गाभा:
एका सहकार्याला मस्कत- ओमान येथे नोकरीची संधी चालुन आली आहे, त्या संदर्भात काही माहीती हवी होती.
- या ठीकाणचे एकंदर सामाजीक वातावरण कसे आहे?
- दोन मुले व दोन वयस्क यांना मध्यम्वर्गीय सुखवस्तु जीवनासाठी दर महीना किती रियाल लागतात?
- कायदा- सुव्यवस्था कशी आहे?
- भारतीय समाज कीतपत आहे? शिक्षणाची सोय कशी आहे?
मीसळ्पाववरील कुणी तिथे असेल किंवा कुणाला या बाबत माहीती असेल तर क्रुपया मदत करावी.
प्रतिक्रिया
25 May 2010 - 1:05 pm | कानडाऊ योगेशु
मि.पा चेच एक सदस्य विनायक रानडे बहुधा त्या भागात राहीलेले आहेत.
खाली त्यांच्या ब्लॉगची लिन्क देत आहे.
विनायक उवाच
त्यांना संपर्क करुन पाहा.
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
25 May 2010 - 2:29 pm | सन्जोप राव
मी ओमानमध्ये वर्षभर राहिलो आहे. ही अर्थात फार जुनी (१९९३) गोष्ट आहे. त्या वेळचे ओमान अत्यंत शांत व सुरक्षित होते. अद्यापही ते तसेच असावे असे मानण्यास जागा आहे. हिंदू देवतांचे देऊळ असलेले ते एकमेव आखाती राज्य होते. भारतीय लोक भरपूर आहेत. शिक्षणासाठी उत्तम शाळा आहे. महाराष्ट्र मंडळही आहे.कायदा- सुव्यवस्था उत्तम आहे. प्रगत विचारांचे राज्य असल्याने महिलांना मोकळीक आहे. काही माफक बंधने सोडली तर (उदा. रमजानमध्ये दिवसा उघड्यावर खाद्यपदार्थ खाण्यास बंदी वगैरे) इतर वेळी आपण एका मुस्लीम राज्यात आहोत याची जाणीवही होत नाही.
खर्चाच्या बाबतीत आता काय परिस्थिती आहे यावर प्रभाकर पेठकर अधिक प्रकाश टाकू शकतील. ते ओमानमध्ये बरेच वर्षे राहिलेले आहेत. आवश्यक असल्यास पेठकरांचा दूरध्वनी क्रमांक व्य.नि. मधून कळवू शकेन.
सन्जोप राव
ठोकर ना लगाना हम खुद है
गिरती हुई दीवारों की तरह
25 May 2010 - 3:48 pm | शैलेन्द्र
धन्यवाद, पेठकर काकांना भेट देतो गरज पडली तर..
25 May 2010 - 3:23 pm | पर्नल नेने मराठे
सोप्या शब्दात सान्गायचे म्हणजे
मस्कत =पुणे
दुबई = मुम्बई
चुचु
25 May 2010 - 3:43 pm | शैलेन्द्र
छान प्रतिसाद, फंडे क्लीअर झाले.
(म्हणजे १-४ दुकान बंद/ एम एम टी/ पाट्या इत्यादी इत्यादी का?)
पळतो आता.