फुल्ल सपोर्ट!

गुंडोपंत's picture
गुंडोपंत in काथ्याकूट
4 Jun 2010 - 12:18 pm
गाभा: 

मंडळी मी विज्ञानवाद्यांना एक आक्रस्ताळे आव्हान दिले होते.
त्यातून चांगल्या गोष्टी उजेडात आल्या.

महत्त्वाचे म्हणजे शालेय मराठीसाठी खुप लोक काम करायला आनंदाने तयार आहेत.
अनेकांनी मला व्यनिद्वारे कळवले. काही जणांनी मदतीबद्दल तेथेच लिहिले आहे.

मुक्तसुनीत, ३_१४ विक्षिप्त अदिती ,पाषाणभेद, धनंजय, राजेश घासकडवी, भेन्डि बाजार, मन, शानबा५१२, जगताप, विनायक पाचलग, अक्षय पुर्णपात्रे, प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी मदतीचा हात पुढे केला आहे.

रामपुरी , llपुण्याचे पेशवेll यांनी आपला फुल्ल सपोर्ट असे सांगितले.
मी रुचा, अवलिया यांनी पाठींबा दिला आहे.
अरुंधती यांनी तत्सम काही मिळते आहे का याची चाचपणी केली.
प्रदीप साध्या सोप्या भाषेची आठवण करून दिली.
आप्पा यांनी तर आपली साईटच द्यायची तयारी दाखवली.

या सर्वांचे मनापासून आभार!
श्री. मिसळभोक्ता, टारझन यांनी धागा हलकाफुलका ठेवला त्याबद्दलही आभार!

मी आवाहन करतो की, 'ते आणि आपण' असा भेद बाजूला ठेउन
आपण सगळे मिळून शालेय विद्यार्थ्यांसाठी असलेले हे स्थळ कसे असावे यावर चर्चा करू या!

तुमच्या कल्पना येथे मांडा.
मला काही अगदी प्राथमिक असे प्रश्न पडले आहेत, ते देतो. तुमचेही प्रश्न द्या

  • यासाठी प्रकल्प कसा आखावा
  • काल मर्यादा आणि काल निश्चिती कशी असावी
  • किती पैसे नक्की लागतील?
  • पैसे उभे करण्याच्या कल्पना
  • सॉफ्टवेयर कोणते वापरावे? मायक्रोसॉफ्टला गळ घातली तर फुकट देतील का? कशी घालावी?
  • इतर पर्याय?
  • रूप कसे असावे?
  • जोडण्या कश्या द्याव्यात? देता येतील?

तसेच

  • शिक्षकांना प्रशिक्षण हा कार्यक्रम कसा आखावा?
  • प्रशिक्षणात काय द्यावे?
  • संगणक अभ्यासक्रम कसा असला पाहिजे?
  • अनेक विद्यार्थी एकत्र गणित स्पर्धा खेळू शकतील अशी मल्टीयुझर ऍनिमेशन बनण्यासाठी काय केले पाहिजे?
  • की निव्वळ आकडेमोड वापरावी?
  • विज्ञानाच्या संकल्पना कशा मांडाव्यात?
  • की आपण डोके न चालवता, मुलांनाच सांगू द्यावे काय हवे ते?
  • कळफलक कोणता वापरावा? इन्स्क्रीप्ट की गमभन? का?
  • त्याचे प्रशिक्षण कसे आयोजित करावे?
  • मुख्य म्हणजे शाळा शाळांपर्यंत कसे पोहोचावे?
  • प्रकल्प कायम चालू राहण्यासाठी काय केले पाहिजे?
  • विद्यार्थ्यांची सुरक्षा?

यापेक्षाही अजून खोलात जाऊन विचार करण्याची गरज आहे.
तुमच्या सर्व कल्पनांचे स्वागत आहे!

मिसळपावचे विश्वस्त 'लोकविकास' या प्रकल्पासाठी आपली शक्ती पणाला लावतील,
असे मला आनंदयात्रींनी आत्ताच कळवले आहे.
माझ्या आकस्ताळेपणाने जर कुणी त्या धाग्यात सहभागी झाले नसेल, तर त्यांनाही मी येथे येण्याचे आवाहन करतो.

आपला
विधायक गुंडोपंत

प्रतिक्रिया

गुंडोपंत's picture

4 Jun 2010 - 12:26 pm | गुंडोपंत

शालेय मुलांसाठी एक शालेय विषय समजावून सांगणारे मराठी स्थळ काढावे.

हे असे करता येईल -

  • - हे एक सर्व शाळांना सामील होता येईल असे पोर्टल असावे
  • - तेथे मुलांना आपले वाटावे म्हणून मराठी शाळा शाळांना त्यांचे पान द्यावे.
  • - तसे त्या शाळांना कळवावे
  • - या प्रकल्पाला वृत्तपत्रातून प्रसिद्धी द्यावी - ती नक्की मिळेलच
  • - शालेय मुलांना मराठीमध्ये, सहजतेने एकमेकांना जोडू शकतील असे वैज्ञानिक प्रकल्प तेथे राबवावेत
  • - मराठी माध्यमाच्या शाळातील संगणक विभागांशी संपर्कात येऊन, त्यांना मराठीतही वैज्ञानिक गोष्टी मिळतात याची जाणीव करून द्यावी.
  • - मराठीचा संगणकावर सुयोग्य वापर कसा करावा यावर प्रयोगासहीत व्याख्याने आयोजित करावीत.
  • - देण्यासाठी संगणकीय मराठी कशी वापरावी याची पत्रके छापून घ्या ती शाळा शाळांना द्या.
  • - शिक्षकांना मराठी मराठीतून संगणक कसा वापरावा याचे प्रशिक्षण द्यावे
  • - मराठीसाठी उपलब्ध असलेली गमभन ते ओपन ऑफिस मुक्तशब्दकोश एका सीडीवर मोफत उपलब्ध करून द्यावे
  • - मराठी माध्यमाच्या शाळातील संगणक विभागांशी संपर्कात येउन मराठीतून शैक्षणिकरित्या देता येतील अशी संगणकाची एखादी शिक्षण पद्धती विकसित करून द्यावी
  • - मराठी माध्यमाच्या शाळात आंतरजालिय जोडण्या देण्यासाठी साधने उभी करावीत.
  • - या प्रकल्पासाठी उपयुक्तता पटावून देऊन पैसे उभे करावेत.

आपला
गुंडोपंत

ऋषिकेश's picture

4 Jun 2010 - 12:44 pm | ऋषिकेश

यथाशक्ती यथामती मदत करेनच.
तुर्तास सर्कीट यांच्या अश्याच आव्हानातून जन्मलेल्या आजी आजोबांच्या वस्तू देऊ शकतो.

तसेच मुलांसाठी एका आगामी मालिकेचे सुतोवाच गेल्यावर्षीच्या उपक्रम दिवाळी अंकात केले होते त्याची पुर्तता या नवीन स्थळावरही करीन

ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

अवलिया's picture

4 Jun 2010 - 12:43 pm | अवलिया

छान ! पुन्हा एकदा पाठिंबा !! :)

--अवलिया

प्रभो's picture

4 Jun 2010 - 6:52 pm | प्रभो

सहमत!

Nile's picture

4 Jun 2010 - 12:52 pm | Nile

उद्देश जर प्रामाणिक असेल (आणि तसे दिसले) तर जमेल तसे सहकार्य करेन. 'चार गोष्टी विज्ञानाच्या' सांगायलातर नक्कीच जमेल असे वाटते.

-Nile

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Jun 2010 - 1:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पंत, आमच्या मराठवाड्यातला आपला एक मिपाकर श्री अनिल सोनुने या शिक्षक मित्राचे बालजगत संकेतस्थळ आहे. त्यांची मदत संकेतस्थळ निर्मिती आणि आपल्या प्रकल्पातील बहुतेक उद्देशासाठी होईल असे वाटते.

कोणत्या वर्गासाठी 'पोर्टल' असावे. विद्यार्थ्यांच्या कोणत्या तासाला विद्यार्थ्यांना त्याबद्दल शिकवता येईल. मास्तरांचे प्रबोधन वर्ग असतात तिथे अशा विषयावर मार्गदर्शन करुन प्रकल्प राबवता येईल का ? सोनुने सरांची मदत होईल. त्यांना बोलून पाहतो.

-दिलीप बिरुटे

शानबा५१२'s picture

4 Jun 2010 - 1:48 pm | शानबा५१२

आपले प्रयत्न स्तुतिलायक आहेत,त्याच शेवटी फलीत काय येत हे पहायला उत्सुक आहे.
website बद्दल बोलाल तर हे आपल्या कामाला येईल.काही मदत होते का बघा.

Prasad Shirgaonkar
CEO - AADI VENTURES
Tel: +91 (0) 20 25454921 | Mobile: +91 9850 828291 | Web: www.aadiventures.com
1st Floor, Atre Vakil Bungalow, 44/41 Navasahyadri Society, Karvenagar, Pune 411 052, MH - India

नोंद : आपला ह्या कंपनीशी काडीचा संबंध नाही,एकदा साईट बनवायच्या संबधित ह्यांकडे चौकशी केली होती.मी कोणाची जाहीरात कधी केली नाही/करणार नाही.

नावातकायआहे's picture

4 Jun 2010 - 2:10 pm | नावातकायआहे

>>उद्देश जर प्रामाणिक असेल (आणि तसे दिसले) तर नक्किच जमेल तसे सहकार्य करेन

असेच म्हणतो

धमाल मुलगा's picture

4 Jun 2010 - 3:38 pm | धमाल मुलगा

कालपर्यंत आधीच्या धाग्यावर काय काय चालु आहे ते फक्त पहात होतो. :)
जुन्या बेरजा वजाबाक्या बर्‍यापैकी झाल्यानंतर ( ;) ) मी बरीचशी आशा सोडली होती.
मात्र, आज हा धागा पाहुन आनंद झाला.

मिसळपावचे विश्वस्त 'लोकविकास' या प्रकल्पासाठी आपली शक्ती पणाला लावतील,असे मला आनंदयात्रींनी आत्ताच कळवले आहे.

दॅट्स इट! ओव्हर & आउट वगैरे वगैरे :)
चांगल्या प्रकल्पांसाठी लोकविकास नेहमीच मदतीला सोबत असेलच.
आता तुम्ही संकेतस्थळ डिझाईन, निर्माण वगैरेचा कोणताही ताण घेणॅ किंवा अगदी फार विचार करणेदेखील ह्यातून पुर्ण मुक्त आहात. :)

एक शंका:
>>मराठी माध्यमाच्या शाळात आंतरजालिय जोडण्या देण्यासाठी साधने उभी करावीत.
हा मुद्दा नाही समजला. म्हणजे आपण एक ISP चालु करायचा की काय? :?
समजा, एखाद्या ISP सोबत काहीतरी कंत्राटी करार वगैरे केले, तरी त्या कंपनीची सेवा सर्वत्र असेलच ह्याची खात्री नाही. सरकारी बी.एस.एन.एल.च्या सहकार्याबद्दल काय बोलणार? :(

कृपया, ह्या मुद्द्यावर आणखी माहिती द्याल का?

इनोबा म्हणे's picture

4 Jun 2010 - 6:04 pm | इनोबा म्हणे

चांगल्या प्रकल्पांसाठी लोकविकास नेहमीच मदतीला सोबत असेलच.
आता तुम्ही संकेतस्थळ डिझाईन, निर्माण वगैरेचा कोणताही ताण घेणॅ किंवा अगदी फार विचार करणेदेखील ह्यातून पुर्ण मुक्त आहात.

+१

नितिन थत्ते's picture

4 Jun 2010 - 4:18 pm | नितिन थत्ते

माझा एक मित्र ग्रामीण शालेय विद्यार्थ्यांच्या गणित शिक्षणावर काही काम करतो. त्याच्याकडे काही तयार मटेरिअल असेल तर पाहतो. ते टंकन करून चढवता येऊ शकेल.

नितिन थत्ते

मुक्तसुनीत's picture

4 Jun 2010 - 5:02 pm | मुक्तसुनीत

१."सपोर्ट" चा पुनरुच्चार करतो. सध्या व्यस्त आहे. वीकांतास अजून लिहिन असे म्हणतो.

२. या धाग्याचे शीर्षक बदलावे. शीर्षकावरून काहीही बोध होत नाही.

३.मिपाबाहेरील मित्र मैत्रिणीना आवाहन पोचवायला हवे. जितक्या जास्त संकल्पना आणि सहाय्य मिळेल तितके उत्तम.

प्रियाली's picture

4 Jun 2010 - 5:08 pm | प्रियाली

हल्ली तेवढा वेळ मिळत नाही. :( पण सदस्यत्व घेऊन प्रतिक्रिया नक्की देईन. विशेषतः, एखादी गोष्ट आवडली नाही किंवा कंटाळवाणी वाटत असेल, एखादा लेख निद्रानाशावर उपाय ठरणार असेल ;-) तर नक्की कळवेन.

धमाल मुलगा's picture

4 Jun 2010 - 5:48 pm | धमाल मुलगा

ह्या एकुणच विषयावर श्री.पाषाणभेद ह्यांचे विचार ऐकायला तसेच अमलात आणण्यासाठी प्रयत्नांची काय दिशा असावी ह्याचे वस्तुस्थितीला धरुन असे मार्गदर्शन्/सल्ला ऐकायला आवडेल. त्यांचा अशा प्रकारच्या काही शालेय जोड-प्रकल्पांचा अभ्यास आहे असे अंधुकसे स्मरते.

पाषाणभेद's picture

5 Jun 2010 - 9:44 am | पाषाणभेद

>>> >>मराठी माध्यमाच्या शाळात आंतरजालिय जोडण्या देण्यासाठी साधने उभी करावीत.

ध. मु., हे मला ही समजले नाही. तरीही संकेतस्थळ निर्माण कराणार्‍यांनी याचा विचार करू नये. हे करणे म्हणजे कदाचीत 'घरचे झाले थोडे' होईल. अन त्याची काळजीही करण्याचे कारण नाही. ज्या दुर्गम भागात आंतरजालाची जोडणीच उपलब्ध नसेल (अशीच शक्यता जास्त आहे) तेथे असली वेबसाईट अगदीच गरज असेल तर आपण वेळोवेळी ऑफलाईन कॉपी करून देवू शकतो. फुल नाही तर फुलाची पाकळीही सुंगध निर्माण करेल.

वरील मुळ प्रश्नात "शिक्षकांना प्रशिक्षण" "संगणक अभ्यासक्रम कसा " आदी प्रश्न हे नंतर उपस्थीत होणारे आहे. आधी पायाभरणी तर होवू दे.

कळफलक: गमभन च. सोपा आहे.

असल्या साईटी म्हणजे सुरूवात (होमपेज) केवळ रंगीत, अ‍ॅनीमेटेड केले म्हणजे मिळवली असे न होता आतले मटेरीयल दर्जेदार व्हावे.
किंबहूना कित्येक परदेशी विद्यापिठांच्या साईटी ब्लॅक व्हाईट / केवळ टेक्ट स्वरूपात आहे अन त्यात मटेरीयल म्हणजे अगदी हिरे माणके आहेत. (पुणे विद्यापिठाच्या साईटीचे उदाहरण देता येईल काय? (हा झाला विनोद हं. असो.))
विकीपीडीयाचे उदाहरण समोर ठेवता येईल.

अन प्रत्येक इंग्रजी शब्दाचे मराठीकरण केलेच पाहीजे असा आग्रह नको.

The universal symbol for diabetes
मधुमेहा विरुद्ध लढा

माझी जालवही

धनंजय's picture

4 Jun 2010 - 7:46 pm | धनंजय

"लोकविकास"कडे तांत्रिक माहिती आणि तळमळीने काम करणारे कार्यकर्ते आहेत.

जमेल तितकी आर्थिक मदत आणि लेखन-मदत देण्यास आनंद वाटेल.

मागे मी काही कुटुंबीयांना विश्वस्त म्हणून घेऊन "लोकमित्र प्रतिष्ठान" ही संस्था रजिस्टर केली. तिचे उद्दिष्ट्य वर सांगितलेल्या संस्थेसारखेच आहे. ही अजून अस्तित्वात आहे, पण गाढ सुप्तावस्थेत आहे. ही संस्था भारतातील कार्यकारी मंडळाच्या आणि विश्वस्तांच्या हातात सोपवावी अशी माझी स्थापनाकाळी इच्छा होती. प्रत्यक्षात मात्र अशा व्यक्तींशी भेटीगाठी करणे, विधायक प्रकल्प स्वतःहून तडीस लावणे मला जमले नाही. त्यामुळे ही संस्था जन्मल्यानंतर तिने "ट्यां" सुद्धा केलेले नाही. स्वतःहून रिमोट कंट्रोलने स्थापनेपसून हस्तांतरित करण्यापर्यंतच्या पायर्‍या मला जमल्या नाहीत.

उदात्त हेतूचा पाया पाहिजेच. पण लोकसंग्रहाचे कौशल्य हवे. लाघवीपणे विसंवादी पात्रांकडून सहकार्य मिळवता आले पाहिजे. कधीकधी तत्त्वांना (घात होणार नाही इतकी) मुरड घालण्याचे भान हवे. या सर्व गोष्टी महत्त्वाच्या.

"लोकमित्र" संस्थेचे स्थापना-पत्रक "लोकविकास"ला देऊ शकतो. त्यातून काही तत्त्वे घेण्यासारखी वाटली, तर "लोकविकास" ती तत्त्वे स्वीकारू शकेल.

टारझन's picture

4 Jun 2010 - 8:32 pm | टारझन

आयला ... काकांशेजारी आमचे णाव पाहुन डोळे पाणावले :)
असो , आम्ही कमेंटा कशा बी टाकत असलो तरी चांगल्या गोष्टींना आपला ण्हेमीच पाटिंबा आहे :) तेंव्हा जियो गुंडोपंत :)

- बंडोपंत

पिवळा डांबिस's picture

4 Jun 2010 - 10:12 pm | पिवळा डांबिस

श्री. गुंडोपंत,
सर्वप्रथम आक्रस्ताळेपणाची कास सोडल्याबद्दल अभिनंदन!:)
त्यामुळेच हा प्रतिसाद देत आहे.
आपल्या प्रकल्पाला आमच्या शुभेच्छा आणि पाठिंबा!
परंतु संकेतस्थळ सांभाळणे (किंवा एकंदरितच आयटी/ कंप्युटर) या विषयांत अनभिज्ञ असल्याने मला काय मदत करता येईल याविषयी साशंक आहे.
जर कुणाला काही सुचत असल्यास कळवा, जरूर विचार करू.
सस्नेह,
पिडां

स्वाती२'s picture

4 Jun 2010 - 11:58 pm | स्वाती२

प्रकल्पासाठी शुभेच्छा!

आवशीचो घोव्'s picture

6 Jun 2010 - 10:55 am | आवशीचो घोव्

आमचं मत:
Microsoft ला गळ घालून मोफत काही मिळवण्याची गरज नाही असे मला वाटते. खास शैक्षणिक दृष्टीकोनातून बनवलेली Edubuntu ही Operating System आपण वापरू शकतो. माझा एक मित्र Ubuntu चा अधिकृत वितरक आहे. अतिशय माफक दरात तो या CDs उपलब्ध करून देउ शकतो. जर तेही करायचे नसेल तर Edubuntu च्या CDs विनामूल्य Download साठी उपलब्ध आहेतच. आणि मी स्वत: Edubuntu installation / maintenance / server administration साठी विनामूल्य सहकार्य देउ शकतो. काहिही गरज लागल्यास कळवा.