गाभा:
नुकताच "शांताराम" ह्या ग्रेगरी डेव्हिड रॉबर्ट्स लिखित मुळच्या आंग्ल भाषेतील कादंबरीचा मराठी अनुवाद मेहता प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला आहे. (किंमत-९९० रूपये)
तर ह्या कादंबरीचा सारांश कुणी सांगेल काय? मला शांताराम संग्रही ठेवायची आहे पण जास्त किंमतीमुळे धाडस होत नाही. पण अर्थातच उत्कृष्ट असेल तर मी ती घेइनच. तरी जाणकारांनी शांताराम संग्राह्य आहे का ते सांगावे.
प्रतिक्रिया
29 May 2010 - 12:52 pm | उमराणी सरकार
मूळ इंग्रजी आवृत्ती ई-बुक स्वरुपात महाजालावरुन विनामूल्य उतरवून घेता येईल. ती वाचून संग्रही ठेवायचे की नाही ते ठरवा.
मला बरी वाटली.
उमराणी सरकार
29 May 2010 - 11:05 pm | इन्द्र्राज पवार
"शांताराम" ची मूळ इंग्रजी आवृत्ती माझ्याकडे आहे जी लंडनच्या "अॅबॅकस" प्रकाशन संस्थेने काढली असून भारतीय चलनात ती मला रुपये ४७२/- पडली. त्या मानाने मेहताची जवळपास एक हजार रुपयांची मराठी आवृत्ती नक्कीच महाग आहे. शिवाय १००० रुपये देवून एका देशातून पोलिसांचा ससेमारा चुकवून भारतात येऊन इथेही तेच "ब्लॅक लिस्ट" मधील धंदे करून झोपडपट्टीत "मसीहा"चा अवतार बनून लाखो रुपयांची उलाढाल करणार्याची कहाणी वाचण्याची काही गरज नाही.
मी हे पुस्तक पूर्ण वाचले आहे (इंग्लिशमधून लिहिले आहे मात्र अशा पध्द्तीने की लेखक ग्रेगरी रॉबर्टस जणू काय तुमच्यासमोर बसून तुम्हालाच आपली ही "रॉबीन हूड" छापाची कथा सांगतोय).
कथानक सांगू शकतो.... पण जर तुम्ही पुस्तक विकत घेऊन वाचणार असाल, तर राहु दे... अन्यथा तुमची वाचनातील इंटरेस्ट कमी होईल.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
30 May 2010 - 12:52 am | टारझन
बिण्धास्त घ्या ... अगदी डोळे झाकून ... आहो मी सांगतोय ना .. घ्या एक नाही तर दोन घ्या ;)
- टल्ली
आपलं काय जातंय सांगायला ;)
30 May 2010 - 1:06 am | मी-सौरभ
नाही आवडली तरी गेल्या पैशाला जागुन छाण म्हना नी काय???
-----
सौरभ :)
30 May 2010 - 11:18 am | टारझन
तेच म्हंटलं .. पहिली नाही आवडली तर किमान दुसरी तरी आवडेल ... एक चान्स ;)
- (सरदार) टारझन सिंग
31 May 2010 - 8:53 am | प्रचेतस
नक्कीच घेउ टारोजीराव, एक कादंबरी तुला भेट द्यायला नक्कीच आवडेल. फक्त तु मात्र तुझ्या खास शैलीतले त्याचे विस्तारपूर्वक रसग्रहण मिपावार टाकले पाहीजेस.
30 May 2010 - 1:24 am | सुधीर काळे
इंद्रजीत-जींशी सहमत नाहीं. माझ्या मते अतीशय वाचनीय कादंबरी आहे! मुंबईकरांसाठी तरी!!
कदाचित ही कादंबरी तशी आत्मकथा आहे. मी तीन-चार वर्षांपूर्वी वाचली होती, त्यामुळे थोडे-फार विसरायला झाले आहे!
कुठल्या तरी गंभीर गुन्ह्यासाठी (कदाचित् खून) तुरुंगात असलेला एक ऑस्ट्रेलियन कैदी तुरुंगातून पळून जातो, न्यूझीलंडच्या खोट्या पासपोर्ट वर भारतात येतो, एका मराठी वाटाड्याचा मित्र बनतो, त्याच्या खेड्यात जातो, कुठल्याशा गुन्ह्याबद्दल मुंबईतल्या तुरुंगात जातो, मग एका 'दादा'च्या संपर्कात येतो, त्याच्याबरोबर बेकायदा धंदे करतो, मग त्याच्याबरोबर पाकिस्तानात व नंतर अफगाणिस्तानात लढायला जातो. बाकीचे प्रत्यक्ष वाचा.
ही कादंबरी मुंबईकरांनी तर जरूर वाचावी. मला खूप आवडली.
------------------------
सुधीर काळे, पुन्हा विठोबाच्या पंढरीत (वॉशिंग्टन डी. सी.) परत!
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचे दुवे: प्रकरण चौथे: http://tinyurl.com/293h432
आधीच्या प्रकरणांचे दुवे 'सकाळ'ने लेखाच्या सुरुवातीला दिले आहेत.
30 May 2010 - 12:55 pm | वेताळ
ह्या पुस्तकाच्या लेखकाचे नाव मनमोहन देसाई तर नाही ना?
वेताळ
30 May 2010 - 1:14 am | Pain
इन्द्र्राज पवार यांच्याशी सहमत.
किमान कथा-कादंबर्यात* तरी चांगले लोक जिंकावेत अशी अपेक्षा आहे. गुंडांच्या यशोगाथा रोजच बघतो...
30 May 2010 - 7:51 am | सुधीर काळे
या पुस्तकात गुंडांचा 'बॉस' मारला जातो!
------------------------
सुधीर काळे, पुन्हा विठोबाच्या पंढरीत (वॉशिंग्टन डी. सी.) परत!
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचे दुवे: प्रकरण चौथे: http://tinyurl.com/293h432
आधीच्या प्रकरणांचे दुवे 'सकाळ'ने लेखाच्या सुरुवातीला दिले आहेत.
31 May 2010 - 12:50 pm | चिरोटा
ह्या पेक्षा Maximum City(Mumbai-lost and found) हे पुस्तक वाचा.अतिशय वाचनिय आहे.विशेषकरुन मुंबईकर असाल तर पायाखाली काय जळते आहे ह्याचा अंदाज येइल.सर्व कथा खर्या आहेत.
http://www.suketumehta.com/
31 May 2010 - 2:40 pm | भारद्वाज
ह्या पेक्षा Maximum City(Mumbai-lost and found) हे पुस्तक वाचा.अतिशय वाचनिय आहे.विशेषकरुन मुंबईकर असाल तर पायाखाली काय जळते आहे ह्याचा अंदाज येइल.सर्व कथा खर्या आहेत.
असेच म्हणतो.
31 May 2010 - 1:26 pm | कानडाऊ योगेशु
"शांताराम" वर एक इंग्रजी चित्रपट बनतोय असे मध्यंतरी वाचले होते.
पायरेट्स फेम जॉनी डेप ला मध्यवर्ती भूमिकेबाबत विचारणा झाली होती.(बहुदा त्याने ती भूमिका प्रथम स्वीकारुन नंतर नाकारली.)
चित्रपट पाहील्यानंतर कदाचित कादंबरी घ्यावी का न घ्यावी हे ठरवु शकाल.
(हॅरी पॉटरची एकही कादंबरी न वाचलेला पण काही चित्रपट पाहीलेला) योगेश.
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.