णमस्कार्स लोक्स ,
फोन हा आजच्या जिवनाचा अविभाज्य घटक आहे. फोन शिवाय हल्ली पान हलणे मुष्किल झाले आहे. फोन ही एक अतिशय उपयोगी वस्तु आहे. (च्यायचा घो ह्या "अगाध प्रतिभेच्या" ... भाषा कशी घसरलीच ... )
असो ... तर काय सांगतोय ? हंम्म्म. .. फोन ला आपण फार युज्ड टू झालोय नै ?
कधी कधी काही असे विनोद होतात .... की आपण स्वतःच स्टंप्स वर बॅट मारुन घेतो आपली बोलतीच बंद होते ..
एकदा काय झालं ... बर्याच वर्षांपुर्वी कॉलेजाच्या फायनल ईयर ला असताना नविन मोबाईल घेतला होता. तेंव्हा मोबाईल एक लग्जरी होती. पण फायनल इयर प्रोजेक्ट को-ऑर्डिनेशनसाठी गरज म्हणुन मोबाईल घेतला होता. एका दिवशी सहजंच मित्राला फोन केला. हा आमचा मित्र पक्का सदाशीव पेठी . काही प्रोजेक्ट च्या कामासाठी त्याला फोन लावला. तो त्याच्या बहिणीने उचलला (त्याच्या बहिणीशी एक दोन वेळा फोन वर बोललो होतो, पण तिच्या अति खडुस टोन मुळे मी बोलायलाच घाबरायचो.)
मी विचारलं ... "अभि आहे ? "
तिकडुन ... " नाही ... तो टॉयलेट ला गेलाय " ..
मला क्षणभर काय बोलावं ते सुचलंच नाही ... आणि मी पटकन बोलुन गेलो ..
"कधी येईल ? "
तिकडुन असा तिरसट आवाज आला ... "आता ते मी कसं सांगु तो कधी येईल ? तो काही सांगुन गेला नाही की किती वेळात येईल ते "
मी जीभ चावली . . एंबेरसमेंट ने माझा चेहरा बघण्यासारखा झाला होता. तो किस्सा आठवुन अजुनही हसतो.
हल्ली जॉब चेंजचे वारे वाहत आहेत. बर्याचदा एचार च्या गोड आवाचाच्या पोरींशी बोलणे होते. एक दिवस असाच कॉल आला, आणि बोलता बोलता फोन ठेवते वेळी "लव्ह यु" बोलुन गेलो (सवयीप्रमाणे ;) ) ... पुन्हा जिभ चावली .. :)
पलिकडची थोडी गोंधळलीच ... म्हणे "सॉरी ... !!!!" म्हंटलं "नथिंग .. ... डु लेट मी नो इफ एनि अपडेट्स"
फोन वरचे किस्से भरपुर आहेत .. :) तुर्तास इतकेच :)
<खुलासा> सदर धागा काथ्याकुटात आहे , आणि फोनवरचे पोपट शेयर करण्यासाठी माफक करमणुक व्हावी एवढाच धाग्यावा उद्देश आहे. उगा तिखटमिठ लाऊन ५० लेख लिहीणे आणि "फोनवर फसवणुक - प्रकरणे १२०वे" पर्यंत गाडी ताणन्याची गरज वाटत नाही. म्हणुन थोडक्यात प्रस्तावनापर २ किस्से टाकलेले आहेत. कृपया आपले किस्से टाका. <खुलाश्याबद्दल धन्यवाद>
- (फोन प्रेमी) टारोबा कॉलर
प्रतिक्रिया
25 May 2010 - 6:23 pm | घाशीराम कोतवाल १.२
बास ईतकेच चॅक चॅक
भाग जरा अजुन मोठे लिहा मग सविस्तर प्रतिक्रिया देउ
25 May 2010 - 6:29 pm | कानडाऊ योगेशु
पु.लं नी आपल्या एका मित्राला फोन केला होता.फोन मित्राच्या छोट्या मुलीने उचलला.
बाबा कुठे आहेत वगैरे विचारण्याआधी वेल्हाळ पु.लंनी तिला विचारले.
"काय चालले आहे सध्या मग?"
पलिकडुन उत्तर आले.
"श्वासोच्छवास"..
पुलंनी लिहिले आहे कि इतके चपखल उत्तर मलाही कदाचित सुचले नसते.
बाकी टारूभाऊंचा पोपट मस्तच.
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
25 May 2010 - 6:33 pm | अनामिक
माझ्या चार वर्षाच्या भाचीला कुणाचाही फोन आला की त्याच्याशी बोलायचं असतं. हि विचारते "तुमी काय कलताय?" पुढचा उत्तर देतो आणि तिला विचारतो "तु काय करत आहेस?", पठ्ठीचं उत्तर तयार असतं "मी तुमच्याशी बोलत आहे".
-अनामिक
25 May 2010 - 6:34 pm | संजा
यापेक्षा अधिक चांगल्या साहित्याची अपेक्षा आहे. कीमान एखादा निबंध तरी .....
बायसन (संजा)
25 May 2010 - 6:36 pm | बिपिन कार्यकर्ते
मस्त किस्सा!!! अजून येऊ द्या.
हे पण भारीच. =))
बिपिन कार्यकर्ते
25 May 2010 - 6:44 pm | अरुण मनोहर
फोन वर तरूण तुर्क तर तासन तास दळत बसतात. मग टारझन भाऊ, तुम्ही येवढ्यात कसा फोन खाली ठेवला? चालबो नाय चालबो नाय.
25 May 2010 - 6:46 pm | अनामिक
तो फोनवरच आहे म्हणून तर लेख आवरता घेतला.
-अनामिक
25 May 2010 - 6:51 pm | बिपिन कार्यकर्ते
त्याला तासन तास दळायला फोनची गरज नाही. ;)
बिपिन कार्यकर्ते
25 May 2010 - 6:52 pm | शुचि
लेख आवडला.
५/६ वीत सार्वजनीक फोनवरून आम्ही १०१ नम्बर फिरवायचो आणि सांगायचो "आग लागली"
"कुठे" विचारलं की उत्तर द्यायचो - "पापडाला" =))
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
25 May 2010 - 6:54 pm | परिकथेतील राजकुमार
ह्या असंस्कृत वाक्याला माझी हरकत आहे. संपादकांनी लक्ष घालावे.
बाकी टारपोपट एक नंबर रे. अजुन जरा १/२ किस्से घातले असतेस तरी चालले असते. तुझा लेख म्हणुन वाचायल बसलो आणी मजा यायला लागली आहे असे वाटेपर्यंत संपला देखील. :(
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
26 May 2010 - 3:13 am | नंदन
--- असंच म्हणतो.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
26 May 2010 - 10:51 am | दिपक
असेच म्हणतो.
बाकी फोनवरुन पराचा आम्ही आणी क्रेडिट कार्ड वाली कन्या !! धम्माल लेख आठवला.
25 May 2010 - 7:06 pm | टुकुल
च्यामारी, आमचा पोपट आठवला.
७-८ वर्षांपुर्वी घरी नवीन लॅन्ड्लाईन फोन आला होता, त्यावेळी एव्हढे काही फोन यायचे नाहीत आणी कॉलर आयडी हा प्रकार नव्हता. तर काही नमुने लोक (किंवा मित्र) त्रास द्यायला मुद्दाम फोन करायचे आणी समोरुन काहीच बोलायचे नाहीत. एकदा ठेवला कि परत अस ४-५ वेळा होत असे. याच्यावर माझा जालीम इलाज एकच होता.
एकदा असच फोन वाजला, उचलला, समोरुन काहीच आवाज नाही. फोन मिच कट केला. असे अजुन दोनदा झाले. चौथ्यांदा जेंव्हा फोन वाजला आणी समोरुन काहीच आवाज आला नाही तस मी एकदम सुरु केले "काय रे पैसे जास्त झाले का मा****..*** **.." लै घाण झापला, यावेळी लगेच पलिकडुन फोन कट झाला.
पाचेक मिनिटानि परत फोन आला, बाबा होते "काय रे ये, किती घाण शिव्या देतोस, अक्कल आहे का तुला? थोड्यावेळापुर्वी मिच फोन करत होतो, त्या डब्यात काहीतरी प्राब्लेम होता म्हणुन माझा आवाज तुला येत नव्हता पण तुझा मला येत होता. आता दुसर्या बुथ वरुन फोन केला आहे".
त्यांना कसबस समजवला कि मला वाटल कि दुसरच कुणीतरी मुद्दाम त्रास देत आहे, पण काय फायदा, पुलाखालुन पाणी आधीच वाहुन गेल होत.
--टुकुल
25 May 2010 - 7:07 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
=))
25 May 2010 - 7:15 pm | मुक्तसुनीत
टारु , महान विषय ! सही किस्से.
वीसेक वर्षांपूर्वीची गोष्ट. चुलत बहिणीचे नुकतेच लगीन झालेले होते. तिच्या कुटुंबीयांशी ओळख वगैरे. यात तिचा दीरही. राजेश्री धाकटे आणि भलतेच लाडोबा ! :-)
यांचे फोनवरचे किस्से फार फार फेमस. आमच्याकडे एकदा फोन केला.
फोन मीच घेतला.
"ट्रींग ट्रींग"
मी : "हलो".
लाडोबा : "हॅलो , कोण बोलतंय?"
झालं ! अस्मादिकांचं डोकं आउट ! कुणी फोन केला तर त्या व्यक्तीने "हे अमुकचे घर आहे का ? मी तमुक बोलतो आहे. अमुक आहेत का ? कोण अमुक बोलतंय का ? " हा प्रोटोकॉल न पाळता, एकदम "ह्यालो , कोण बोलतंय?" असे म्हण्टले की आजसुद्धा मानसिक शांती राखायला त्रास होतो. तेव्हा तर काय , टीनएज मधला सगळा कारभार. मी फारशी सभ्यता आवाजात न ठेवता विचारले ,
"अहो तुम्ही कोण बोलताय बोला ना ! कोण पाह्यजे ? कुठला नंबर पाह्यजे !" झाSSलं ! लाडोबांनी फोन ठेवून दिला ! मग नंतर बहिणाबाईंचा फोन : "अरे , तो आमचा 'हा' बोलत होता हो !"
आमच्या कुटुंबात त्यानंतर मला कुणीही फोनवर भेटले की मुद्दाम "ह्यालो , कोण बोलतांय?" असे विचारून फिस्स्कन हसायची पद्धत होती.
25 May 2010 - 7:40 pm | फटू
अगदी आजही बरेच लोक हा प्रकार करतात. फोन करतात आणि समोरच्या व्यक्तीने "हॅलो" म्हटले की हेच त्या व्यक्तीला विचारतात, "हॅलो, कोण बोलतंय". अरे बावा, फोन तू केला आहेस, तुला कोणाशी बोलायचं आहे ते सांग ना...
@टारोबा: दोन्ही किस्से अप्रतिम बरं का. परंतू लेख आवरता घेतल्यासारखा वाटला राव. कुणाचा फोन वगैरे आला काय?
आमच्याही हापिसात पोरीबाळींचे फोन येतात, क्रेडीट कार्ड गळ्यात मारण्यासाठी. पोरी अगदी रांगेने एकेक करून सगळे विस्तारीत क्रमांक (यक्श्टेन्शन हो) लावून बघतात. असे रांगेने फोन वाजल्यावर पोरं फोन उचलत नाहीत. पण कुणी उचललाच तर पोरगी लगेच विचारते "सर आप अमुक तमुक कंपनीमें काम करते हैं ना?" इकडून उलट प्रश्न असतो, "आपने कहा कॉल किया हैं?"
"अमुक तमुक कंपनीमें" पोरगी बावळटपणे उत्तर देते.
"नेक्स्ट जनरेशन" खुपच हुशार आहे. कधी तुम्ही तुमच्या आजुबाजूच्या तीन चार वर्षांच्या मुलांना मोबाईल फोनवर बोलताना पाहिलंय? पाहिलंत तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल, ही मुलं अगदी शिस्तीत मोठयांसारख्या मोबाईल फोनवर बोलताना येरझारा घालतात.
- फटू
25 May 2010 - 7:52 pm | मस्त कलंदर
मला असाच एकदा विनाकारण ओळख वाढवू इच्छिणार्या व्यक्तीचा फोन आला.. त्या व्यक्तीची याबाबतीतली किर्ती तोवर माझ्यापर्यंत पोचली होतीच. त्यामुळे तो मी किमान शब्दात नि अवघ्या ४२ सेकंदात संपवला. यावरून तरी तीने बोध घ्यावा की नाही??? पण कुठचे काय, लगेच मला दुसर्या दिवशी पुन्हा त्या व्यक्तीने दोन्-तीन वेळा फोन केला.. अर्थातच प्रत्येक वेळी माझ्याकडून फोन बिझी होता.. तिसर्यांदा मात्र मी चालू असलेला फोन कट करून वेटिंग कॉल रिसिव्ह केला.\
व्यक्ती: "हॅलो"
मी: "काही काम होतं??"
व्यक्ती: "नाही"
मी:"मग?? मी माझा फोन बिझी आहे नि मी वेटिंगवरचा कॉल घेत नाही, याचा सरळसरळ अर्थ मला तुमच्याशी बोलायचे नाही हे कळत नाही??? काही काम नाही ना??"
व्यक्ती(चाचरत): "नाही"
पुढे अर्थातच मला काहीही बोलायची गरज पडली नाही!!! :)
हा किस्सा आमच्या मित्रमंडळात "२४ सेकंदाचा पोपट" म्हणून प्रसिद्ध आहे!!!!
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
26 May 2010 - 9:28 am | श्रावण मोडक
बरं. कळ्ळं... इतक्या भावना दुखावणारं लिहिणं जमतंच कसं तुम्हाला म्हणतो मी. छ्या... :)
26 May 2010 - 12:53 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
काय मजा आली असेल ना गं "ताई" असा पोपट करायला!!
अदिती
25 May 2010 - 7:54 pm | अरुंधती
माझ्या वडीलांना एका नामवंत बँकेतून एका मंजुळ आवाजाच्या कन्येचे ''तुम्हाला लोन हवंय का?'' वगैरे वगैरे सारखे फोन यायचे.... मी त्यांना म्हटलंही, काय उगाच टाईमपास करताय, सांगून टाका तिला नकोय कर्ज म्हणून... तर वडील म्हणाले, आवाज छान आहे पोरीचा... ह्यॅ ह्यॅ ह्यॅ....;-) मग एक दिवस बापूंना खूप कंटाळा आला. पकले होते तोवर तिची तीच रेकॉर्ड ऐकून....तिला म्हणाले, हवंय कर्ज...पण एका अटीवर... मी ते फेडू शकत नाही, फेडणार नाही, तारण देणार नाही.... मग काय, देताय का कर्ज, बोला! पलीकडून फोन जो कट् झाला तो पुन्हा त्या फोनने छळले नाही!
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
25 May 2010 - 8:01 pm | योगी९००
मस्त घागा...
नुकताच माझा एक मोठ्ठा पोपट झाला. मी माझ्या मोबाईलवर एक नवीन application टाकले जेणे करून माझा मोबाईल हरवला तर मला track करता येईल. बस्स.. मोबाईल हरवला तर लगेच जवळच्या मोबाईल वरून एक स्पेशल समस टाकायचा. म्हणजे predefined णंबरावर माझ्या मोबाईलचे GPS location ठराविक काळाने परत परत येत रहाते. तसेच कोणी sim बदलला तरी मला ते माझ्या predefined णंबरावर कळत रहाते...!!!
पण चुकून predefined णंबर म्हणून माझाच मोबाईल णंबर टाकला...आणि test करताना माझ्या मुलीला सांगितले की माझा मोबाईल घेऊन जरा थोडे दुर जा..मग ऐटीत बायकोच्या मोबाईलवरून मला समस टाकला आणि वाट बघायला लागलो की कधी समस येतोय ते..मला वाटत होते की predefined णंबर म्हणून बायकोचा णंबर टाकला आहे. ..१५-२० मि. वाट बघितल्यावर त्या application ला चांगल्या २-३ कोल्हापुरी शिव्या घातल्या..मग मुलीला शोधून तिच्याकडून माझा मोबाईल घेतला..आणि पहातो तो काय...५-६ समस माझ्याच मोबाईलवर आलेले....!!! त्यानंतर बायकोला हसताना पाहून मात्र स्वतःवर वैतागलो..
खादाडमाऊ
25 May 2010 - 9:17 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
९५ सालच्या आसपास लँडलाईनची बरीच अॅप्लिकेशन्स क्लियर होऊन आमच्या घरचा पहिला फोन आला. बरेच लोकं पकवायला फोन करायचे. आमचे बापू (वडील हो) शांतपणे त्यांचीच टांग खेचत बसायचे. सुरूवातीला हे माहित नव्हतं म्हणून "इरफान आहे का?" या प्रश्नाला सरळ उत्तर द्यायचो. नंतर एकदा बाबांनीच फोन उचलला.
पलिकडचा: इरफान आहे का?
बाबा: नाही, कालच मेला ना तो! आत्ताच त्याला पुरून आलो.
पलिकडचा: कसा काय? मला कसं नाही कळलं?
बाबा: काय रे, तू अफू घेतली होतीस ना काल? तूच ना खून केलास त्याचा??
पुढे कधी इरफानचा शोध आमच्या घरी झाला नाही.
आमच्या काकांनाही फोन केल्यावर "कोण बोलतंय" म्हणून विचारायची सवय होती. माझा भाऊपण अँग्री यंग म्यान ... एकदा काका आहे हे माहित असतानाही तिरसटून दिलं उत्तर, "तुझा बाप!" हसून हसून मी आणि बाबा लोटपोट!
अदिती
25 May 2010 - 10:39 pm | मस्त कलंदर
सेम असाच किस्सा आमच्या घरी घडला..
एकदा मी आणि भाऊ दोघेच घरात होतो.. नि फोन आला.. बोलणार्याने एकदम खेडवळ लहेजात "शिरपतराव हायती का?" म्हणून विचारले..
भाऊ म्हणाला,"आत्तापत्तूर हुतं.. पर आत्ताच गेलं की वं ते.. लई चांगला माणूस.. पण काय चालतं का आपलं? आलेलं मानूस कदी ना कदी जायाचंच"
मी पण त्याला खाणाखुणा करून त्यात भर घालत होते..
शेवटी तिकडचा माणूस घायकुतीला आला, तेव्हा त्याला, "आवो.. ते काय गेलं मंजी कायमचं गेलं न्हायती.. पावण्याच्या घरी आलेलं मानूस आपल्या घरी कदी ना कदी जायचंच.. घरी गेलं वो ते आपल्या" असं म्हणून टाकलं!!
नंतर बराच वेळ दोघेही खुसुखुसु हस्त होतो... :)
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
25 May 2010 - 9:24 pm | टुकुल
>>>एकदा काका आहे हे माहित असतानाही तिरसटून दिलं उत्तर, "तुझा बाप!" हसून हसून मी आणि बाबा लोटपोट!
अरररर.. एखाद्याच्या सवयीला अस उत्तर?
--टुकुल
25 May 2010 - 9:28 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
अर्र, तुम्हाला फारच वाईट वाटलेलं दिसतं आहे. एक काम करा, तिकीट काढल्यावर तुम्ही आमच्या काकांना फोन मॅनर्स n+1 व्या वेळेला शिकवा; आत्मिक समाधान आणि अध्यात्मिक उन्नती होईल!!
अदिती
25 May 2010 - 9:36 pm | मुक्तसुनीत
लाडोबा यांची ओळख: संदर्भ : वरील पोस्ट
एकदा लाडोबा , मी आणि अजून एक मित्र जितेश कट्ट्यावर भेटलो. गप्पा मारल्या. निघालो. आपापल्या घरी गेलो.
थोड्या वेळाने लाडोबांचा आमच्या घरी फोन. फोन आमच्या बापूसाहेबानी उचलला. आमचे बापूसाहेब गणिताचे शिक्षक - त्यांच्या टेंपरामेंटबद्दल इतके म्हण्टले तरी पुरेसे आहे ! पुढील संभाषण :
"ट्रिंग ट्रिंग"
बापूसाहेब : "हलो"
लाडोबा : "हलो कोण बोलतंय !"
बापूसाहेब : (त्रासिक स्वरात ) " अरे , लाडू का ? बोल बोल ! काय आहे ? "
लाडोबा : "हलो ...कोण .... कोण बोलतंय ! जीतेश आहे का ?"
बापूसाहेब : "अरे बाबा ! मी मुसुचा बाबा बोलतोय ! काय चाललंय काय ? जीतेश नाही आहे इकडे ! "
लाडोबा : "अरे ! काका ! तुम्ही जितेश च्या घरी काय करताय ? "
बापूसाहेब (बॉइलिंग पॉईंटमधे !) : "अरे ! तू शुद्धीवर आहेस ना ? डोकं बिकं ठीकाय ना ? "
.... फोन ठेवून देण्यात येतो !
25 May 2010 - 9:36 pm | नील_गंधार
माझा स्वतःचा कधी पोपट झालेला नाही,परंतु ब-याच जणांचा पोपट मी केलेला आहे.
आपल्याच एखाद्या जुन्या मित्राचा नंबर अचानक गवसतो.
मग काय चालु करायचे की मी अमुक अमुक कंपनीतून बोलतोय,
तुमच्याशी नवीन जॉब/युके-युएसला मायग्रेट होणार का?...चालु करायचे.
पर्सनल इंटरव्ह्युव अन जमलेच तर टेक्निकल इंटरव्ह्युव घेउन टाकायचा.हे येते का ते येते का? वगैरे प्रश्न टाकून पार भंडावून टाकायचे.
अन शेवटी किती पगार घेणार? असा प्रश्न टाकून त्याला घोळात घेणे,
व जास्त पैशे मागताना तुम्हाला लाज कशी वाटत नाही असे बोलुन बेकार चढणे. ब-यापैकी दंगा झाल्यावर त्याला शिवी घालून आपलि ओळख सांगणे.;)
इथे शिवी घालणे महत्वाचे.कारण खरा मित्रच तुमची शिवी व तुमचा त्रास इग्नोर करू शकतो.
:)
नील.
25 May 2010 - 10:28 pm | फटू
माझाही एक मित्र आमच्या ग्रुपला हैराण करतो. प्रत्येक वेळी नविन क्रमांकावरुन कॉल करतो, आवाज बदलतो आणि सुरु होतो...
- फटू
25 May 2010 - 9:36 pm | दादा कोंडके
माझा एक मित्र पक्का सदाशिवपेठी आणि गेमाडपंथी!
एकदा त्याने माझे पैसे घेतले आणि द्यायचे नाव काढेना. मी त्याला फोन कर-करून वैतागलो!
माझा फोन नंबर दिसला कि एकतर उचलणार नाही किंवा कट करणार.
एकदा मी त्याला सकाळीच फोन केला,
तो: हॅलो (त्याला बहुतेक मी आहे हे कळलं नसावं)
मी (रागावून): अरे किती दिवसांपासून फोन करायचा प्रयत्न करतोय तूला!
तो : अरे मी जरा बाहेर ट्रॅफीक मध्ये आहे, तुला नंतर फोन करतो.
मी: अरे पण मी तुला लँडलाईन वर फोन केलाय! =))
26 May 2010 - 2:33 am | मीली
यु ट्यूब वर एक विनोदी संभाषण ऐकण्यात आले ...
तुम्ही पण ऐकून बघा आणि सांगा कसे वाटले!
http://www.youtube.com/watch?v=9EnCsk7QR0I
मीली
26 May 2010 - 6:55 am | स्पंदना
मुंबईत एकदा एक फोन आला...पलीकडुन टिपिकल भैय्या स्वर "हा////लो"
मी: 'हलो?"
पलिकडुन ""हा////लो"
मी: 'हलो?"
परत
""हा////लो"
अस निदान चार पाच वेळा शेवटी मी उकळायला लागले.
ओरडुन म्हंटलः क्या हालो हालो लगाया है?
बाई म्हणते मेरेको सुनाई दे रहा है..आपको सुनाई दे रहा है क्या?
कप्पाळ...
"श्वासोच्छवास" भारी..
अन वरील किस्से हि छान.
शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
26 May 2010 - 9:26 am | शिल्पा ब
अस निदान चार पाच वेळा शेवटी मी उकळायला लागले.
ओरडुन म्हंटलः क्या हालो हालो लगाया है?
बाई म्हणते मेरेको सुनाई दे रहा है..आपको सुनाई दे रहा है क्या?
कप्पाळ...
=)) =)) =)) =)) =))
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
26 May 2010 - 8:39 am | भय्या
असाच
कुठेतरी वाचलेली एक गंमत
एक व्यक्ती :- हेलो? अमुक एयर कंपनी?
ऑपरेटर : -नमस्कार, बोला.
एक व्यक्ती :-चेन्नै ते मुंबै प्रवासाला किती वेळ लागतो?
ऑपरेटर : जस्ट ए मिनीट
एक व्यक्ती :- ओ. के थँक्स!
---
26 May 2010 - 8:43 am | प्रभो
लै भारी रे टार्या.....लव यू वाला किस्सा तर भारीच!!
26 May 2010 - 8:45 am | चटोरी वैशू
७-८ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे...
घरी नेहमी ब्ल्याऩक कॉल यायचे...
एकदा आईने फोन उचलला...
आई: हॅलो...
पलि़कडून : मी करिश्मा बोलतेय...
आई: गोविंदा खेळायला गेलाय... नंतर कर फोन...
पलिकडून फोन कट्...
अजुनही किस्सा आठवला कि हसू येते...
26 May 2010 - 8:54 am | टारझन
हाहाहा .. किस्सा जबरा =))
-(करिष्मा) टारझन
26 May 2010 - 9:28 am | शिल्पा ब
=)) =)) =)) =)) =))
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
26 May 2010 - 9:00 am | भय्या
तासनतास दळत बसणे आमच्याकडे याला '' गुळ काढणे'' असे म्हणतात.
26 May 2010 - 9:03 am | पाषाणभेद
मित्राकडे माझा नंबर नाही हे पाहून मी सुरू होतो की, 'हॅलो, हवालदार शिंदे. बंडगार्डन पोलीस स्टेशन. लगेच श्टेशनावर या.'
समोरचा गांगरतो. नंतर मग तुम्ही बाईकला ठोकले, मस्ती केली इ. सुरू होतो. त्या त्या गावाचे पोलीस स्टेशन चे नाव घ्यायचे अन चालू व्हायचे.
मस्त मजा येते. शेवटी शिव्या. फोन नंबर सेव्ह न केल्यामुळे.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
26 May 2010 - 10:14 am | सोम्यागोम्या
आमच्या अशाच एक शेफारलेल्या मावशी आहेत. अगदी राजेशाही थाटात कामं करणा-या. डुलत डुलत चालणार. सगळ्या जगाची विद्दवत्ता माझ्यातच साठली आहे अशी भावना. कोणाला चांगलं म्हणून कधी म्हणणार नाही.
मावशीबाई कुठे तरी फोन लावत होत्या, तर तो लागेना. यांच्या कपाळावरच्या आठ्या वाढल्या. दोन तीन वेळा प्रयत्न केला असेल. अचानक मावशी बाई उद्गारल्या. "आहो बरोबरच लगाया है", माझ्याकडे पहात "काय बावळट बाई आहे, मला नंबर तपासा म्हणते" !!
(त्या काळी बावळट बायकांच्या संदेशाची सेवा नुकतीच सुरु झाली होती ! :D )
26 May 2010 - 10:26 am | आंबोळी
जबर्या किस्से आहेत रे एकेकाचे....
टार्या लै बेष्ट धागा....
ते मॉरिशसच्या फोनचा पण किस्सा टाक ना....
आंबोळी
26 May 2010 - 10:46 am | टारझन
बरी आठवण केलीस ....
तर लोकांनो एकदा काय झालं ... मिसळपाव वरच्या एका अत्तिशय हुशार , मानसिक समतोल असणार्या व्यक्तिबरोबर आमचं "भांडाण" झालं .. आमच्या साध्या सुध्या शब्दांनीच त्या व्यक्तिला खुप मिर्या झोंबल्या होत्या. तर त्या व्यक्तिने कोण्या मॉरिशस च्या शिंच्याला मला फोन करुन धमकी द्यायला लावली =))
सुरूवातीला ती व्यक्ति ठिक बोलली ... मी पण मग ठिक ठाक उत्तरं दिली ... पण नंतर भाऊ म्हने ... "तु आमच्या धर्मा विषयी काहीही लिहीतोय असं मला कळलं " (च्यायची कटकट ...)
"जस्त गुगल माय नेम .. मुल्ला #$#($#($ , यू विल नो व्हू एम आय "
आपला टाळकाच आउट झाला ... भेंडी .. असशील कोन कुठचा ... रुबाब कोणाला दाखवतो बे भाड्या ?
उतरलो डायरेक्ट हिंदीवर ... आणि आवाज फुल्ल .. न घातल्या चांगल्या चार पाच शिव्या ... "सामने आ के बात कर #($(#$ .. बताता हुं मै कौन हू ... गुगल का जरुरत नही. .. "
फोन कट ..
मी आजुबाजुला पाहिलं तर बँकेतली सगळी लोकं क्युब मधे उभी राहुन माझ्याकडे भुवया उंचावुन पहात होती. .. =))
असो .. असेच चॅट वरचेही किस्से आहेत .. त्याचा धागा फिर कभी @!
- तांबोळी
26 May 2010 - 12:52 pm | मृगनयनी
एक दिवस असाच कॉल आला, आणि बोलता बोलता फोन ठेवते वेळी "लव्ह यु" बोलुन गेलो (सवयीप्रमाणे ) ... पुन्हा जिभ चावली ..
पलिकडची थोडी गोंधळलीच ... म्हणे "सॉरी ... !!!!" म्हंटलं "नथिंग .. ... डु लेट मी नो इफ एनि अपडेट्स"
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
<खुलासा> सदर धागा काथ्याकुटात आहे , आणि फोनवरचे पोपट शेयर करण्यासाठी माफक करमणुक व्हावी एवढाच धाग्यावा उद्देश आहे. उगा तिखटमिठ लाऊन ५० लेख लिहीणे आणि "फोनवर फसवणुक - प्रकरणे १२०वे" पर्यंत गाडी ताणन्याची गरज वाटत नाही.
अगाईईई ग्ग!!!.... =)) =)) =)) =)) =))
काय टारोबा.... एका दगडात किती पक्षी मारतोस्स्स्स!!!! ;)
__________
असो...
मध्यन्तरी आमच्या दूरच्या नात्यातल्या एका व्यक्तीचे दु:खद निधन झाले. (गाव -नाशिक) त्या व्यक्तीचे मूळ नाव वेगळे होते.. आणि घरामध्ये त्या व्यक्तीस "नन्दु" या नावाने संबोधले जाई...
"दशक्रिया विधी" कोणत्या घाटावर आहेत आणि किती वाजता... हे विचारण्यासाठी माझ्या बाबांनी त्यांच्या घरी फोन लावला..तो एका व्यक्तीने उचलला.
तो : हॅलो.. कोण?
बाबा : हॅलो.. मी पुण्याहून ____ बोलतोय...
तो: हं बोला..
बाबा : ते "दहावं" किती वाजता आणि कुठे आहे?..
तो : गंगेच्या वरच्या घाटावर... ९ वाजता..
बाबा : ओके... आपण कोण बोलताय? :-?
तो : मी नन्दू!.. काल रात्रीच आलो! :)
" बाबा " एकदम "नि:शब्द"........ :( :|
बाबांनी परत विचारले... तो परत म्हणाला : "मी नन्दू"!
बाबा : अरे मस्करी करतोस काय रे ? अणि काल कसा काय आलास ? :(
तो : अहो नाही.. मी खरंच नन्दू!.. काल रात्रीच जबलपूरवरून आलो!.. :-?
"जबलपूर" म्हटल्यावर बाबांना क्लिक झालं, की जी व्यक्ती वारली, तिच्या बायकोच्या आत्तेभावाचं नाव पण नन्दू'च आहे...! .. आणि तो "हा" नन्दु आहे... जो गेला.. "तो" हा नन्दु नाही! ;)
पण केवळ नामसाधर्म्यामुळे उडालेल्या गोन्धळामुळे तश्या परिस्थितीत देखील दोघांना हसू आले! :|
___________
असो..
माझ्या जुजबी ओळखीचे काही लोक आहेत. त्यापैकी काही पुरूष आहेत व काही स्त्रिया आहेत. त्यापैकीसुद्धा काही पुरुषांचा आवाज बायकी आहे. आणि काही स्त्रियांचा आवाज पुरुषी आहे... :-?
माझा नम्बर कुठून तरी मिळवून हे लोक मला कधीतरी फोन करत असतात... पण त्यांचा नम्बर माझ्याकडे सेव्ह नसल्याने माझा खूप गोन्धळ उडतो! ;)... की नक्की "कोण" बोलतंय?
;) ;) ;) =))
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
26 May 2010 - 11:33 pm | भारद्वाज
दोनही किस्से ह.ह.पु.वा. करतायत.
'लव यु' तर एकदम लाजवाब =))
सविस्तर प्रतिसाद आता देतोय.
माझा किस्सा:
१० वर्षांपूर्वीची गोष्ट. तेव्हा ९वी-१०वीत होतो. अल्लड प्रेमाचे दिवस. तिच्याशी नजरानजर होण्यासाठीच शाळेत जायचो. धडपड करून शाळेच्या कॅटलॉगमधून तिचा फोन नंबर मिळवला (लँडलाईनचे दिवस). एक दिवस घरून फोन लावला. फोनचा शेवटचा नं. दाबेपर्यंत धडधड टीपेला पोहोचायची आणि फोन लागल्यावर पलिकडून तिचा आवाज आला की काही केल्या मला आवाज फुटायचा नाही. मनात नसताना ब्लँक कॉल जायचा. असे १-२ दिवस झाले. तिसर्या दिवशी मला लागोपाठ १-२ ब्लँक कॉल आले. आयला म्हटलं भावना तिकडे पोहोचल्या वाटतं 8> . (त्या वयात आपण जे काही करतो तसे आपल्याबरोबर घडले की ते तिनेच केले असे उगाच, कारण आणि पुरावा नसतानाही वाटत राहते :X ). मनात मोरपिसारा फुलला !!! पुन्हा फोन वाजला की पहिल्या रिंगमधेच उचलून बोलायला चालू करायचे ठरवले. फोन वाजला. लगेच उचलला आणि पुढील संवाद घडला:
मी (लाडीक आवाजात) : अगं,आता तरी बोल. किती ब्लँक कॉल करतेस?
पलीकडचा पुरुषी आवाज : हॅलो सकाळ कार्यालय ?
फुललेला मोरपिसारा घडी घालून ठेवावा लागला :|
27 May 2010 - 12:59 am | शिल्पा ब
=)) =)) =)) =))
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
27 May 2010 - 1:42 am | नंदन
>>> फुललेला मोरपिसारा घडी घालून ठेवावा लागला
ठ्ठो! =)) =)) =))
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
26 May 2010 - 11:03 am | कोदरकर
आमच्या एका मित्राने मोबाइल नंबर बदलला आणि नवीन कार्ड वापरून मेसेज पाठवीला
" हा माझा नवीन नंबर आहे "
खाली नाव न टाकता..
आता बोला...
ज्यांनी फोन केला त्यांनाच कळाले की हा काटेचा नंबर आहे...
26 May 2010 - 11:07 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
मी पण हाच प्रकार केला. "This is new me." बस्स, पुढे नाव नाही, गाव नाही!
मग आपल्या डान्रावांचा प्रतिसाद आला: "This is old me -- Donya Abhyankar :D :D"
मग पुन्हा सगळ्यांना एसेमेस पाठवत बसले होते!
अदिती
26 May 2010 - 11:39 am | स्वाती दिनेश
मस्त किस्से, टार्याचे आणि प्रतिसादातलेही..
स्वाती
26 May 2010 - 11:48 am | स्पंदना
धन्याला एकदा साधारण सकाळी ११ च्या सुमाराला मेसेज यायला सुरु झाली. मजकुर साधारण असा...I liked your role in MSK but I love Salamaan . Please forward me his no."थोडावेळ असे मेसेज नंतर
"I understand his grief and only I can bring him solace pls give me his no." याला काही कळेना . सगळे मेसेजीस कलकत्त्या हुन. शेवटी घरी आला.
माझा धाकटा दिर हुशार. त्याला माहिती "मुझसे शादी करोगी" नावाचा नविन पिक्चर आलेला.आणि साधारण याच सुमारास ऐश्वर्या प्रकरण ऐरणी वर आलेल. यान बसुन आपल्या मित्राचा एक नं. फॉरवर्ड केला. पाच मिनिटात मेसेज वर शिव्या. सहा च्या सुमारास कलकत्त्या हुन एका माणसाचा फोन्..ही माझी मुलगी सलमान शी लग्न करायचा हट्ट धरुन बसलिय तो 'अक्षय भाई क्रुपा करके सलमानजी का नं. दे दिजिये" त्या मानसाला "अरे मै वो अक्षय नही सीधा सादा आदमी हुं " हे समजावुन सांगे पर्यंत नाकी नौ आले. कुणी तरी तिच वेड पाहुन मुम्बई च्या अक्षय चा पत्ता द्यायच्या नादात धन्याचा नं . दिला होता. पुढचे दोन दिवस आमच्या ह्यांची चाल बदलली होती....
शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
26 May 2010 - 11:50 am | llपुण्याचे पेशवेll
आमच्या एका मित्राच्या घरात खालच्या मजल्यावर ऑफिस होते. बरेच दिवस तो ऑफिसवाला जागा रिकामी करून देत नव्हता म्हणून वाद चालू होते. म्हणून आमचा मित्र सदर ऑफिसवाल्याला त्रास देण्यासाठी काहीही करत असे. कोणी दुपारी ऑफिसमधे नसेल तेव्हा ऑफिसच्या शिपायाची नजर चुकवून ऑफिसमधे जाई व तिथल्या फोनवरून उगाच कुठेही फोन लावत गप्पा मारत बसे. ऑफिसच्या १ तासाच्या लंच मधे त्याच्या मस्तं गप्पा होत. ;)
एकदा तर त्याने कडीच केली. उगाच कोणालाही फोन लावायचा आणि विचारयचा "हॅलो , देशपांडे आहेत का?". "नाही. राँग नंबर". "थांबा ठेऊ नका. आम्हाला कोणीही चालेल, आम्हाला भारताच्या राजकारणावर गप्पा मारायच्यात. "
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Phoenix
26 May 2010 - 12:26 pm | जयदीप
एकदा लाईट गेले असताना महाराष्ट्र विद्युत महा. च्या कार्यालयात दुरध्वनी लावला होता.
मी: आहो किति वेळ तुमचा फोन बीझी.
म रा वि म कार्यकर्ता: कोणता नंबर लावला तुम्ही?
मी: बाविस तिनशे चाळीस.
म रा वि म कार्यकर्ता: आहो तो चुकीचा नंबर आहे. आमचा नंबर "दोन तेविस चाळीस" आहे.
मी फोन ठेवला.
२२-३४० = २-२३-४० हे सुत्र अजुन त्याला कळालेले नाही. :D
26 May 2010 - 2:11 pm | सुमीत भातखंडे
=))
बाकी लेख आणि प्रतिक्रिया दोन्ही आवडले.
26 May 2010 - 5:37 pm | योगी९००
म्हणजे त्याने तुमचा पोपट केला म्हणायचा...फोन ठेवला कशाला..? कामाचे बोलून घ्यायचे ना..???
खादाडमाऊ
26 May 2010 - 6:52 pm | सुखदा राव
आमच लव्हलग्न. त्यामुळे रोज रात्री समस समस खेळत बसायची सवय. शेवटचा 'लव्ह यू' असा समस करुन झोपायचो. नवर्याच्या फोनबूकमध्ये माझ्या नावाच्या वर त्याच्या 'सुचेता' या बहिणीच अन खाली 'सुमेधा' या मैत्रीणीच नाव होत. १दा माझ्या ऐवजी बहिणीला 'लव्ह यू' चा समस केला. झाल, तिने इतर सगळ्या भावन्डाना तो समस पाठवला अन मग माझा नवरा बसला सगळ्याना उत्तर देत. हे तरी परवडल १दा त्या कोणा सुमेधाला असा समस केला. समस करुन हा झोपला त्यामुळे ह्याला महीतच नाही समस तिला गेल्याच. २ दिवसानी लक्षात आल की चुकुन तिला समस केला. मग 'सॉरी' म्हणाला तिला. तर ती बया म्हणे तोवर विचार करत होती 'हो' म्हणाव की 'नाही' याचा.
27 May 2010 - 1:11 am | Pain
=)) =)) =))
26 May 2010 - 8:36 pm | कलंत्री
सर्व वाचुन धमाल वाटली.
पूर्वीच्या काळी ( १५/२० वर्षापूर्वी) एका समाजामध्ये जावयाशी बोलताना पदर तोंडावर घेऊन बोलण्याची पद्धत असे. अश्या समाजामध्ये चुकून सासूने जावयाचा फोन घेतलाच तर ती स्त्री पदर तोंडावर घेऊनच बोलत असे. ( असे ऐकले आहे).
27 May 2010 - 12:46 am | jaypal
प्रतीसादात्मक किस्से आवडले
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
27 May 2010 - 12:51 am | टारझन
फोटू सिलेक्षन बद्दल हॅट्स ऑफ !!! जियो जैपाल जियो !!
- मेंढपाल
27 May 2010 - 12:54 am | jaypal
जियो शब्द कलजाला भिडले रे !!! =))
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
27 May 2010 - 10:35 pm | सुखदा राव
जावई अन सासूच्या फोनच्या प्रतिक्रियेवरून आठवले, माझी १ घुन्गट घेणारी मारवाडी मैत्रीण सासू-सासर्यान्चा फोन आला की घुन्गट ओढुन मगच फोनवर बोलायची.
11 Dec 2010 - 10:55 am | प्रसाद_डी
१ हाइट....
मी आनि मामा तालुक्या वरुन गावाला परत येत होतो.... मामा वैताग लेला होता.... त्याला काही तरी अठ्वले ..त्याने घरी कॉल केला...... ३- ४ वेळा केला कोनी उचलला नही..... वैतागला... शेवट्चा महनुण परत केला तर पोराने उचलला...
पोरगा: 'कोन ?'
मामा: 'मी' .....
पो : कोण? हॉलो?????????????'
मामा: 'मी आबा...' ..... (२- ३ वेळा झाल.. मामा वैताग ला... परत )
पो : हॉलो कोन हे?
मामा :'तुझ्या आ़ईचा नवरा फोन दी तीला....................... '
(पोर या वेळेला ऐकुन आईला फोन देतो....)
14 Feb 2011 - 5:56 pm | वपाडाव
हे तर नेहमीच घडणाऱ्या किस्स्यांपैकी आहे...
एकदा आमच्या एका मित्रानं घरी फोन केला.
आणी फोन उचलल्या उचलल्या गडी सुरु झाला.
"अबे #@$$@$, काही लाज-लज्जा है का नै तुला?
#@#@@, इतके दिवस झाले तुला गावी येऊन, पाय झडले का कै?
घरी तरफड ना @#@$$$!!! "
आमचे तीर्थरूप, (गम्भीर/कडक आवाजात)"हेलो, कोण बोलताय?"
"हेल्लो, काका स्वारी!! आनंदचा फोन आला नव्हता म्हणून सांगा.."
हे जेव्हा त्याने आम्हाला (मित्रांना) सांगितले तेव्हाच त्या गोष्टीचा सर्व पोरांनी कीस पाडला.
आजही मित्र त्याला फोन करून "आनंदचा फोन आला नव्हता म्हणून सांगा" असंच म्हणतात..