामी आंबे आवडतात. हापुस आणि पायरी परवडत नसल्याने कधी तरी खातो.
घरी आंब्याची ४ झाडे आहेत. दरवर्षी २००० आंबे येतात.
मंडळी सांगा बरे जरा तुमच्यापैकी कुणी जाणकार असेल तर आंबा कसा निवडावा?
>> आपल्यला परवडणारा आंबा आणि आवडणारा घ्यावा.
कोणत्या वेळी कोणता आंबा चांगला फलदायी असतो ? वगैरे वगैरे..
>> जो आंबा मुड त्रुप्त करतो तो.
14 Jun 2010 - 4:58 pm | परिकथेतील राजकुमार
लेखन नेहेमीचेच भावोत्कट.
नान्याचा हातखंडा लिखाण वाचून मजा आली....स्साला... काय अस्सल लिखाण आहे. शब्द न् शब्द मोजून-मापून. बढिया.
पण नाना, काहीतरी अधिक भरीव लिहावेत अशी विनंती, पांचट लिखाण तुम्हाला सहज शक्य आहे, ते तुम्ही करीत आलाच आहात.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
15 Jun 2010 - 12:55 am | नंदन
असेच म्हणतो. मिभोंशी सहमत आहे.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
14 Jun 2010 - 4:59 pm | योगी९००
फार पुर्वी एक "खुले आम" नावाचा चित्रपट येऊन गेला..(http://www.imdb.com/title/tt0416890/)
RD चे संगीत आणि "आंब्या"वर चित्रपट म्हणून पहायला गेलो..फार निराशा झाली..पुर्ण चित्रपटात एकही फळ दाखवले गेले नव्हते..
तेव्हापासून या फळांच्या राजावर एखादा चित्रपट यावा अशी ईछ्छा बाळगून आहे.
खादाडमाऊ
14 Jun 2010 - 5:04 pm | परिकथेतील राजकुमार
हापूस चित्रपट येतोय ना लवकरच.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
14 Jun 2010 - 5:23 pm | गणपा
आरारारा रा रा
त्या मराठी माती वाल्यांनी पार मातीच करुन टाकली की राव.
शिणुमाची संमदी श्टोरीच सांगुन राह्यले ना भाव ते.
14 Jun 2010 - 5:12 pm | गणपा
हे घे रे/गं माऊ

अधिक माहीती
http://marathimovie.org/2010/05/upcoming-marathi-movie-hapus/
14 Jun 2010 - 9:21 pm | मिलिंद
आणी गानीबी ऐका रसाळ हापुसवानी
http://haapus.erosentertainment.com/marathi/index.html
आणी कोंटेस्ट बी ठेवलीय त्या हापुसवाल्यांनी --
तीबी बगा जमती का ती?
http://dvdstore.erosentertainment.com/contest/qa_box.asp?ID=44&Contest=H...
14 Jun 2010 - 5:01 pm | वेताळ
पण तुम्हाला आंबेच हाताळायचेच असतील तर बाजारात जा. त्यावर एकादा लेख टाका.
वादळात व पावसात पडलेले आंबे पिकताना डागलतात व
खाताना मध्येच एकादा मिठाचा खडा लागावा तसा खारट व आंबट लागतात.
तसे तुम्ही आंबटशौकिन आहातच. :D
वेताळ
14 Jun 2010 - 5:04 pm | अवलिया
>>>तुम्ही आंबटशौकिन आहातच.
माझ्यासारख्या सज्जन पापभीरु माणसाला नावे ठेवल्याबद्दल वेताळाचा निषेध.
या अमावस्येला मांत्रिक तुला बाटलीत बंद करेल असा शाप देतो
--अवलिया
14 Jun 2010 - 5:23 pm | वेताळ
आंबटशौकिन ह्या शब्दाचा अर्थ ज्याला आंबट रस आवडतो,आंबटरसाचा शौक असणारा असा घ्यावा. ;)
बाटली मला तरी रस नाही :D
वेताळ
14 Jun 2010 - 6:15 pm | अवलिया
वोके... :)
--अवलिया
14 Jun 2010 - 6:48 pm | वाटाड्या...
तोतापुरी : अगदीच तोता वाल्यांनी खावा...
हापुसः राजा लोकांनी खावा, महाराजा.
रायवळ/गावठी: गावची चव हवी असलेल्यांनी लोकांनी खावा...
आता आंब्याच्या आकारावरुन..
तोतापुरी: भंगार
हापुसः कसा गरगरीत..बघता क्षणीच चव घेऊन पहावा असा...
रायवळ/गावठी: गोट्यांमधला बिर्री प्रकारची गोटी कशी असते तसाच प्रकार (वेळेला केळं) तसा हा आंबा..
बाकी हातात बसतो का नाहे हे असलं बघु नये. वाटलं की घेऊन टाकावं. संकरीत आंबा म्हटलं अगदीच एखाद्या शेतकी शास्त्रज्ञाच्या प्रयोगशाळेत गेल्या सारखं वाटतं.
बाकी नाना, आंबा चोखुन खाण्यात जी मजा आहे ती कापुन खाण्यात नाही....तोंड कसं रंगलं पाहीजे. २ दिवस हाता-तोंडाचा वास नाय गेला पायजे. नंतर जमवायच्या त्या फक्त कोया...आणि त्या कोयांची फक्त लगोरी खेळायची....
(एका वेळेला पाटी पाटी पायरी हादडलेला)
- वाटाड्या...
14 Jun 2010 - 6:50 pm | अवलिया
ज ब रा रे वाटाड्या ...
खरोखर नावाला जागलास तु !!! :)
--अवलिया
15 Jun 2010 - 5:26 pm | मितभाषी
वाटाड्याषी सहमत. :D
14 Jun 2010 - 6:59 pm | पाषाणभेद
आम्ही येथे आंबे निवडायला मदत केली होती तर लोक बोलतात की आम्ही वंगाळ बोलतो.
ठिक आहे. आयडी आयडी चा परिणाम दुसरं काय?
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
14 Jun 2010 - 11:47 pm | विनायक प्रभू
स्।आंआट
15 Jun 2010 - 4:20 pm | II विकास II
नाना, आंबे निवडुन झाले की सांग खायला येउ.
15 Jun 2010 - 6:08 pm | jaypal
आणि सर्व प्रतिसाद वाचले. तरी पण राहववत नाही म्हणुन सांगतो.
आंबा कोणताही असुद्या, तो पाडावर(झाडावर) पिकलेला असावा. असा पाडाचा आंबा खायला मिळण म्हणजे स्वर्ग सुख ब्रका?
आण्णा (जगदिश खेबुडकर ) काय म्हणतात तेवढ ऐकाच ;-)
http://www.dhoomley.com/meemarathi/Pinjra/Naka%20Todu%20Pavan%20Jara%20Thamba.htm
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
15 Jun 2010 - 11:05 pm | शुचि
सुगंध, रूप, रंग, नेत्रसुख यात उजवं फळ घ्यावं.
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
18 Jun 2010 - 12:46 pm | सातबारा
हापुस म्हणजे हेमामालीनीचा चेहरा तर केशर म्हणजे ईशा देओलचा !
(आपली पसंती मात्र केशरला)
---------------------
हे शेतकर्यांचे राज्य व्हावे.
18 Jun 2010 - 4:48 pm | अविनाशकुलकर्णी
तोतापुरि मस्त
4 Aug 2014 - 3:02 pm | प्रसाद गोडबोले
:)
"चहा कसा करावा "च्या कोणत्यातरी प्रतिसादात ह्याची लिन्क सापडली :)
4 Aug 2014 - 3:17 pm | टवाळ कार्टा
आयला...फटाका आहे एकदम ;)