उध्र्वपतन व रिव्हर्स ऑस्मॉसिस (उलटे सूक्ष्म शोषण) माहिती हवी आहे

Manoj Katwe's picture
Manoj Katwe in काथ्याकूट
25 May 2010 - 7:03 am
गाभा: 

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=723...

आत्ताच मी हि बातमी वाचली.
समुद्राचे पाणी गोडे करण्याबाबत हि उपाय योजना सरकार राबविण्याचा प्रयत्न करीत आहे.
ह्या बातमी मध्ये उध्र्वपतन व रिव्हर्स ऑस्मॉसिस (उलटे सूक्ष्म शोषण) ह्या प्रक्रियांचा उल्लेख आहे.
मी विकिपीडिया व इंटरनेट गुगलून पहिले पण काही जास्त उपयुक्त माहिती मिळाली नाही.

कोणी सोप्या भाषेत देऊ शकेल काय ?

प्रतिक्रिया

शैलेन्द्र's picture

25 May 2010 - 10:05 am | शैलेन्द्र

उर्ध्वपतन म्हणजे डीस्टीलेशन, पाणी तापवुन त्याची वाफ करायची, ति वाफ एका नळीने दुसर्‍या भांड्यात जमा करुन थंड करायची व परत पाणी तयार करायचे, या प्रक्रियेने तयार झालेले पाणी पीण्यासाठी तसे नीरुपयोगी असते कारण त्यात आवश्यक क्षार नसतात.

http://en.wikipedia.org/wiki/Reverse_osmosis

वरील लिंक रिव्हर्स ऑस्मॉसिसबद्द्ल माहीती देते. यात क्षारांचे प्रमाण कमी केले जाते पण पुर्ण काढुन टाकले जात नाही. "RO" या नावाने प्रचलीत असलेले पाणी गाळण्याचे यंत्र याच पद्धतीने काम करते. या पद्धतीचा एकमेव तोटा म्हणजे १ लीटर पाणी शुद्ध करताना ४ लीटर पाणी गाळनी धुण्यात जाते, पण समुद्रात पाण्याचे प्रमाण हे लिमीटेशन नसल्याने खारे पाणी गोडे करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे.

निरन्जन वहालेकर's picture

25 May 2010 - 10:53 am | निरन्जन वहालेकर

http://wikipedia.org/wiki/RO Desalination

वरील लिंक रिव्हर्स ऑस्मॉसिसबद्द्ल माहीती देते.

टारझन's picture

25 May 2010 - 11:24 am | टारझन

उध्र्वपतन व रिव्हर्स ऑस्मॉसिस (उलटे सूक्ष्म शोषण) माहिती हवी आहे

क्षणभर उचकी लागली होती ;)

शैलेन्द्र's picture

25 May 2010 - 11:41 am | शैलेन्द्र

बर झालं, शिघ्र गेली...

फटू's picture

25 May 2010 - 11:58 am | फटू

शिघ्र गेली.

बेक्कार हसलो राव. एक सल्ल्ला, असं संस्कृतप्रचूर लिहित जाऊ नका. काहींना संस्कृत मानवत नाही.

- फटू

फटू's picture

25 May 2010 - 12:02 pm | फटू

मनोजभाऊ, वॉटर बॉटलींग असं शोधा. खुप माहिती मिळेल. आपण जे बाजारातलं विकतचं पाणी मिनरल वॉटर म्हणून पितो, त्याच्यावर रिव्हर्स ऑस्मॉसिस ही प्रक्रिया केलेली असते.

- फटू

विसुनाना's picture

25 May 2010 - 12:58 pm | विसुनाना

ऊर्ध्वपतन नव्हे ऊर्ध्वपातन!