भोपाल वायू दुर्घटना...न्याय

शिल्पा ब's picture
शिल्पा ब in काथ्याकूट
8 Jun 2010 - 6:13 am
गाभा: 

लोकसत्तात आताच http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=75758:2... हि बातमी वाचली...न्यायालयाने वॉरन अंडरसन याचा उल्लेखदेखील केला नाही असे लिहिले आहे...अशीच थट्टा होणार असेल तर लोक का म्हणून कायद्याने वागायला जातील? का त्यांना देशप्रेम वाटेल?

पेपर उघडला कि असंच काहीतरी वाचायला मिळतं... :-( नक्की कोणाचं, कुठे आणि काय चुकतंय हे कळायलाच मार्ग नाही..

प्रतिक्रिया

शुचि's picture

8 Jun 2010 - 6:30 am | शुचि

फरारी म्हणून घोषीत केलं असतं तर जनतेचा दबाव आला असता की अमेरीकेवर दडपण आणा जे शक्य नसेल राजकीय कारणांमुळे कदाचित.
पण न्यायव्यवस्थेला अर्थ काय जर तुम्ही नीर्भीड सत्य पुढे आणू शकत नसाल तर?

आणि लोकसत्तानी अधुरा न्याय काय म्हटलय? अधुरा हा काय मराठी शब्द आहे का? काय ही भाषांची सरमिसळ! X(

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

हुप्प्या's picture

8 Jun 2010 - 6:51 am | हुप्प्या

भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी
अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी

असे गाणे आहे आणि ते २०-२५ वर्षे जुने आहे. तेव्हा हा शब्द मराठीत तुरळक का होईना आढळतो असे वाटते.

बाकी तुमच्या विचारांशी सहमत.

चूकते फक्त जनतेचच,
५००/१००० रुपये घेउन हवे त्याला मत देताना मी स्वत किती तरी वेळा पाहिले आहे.

पुण्यात नाना पेठ मध्ये निवडणुकीच्या वेळेस कोणीतरी जाऊन बघा , कसा बाजार मांडलेला असतो.
तसे कोणत्याही ठिकाणी जावा हो, हेच बघायला मिळेल.
मत देताना कोनोही विचार करत नहीं. आणि नन्तर बोम्ब मारण्यात के अर्थ आहे.
ज्याला त्याला थोड़े फार पैसे मिळाले की कायदा , व्यवस्था धाब्यावर बसवायला निघतो.

जशी प्रजा तसा राजा.

निवडणुकीच्या अगोदर येऊन घरात किव्वा गल्ली मध्ये एखाद दुसरं काम करून दिलं कि लोक फार विचार न करता त्याच्या पदरात मत टाकून मोकळे होतात.
जिथे जनताच एवढी भ्रष्ट असेल तिथे हे नेते तरी काय करणार.
शिस्त, प्रामाणिकपणा, चिकट, संवेदाशिलता हि फक्त भारतात पुस्तकात सापडते.

हे असेल चालू राहणार

आणि जरा थोडा वेळ अजून वाट बघा.
२०१६-१८ पर्यंत अनु भत्त्या सुद्धा चालू झाल्या असतील.

(किती मरतील हो जर एखाद्या अणुभट्टी चा स्फोट झाला तर ?
झपाट्याने लोकसंख्या कमी होण्यासाठी केंद्र सरकारने केलेली हि योजना आहे )

जाऊदे त्याबद्दल बोलायलाच नको.

(मनमोहन सिंगांना एक संदेश,
जर तुम्ही अणु भत्त्यांच्या सुरक्षितते बाबत ठाम असाल तर तुम्ही तुमचे घर त्या भट्टीच्या जवळ बांधा.
तुम्ही नाही तर निदान तुमचे कुटुंब तरी तिथे राहू द्या)

नितिन थत्ते's picture

8 Jun 2010 - 9:41 am | नितिन थत्ते

इथे सरकार आणि राज्यकर्ते यांचा संबंध फक्त कोण सुटले याबाबत आहे. पण जे दोषी ठरले आहेत त्यांना कडक शिक्षा देणे आपण (५००-१००० रु घेऊन) निवडून न दिलेल्या कोर्टाच्या हातात होते. मोठा लॅप्स तिथे झाला आहे.

ते सगळे निर्दोष सुटले असते तर आपण सरकार आणि राज्यकर्ते यांना तपास नीट न केल्याबद्दल, मुद्दाम पळवाटा ठेवल्याबद्दल दोष देऊ शकलो असतो.

नितिन थत्ते

शिल्पा ब's picture

8 Jun 2010 - 9:55 am | शिल्पा ब

राजकारणी अन न्यायव्यवस्था यांचा संबंध असतो थत्तेकाका....काल का परवाचीच बातमी घ्या...शिवराज पाटलांनी अफजल गुरूची शिक्षा कशी काय लांबवली? कुठे वाचली काही आठवत नाही...लिंक मिळाली कि टाकेन..

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

अडाणि's picture

9 Jun 2010 - 5:37 am | अडाणि

बातमी बरोबर आहे पण दोन्हीचा संबंध काय?

शिवराज पाटलांनी जे केले ते न्याय व्यवस्थेचे काम झाल्यावर.. त्यात सरकारने दबाव आणून न्यायालयाचा निर्णय फिरवला असे नव्हे...

आज काल कुठेही खुट्ट वाजले कि राजकारणी आणी सरकारवर तोंड्सुख घेण्याची फॅशन आलि आहे.. (हा प्रतिसाद काटवे साहेबांसाठी आहे)

-
अफाट जगातील एक अडाणि.

मला तर बुवा कुठेही खुत्तू वाजल्याचा आवाज आला नाही , तुम्हाला कुठे आला ते कळवाल का ?
मला तर बुवा फक्त
१) मुंबई मधले बोंब स्फोटाचे आवाज ऐकू येतात आणि त्यावर आपल्या माननीय पंतप्रधानांनी धाडलेले निषेध (कडक, तीव्र कडक, अधिक कडक,) ऐकू येतात फक्त.
२) २०-२५ राज्यात धुमाकूळ घातलेल्या नक्षली वाल्यांचे पण कधी कधी गोळीबार ऐकू येतात.फक्त
३) अक्धी कधी एखाद दुसरी ट्रेन पालथी पडलेली ऐकू येत फक्त
३) हजारो लोकांना न्याय मिळाला नाही म्हणून त्यांचे रडणे ऐकू येते फक्त (भोपाल gas दुर्घटना)
४) गरिबांचे जीवाची किंमत २५ हजार रुपये अशी वृतपत्राण (news paper ) मधून आरडा ओरड ऐकू येते फक्त
५) तो नालायक andarson आरामात जगत आहे. त्या विरुद्ध इकडच्या सरकारने कधीतरी एकदा ब्र काढला होता . तो ब्र सुद्धा मला ऐकू आला होता. फक्त
६) बाकी तो २६/११ तमाशा पण ऐकू आला होता.
६) किती सांगू हो . काही लिमिट आहे का ?
७) तो कसाब आपणा भरलेल्या कारमधून आता हाय कोर्टात अपील करत आहे. म्हणजे अजून तरी १०-१२ वर्ष तो बिर्याणी चिकन तोडणार तुरुंगात. तो चिकनचे तुकडे तोडण्याचे आवाज सुद्धा मला ऐकू येतात.
तुम्हाला फक्त खुत्त ऐकायला येत.
(कृपया हलके घ्या : तुम्हाला कान (नाही डोके) तपासायची गरज आहे.

राजकारणी आणी सरकारवर तोंड्सुख घेण्याची फॅशन आलि आहे
हि फॅशन कधी पासून आली आणि कधी संपले हे काही समजेल का.
फॅशन म्हणजे ४-६ महिन्याचा दिखावा असतो माझ्या मते.

अवांतर : भोपाल मधील दुर्घटना ग्रस्त लोकांना एकदा प्रत्यक्ष भेट द्या. आणि त्यांना तुमचे हे फॅशन पुराण सांगा.

(जो पर्यंत एखादी परिस्थिती आपल्यावर येत नाही तो पर्यंत त्या परिस्थितीतले गांभीर्य समाजात नाही.)
देव न करो तुम्ही एखाद्या विमानातून प्रवास करत असाल आणि ते विमान विमानतळावर उतरून दिलं नाही कारण तिथून आता मनमोहन सिंग जाणार आहेत.
आणि तुमचे विमानाचे पेट्रोल संपले. मग काय कराल.

तेव्हा कदाचित ह्या परिस्थितीला फॅशन फॅशन म्हणण्याची तुमची हौस भागेल

अडाणि's picture

10 Jun 2010 - 6:01 am | अडाणि

मित्रा मनोज,
मि खुट्ट आवाज कुठे ऐकला माहितेय ? ह्याच धाग्यावर.... वर तु जो अकलेचा पसारा फुलवुन (नळावर) थयथयाट चालु केला होतास तेव्हाच... फालतु संध्यानंद टाईप अव्वाच्यासव्वा दावे करून डोक्याची मंडई करू नकोस.

एवढा जर राजकारण्यांचा त्रास होत असेल (आणि *डीत दम असेल) तर पुढच्या नगरसेवकाच्या निवड्णुकीला उभा रहा

-
अफाट जगातील एक अडाणि.

Manoj Katwe's picture

10 Jun 2010 - 10:38 am | Manoj Katwe

आपल्या नावातच अडाणी आहे तर मी आता काय बोलू.
मी केलेले दावे तुम्हाला संध्यानंद छाप वाटतात. धन्य आहे तुमची.

आणि आपले नाव बदलून दुसर्याला नावे ठेवण्याबद्दल सलाम.
(आपले खरे नाव पण कळवा जरा ,
कदाचित तुमच्याकडे मत मागायला यायला लागेल.)

वैष्णव जन तो तेने कहिये, जे पीड परायी जाने रे
आपल्याला काय कळणार म्हणा पीड परायी.

टारझन's picture

8 Jun 2010 - 8:41 am | टारझन

लोकसत्ता ला नावं ठेवायचं काम नाय , आमच्या कोदांचे लेख छापतो लोकसत्ता ... पेपराची क्वालिटी ज्याम उंचावली आहे .... उगाच फालतु आरोप नकोत.

- शिम्प ल

हेरंब's picture

8 Jun 2010 - 10:04 am | हेरंब

भोपाळची दुर्घटना ही 'मिथाईल आयसोसायनेट' या विषारी गॅसमुळे घडली. याला कंपनीचे व्यवस्थापन तर जबाबदार आहेच पण इतक्या मोठ्या प्रमाणावर हा गॅस साठवायला परवानगी देणारे सरकारचे फॅक्टरी इंन्स्पेक्टरही जबाबदार आहेत. तसेच हा गॅस पाण्याशी त्वरित संयोग पावून नष्ट होऊ शकतो हे ज्ञान सामान्य माणसांपर्यंत पोचवण्यास प्रशासन कमी पडले. नाकावर ओला, पाण्याने थबथबलेला टॉवेल धरला असता तर यातले कितीतरी जीव वाचले असते.
त्यामुळे फक्त कारखान्यातील लोकांना शिक्षा होऊन न्याय पुरा होणार नाही, तर सर्व संबंधित सरकारी अधिकार्‍यांनाही तितकीच शिक्षा व्हायला हवी.

शिल्पा ब's picture

8 Jun 2010 - 10:37 am | शिल्पा ब

अगदी...लोकांच्या जीवाला काही किमतच उरलेली नाही...सगळीकडे नुसता बेदरकारपणा.....दुर्लक्ष...
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

अरुंधती's picture

8 Jun 2010 - 10:01 pm | अरुंधती

जोवर जीव एवढे स्वस्त आहेत, लोकसंख्या तटतटून फुगलेली आहे, मरणारी माणसे सामान्य नागरिक आहेत, सत्ता - अधिकारावरच्या लोकांचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत, प्रशासन डुलक्या घेतंय, दंडाधिकारी आळस करत आहेत आणि न्यायव्यवस्था सर्व चिथड्या, चिंधड्या असहायतेने पाहात आहे......... तोवर हे असंच चालायचं!

आणि आम्ही अश्याच लोकांना पुन्हापुन्हा निवडून देणार बर्र का! अगदी आंधळेपणानं! मग आता उगाच रडून काय उपयोग?

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

नितिन थत्ते's picture

9 Jun 2010 - 7:39 am | नितिन थत्ते

वर अडाणि यांनी म्हटले आहे ते खरे आहे. उठसूट राजकारण्यांवर तोंडसूख.

>>न्यायव्यवस्था सर्व चिथड्या, चिंधड्या असहायतेने पाहात आहे.

आत्ता ज्या चिंधड्या उडाल्या आहेत त्या न्यायव्यवस्थेने स्वतः उडवल्या आहेत. दोषी ठरवल्यानंतर सौम्य शिक्षा देणे हे काम न्यायव्यवथेनेच केले आहे.

प्रशासन, दंडाधिकारी कुण्णाकुण्णाचा संबंध नाही इथे. दोन वर्षांची शिक्षा ठोठावलेल्या केशब महिंद्रालाही तत्काळ जामीनावर न्यायव्यवस्थेनेच सोडले आहे.

नितिन थत्ते

समंजस's picture

9 Jun 2010 - 11:43 am | समंजस

न्यायालयाच्या या निर्णया वर फक्त एकच शब्द योग्य आहे प्रतिक्रिया द्यायला, तो म्हणजे युसलेस.

छोटा डॉन's picture

9 Jun 2010 - 1:14 pm | छोटा डॉन

ह्यावरुन आम्हाला एक वाक्य आठवले
"न्यायालयात न्याय मिळतोच असे नाही पण न्यायालयात जे काही मिळते त्यालाच न्याय असे म्हणण्याची पद्धत आहे". असो.

------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !