विश्वकर्मा नीलकांत

आनंदयात्री's picture
आनंदयात्री in काथ्याकूट
22 Apr 2008 - 2:12 pm
गाभा: 

अरे हो हो हो ... सांगतो .. असे शीर्षक का ते सांगतो ... "विश्वकर्मा नीलकांत" असे धमालराव आमच्या कांताला संबोधत असतात, कारण दिवसभर (ऍटलिष्ट धा तास तरी) मिपा आमच्या साठी विश्व असते हो. आम्ही दिवसभर इकडे वावरतो, चकाट्या पिटतो, एकमेकांची खेचतो, एकमेकांची सुख दु:ख्खे वाटतो झालच तर आत्मानंदी गुरु वैगेरे पण मिळवतो :). आता काही जण आम्हाला पडिक वैगेरे म्हणुन पण हिणवतात, पण आम्ही काय ते मनावर घेत नाही, म्हणो बापुडे !

तर असे हे मिपा आमच्या आयुष्यातला महत्वाचा घटक झाला आहे, आमची आणी एक प्रतिमा आहे तिकडे, एक प्रतिविश्वच म्हणा ना ! तर आमच्या या विश्वाचा विंजिनीयर नीलकांत .. म्हणजे आपला कांता हो ! त्याने आमचा एक मोठा हट्ट पुर्ण केलाय, आमच्या खरडवह्या त्याने एकदम टकाटक करुन दिल्यात. काय आनंद सांगु, अवर्णनीय. एखाद्या सुग्रण गृहिणीला खुप दिवसांनी ओट्याला बसवलेल्या किचन ट्रॉलीचा आनंद, एखाद्या कॉलेजकुमाराला नव्याने मिळलेल्या क्यामेरावाल्या मोबाइलचा आनंद, एखाद्या तरुणाला आपल्या गोडश्या गर्लफ्रेंडला मित्रात मिरवण्याचा आनंद कित्ती कित्ती असेल नाई !! तसाच आम्हालाही आमच्या मिपावरच्या या सुधारणेचा खुप खुप आनंद झालाय.

:)

विश्वकर्मा नीलकांत - तुमचे खुप खुप अभिनंदन !!!!!!!

आणी शतशः धन्यवाद सुद्धा.
याचबरोबर शशांक, ओंकार या पडद्यामागच्या जादुगारांना सुद्धा धन्यवाद. :)
आणी हो याचबरोबर आपल्या घराची ओसरी अगदी आनंदाने आम्हाला खेळायला देणार्‍या तात्यांचे पण धन्यवाद. :)

प्रतिक्रिया

मनस्वी's picture

22 Apr 2008 - 2:31 pm | मनस्वी

* विश्वकर्मा नीलकांत * शशांक * ॐकार * तात्या *
* अभिनंदन * धन्यवाद * शुभेच्छा *

विजुभाऊ's picture

22 Apr 2008 - 2:24 pm | विजुभाऊ

खरेच की. खरड्व्हया एकदम टकाटक झाल्या
धन्यवाद निलकान्त भौ.लै झ्याक

धमाल मुलगा's picture

22 Apr 2008 - 2:30 pm | धमाल मुलगा

आनंदयात्रीसाहेबांनी आमच्या जणू तोंडची वाक्यंच पळवली...
त्यानी एव्हढं छान अभिनंदन आणि धन्यवाद देण्याचं तंत्र अवलंबलं की आम्हाला आता काही बोलण्याची गरजच उरलेली नाही..

तरीही.. विश्वकर्मा नीलकांत, शशांक, ॐकार ह्यांना मनापासून धन्यवाद.

आपलाच,
ध मा ल.

विसोबा खेचर's picture

22 Apr 2008 - 2:36 pm | विसोबा खेचर

एखाद्या सुग्रण गृहिणीला खुप दिवसांनी ओट्याला बसवलेल्या किचन ट्रॉलीचा आनंद, एखाद्या कॉलेजकुमाराला नव्याने मिळलेल्या क्यामेरावाल्या मोबाइलचा आनंद, एखाद्या तरुणाला आपल्या गोडश्या गर्लफ्रेंडला मित्रात मिरवण्याचा आनंद कित्ती कित्ती असेल नाई !! तसाच आम्हालाही आमच्या मिपावरच्या या सुधारणेचा खुप खुप आनंद झालाय.

वा! क्या बात है... :)

आणी हो याचबरोबर आपल्या घराची ओसरी अगदी आनंदाने आम्हाला खेळायला देणार्‍या तात्यांचे पण धन्यवाद. :)

अहो तुमच्यासारखी चार स्वच्छंदी, दिलखुलास माणसं या ओसरीवर वावरतात म्हणून तर तिला शोभा आहे! त्यामुळे उलटपक्षी, मिपाचं अंगण, पडवी, ओसरी हसतीखेळती, जिवंत ठेवल्याबद्दल खरं तर मीच सर्वांचा आभारी आहे...!

या ओसरीवर कितीही खेळा, हसा, बागडा, रडा, धिंगाणा घाला, काय हव्वं ते करा!

परंतु फक्त एकच अट! या ओसरीवर प्रमाणभाषा आणि शुद्धलेखनाच्या गप्पा मारायच्या नाहीत! बाकी काय हव्वं ते करा!

:)))))))))))))))))

आपला,
(मिपाच्या ओसरीवरचा एक सांगाती) तात्या.

मदनबाण's picture

22 Apr 2008 - 2:46 pm | मदनबाण

अभिनंदन सर्वांचे .....

मदनबाण

आर्य's picture

22 Apr 2008 - 2:56 pm | आर्य

अभिनंदन आणि धन्यवाद ही......................

स्वाती दिनेश's picture

22 Apr 2008 - 4:57 pm | स्वाती दिनेश

वावा..आता खरडवहीतून प्रतिसाद देता येतोय,अभिनंदन!

चतुरंग's picture

22 Apr 2008 - 5:02 pm | चतुरंग

एकेक सुधारणा मिपाला प्रगतीपथावर नेत आहेत.
सर्व संबंधित लोकांचे अभिनंदन!

चतुरंग

शितल's picture

22 Apr 2008 - 5:24 pm | शितल

विश्वकर्मा नीलकांत, शशांक, ॐकार ह्यांना मनापासून धन्यवाद.

स्वाती राजेश's picture

22 Apr 2008 - 5:37 pm | स्वाती राजेश

आणि पडद्यामागील सदस्यांचे मनापासून धन्यवाद!!!!!!!!!!!!!

हस्तर's picture

13 Jun 2020 - 12:46 pm | हस्तर

हो