आगामी काळात होणार्या काही खगोलशास्त्रीय घटना पुढील प्रमाणे असून त्यांचा फलज्योतिषाच्या अंगाने विचार भविष्यकाळात डोकावून पहाणार्यांसाठी केला आहे.
या घटना अशा -
- दिनांक २७ मे २०१० रोजी सायन धनु राशीत ६अंश३२मि. वर होणारी पौर्णिमा
- दिनांक ११ जुलै २०१० रोजी सायन कर्क राशीत १९ अंश २३ मि. वर होणारे सूर्यग्रहण
- दिनांक ३१ जुलै २०१० रोजी सायन तूळ राशीत ०अंश ४९ मि वर होणारी शनि-मंगळ युती
या प्रमुख खगोलशास्त्रीय घटनांचा आढावा आपण आता घेऊ...
वरील पौर्णिमा खाली दिलेल्या कालावधीमध्ये ज्यांचे जन्म असतील त्यांच्या जन्मपत्रिकेतील शनीस सक्रिय करते आणि त्यामुळे ते शनीने मूळ पत्रिकेत केलेल्या योगांनुसार त्रासदायक ठरायची शक्यता बरीच आहे.
१३ एप्रिल १९३५ ते ६ मे १९३५, ७ ऑगस्ट १९३५ ते ३ ऑक्टोबर १९३५
१२ डिसेंबर १९३५ ते २७ जानेवारी १९३६, २९ जून १९४२१७ जुलै १९४२
४ नोव्हेंबर १९४८ ते ३० जाने १९४९, २३ जुलै १९४९ ते २५ ऑगस्त १९४९
२१ नोव्हे १९५६ ते २५ डिसेंबर १९५६, ९ जुलै १९५७ ते १४ सप्टेंबर १९५७
२१ मे १९६४ ते १० जुलै १९६४, १ फेब्रु १९६५ ते ६ मार्च १९६५
२ ऑगस्ट १९७१ ते ७ नोव्हेंबर १९७१, १८ एप्रिल १९७२ ते २० मे १९७२
१ सप्टेम्बर १९७८ ते ४ ऑक्टोबर १९७८, २८ मार्च १९७९ ते २० जून १९७९
वरील पौर्णिमा खाली दिलेल्या कालावधीमध्ये ज्यांचे जन्म असतील त्यांच्या जन्मपत्रिकेतील हर्षल सक्रिय करते आणि त्यामुळे ते हर्षलने मूळ पत्रिकेत केलेल्या योगांनुसार त्रासदायक ठरायची शक्यता बरीच आहे.
३१ ऑगस्ट १९४२ ते २० सप्टेंबर १९४२, २५ मे १९४३ ते १९ ऑगस्ट १९४३
१२ ऑक्टोबर १९४३ ते २४ मे १९४४, ३१ ऑक्टोबर १९६२ ते ३१ जाने १९६३
११ ऑगस्ट १९६३ ते १८ ऑक्टोबर १९६३, १५ फेब्रु १९६४ ते ३ ऑगस्ट १९६४
वरील पौर्णिमा खाली दिलेल्या कालावधीमध्ये ज्यांचे जन्म असतील त्यांच्या जन्मपत्रिकेतील नेपच्यून सक्रिय करते आणि त्यामुळे ते नेपच्यूनने मूळ पत्रिकेत केलेल्या योगांनुसार त्रासदायक ठरायची शक्यता बरीच आहे.
१ ऑक्टोबर १९३० ते १९ फेब्रु १९३१, ३ ऑगस्ट १९३१ ते २३ सप्टेंबर १९३२
९मार्च १९३३ ते २५ जुलै १९३३, १६ जाने १९७२ ते २९ एप्रिल १९७२
१५ नोव्हेंबर १९७२ ते ७ जाने १९७४
१९ मे १९७४ ते १० नोव्हेम्बर १९७४
वरील पौर्णिमा खाली दिलेल्या कालावधीमध्ये ज्यांचे जन्म असतील त्यांच्या जन्मपत्रिकेतील प्लुटो सक्रिय करते आणि त्यामुळे ते प्लुटोने मूळ पत्रिकेत केलेल्या योगांनुसार त्रासदायक ठरायची शक्यता बरीच आहे.
१५ सप्टे १९५९ ते ९ मार्च १९६०
१८ जुलै १९६० ते २१ सप्टे १९६१
११ मार्च १९६२ ते २४ जुलै १९६२
वरील कालावधीमध्ये जन्मलेल्या व्यक्तीनी ग्रहणाच्या पुढे व मागे १ आठवडा आपल्या सर्व व्यवहारात विशेष काळजी घ्यावी.
दिलगीरी
वर अनवधानाने २७मे रोजी चंद्र्ग्रहण असल्याचा उल्लेख अगोदर झाला होता. २७ मे रोजी फक्त पौर्णिमा असून ग्रहण २६ जुन २०१० रोजी आहे. येथे गणित करून काढलेल्या जन्मतारखा पौर्णिमेच्या प्रभावात येतात. यामुळे कुणाची दिशाभूल झाली असल्यास क्षमस्व...!
प्रतिक्रिया
23 May 2010 - 5:56 pm | शुचि
शनी-मंगळ युती पोलीस , मिलीटरी आदि क्षेत्रात काम करणार्या व्यक्तींत आढळते हे खरे आहे का?
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
23 May 2010 - 6:01 pm | युयुत्सु
ही युती ज्या पत्रिकेत दिसते त्या सहसा वैफल्यग्रस्त अथवा अपयशी असतात.
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
23 May 2010 - 6:20 pm | वेताळ
कि जवळ जवळ सर्वाना हे ग्रहण त्रासदायक ठरणार. ~X(
वरील व्यक्तींनी त्रासमुक्तिसाठी काही पुजापाठ करावेत का?
विशेषतः सत्यनारायण पुजा वैग्रे केल्यातरी चालतील का?
वेताळ
23 May 2010 - 10:18 pm | पाषाणभेद
वेताळ बालक!
>>>> "वरील व्यक्तींनी त्रासमुक्तिसाठी काही पुजापाठ करावेत का?"
असे अभद्र प्रश्न का बरे पुसीतोस? अरे केवळ वरील व्यक्तींनींच नाही तर समस्त मानव योनी धारण करणार्यांनी या ग्रहणकाळात पुजापाठ करावेत. राजेश घासकडवीबुवांनी सांगितलेली पुजा तुला माहित नव्हे काय? नसल्यास त्या पुजेच्या कहाणीचे पुस्तक बाजारात अगदी नाक्यानाक्यावर उपलब्ध आहेत. ते सुध्दा कमी किंमतीत! त्या पुजापाठाचे या काळात स्तवन करावे. आचमने करावीत. या काळात होणारे चंद्रग्रहण हे रात्री होणारे असेल. त्यामुळे रात्रीदेखील अंधार पडेल. तापमानात घट होईल. घराचे दरवाजे घट्ट मिटावेत व गृहदेवतेची पुजा करावी. इष्ट परिणाम साधण्यासाठी एक दिवस आधीच सराव करावा.
दुसर्या दिवशी व्रताचे उद्यापन करावे. नाडिपरिक्षा केलेली नसेल तर आधीच करवून घेणे.
विशेषतः सत्यनारायण पुजा तर अवश्य करावी. पण ती दुसर्या दिवशी. वेताळ बालका! तू पुजेचे वेळी इष्टमित्रांना अवश्य बोलवावे. त्यांनाही पुजेची महती सांगावी. पण ज्यानेत्याने पुजा घरीच करावी. सामूदायीक पुजेने मंगल स्वरांचे ध्वनी एकत्र येतात अन तो आवाज टिपेला पोहचतो. असो. काही अडचण असल्यास तोडगा करावा. शुभं भवतू!
----------------------------------
- पाषाणभट गुरूजी
डायबेटीस विरुद्ध लढा
माझी जालवही
23 May 2010 - 7:53 pm | भारद्वाज
म्हणजे चंद्रग्रहण पाहायला सायनला जायचे का =))
जय महाराष्ट्र
23 May 2010 - 11:21 pm | अनंत छंदी
ज्यांची जन्मतारीख वरील कालावधीतील नाही त्यांना ग्रहणाचे शुभ की अशुभ परिणाम भोगावे लागतील?
24 May 2010 - 7:47 am | युयुत्सु
त्यांना ग्रहण परीणाम शून्य ठरेल.
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
24 May 2010 - 12:49 am | मी-सौरभ
तरुण पिढी कडे लक्श न दिल्याबद्दल णिशेढ .....
-----
सौरभ
24 May 2010 - 3:04 am | इंटरनेटस्नेही
--
इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.
24 May 2010 - 7:57 am | सहज
आधीचे धागे
१९ सप्टें २००९ची आमावस्या, १६ मार्च २०१० रोजीची अमावस्या
या दोन दुव्यातील जन्मदिवस असणार्या मिपाकरांनी त्यांना/ त्यांच्या माहीतीतल्या लोकांना ते दोन दिवस काही त्रास झाला का किंवा धाग्यामुळे मिळालेल्या माहीतीने कसा फायदा झाला हे कृपया सांगू शकेल काय?
युयुत्सु तुम्हाला मिळालेला फीडबॅक काही शेअर कराल का प्लीज.
24 May 2010 - 8:21 am | युयुत्सु
मी कोणताही फीड्बॅक शेअर करू इच्छित नाही. कारण मी व्यक्तिगत privacy ला प्राधान्य देतो. माझ्याकडे नवराबायको जेव्हा सल्ल्यासाठी येतात तेव्हा एकमेकांचे एकमेकांना काहीही कळत नाही.
नुकत्याच इथे गाजलेल्या एका वादग्रस्त प्रकरणात काही जणांच्या पत्रिका माझ्याकडे असल्या मुळे मला त्यांची चर्चा करणे शक्य होते पण तत्वाच्या बांधिलकी मुळे ते शक्य होणार नाही.
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
24 May 2010 - 8:25 am | सहज
नुकत्याच इथे गाजलेल्या एका वादग्रस्त प्रकरणात काही जणांच्या पत्रिका माझ्याकडे असल्या मुळे मला त्यांची चर्चा करणे शक्य होते पण तत्वाच्या बांधिलकी मुळे ते शक्य होणार नाही.
त्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय एकदम जाहीर चर्चा करणे चुकीचेच आहे पण नावाचा उल्लेख न करता, अनुभव सांगुन लोकांना सावध करण्यात कायद्याने, अथवा तत्वाने काही चुकीचे आहे असे वाटत नाही. असो.
मिपाकरांना विनंती की शक्य असल्यास आपला अनुभव जरुर लिहावा. निनावी रहायचे असेल तर युयुत्सुंकरवी लिहावा.
24 May 2010 - 9:33 pm | टारझन
हा शब्द काळजाला भिडला ;) चला रात्रीचं डिणर घेऊन येतो आता !!
-(एफ.सी. कॉलेज रोड वर भटकणारा) यंगुत्सु
25 May 2010 - 9:00 am | गोगोल
आणि त्यात किती जण आणि कोण अडकले आहेत ते ही माहिती आहे. त्यातील काही जणांनी प्राइवेट मध्ये तुमचा सल्ला घेतला. पण ज्या अर्थी त्यांनी प्राइवेट मध्ये तुमचा सल्ला घेतला, त्या अर्थी त्यांना सगळ्यांसमोर ते भविष्यवर विश्वास ठेवतात किंवा तुमच्याकडे सल्याला येतात हे सांगायचे नव्हते. तरी ही तुम्ही काही जण तुमच्याकडे आले होते हे सांगून, तुमची जाहिरात करताना एक प्रकारे त्यांची प्राइवसी ब्रेक केली नाहीत काय?
25 May 2010 - 9:50 am | युयुत्सु
नावे उघड केली नसल्याने प्रायव्हसी ब्रेक होत नाही...
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
25 May 2010 - 10:56 am | सहज
फक्त मुद्द्याची माहीती सांगा, "प्रायव्हसी ब्रेक" करा असे कुठे म्हणालो होतो.
असो.
25 May 2010 - 11:14 am | युयुत्सु
संबंधीतानी त्याना वाटले तर ती माहिती तुम्हाला द्यावी. माझ्याकडून तरी ती मिळणार नाही...
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
24 May 2010 - 9:06 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
ग्रहण नक्की किती वाजता होणार? रात्री उशीरा होणार असेल तर त्रास होणारच, पाहिलं तर जाग्ररणाचा आणि नाही पाहिलं तर लालसर चंद्राचे फोटो न काढण्याचा!
(शनी) अदिती
24 May 2010 - 7:52 pm | पाषाणभेद
>>> ग्रहण नक्की किती वाजता होणार?
आमच्या जोतिर्विद्येच्या अभ्यासाने आम्ही खात्रीने सांगतो की, ग्रहण हे रात्रीच होणार आहे. तत्राप चंद्राची नाडी अद्याप हाती न पडल्याने त्याचा निश्चित कालावधी सांगणे कठीण आहे. असो.
ग्रहणकालात पुजाअर्चना जरूर करावी. नमस्तस्यै...नमस्तस्यै...
--------------------
- पाषाणभट
डायबेटीस विरुद्ध लढा
माझी जालवही
24 May 2010 - 8:20 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
'किती वाजता' या प्रश्नाचं उत्तर 'रात्री' असंही असू शकतं हे आजच समजलं! असो, तुमच्या सहीतला 'ओ' आणि ते इंग्लिश वाक्य अजून तसंच आहे. आणि हो मधुमेहाशी कसं लढायचं?
अदिती
25 May 2010 - 9:50 am | पाषाणभेद
ताई, तुमच्या प्रश्नाचे उत्तर या नविन धाग्यात लिहीले आहे. कृपया पहा.
http://www.misalpav.com/node/12461
मधुमेहाविरुद्ध लढा
माझी जालवही
24 May 2010 - 9:10 pm | धनंजय
भारतात दिवसउजेडाच्या काळात ग्रहण लागेल. थोडाच काल संध्याकाळचा. फोटो काढणे दुरापरस्त आहे.
नासा संकेतस्थळावरून (२६ जून २०१०):
फिकट सावलीचा स्पर्श :Penumbral Eclipse Begins: 08:57:21 UT = भा.प्र.वे. १४:२७:२१
गडद सावलीचा स्पर्श : Partial Eclipse Begins: 10:16:57 UT = भा.प्र.वे. १५:४६:५७
सर्वाधिक ग्रहण : Greatest Eclipse: 11:38:27 UT = भा.प्र.वे. १७:०८:२७
गडद सावलीतून मुक्ती : Partial Eclipse Ends: 12:59:50 UT= भा.प्र.वे. १८:२९:५०
फिकट सावलीतून मुक्ती : Penumbral Eclipse Ends: 14:19:34 UT = भा.प्र.वे. १९:४९:३४
(आजकाल पुण्यातला सूर्यास्त १९:०० - १९:०५ अशा समयी होतो आहे. म्हणून वाटते १९:०५ ते १९:४९ पर्यंत फिकट सावली तेवढी थोडीशी दिसेल.)
युयुत्सूंच्या लेखात तारीख "२७ जून" अशी दिलेली आहे. तिथी आणि तारीख यांच्यामधील तफावत, असे काहीतरी स्पष्टीकरण असावे. कोणास ठाऊक.
24 May 2010 - 9:36 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
२६ जूनला अमेरिकेतून ग्रहण दिसेल तेव्हा भारतात २७ जून असेल असं काहीसं स्पष्टीकरण असेल काय? कालनिर्णयाप्रमाणे भारतात २६ तारखेला संध्याकाळी ४:५९ ला पौर्णिमा संपेल. त्यामुळे ग्रहण दिसणं अशक्य वाटत आहे.
पण तसंही १९:०५ ते १९:४९ याच वेळात ग्रहण दिसणार असल्यास आजूबाजूच्या उंच इमारती आणि प्रदूषणामुळे ग्रहण लागलं आहे एवढं डोळ्यांनी कळलं तरी खूप!
अदिती
24 May 2010 - 10:11 pm | धनंजय
ग्रीनिचला जून २६ची सकाळ, म्हणजे भारतातही जून२६चीच दुपार...
शिवाय कालनिर्णयही पूर्णिमा जून २६लाच संपते, असे म्हणते आहे. पूर्णिमा संपल्यानंतर जून २७ला ग्रहण लागणे म्हणजे भौमितिक अशक्यता!
25 May 2010 - 8:50 am | युयुत्सु
ग्रहणाची पत्रिका
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
25 May 2010 - 8:55 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
वरच्या चित्रातून मला एवढंच कळलं, पुण्यातल्या कोथरूडमधून सकाळी ११ वाजून ३८ मिनीटांनी हे खंडग्रास चंद्रग्रहण सुरू असेल. (तेव्हा जी.एम.टी. ००:०० कसं असेल हे समजलं नाही.) हे ग्रहण आपल्याकडून "दिसणार"च नाही.
अवांतरः सदर सॉफ्टवेअर श्री. राजीव उपाध्ये यांच्या नावावर विकत घेतल्याचं वरील चित्रातून व्यक्त होत आहे! ;-)
अतिअवांतरः मधल्या मोठ्ठ्या चित्राचा अर्थ काय?
अदिती
25 May 2010 - 9:20 am | गोगोल
शरद उपाध्ये यान्चे कोण?
25 May 2010 - 9:47 am | युयुत्सु
व्यवसाय बन्धु! :)
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
25 May 2010 - 10:19 am | युयुत्सु
वरच्या चित्राचा अर्थ तुम्ही थोडा चुकीचा लावला आहे. हे चित्र वैश्विक वेळेस अमुक अमुक वाजता कोथरूड पुण्यात आकाश कसे दिसेल याचे चित्र दाखवते.
वरिल चित्र ग्रहण परमोच्च स्थितीला पोचलेले असतानाचे आहे, तेव्हा वैश्विक वेळ ११:३८ सकाळी आहे म्हणजे पुण्यात तेव्हा संध्याकाळी ५ वाजून ८ मि झाली असतील. वर्तुळाचा केद्र निरीक्षकाची जागा दाखवतो. Asc-Des या रेषेने वर्तुळ जेथे छेदले गेले आहे ते बिंदू क्षितीज दाखवतात.
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
25 May 2010 - 10:44 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
आता थोडं आणखी कळलं. धन्यवाद
अदिती
24 May 2010 - 11:44 am | अर्चिस
अद्वितीय विद्वत्तेच अभूतपूर्व दर्शन घडवणारा लेख. हा लेख वाचून खालील प्रश्नांची उत्तरे मिळाली
राज-उद्धव दिलजमाई सध्या नाहीच!
२०१६ पर्यंत राज्य लोडशेडिंगमुक्त करणे अशक्य
हृतिक-बार्बराला धक्काबुक्की
दिवसभरात उष्माघाताचे १० बळी
यूपीच्या मंत्र्यांना नेपाळमध्ये अटक
अंबानी बंधूंमध्ये शेकहँड!
25 May 2010 - 9:18 am | सहज
हा धागा तसेच या आधीचे असले धागे यातुन काही खरेखुरे अनुभव, घटना याची माहीती कळत नाही तोवर ह्या धाग्यांचे प्रयोजन कळत नाही.
युयुत्सु यांनी एका चांगल्या भावनेने लोकांना सावध करायला धागा काढला आहे पण अश्या धाग्यांचा नक्की उपयोग कळला तर आवडेल.
>त्रासदायक ठरायची शक्यता बरीच आहे.
का असे हर्षल, प्लुटो का ठरवतो की चला पुढच्या काही दिवसात....जर पुर्वी केलेल्या क्रियांमुळे म्हणजे आपलेच कर्म व भोग असतील तर मग बुरे काम का बुरा नतीजा इतकी म्हण पुरेशी नाही का? त्याकरता ग्रह, ग्रहण मधे कशाला?
> व्यवहार सावधानतेने करावेत
ते तर नेहमीच जेव्हा कधी कराल तेव्हा सावधानतेने केले पाहीजेत.
उगाच शब्दछलात न अडकता काही ठोस माहीती कळू शकेल काय?
25 May 2010 - 11:18 am | युयुत्सु
मूळ लेखातील १ल्या वाक्यात याचे उत्तर आहे.
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
25 May 2010 - 4:09 pm | युयुत्सु
ज्या लोकाना ज्योतिषाबद्दल आस्था आहे, तसेच जे ज्योतिषाचा योग्य उपयोग करून घेतात त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी हा धागा आहे. अन्य लोकानी करमणुक म्हणून याकडे बघितल्यास माझी हरकत नाही.
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
25 May 2010 - 9:26 am | jaypal
ही देशाची गरज आहे.
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
26 May 2010 - 2:15 am | पाषाणभेद
सही कार्टून आहे भावा. ज्योतिष अन भारत सरकार या दोन्हीं पार्टीज ला शालजोडीतले मारले आहेत.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
25 May 2010 - 8:47 pm | टुकुल
हे हे हे हे हे...
लै भारी चित्र रे जयपाला.
युयुत्सु, तुम्ही नावः भारत, जन्मतारीख १५ ऑगस्ट १९४७ वेळः जाणकार सांगतीलच, याची पत्रीका काढुन फलज्योतीषामार्फत भविष्य सांगा कि प्लिज.
--टुकुल
7 Jan 2014 - 2:43 pm | आयुर्हित
मला ह्या विषयाचे फार आकर्षण आहे. बरीच(पण तुमच्या मानाने क्षुल्लकच म्हणावे लागेल)माहिती मिळवली आहे, मिळवतो आहे.
कृपया मला ह्या विषयाची अधिक माहिती, मार्गदर्शन देऊ शकाल का?
आपला लाडका: आयुर्हीत
7 Jan 2014 - 3:12 pm | मारकुटे
सध्या ते फार व्यस्त असावेत असे दिसते. बरेच दिवसांत काही सल्ले दिलेले दिसत नाहित.