गाभा:
सूचना:
ज्योतिषशास्त्र, राशी आणि स्वभाव वैशिष्ट्ये हे सर्व मानणार्या मिसळपावच्या वाचकांसाठी हा चर्चेचा प्रस्ताव....
रास ओळखण्याचा नियम-
जन्मकुंडलीत ज्या राशीत चंद्र असतो ती आपली रास असते.
मिसळपाव चे जे वाचक वॄषभ राशीचे आहेत त्यांनी आणि ज्या वाचकांचे मित्र/नातेवाईक/ ओळखीचे/ संपर्कातले व्यक्ती वृषभ राशीचे आहेत त्यांनी वॄषभ व्यक्तींचा स्वभाव येथे मांडावा.
हेतू हा की ज्योतिष शास्त्रात जी वॄषभ राशीची वैशिष्ट्ये सांगितली आहेत ती पडताळून पाहाणे....
अजून एक :
कुंडलीत प्रथम स्थानी २ हा आकडा असेल (वृषभ) आणि प्रथम स्थानी शुक्र ग्रह असला ...
तरीपण त्या व्यक्तीचा स्वभाव वृषभ राशीसारखा असू शकतो,
मूळ रास वेगळी असली तरी... (म्हणजे चंद्र हा २ हा आकडा असलेल्या स्थानात नसला तरीही..)
प्रतिक्रिया
28 May 2010 - 11:29 am | शिल्पा ब
तीळ काय ? रास काय? कसला एवढा अभ्यास चालू आहे? सहज एक प्रश्न...राशीवर शरीरावरील तिळांचे प्रमाण अवलंबून असते का?
बाकी कसल्याश्या नाड्यांवर आमचे भविष्य आहे असे म्हणतात...त्यातच स्वभावाचा सुद्धा उल्लेख असावा...
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
28 May 2010 - 8:08 pm | नरेश_
या राशींचे लोक बायकोचे बैल असतात म्हणे. आता त्या बाजूने विचार करायचा तर, असे सांगता येईल की या राशींचे पुरुष चांगले,आदर्श, कामसू वगैरे असतात.
दहा दहा तासांचे दररोजचे भारनियमन, वाढती महागाई, कर्मचार्यांचा असहकार या सर्व कटकटींनी व्यापलो असलो तरी कविता पाडून आम्ही कुणाला वेठीस धरत नाही ;)
28 May 2010 - 11:28 pm | पंगा
'बैल' आणि 'वळू' यांच्यात काही फरक असतो, असे ऐकलेले आहे.
नक्की काय ते ठरवा.
पहिल्या विधानाबद्दल नक्की काय ते ठरवल्यावर या विधानाचा विचार करता येईल.
- पंडित गागाभट्ट.
28 May 2010 - 11:33 am | प्रकाश घाटपांडे
स्वभाव राशींचे हा विश्वास पटवर्धन यांचा कार्यक्रम व राशी चक्र हा शरद उपाध्यांचे कार्यक्रम हे ज्योतिषाच्या निमित्ताने मनोरंजना चे आहे. त्या अर्थाने फलज्योतिष हे उपयुक्त आहे
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
28 May 2010 - 11:51 am | गुंडोपंत
काय उड्या मारताय?
आता फलज्योतिष हे उपयुक्त आहे?
वाचून कान धन्य झाले त्यातून आता आनंदाश्रू वाहत आहेत.
आपला
गुंडोपंत
28 May 2010 - 11:52 am | प्रकाश घाटपांडे
त्या अर्थाने हे शब्द महत्वाचे.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
28 May 2010 - 11:59 am | गुंडोपंत
आता आस्सं काय करताय राव?
मी माझ्या डोळ्यांनी हे ऐकल्यावा माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही!
आपला
गुंडोपंत
28 May 2010 - 5:59 pm | पंगा
(डोळ्यांनी) ऐकावे ते नवलच!
- पंडित गागाभट्ट.
28 May 2010 - 5:57 pm | पंगा
कानांतून आनंदाश्रू कसे वाहतात?
- पंडित गागाभट्ट.
28 May 2010 - 11:34 am | सुखदा राव
तिळ, रास..... मुली बघताय का? माझी रास कुम्भ आहे अन या राशीच्या लोकान्च आणि व्रुशभ राशीच्या लोकान्च एकमेकात पटत नाही इतकच मला माहित आहे.
28 May 2010 - 4:08 pm | पांथस्थ
पटणं न पटणं हे राशीवर नसतं वो.
मी कुंभ आहे आणि मंडळी तुळा (वृषभ नाही) तरी पण पटत नाही :)
सर्वेक्षण केले तर कोणत्याच राशीचे कोणाशीही पटत नाही आणि सगळ्याच राशींचे सगळ्यांशीच पटते असाही निष्कर्ष निघु शकतो (म्हणुनच कोणी करत नाही बहुदा!)
मंडळी मिपावर येत नाही म्हणुन लेखन स्वातंत्र्य ;)
- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर
28 May 2010 - 4:24 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
म्हणजे एवढ्या मस्तपैकी फोटोसकट दिलेल्या रेसिप्यासुद्धा ... हॅ हॅ हॅ! ;-)
अदिती
28 May 2010 - 4:30 pm | पांथस्थ
ऐसा सबके सामने नही बोलनेका बाबा!
- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर
29 May 2010 - 10:47 am | दिपक
कुंभवाल्यानी कुंभ रास असणारीच बायको करावी तरच पटेल असे आज सकाळीच शरद उपाध्येंच्या ‘भविष्यावर बोलु काही’ कार्यक्रमात ऎकले. :-)
(कुभंवाला) दिपक
वृषभ राशीचा नवरा असलेल्या बायका नशिबवान असतात,
सगळी कामे नवराच करतो, त्यामुळे बायका सुखी. :D
28 May 2010 - 7:45 pm | निमिष सोनार
मी विवाहीत आहे..
सहज एक अभ्यास म्हणून मी ही चर्चा सुरू केली आहे....
29 May 2010 - 6:25 pm | सुखदा राव
ओ आवरा... मी पण विवाहीतच आहे बर. मी फक्त १ ऐकीव माहिती सान्गितली.
28 May 2010 - 11:39 pm | एक
कसं पटणार?
बैलाने (वृषभ) एक छोटासा धक्का दिला तर मडकं (कुंभ) फुटणार नाही का? :)
-(धनुष्यबाण वाले) एक.
28 May 2010 - 11:37 am | चिरोटा
वृषभ राशीचे लोक्-ऐट्बाज राहण्याची सवय असते.नटण्याची आवड असते.उपाध्ये ह्यांनी सांगितलेली वैशिष्टे माझ्या ओळखीतल्या वृषभ राशीच्या लोकांना बरोबर लागु पडतात.
P = NP
28 May 2010 - 5:54 pm | शुचि
एक सुंदर स्त्री अतिशय मोहक. मुख्य म्हणजे नटण्यात नंबर १. खूप खूप ऐटबाज राहणी.
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
28 May 2010 - 10:10 pm | शिल्पा ब
इंग्रजी महिन्यानुसार वृश्चिक आणि मराठीनुसार वृषभ अशी माझी रास स्थिती आहे...मग नक्की काय समजायचे?
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
28 May 2010 - 11:30 pm | भारद्वाज
शिल्पातै, सॅन होजेला असताना वृश्चिक नि सीबीडीत असताना वृषभ... ;)
जय महाराष्ट्र
29 May 2010 - 10:54 am | मी-सौरभ
=))
इतर ठिकाणी ?????
-----
सौरभ :)
28 May 2010 - 11:47 am | युयुत्सु
मेष सोडून एकदम तुम्ही वृषभेवरच उडी मारलीत. जाउ द्या!
आमचा एबर्टीन वृषभ राशीच्या चंद्राबद्दल काय म्हणतो ते पुढे देत आहे -
Constancy, tenacious clinging to acquired possessions. Steadfastness and firmness, an understanding or appreciation of the beautiful, enjoyment of life.– Changeable material circumstances
.
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
28 May 2010 - 11:51 am | प्रकाश घाटपांडे
ते निरयण राशीबद्दल बोलताहेत. तुमच सायण आहे.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
28 May 2010 - 11:54 am | युयुत्सु
खरच की हो. सॉरी हं!
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
28 May 2010 - 11:55 am | नितिन थत्ते
तेजायला, सायन की कुर्ला प्रमाणे रास बी बदलतीया का?
नितिन थत्ते
28 May 2010 - 11:56 am | फटू
ज्योतिषानेच चुकीचं कोष्टक पाहीलं की राव...
- फटू
28 May 2010 - 2:07 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
ज्योतिषीबुवा, तुमच्या वारंवार चुका व्हायला लागल्या आहेत. अंमळ एकदा पुन्हा स्वतःचंही ज्योतिष पहा आणि कल्जि घेने.
अदिती
28 May 2010 - 3:32 pm | युयुत्सु
पौर्णिमेचा परिणाम बहुदा!
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
28 May 2010 - 1:10 pm | इरसाल
इचीभैन सायन नाय काय आम्ही रसायन
28 May 2010 - 2:18 pm | अरुण मनोहर
तीळ असलेल्या वृषभापासून सगळ्यांनी सावध रहावे
28 May 2010 - 2:23 pm | मेघवेडा
फक्त वृषभच का? बाकीच्या राशी का नाहीत?? :?
(असो. आता बारा राशींचे बारा धागे काढू नका.. :P)
-- मेघवेडा!
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
28 May 2010 - 2:36 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
What's your rashee
28 May 2010 - 3:35 pm | मेघवेडा
च्यायला कसला वैताग पिच्चर आहे.. आणि त्यात वीकांताला पाह्यला.. £8 फुकट गेले!! :(
-- मेघवेडा!
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
28 May 2010 - 3:39 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
तुम्हाला टोरंट माहित नाही वाट्टं! ;-)
मला फुकटात मिळाला पिच्चर तरीही वेळ फुकट गेल्याचं वाईट वाटलं ... वेळ + £८ म्हणजे अतिच झालं!
अदिती
28 May 2010 - 4:03 pm | मेघवेडा
माहित नाही कशाला.. पण कधीमधी जातो की थेट्रात सुद्धा.. पण आयुष्यात कायम लक्षात राहील अशी चूक होती ती!! ;)
मी 'घझिणी' सुद्धा £9 देऊन बघितलाय... आता बोल ;)
-- मेघवेडा!
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
28 May 2010 - 8:00 pm | टिउ
मी $१५ देऊन! (हो आम्ही अमेरीकेत असतो ;)) ते पण पहील्या रांगेत बसुन! वेळ, पैसा वाया गेलाच शिवाय मान दुखायला लागली...मी आणी अजुन एक जण एका तासात बाहेर आलो. बाकीच्यांनी पैसे वाया जातील म्हणुन पुर्ण चित्रपट सहन केला!
असो फारच अवांतर झालं...तसंही असल्या धाग्यावर काय लिहीणार म्हणा!
28 May 2010 - 8:09 pm | मेघवेडा
>> बाकीच्यांनी पैसे वाया जातील म्हणुन पुर्ण चित्रपट सहन केला!
=)) =))
म्हणजे बघितल्याने सार्थकी लागतील असं वाटत होतं की काय! ;)
>> तसंही असल्या धाग्यावर काय लिहीणार म्हणा!
टवाळखोरीसाठी असलेच धागे बरे पडतात की राव!! ;) असं हिणवू नका!! :D
-- मेघवेडा!
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
28 May 2010 - 7:52 pm | निमिष सोनार
माझी रास वृषभ आहे..
28 May 2010 - 8:03 pm | निमिष सोनार
कारण सोप्पं आहे. माझी रास वृषभ आहे...
28 May 2010 - 2:35 pm | आंबोळी
>>>मिसळपाव चे जे वाचक वॄषभ राशीचे आहेत त्यांनी आणि ज्या वाचकांचे मित्र/नातेवाईक/ ओळखीचे/ संपर्कातले व्यक्ती वृषभ राशीचे आहेत त्यांनी वॄषभ व्यक्तींचा स्वभाव येथे मांडावा. हेतू हा की ज्योतिष शास्त्रात जी वॄषभ राशीची वैशिष्ट्ये सांगितली आहेत ती पडताळून पाहाणे....
--फक्त आपल्या राशींवर आणि तिळांवर धागे काढणे या लोकाना फार आवडते....
--बाकी कुठे उभे आहोत वगैरे न बघता शेण टाकण्याची सवय असते.
--जरा मना विरुद्ध काही झाले (प्रतिसाद वगैरे) की लगेच शिंगे काढून डुरकायला लागतात....
आजुन सापडली की टाकतोच..
आंबोळी
28 May 2010 - 7:53 pm | निमिष सोनार
खरे आहे. म्हणणे पटले :-)
28 May 2010 - 5:20 pm | jaypal
त्यांना कायम वेसण घालुन कंट्रोल मधे ठेवाव लागत.
![b](http://www.istockphoto.com/file_thumbview_approve/6735701/2/istockphoto_6735701-angry-bull.jpg)
नाही तर लगेच उधळतात. =))
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
28 May 2010 - 8:05 pm | सोम्यागोम्या
जयपाल मस्त फोटु!
मूळ लेखाला प्रतिसादः
माझा भाऊ व मी दोघेही वृषभ राशीचे आहोत. दोघांमध्ये जमीन आस्मान चा फरक आहे. स्वभावात, राहण्याच्या, खाण्यापिण्याच्या पद्धतीत खूप फरक आहेत. नीटनेटके पणा माझ्यात आहे पण त्यच्याकडे अजिबात नाही. लहानपणी व आता सुद्धा सफरचंद खाताना सुद्धा तो भासकन उचलून खायचा मी सुरी घेऊन फोडी करुन बिया काढून खायचो.
तेव्हा राशीवरुन काही वैशिष्ट्ये ठरत असावीत असे मला तरी वाटत नाही.
28 May 2010 - 9:08 pm | निमिष सोनार
पण मग -
दोघांच्या कुंडलीत प्रथम स्थानी कोणती रास आहे त्यावरही स्वभाव वैशिष्ट्ये ठरतात....
दोघांच्या कुंडलीत प्रथम स्थानात ग्रह किंवा रास वेगवेगळे असतील... राशी एकच असली तरी.
माझ्या वाचनीय "शहराला" जरुर भेट द्या-
http://nimishthinkcity.blogspot.com
28 May 2010 - 10:07 pm | सोम्यागोम्या
कुंडलीत ग्रह वेगळे असणारच आणि व्यक्ति निराळ्या असणारच पण इथे विषय राशीवरुन काही सामायिक गुणधर्म असतात का? असा आहे.
तर तसे काही मला आढळले नाहीत. बाकी वृषभवाले रोमँटिक असतात असं उपाध्ये साहेब म्हणतात. ते खरां का?
29 May 2010 - 10:18 am | निमिष सोनार
होय! ते खरं आहे.
माझ्या ब्लॉगला जरुर भेट द्या-
http://nimishthinkcity.blogspot.com
28 May 2010 - 8:31 pm | नरेश_
शरदिनी मॅडमची रास कोणती हो?
जाणून घ्यायला आवडेल.
दहा दहा तासांचे दररोजचे भारनियमन, वाढती महागाई, कर्मचार्यांचा असहकार या सर्व कटकटींनी व्यापलो असलो तरी कविता पाडून आम्ही कुणाला वेठीस धरत नाही ;)
28 May 2010 - 8:38 pm | चतुरंग
मॅडमची रास 'भडक मकर'
(मीन)चतुरंग
28 May 2010 - 11:33 pm | भारद्वाज
=)) =)) =))
28 May 2010 - 9:14 pm | निमिष सोनार
कुंडलीत प्रथम स्थानी २ हा आकडा असेल (वृषभ) तसेच प्रथम स्थानी शुक्र ग्रह असला तरीही...तरीपण त्या व्यक्तीचा स्वभाव वृषभ राशीसारखा असू शकतो, मूळ रास वेगळी असली तरी...
28 May 2010 - 11:25 pm | बेसनलाडू
तुम्ही लग्नराशी आणि जन्मराशीत गल्लत करताय, असे वाटते. चू. भू. द्या. घ्या.
कुंडलीत चंद्र ज्या राशीत आहे, ती जन्मराशी (मग राशीस्वामी कोणत्याही स्थानी असो). तसेच कुंडलीत प्रथम स्थानी जी राशी असते, ती लग्नराशी (पुन्हा, लग्नेश = लग्नराशीचा स्वामी, कोणत्याही स्थानी असो). भारतीय ज्योतिषशास्त्रात मन (स्वभाव) आणि तन (विचारपद्धती) वेगळे मानले गेले आहे. चू.भू.द्या.घ्या. तसेच तन म्हणजे फक्त रंगरूप, वजन-उंची इ. नव्हे. तर विचारपद्धती, जिच्यावर मेंदूचा अंमल असतो, ती सुद्धा. तनु (रंगरूप, उंचीवजन इ.) आणि विचारपद्धती (मेंदू) यांवर लग्नराशीचा प्रभाव असतो, तर मनावर (स्वभावावर) जन्मराशीचा (चंद्रराशीचा) प्रभाव असतो. स्वभाववैशिष्ट्ये, विचारपद्धती इ. केवळ राशीच्या अधिपत्याखाली नाही, तर राशीस्वामी व इतर ग्रहांचे गुणात्मक योग कसे झाले आहेत, इ. घटकांवर अवलंबून असते.
(माहीतगार)बेसनलाडू
माझा या शास्त्राचा अभ्यास नाही. हे शास्त्र/विज्ञान आहे की नाही, यावर निरंतर वाद चालू आहे; त्यात मी कधीच पडत नाही. माझ्यासाठी या प्रकारावरचा विश्वास-अविश्वास, श्रद्धा-अतिश्रद्धा-अंधश्रद्धा इ. परिस्थितीच्या सोईने ठरत असतात, परिस्थितीजन्य असतात :)
(सोयीस्कर)बेसनलाडू
इतके असूनही जालावर व इतरत्र वाचून वगैरे जी माहिती मिळते, त्यावरून वरील प्रतिसाद लिहिला आहे.
(लेखक)बेसनलाडू
मिसळपाववर पूर्वी नियमित लेखन करणारे व ज्यांनी मिसळपाववर छंदशास्त्र हा विभाग चालू केला, ते धोंडोपंत यांच्या ज्योतिषशास्त्रविषयक जालनिशीवर बरीच माहिती उपलब्ध आहे. अशा अनेक हिंदी, मराठी, इंग्रजी जालनिशा उपलब्ध आहेत.
(दुवादार)बेसनलाडू
28 May 2010 - 9:43 pm | निमिष सोनार
एखाद्या वाचकाचा ज्योतिषशास्त्रावर ब्लॉग आहे का?
माझ्या ब्लॉगला जरुर भेट द्या-
http://nimishthinkcity.blogspot.com
29 May 2010 - 12:04 am | फटू
कंच्या दुनयेत र्हाता तुमी?
लय आदी हितं येक म्होटे जोतीशी लिवायचे. हल्ली नाय लिवित हितं. पन त्यांचा बलाग हाय. त्या बलागावर ते कुनाचा लगन कदी ठरंल, घर कदी कोन यिकत घेइल, पॉर्गा व्हईल का पोर्गी ह्याबदलची त्यांची (म्हंजे त्यानी त्यांच्या जातकांची सांगितलेली) सगली भविश्ये कशी खरी झाली तो लिवतात.
आजून येक लय म्होटं जोतीशी हितं हायेत. ते पन बलाग लिवतात. आता न्यामका आटवत नाय पन भौतेक यिंग्रजीत लिवतात ते. त्याना वलकायला येगदम सोपा हाय. हितं मिपावर येकादया कायद्याचा फायदा घेवुन बायका आपल्या न्हवर्याला कसा तरास द्यातात आजुन सुर्य ह्या राशीतना त्या राशीत ग्यालावर तो कुनाला वाईट हाय आसा यकादा धागा दिसला का समजून जायाचा, ह्या धाग्याचा लेकक म्हनजेच आपलं बलाग लिवनारं जोतीशी.
छे ! दमलो बुवा. सवय नाही राहीली आता गावच्या बोलीभाषेत बोलायची, लिहायची.
फटू