गोल्ड इटीएफ- एक सोन्याचा म्युच्युअल फंड

शेखर जोग's picture
शेखर जोग in काथ्याकूट
5 Jun 2010 - 2:06 pm
गाभा: 

जगातल्या एकंदरीत सोन्याच्या गरजेतील २७% गरज किंवा मागणी ही एकट्या भारतात आहे. आणि आता सोन्यात पैसे गुंतवण्यासाठी एक वेगळा व सोपा मार्ग उपलब्ध आहे.

अनेक वर्षापासून सोन्यात पैसे गुंतवायचे असतील तर बाजारात जाऊन सोने खरेदी करायला लागायचे. गुंतवणूकीदारांची एक मागणी अनेक वर्षापासून होती की सोने खरेदी केल्याशिवाय सोन्यात पैसे गुंतवायला आले पाहिजेत म्हणजे सोन्याचा म्युच्युअल फंड हवा. ही गरज गोल्ड इटीएफनी भरून काढली.

गोल्ड इटीएफने सोने खरेदी करताना उदभवणारे अनेक प्रश्न जसे किंमतीतील फरक, सोन्याची शुध्दता, इन्शुरन्स, सोन्याच्या साठवणीच्या अडचणी व सोने सहजतेने विकता न येणे, या अडचणीवर मात केली आहे. याचा गुंतवणूकीदाराना काही फायदा झाला का? आपल्या सर्व गुंतवणूकीच्या खात्यात सोने असले पाहिजे की नाही? किती किंमत एकंदरीत गुंतवणूकीमधे असेल? व यात गुंतवणूकीसाठी काय धोरण असावे? या प्रश्नांच्या उत्तरांवर भारतातील गोल्ड इटीएफचे यश अवलंबून आहे. अमेरिका युके व स्वीझरलंड सारख्या देशात याला लोकप्रियता लाभलेली आहेच.

तर गोल्ड इटीएफ हा एक ओपन एंडेड म्युच्युअल फंड आहे. यात जे काही गुंतवणूकीदारानी पैसे गुंतवलेले असतील ते सर्व पैसे स्टॅन्डर्ड गोल्ड बुलियन(म्हणजे ०.९९५ शुध्दता असलेले सोने)मधे गुंतवले जातात. व गुंतवणूकीदाराच्या रक्कमेइतके युनिटस त्याला दिले जातात. व हे युनिट्स स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट होतात.
गोल्ड इटीएफ एक निशक्रिय गुंतवणूक आहे. व याची किंमत साधारण सोने बाजारात मिळणार्‍या सोन्याच्या भावाएवढी(स्पॉट मार्केटमधील सोन्याचा भाव) असण्याचा प्रयत्न केला जातो.
गुंतवणूकदार या गोल्डइटीएफचे युनिट्स शेअरमार्केटमधून विशेषतः एनएससीवरून शेअरब्रोकरमार्फत खरेदी करू शकतात.
उदा.: बेंच मार्क म्युच्युअल फंडच्या गोल्ड बीज या स्किममधे तुम्ही गुंतवलेल्या पैस्याचे युनिटस अशा तर्‍हेने दिले जातील की एका युनिटची किंमत साधारण एक ग्रॅम सोन्याएवढी असेल. म्हणजे जर एका गोल्ड बीजची किंमत एनएससीवर रु १८०१/- एवढी असेल तर १० युनिट्स तुम्हाला रुपये १८०१० या किंमतीला मिळतील.
अर्थात या युनिटची किंगत ठरवताना सोन्याच्या किंगतीतून म्युच्युअल फंडला आलेल्या खर्चाचा भाग वजा केलेला असतो. व तो साधारण १% ते २.५% एवढा असू शकतो.
बाजारात सध्या असलेल्या गोल्ड इटीएफची माहिती याप्रमाणे.
नाव, फंड, खर्चाचा भाग, युनिटची किंगत सोन्यात, इटीएफ सुरू कधी झाला.
१.गोल्डबीज, बेंचमार्क म्युच्युअल फंड, १%, साधारणतः १ ग्रॅम सोने, ७ मार्च २००८
२.युटीआय गोल्ड इटीएफ, युटीआय म्युच्युअल फंड, २.५%, साधारणतः १ ग्रॅम सोने, ३ जानेवारी २००७
३.कोटक म्युच्युअल गोल्ड ट्रेडेड फंड, २.५%, साधारणतः १ ग्रॅम सोने, २१ जुन २००७
४.रिलायन्स म्युच्युअल फंड- गोल्ड एक्सचेंच ट्रेडेड फंड, एक्सचेंच ट्रेडेड फंड, २.५%, साधारणतः १ ग्रॅम सोने, १ नोव्हेंबर २००७
५.क्वांटम गोल्ड फंड एक्सचेंच ट्रेडेड फंड, १.२५%, साधारणतः १/२ ग्रॅम सोने, २७ फेब्रुआरी २००८
६.एसबीआय म्युच्युअल फंड- एसबीआय गोल्ड इटीएफ, एक्सचेंच ट्रेडेड फंड, २.५%, साधारणतः १ ग्रॅम सोने, ३० मार्च २००९

क्रमशः

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

5 Jun 2010 - 6:23 pm | मदनबाण

छान माहिती... :)

मदनबाण.....

"Intelligence is what you use when you don't know what to do."
Jean Piaget

अगोदरच नावाजलेल्या बॅका व फंड कुठे गायब आहेत ते माहित नाही.
त्यापेक्षा सोने घेवुन ठेवणे हेच बरे.
वेताळ

बघा ब्वॉ सांभाळुन गुंतवणुक करा.