हल्ली

तिमा's picture
तिमा in काथ्याकूट
10 Jun 2010 - 10:38 am
गाभा: 

हल्ली मिसळपाव खायला आलो की जुने दिवस आठवतात. झणझणीत, तोंडाला पाणी सुटणार्‍या किती डिशेस खाल्या त्याची आठवण येते.
हली मिसळ खाताना बर्‍याचवेळा खडा लागून रसभंग होतो. एक चमचमीत डिश खाऊन 'रिपीट' ऑर्डर द्यावी तर पाणी वाढवलेली डिश समोर येते.
कधीकधी डिश खूप आवडलेली असते पण ती खात असतानाच कुठूनतरी पारंबीला लोंबकाळून खराखुरा टारझन येतो आणि काय होताय हे कळायच्या आत आपल्या समोरची डिश घेऊन गायब होतो.
आजुबाजूची अनेक गिर्‍हाईके एकाच डिशची फर्माईश करत आहेत म्हणून तीच मागवावी तर ती इतकी सपक निघते की आपली टेस्ट बिघडली आहे की पब्लिकची, असे वाटायला लागते. असो, "म्हातारपण वाईट" हेच खरे!!!

प्रतिक्रिया

शिल्पा ब's picture

10 Jun 2010 - 11:07 am | शिल्पा ब

बरं...आता याच गोष्टींवर पुन्हा दोन धागे निघाल्यावर आणि डोंगराएवढा काथ्याकुट झाल्यावर आम्ही नेमके काय करावे असे मत आहे?

(बाकी असेच 'आता कंटाळा आला' असे सांगणारे किती धागे निघताहेत काय माहिती !!)

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

तिमा's picture

10 Jun 2010 - 11:19 am | तिमा

धन्यवाद.दुर्लक्ष करावे, अनुल्लेखाने मारावे.

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

तुमच्यामते पाणी जास्त घातल्याने हल्ली रश्श्याला "पाण्चटपणा" आलेला आहे. हॉलीवुडच्या मिरच्यांमुळे चव येईल असे वाटले होते. पण असो. आजकाल बाकरवडीसुध्दा बेचव वाटायला लागलीये.

चांदनी आयी ID उडाने. ., सुझे ना कोई मंजील.
नाना बेरके

शुचि's picture

10 Jun 2010 - 8:22 pm | शुचि

खडा बिडा माझ्या दाताखाली नाही बाई आला.
मला मिसळ पूर्वीहूनही जास्त आवडू लागलेय. मस्त लागते लिंबू पिळून.

जसे स्वभावाचे नमुने कळू लागले तशी चंद्राच्या वाढत्या कलेप्रमाणे मजा वाढू लागली. प्रत्येकाचा एक स्वभाव आहे, सात्विक, राजसिक, तामसी , स्वच्छंद, मस्तमौला, कलंदर, आनंदी.... रसिक साहित्यीक मंडळी आहेत. एकमेकांच्या साहित्यीक कोपरखळ्या, चिमटे सगळं काही चाललेलं असतं. पण कोणाचा तोल सुटलेला क्वचितच पाहीलाय (हो पाहीलाय :( ) .... पोच ठेऊन, मान राखून पण छान शालजोडीतले ठेऊन देतात.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

प्रियाली's picture

10 Jun 2010 - 9:01 pm | प्रियाली

जसे स्वभावाचे नमुने कळू लागले तशी चंद्राच्या वाढत्या कलेप्रमाणे मजा वाढू लागली. प्रत्येकाचा एक स्वभाव आहे, सात्विक, राजसिक, तामसी , स्वच्छंद, मस्तमौला, कलंदर, आनंदी.... रसिक साहित्यीक मंडळी आहेत. एकमेकांच्या साहित्यीक कोपरखळ्या, चिमटे सगळं काही चाललेलं असतं. पण कोणाचा तोल सुटलेला क्वचितच पाहीलाय (हो पाहीलाय ) .... पोच ठेऊन, मान राखून पण छान शालजोडीतले ठेऊन देतात.

पालथ्या घड्यावरून पाणी?