बाजार मांडियेला....!

विनायक पाचलग's picture
विनायक पाचलग in काथ्याकूट
21 May 2010 - 8:13 am
गाभा: 

''माझा मुलगा ना, आय.आय.टी. करतोय. " कुठे ना कुठे, कधी ना कधी तरी हे वाक्य तुम्ही ऐकले असेलच. कारण बारावी विज्ञान शाखेतील मुलांपैकी निम्मी मुले आज ''आयआयटी करत आहेत.'' ''आयआयटी'' त प्रवेश मिळविण्यासाठी अभ्यास करणे याचा शॉर्ट फॉर्म म्हणजे आय अय टी करणे .

आयआयटी ,भारतातली सर्वोत्तम अभियांत्रिकी शिक्षण संस्था, या संस्थेतून बाहेर पडणारा विद्यार्थी हा सर्वोत्कृष्टच असतो, असायचा... त्यामुळे तिथे जाण्यासाठी प्रयत्न तर सगळे करायचे. पण, त्याचा इतका बाऊ होत नव्हता. पण, साधारणतः २१ व्या शतकाच्या सुरवातीपासून सारेच बदलत गेले. माणसाच्या आणि समाजाच्या अपेक्षा वाढल्या.. 6 आकडी पगार खुणावू लागले. पण, त्यावेळी स्वत:तल्या क्षमतांची जाणीव करुन घेण्याइतपत वेळ मात्र आपण स्वतःला देऊ इछित नव्हतो. इंस्टट फूड सारखे इंस्टंट शिक्षण आणि पैसा मिळावा असे वाटु लागले . नेमका याचाच फायदा घेऊन आधी कोटा, राजस्थान येते, आणि नंतर संपूर्ण देशभरात आयआयटी क्लासेस सुरू झाले आणि यथावकाश त्यांचा बाजार झाला....

किती आहे या बाजाराची व्याप्ती? आजघडीला मला एकटयाला 50-60 आयआयटी प्रशिक्षण संस्था माहिती आहेत. ज्यांची वेगवेगळया शिक्षणविषयक मासिकात पानभर जाहिरात द्यायची क्षमता आहे. गावागावात आणि राज्याराज्यात असणारे शिलेदार वेगळेच....! अख्या भारतातुन साधारणत: 5 लाख विद्यार्थी या परिक्षेला बसतात. आणि, त्यातले कमीत कमी 75 टक्के लोक अशा संस्थांशी निगडीत असतात. आणि, या दोन वर्षासाठी फी 60,000 ते 2 लाख अशी असते. या सगळयांचा विचार केला, तर या क्लासेसची वार्षिक उलाढाल काही हजार कोटीत नक्कीच जाते....

या बाजारमुळे होणारा परिणाम म्हणजे विद्यार्थी, त्यांचे पालक तर नागवले जातात माझ्या काही मित्रांनी कर्ज काढून ही फी भरलेली आहे. हेसुध्दा एकवेळ मान्य केले असते. जर, खर्‍या अर्थाने या क्लासेसमध्ये शिक्षण मिळाले असते. पण, या सर्व संस्थांनी शिक्षणाच्या मूळ तत्वालाच हरताळ फासला आहे. दहावीत मी एका क्लासला होतो. त्या क्लासमुळे मी 94 टक्के चा 96 टक्के वर तर आलोच, पण माझा 70 टक्के चा एक मित्र 80 टक्केवर आला. आणि, आजही सरांना फोन केला, तर ते आमच्या बॅचचे यश म्हणून माझ्या मित्राचे नाव घेतात. कारण, ही आपली शिक्षण पध्दती आहे. कोणताही शिक्षक आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करतो, केला पाहिजे ,शाळेत तर हे व्हायचेच पण अगदी कॉलेजचे शिक्षणही बहुतांशी या तत्त्वावरच आधारलेले असते. या क्लासेसमध्ये या संकल्पनेलाच हरताळ फासलेला आहे. क्लास सुरू झाल्यानंतर काही दिवसातच 100 पैकी ज्या दहा मुलांकडून यशाची अपेक्षा आहे. अशांना वेगळे करून सर्व लक्ष त्यांच्यावर केंद्रीत केले जाते. आणि, त्यांना एक-दोन सोयी देण्यासाठी उरलेल्या 90 जणांचे पैसे वापरले जातात. आणि, इथेच हा बिझनेस होतो कारण अगदी त्या दहाजणांशीही यातल्या कोणत्याही शिक्षकाचे भावनिक नाते तयार होत नाही . कारण ती दहाजण त्यांच्यासाठी फक्त प्रॉडक्ट असतात. ज्यांचे मोठेमोठे फोटो छापून त्यांना पुढच्या वर्षीचा बिझनेस मिळणार असतो. आणि म्हणूनच या क्लासेसचा फॉर्म भरतानाच आम्ही तुमचा फोटो व नाव कधीही व कुठेही वापरू शकतो. असा नियम असतो.

साहजिकच विद्यार्थी हा प्रॉडक्ट बनल्याने आणि त्याचे यश हे एक प्रॉफिट स्टेटमेंट असल्याने मग त्यांच्या यशासाठी एक पॅटर्न बनवला गेला. कोटयात बनलेला हा पॅटर्न आता देशभर पसरलेला आहे. अतिमेहनत आणि काहीसे पाठांतर यावर आधारलेला हा पॅटर्न अर्थातच बिनबुडाचा आहे. आयआयटीमध्ये गेल्यानंतर पहिल्याच वर्षी नापास होणार्‍या मुलांची वाढलेली संख्या आणि आम्हाला टॅलेन्ट मिळत नाही आहे अशी आयआयटी प्रोफेसर्सची ओरड हे हीच बाब अधोरेखित करते. हे टाळण्यासाठी त्यांनी काही उपाय योजले, मात्र अर्थातच ते अपुरे ठरले.

महत्वाचे म्हणजे या व्यवसायाला अनेक कंगोरे आहेत.आपण आधी त्यांच्या गिर्‍हाईकांबद्दल पाहु( होय त्यांच्यासाठी ते गिर्‍हाईकच असतात) .सहसा दक्षिणेकडील माणसे ही बुध्दीवादी असतात. आणि, त्यांना मेंदूशी खेळायला आवडते. त्यामुळे असा समाज हा या क्लासेसचा ''सॉफ्ट टार्गेट'' असतो. कारण, हे विद्यार्थी 12 वी नंतर असणार्‍या परिक्षांचा अभ्यास सहावीपासूनच सुरू करतात. लक्षात घ्या, एका वर्षाला साधारण 50,000 फी धरली, तर फीच रक्कम वाढतेच. पण, ''सरावाच्या जोरावर ते सहज बाजीही मारतात.'' सर्वसाधारणपणे, इतर विद्यार्थी जे 2 वर्षात शिकतात, ते हे सहा वर्षात शिकतात. त्यांचा दुसरा सॉफ्ट टार्गेट विभाग म्हणजे उत्तरेकडचा भाग. यासंदर्भात मला जी माहिती मिळाली त्यानुसार या भागात ''हुंडा'' व तत्सम पध्दतीचे प्रस्थ हे फार मोठे आहे. आणि, एखाद्यापुढे ''आयआयटी'' ही डिग्री लागली की ती रक्कम आपोआप दुप्पट होते. याचा अर्थ, या शिक्षणाचा कोणताही खर्च त्यांना करायचा नसतो. आणि, ज्ञान किती मिळाले त्यांच्याशी त्याचा काहीही संबंध नसतो. त्यामुळे अर्थातच क्लासवाल्यांचे फावते. महाराष्ट्र व मध्य भारतात या दोन्ही Extremities नसल्या तरी माध्यम क्रांतीमुळे त्या आपल्यापर्यंत येतात, मोहवतात व आपण अलगद जाळयात अडकतो. मोठमोठे बॅनर ,आर्ट पेपर वर जाहिराती , एम बी ए झालेल्यांचे प्रोफेशनल बोलणे इ. गिर्‍हाइकाला भुलवणारे फंडे सोबतीला असतातच.

याशिवाय, या काळात विद्यार्थ्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. ज्यामुळे त्यांना यश तर मिळत नाहीच पण त्यांचा सर्वांगीण विकासही खुंटतो. पहिली गोष्ट म्हणजे हे क्लासेसवाले कोणत्याही मुलाला आयआयटी करायला देतात. त्याची लेवल तपासणे हे त्यांना गरजेचे वाटत नाही. अर्थात २00/- घेऊन ऍप्टीटयुड टेस्ट होतात. पण, त्या फक्त पैसे काढण्यासाठी आणि बिनकामाच्या असतात. कारण त्यात कमी गुण मिळालेल्यांना ऍडमिशन देताना मी स्वत: पाहिलेले आहे. दुसरे महत्वाचे म्हणजे फ्रँचाईजीकरण.... आजकाल या सर्व क्लासेसनी देशभर आपले जाळे विस्तारले आहे ते याच माध्यमातून.... पण त्यामुळे एखाद्या फ्रॅंचाईजी ओनरला प्रॉफिट झाला नाही की तो फ्रॅंचाईजी बंद करतो आणि मुलाना वार्‍यावर सोडतो. नवीन क्लास पाहिला तर पुन्हा तिथे पुर्ण फी भरायची ...म्हणजे जवळपास अशक्यच.. दुसरी गोष्ट अशी की, यातले बहुतांशी शिक्षक हे उत्तर भारतीय वा अतिदक्षिणेकडील असतात. त्यामुळे त्यांच्याशी, त्यंच्या भाषेशी आणि त्यांच्या शिकविण्याच्या पध्दतीशी विद्यार्थ्यांना समरस व्हायला वेळ लागतो. याशिवाय सीबीएसई अभ्यासक्रम जास्त उजवा ठरणे हेदेखील त्याला पोषक ठरते. या सगळयाशी मेळ साधेपर्यंत तो शिक्षकच नोकरी सोडतो. मग पुन्हा दुसरा शिक्षक पुन्हा हे सगळे चक्र.... शेवटी हा बिझनेस आहे, आणि ते पगारी कामगार ,त्यामुळे जिथे जास्त पगार तिथे ते पळतात. जेव्हा हे आपली डिग्री खोटी सांगू शकतात, तिथे बाकी सारेच शक्य आहे, नाही का?

या सर्वांमुळे मुलगा आयआयटी-जेईई पार करणे अवघड जाते . मात्र, तरीही AIEEE आणि CET या इतर परिक्षांचे मार्ग त्यांना खुले असतात. पण, अत्यंत दुर्देवाची गोष्ट अशी की, या क्लासेसच्या सांगण्यावरून मुले कॉलेजला दुय्यम लेखतात. वर्षवर्षभर कॉलेजला जात नाहीत. त्यामुळे त्यांना बेसिक नॉलेजही नसतेच नसते. अर्थात, सर्व कॉलेजसचा याला विरोध आहे. पण, सगळेच गेल्याने नाखुषीनेच त्यांनाही हे मान्य कराव लागलं आणि कॉलेज बुडवण्याला परवानगी द्यावी लागते . आणि या सगळया घोळात विद्यार्थ्यांची अवस्था ''ना घर ना घाट का'' अशी होऊन जाते.

या सगळयांचे परिणाम विद्यार्थी भोगतात . बर्‍याच विद्यार्थ्यांना आपण फसलोय , हे योग्यवेळी लक्षात येते. पण, त्यानंतर वाट बदलणे तितकेसे सोपे नसते.कारण आजकाल असलेली प्रचंड स्पर्धा ,आरक्षण वगैरे सारख्या गोष्टी यामुळे जागा कमी आणि विद्यार्थी जास्त अशी परिस्थिती झाल्याने तो गेलेला काळही फारच महागात पडतो. त्यामुळे, मग त्याचे भविष्य अंधारमय होते. परगावी आलेल्यांना होमसिकपणा येतो, अभ्यास एके अभ्यास केल्याने सर्वांगीण वाढ तर होत नाहीच( काही काही जण तर राज्य बदलतात .उदा . कोटा किंवा हैद्राबाद) आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, त्या नवयुवकाचा आत्मविश्वासच नाहिसा होतो, बाकी सारे मिळेल तो मात्र परत मिळणे फार अवघड...

अर्थात, ''हिरा मातीतही चमकतो'' त्यामुळे जे खर्‍या अर्थाने अतिशय बुध्दीमान आहेत ते बहुतेकदा तरतात.पण त्यांच्याही रँकवर फरक पडतो. शेवटी 5,00,000 मुले बसली तरी आयआयटीत 10,000 जणच जाणार आहेत ना? त्यामुळे, टिकणारे कमी आणि गळणारे नेहमीच जास्त असतात. सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे आपला खरा अनुभव सांगायला लोक घाबरतात. कचरतात, कदाचित कारण नसताना तो त्यांना त्यांचा पराभव वाटतो. आणि, त्यामुळे पुढ्च्यास ठेच आणि मागचा शहाणा असेही होत नाही आणि अगदी दरवर्षी एका एका क्लासेसमध्ये हजारे मुले प्रवेश घेतात, त्यांचा ''धंदा'' बिनदिक्कतपणे चालू राहतो.

हे सगळे पूर्णपणे थांबवता येईल की, याबद्दल मी साशंक आहे. पण, निदान हा बाजार आटोक्यात तरी आणता येईल. यासाठी, सर्व पातळयांवर प्रयत्न होणे गरजेचे आहे. कपिल सिब्बलानीम ध्ये 80 टक्के मार्कांचा निकष आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो हाणून पाडण्यात आला . या निर्णयामुळे निदान ही फुग 50 टक्क्यांनी कमी झाली असती. याशिवाय, यासंदर्भात महत्वाची पावले स्वत:च आयआयटी उचलु शकतात. या परीक्षासंदर्भात ते स्वतःच मार्गदर्शन करु शकतात. आयआय ई एल.एस. सारख्या परिक्षांबाबत हा मार्ग उपयुक्तरित्या चालू आहे आणि इंटरनेट सारखे माध्यम असताना बहुतांश ठिकाणी हे शक्य आहे. (नाहीतर वेगवेगळे क्लासेस, ई-पेपर, ई-क्लासेस काढून पैसे कमवत आहेतच की) आणि, यातला सर्वात महत्वाचा घटक म्हणजे समाज. समाजाचा एकुणच या ''आयआयटी'' कडे ,क्लासेसकडे आणि आपल्या पाल्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेल, तेंव्हा हे प्रश्न आपोआप सुटत जातील.निदान आपले खरे खरे अनुभव शेअर केले तरी फरक पडु शकतो. 14 तास काम करून पैसे कमवणारे यंत्र का एक उत्तम माणूस या दोन पर्यायापैकी जेंव्हा आपल्या पाल्याबद्दल माणूस या पर्यायावर प्रत्येक पालक क्लिक करेल, तेंव्हा सगळचं चांगल होईल.

शेवटी इतकेच की, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. कारण, नजीकच भविष्य ज्या नवयुवकांच्या हातात आहे. त्यांच्या आयुष्याशी या गोष्टी निगडीत आहे. हा! गेली दोन वर्षे मी या बाजारात आहे. कोणत्या जागेवर आहे ते माहित नाही, पण आहे. या दोन वर्षाचा जेंव्हा त्रयस्थपणे विचार केला, तेंव्हा जे जाणवलं ते मांडलं आहे. या विषयात अनेक भाग/मत मतांतरे आहेत. त्यातलं मला जे जाणवलं, जे सार्वत्रिक वाटले ते मांडलं आहे. हेच खरे, असेच करा असा अट्टाहास नाहीच आहे. पण , यावर विचार व्हावा अशी इच्छा आहे. आणि, म्हणूनच पहिल्यांदा मला स्वत: ला माझ्या विचारांशी प्रामाणिक राहता यावं म्हणून माझ्या निकालाआधी हे खरडलं आहे. इतकंच........ !

विनायक पाचलग
( सदरचा लेख साप्ताहिक साधनाच्या या आठवड्याच्या अंकात प्रकाशित झालेला आहे.)

प्रतिक्रिया

चिरोटा's picture

21 May 2010 - 10:45 am | चिरोटा

विचार करण्यासारखा लेख.
२००३ साली एका अमेरिकन चॅनलने आय आय टी वर एक कार्यक्रम बनवला होता."Its easier to get into Harward/MIT than to IIT"!कार्यक्रमात म्हंटले होते.
आंतरराष्ट्रीय पातळीवर आय आय टीज चे योगदान काय हा संशोधनाचा विषय असला तरी हल्ली आय आय टीतून पास होणे भारतात प्रतिष्ठेचे मानले जाते.
खरोखरच बारावी/आय आय टी परिक्षांचा बाजार झाला आहे.सुरुवातिला ह्या परिक्षेच्या तयारीचा मक्ता फक्त मुंबईच्या अग्रवाल क्लासेस(Top ranking students always almost come from Agrawal Classes!! वाले) आणि चेन्नईच्या ब्रिलियंट ट्युटोरियल्स कडे होता. अग्रवालची गंमत अशी की तुम्ही त्यांना उत्तरे पाठ्वली नाहीत तर पुढचे पॅकेट् ते पाठवत नसत.!
९१ साली मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारल्या नंतर पगार प्रचंड वाढू लागले.लोकसंख्या/इंग्रजीवर प्रभुत्व ह्यामुळे भारतिय अभियंत्यांची मागणी वाढली. आय आय टीला स्टार स्टेट्स होताच्.९०च्या दशकांनतर आंतर्राष्ट्रीय बाजारात अभियंत्यांची मागणी वाढली.इतर भारतिय संस्थांच्या अभियंत्यांसारखी आय आय टी अभियंत्यांना बाजारात किंमत आली.
मिडियाचा प्रचार,वाढते पगार आणि अर्थातच अमेरिकेतल्या काही (rags to riches)success stories हे घटक आय आय टी अभियंत्यांना सुपर स्टार स्टेट्स देण्यास कारणीभूत झाले.आय आय टी मधुन पास होणे म्हणजे जगात् कोठेही (वाचा-अमेरिका/कॅनडा) सेटल होवून पैसे मिळवण्याचा सोपा मार्ग हा समज त्यामुळे दृढ झाला.साहजिकच वाट्टेल ते करुन तेथे प्रवेश मिळवणे हे अनेकांचे ध्येय बनले.
सध्यातरी क्लासेसच्या/तीव्र स्पर्धेच्या दुष्टचक्रातून सुटण्याचा मार्ग दिसत नाही!!
P = NP

विनायक पाचलग's picture

21 May 2010 - 10:40 am | विनायक पाचलग

महत्वाची गोष्ट म्हणजे यावर जाहिरपणे फार कमी बोलले जाते.
मग आपणच बोलावे म्हणुन हा प्रयत्न ....
(जाता जाता - गेले १० दिवस आउट ऑफ स्टेशन असल्याने माझ्या आणि इतरांच्या एकाही लेखावर काही लिहु शकलो नाही ,त्याबद्द्ल दिलगिर आहे ,आता मात्र मला वेळ देता येईल असे वाटते )
विनायक

llपुण्याचे पेशवेll's picture

21 May 2010 - 10:40 am | llपुण्याचे पेशवेll

विनायका,
बरेच दिवसांनी चांगला लेख लिहीलास. बाकि उत्तर दक्षीण वर्गीकर तितकेसे पटले नाही. आमच्या आजूबाजूला तरी जे ८५ %च्या वर होते तेवढेच आणि काही नव'हुषार' मुलंच ;) प्रयत्न करीत. आमच्यासारखी सामान्य माणसे त्याच्या वाटेला जात नसत. उगाच बापाचा पैसा कशाला वाया घालवा. :)
उत्तर आणि दक्षिणेच्या शिक्षकांत तिथल्या स्थानिक भागातल्या शिक्षण पद्धती भिनलेल्या असतात. व त्यामुले कमीतकमी पुण्यातल्या मुलांना तरी त्रास होताना पाहीला आहे. कारण ते शिक्षक मुलांना अधिक माहिती आधीच असण्याची अपेक्षा करतात. आणि मग 'हे येत नाही तुम्हाला? ते येत नाही?' असेही म्हणतात. त्यामुले विद्यार्थ्यात न्यूनगंड येतो. असा न्यूनगंड व त्यामुळे आलेलं नैराश्य माझ्या आजूबाजूच्या अनेक मित्रांमधे मी पाहीलेलं आहे. शेवटी एक वर्ष मागे बसल्यावर सत्याची जाणीव झाली. ;) आता पुण्यातूनच इंजिनियरींग करून चांगले कमावतेही झाले आहेत सगळे.
अर्थात सन्माननीय अपवाद असतातच सगळीकडे. आमच्या एका मित्राचे अशा क्लासचे सर त्याला म्हणायचे अरे तू आयटीत जाणार नाहीयेस कारण तुझी क्षमता कमी आहे. पण पैसे भरून इथे आला आहेस तर अभ्यास कर. जीव तोडून कर. त्याचा फायदा इतरत्र नक्की होईलच. शेवटी आयआयटी म्हणजे संपूर्ण जग नव्हे. जगात सध्या सिव्हील इंजिनियर ना खूप मागणी आहे. ते बघ. तू सिव्हील इंजिनियर नक्की होऊ शकशील. बराच फायदा आहे त्यातही.
छान लेख .

पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Phoenix

सहज's picture

21 May 2010 - 10:40 am | सहज

मागे एकदा प्रभुसरांनी एक दुवा दिला होता की अभियांत्रीकीच्या किती जागा कुठे उपलब्ध आहेत. अ‍ॅडमिशनच्या सोयीसाठी.

बरं ठीक खूप पैसे खर्च न करता शिक्षण घेउन अर्थाजन करण्यात सुरवात केली तरी नंतर उत्तम लोकेशनला मोठे घर, कार, मोबाईल, इ. च्या मागे पैसा घालवणारच की लोकं

या ना त्या मार्गाने असा ना तसा पैसा खर्च होतोच.

बाजारव्यवस्थेत सगळेच आहोत.

धनंजय's picture

22 May 2010 - 8:39 pm | धनंजय

चांगला लेख. लेखनशैलीतली प्रगती सुद्धा अभिनंदनीय.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 May 2010 - 10:42 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

बाजार मांडला आहेच पण याला आपणही तेवढेच जबाबदार नाही का?

आयआयटी'च ग्रेऽऽट असतात यापेक्षा सेंट स्टीफन्ससारखी कॉलेजेस (भौतिकशास्त्राचा विचार करता तरी!) मला जास्त ग्रेट वाटतात. आपल्या देशाची लोकसंख्या, त्यात दरवर्षी बारावीतून इंजिनीयर बनण्यासाठी बाहेर पडणार्‍यांची संख्या, आयआयटीमधे उपलब्ध असलेल्या जागा आणि आयआयटीचं स्टेटस यांचा विचार करता आयआयटी काही विशेष लक्षवेधी काम करतात, शिकवतात यावर विश्वास ठेवणं कठीण असतं.

अ‍ॅडमिशन देतानाच हुशार मुलांना घेतलं की दर्जा टिकवणं कठीण नाही. यापेक्षा सेंट स्टीफन्स (दिल्ली), सेंट झेवियर्स (मुंबई) इथले भौतिकशास्त्राचे अध्यापक जास्त चांगलं काम करतात हे चटकन दिसून येतं. ही तुलना करून आयआयट्यांना कमी लेखायचं आहे असं नाही, पण इंजिनियरींगच्या पुढे काही करियर असतं हेच या पोरांना आणि त्यांच्या पालकांना माहित असतं का?

अलिकडच्या काळात 'जेईई' बकवास झाल्याचं शिक्षकांकडूनच कानावर येतं. आयआयटीमधून किती संशोधन होतं? आणि किती चांगल्या संशोधक आणि/किंवा अध्यापकांना ८०% पेक्षा जास्त मार्क मिळाले होते? बाजार कमी करा हे ठीक आहे, पण तरीही कितीतरी गुणवान विद्यार्थ्यांना दहा हजार (फक्त) या मर्यादेमुळे आयआयटीबाहेर रहावं लागत असेल?

अदिती

विनायक पाचलग's picture

21 May 2010 - 11:10 am | विनायक पाचलग

विषय काढलाच म्हणुन एक जबरी उदाहरण देतो...( एका वरिष्ठ पत्रकाराने सांगितले आहे.)
२००५ च्या प्रलयानंतर मुंबईच्या अभ्यासासाठी (जमीनीची उंची वगैरे- याचा टेक्निकल शब्द आठवत नाही) एक सदस्यीय समिती स्थापन झाल्यावर मुंबईच्या उंच सखल भागांच्या अभ्यास करुन नकाशा केला पाहिजे असे ठरले आणि हे काम आय आय टी ला दिले गेले .( सिव्हिल ईंजीनीअरींग च्या पहिल्या वर्षाला हा भाग असतो म्हणे ) तर गेल्या ४ वर्षात त्या कामात शुन्य प्रगती आहे ...
असो...
बाकी सहमत

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 May 2010 - 11:41 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

मराठी शब्द माहित नाही, गणित, खगोलशास्त्रात हमखास वापरला जाणारा शब्द टोपॉलॉजि!

अर्थात या प्रोजेक्टमधे नक्की कुठे गाडं अडलं आहे, पैसे दिले आहेत का, नक्की कोणी कधी काम करणं अपेक्षित आहे इ.इ. बाबी समजल्याशिवाय कोणावरही दोषारोप करता येणार नाही.

माझा आयआयटीवर राग आहे असं नाही, पण आयआयटीजना देव बनवून टाकलं आहे त्याबद्दल विषाद वाटतो.

अदिती

Dhananjay Borgaonkar's picture

21 May 2010 - 11:54 am | Dhananjay Borgaonkar

अत्यंत माफक प्रतिसाद.

मिसळभोक्ता's picture

22 May 2010 - 1:19 am | मिसळभोक्ता

माझा आयआयटीवर राग आहे असं नाही, पण आयआयटीजना देव बनवून टाकलं आहे त्याबद्दल विषाद वाटतो.

सहमत आहे, परंतु,

लंगड्या गायी वासरांत शहाण्या वाटतात, ह्याचा देखील विचार व्हावा.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

चिरोटा's picture

22 May 2010 - 9:26 pm | चिरोटा

सहमत. अमेरिकेतल्या आय्.व्ही.लीग्स विद्यापीठांतील पी.एच्.डी प्रोग्रॅम्सना वासरांपेक्षा लंगड्या गाईंना प्राधान्य मिळते ही वस्तुस्थिती आहे.
P = NP

इन्द्र्राज पवार's picture

21 May 2010 - 4:59 pm | इन्द्र्राज पवार

(जमीनीची उंची वगैरे- याचा टेक्निकल शब्द आठवत नाही)

याला शासकीय शब्द आहे = "प्रदेशनज्ञान" ~ टोपोग्राफीच्या जोडीचा, तर तुम्ही वर्णन केलेल्या त्यातील तज्ज्ञास म्हणतात "प्रदेशनकाशाकार"
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

मनिष's picture

21 May 2010 - 11:14 am | मनिष

अदितीशी सहमत. सविस्तर प्रतिसाद नंतर देतो!

परिकथेतील राजकुमार's picture

21 May 2010 - 11:37 am | परिकथेतील राजकुमार

च्यायला !!

दहावीत तुम्हाला ९६% पडले होते आणी तुमच्या मनाने तुमचे मित्र जरा मागेच होते, हे सांगायला येवढा मोठा लेख लिहिला होय ? त्यापेक्षा खरडवहीत मार्कलिस्ट (लेख डकवता तशी) स्कॅन करुन डकवली असती तरी चालले असते की.

©º°¨¨°º© साधनाकथेतील राजेंद्रकुमार ©º°¨¨°º©
आमचे राज्य

तु मग आता काय करायचे ठरवले आहेस?

वेताळ

विनायक पाचलग's picture

21 May 2010 - 12:01 pm | विनायक पाचलग

मी आय आय टीला जाणार नाही असे कुठे म्हटले?
निकाल लागेल तसे
( राजकारणाला शिव्या दिल्या तरी ते म्हणतील तसाच कारभार चालतो ,तसेच आहे हे..)
फक्त कोणीतरी बोलले पाहिजे म्हणून लिहिले..
निकाल लागल्यावर मी २ वर्षे त्रयस्थपणे जे पाहिले ते तितक्याच त्रयस्थपणे मांडु शकलो नसतो म्हणुन आत लिहिले इतकेच...

विनायक पाचलग
वाँट टु टॉक

वेताळ's picture

21 May 2010 - 12:07 pm | वेताळ

अगोदरच कोल्हापुरातुन खुप कमी मुळे आय आय टीला जातात.त्यातुन तुझ्याकडुन आमच्या अपेक्षा खुप आहेत.
तु कोणता कोचिंग क्लास जॉईन केला होतास?
वेताळ

Dhananjay Borgaonkar's picture

21 May 2010 - 12:13 pm | Dhananjay Borgaonkar

बाजार मांडला आहे हे खरय पण याला सर्वेस्वी आपणच जवाबदार नाही का??
आज मुल जन्माला आल की प्रत्येक आई बाप आधीच ठरवतो की तो , ती Engg झालाच पाहिजे. त्यासाठी ते वाट्टेल ती किंमत मोजायला तयार असतात. पालक Engg च्या पुढे विचारच नाही करु शकत.
जर का पोरगा Msc or तत्सम दुसरी डेग्री घेतली तर तो काय मठठ होतो का? पण नाही काही झाल तरी Engg झाला म्हणजे आयुष्याच सार्थक झाल असा समज अजुनही आपल्या समाजात आहे.
सहाजीकच यामुळे शिक्षण संस्थांच फावतं. परत शिक्षण संस्थांच privatization झाल्यामुळे सरकारचा कुठेच अंकुश नाहीये.
त्यातुन परत कोटा आहेच. एवढ सगळ करुन ओपेन वाल्यांच्या वाटेला अश्या किती जागा येणार?? मग मारामारी चालु.
९६% पुढेच अ‍ॅडमिशन. मग ९६% मिळवण्यासाठी उपाय काय?
मग कुठल्या ना कुठल्या क्लासेस लावा कोचिग घ्या.
सगळाच बाजार आहे.

फक्त एवढच नाही सर्व बड्या कंपनीज campus साठी पहिल्यांदी Engg prefer करतात. आणि मग नंतर non engg ला घेतात.
असही नाही की select झालेला engg कंपनीत येऊन खुप काही दिवे लावतो. पण ही आपली अजुन मानसिकताच झाली आहे की आपण engg च्या पुढे विचार नाही करु शकत.

विजुभाऊ's picture

21 May 2010 - 12:46 pm | विजुभाऊ

मध्यन्तरी पुण्यात पिंपरी-चिंचवड च्या एका संस्थेने एक सेमिनार आयोजित केला होता त्यात ते क्लासेस पूर्ण वेळ दोन वर्ष वेगवेगळ्या परीक्षांची तयारी करवून घेतात. एरवीची ऑनलाईन प्रवेशपद्धती न वापरता या संस्थेच्या विद्यार्थ्याना तेथल्याच एका कॉलेजात प्रवेश दिला जातो. मुले केवळ प्रॅक्टीकल्स साठी कॉलेजात जातात.
हे क्लासेस बाहेर गावच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या हॉस्टेलवर रहाण्याची सोय करतात.
क्लासेस ची फी रू.३ लाख. फक्त.
या क्लासेस चे रीझल्ट्स ते दाखवतात. तसे असतील देखील . पन मग तसे असेल तर ते आपल्या शिक्षणसंस्थांचे अपयश आहे.
शिक्षणसंस्था या विद्यार्थ्याना वेगवेगळ्या परीक्षांबाबत माहिती देत नाहीत. तसेच अभ्यास शिकविण्यात मुलाना विश्वासू वाटत नाहीत.
तीच गोष्ट. सी ई टी ची... सी ई टी न देणारे मुले ही...इतराना बौद्धीक दृष्ट्या मागास वाटतात . शिक्षक देखील त्याना हिणवतात.
सी ईटी जर विद्यार्थ्याचे भवितव्य ठरवणार असेल तर मग हव्यात कशाला बोर्डाच्या परीक्षा?

क्लिंटन's picture

21 May 2010 - 1:25 pm | क्लिंटन

आणखी एका छान लेखाबद्दल विनायक पाचलगचे आभार.

मला वाटते की प्रत्येक गोष्टीत मागणी आणि पुरवठ्याचे गणित असते. मी स्वतः आय्.आय्.टी ची जे.ई.ई दिली नव्हती. पण मी आय्.आय. एम मधील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी असलेली CAT ही परीक्षा देऊन त्यात चांगली कामगिरी करून आज आय.आय.एम. अहमदाबाद येथील व्यवस्थापन अभ्यासक्रमाचे पहिले वर्ष पूर्ण केले आहे. CAT आणि जे.ई.ई या वेगळ्या परीक्षा असल्या तरी या परीक्षांच्या 'मार्केट'चा विचार केला तर CAT आणि जे.ई.ई या दोन्ही परीक्षांना सामायिक मुद्दे लागू पडतील. तू उद्या आय.आय.टी चा विद्यार्थी होशील आणि आणखी चार वर्षांनी CAT किंवा जी.आर्.ई सारख्या परीक्षा पण देशील तेव्हा मला काय म्हणायचे आहे याचा तुला स्वतःला अनुभव येईल.

मला आय.आय.टी च्चे माहित नाही पण आय.आय.एम मध्ये आज शिक्षण घेत असलेले अर्ध्यापेक्षा जास्त विद्यार्थी CAT साठी कोणताही क्लास लावत नाहीत. ते अशा क्लासेसचे मटेरियल घेऊन स्वतः अभ्यास करतात. तसेच या क्लासेसच्या CAT साठीच्या प्रवेश परीक्षा देतात पण क्लासरूम कोचिंग मात्र लावत नाहीत. मी स्वतःही तेच केले होते.

या क्लासेसना एवढी मागणी का आणि ते कोणत्या आधारावर एवढी फी घेतात? त्याचे उत्तर आय.आय.टी आणि आय.आय.एम या शिक्षणसंस्थांमधील विद्यार्थ्यांना भविष्यात मिळत असलेल्या संधींमध्ये लपलेले आहे. या संस्थांमधील शिक्षण म्हणजे भविष्यकाळातील श्रीमंती आणि मानमरातब याचा 'पासपोर्ट' असेच समजले जाते आणि बहुतांशी परिस्थिती तशी आहेही. साहजिकपणे या संस्थांसाठीच्या प्रवेश परीक्षांमध्ये असलेली स्पर्धा वाढली. आमच्या संस्थेत सुनील हांडा नावाचे प्राध्यापक आहेत. त्यांनी १९७७ मध्ये CAT परीक्षा दिली तेव्हा ती परीक्षा देणारे एकूण विद्यार्थी होते २५००. मी २००८ मध्ये ती परीक्षा दिली तेव्हा ती परीक्षा देणारे विद्यार्थी होते २.५ लाख. म्हणजे एकूण विद्यार्थ्यांची संख्या १०० पटीने वाढली. तितक्या प्रमाणात जागा वाढल्या का? नक्कीच नाही. याचा परीणाम म्हणून स्पर्धा वाढली. आणि अशा स्पर्धेत टिकून पुढे प्रवेश मिळविणे म्हणजे एक मोठे दिव्य असते हे मी स्वानुभवावरून सांगतो.

याचा परिणाम म्हणजे अशा क्लासेसची मागणी वाढली आणि विद्यार्थी (त्यांचे पालक) कितीही फी भरायला तयार होऊ लागले. अर्थशास्त्राच्या सिध्दांतांप्रमाणे मागणी वाढली की किंमती वाढू लागतात. तेच गणित इथे. आज पुण्यात CAT परीक्षेसाठीचे हे क्लासेस २३ ते २५ हजार फी घेतात. मुंबई, दिल्ली या ठिकाणी ही फी अजून जास्त आहे. जे.ई.ई साठी क्लासेसची ५० हजार फी ही बातमी माझ्यासाठी नवीन आहे.

आता इथे मागणी-पुरवठ्याचे गणित कसे? समजा एखाद्या क्लासने जे.ई.ई साठी दोन लाख रुपये फी ठेवली तर त्या क्लासला विद्यार्थी मिळायची मारामार असेल. मग त्याला विद्यार्थी मिळवायला फी कमी करावी लागेल. हे क्लासेस एका प्रकारची सेवा देत असतात आणि त्या बदल्यात पैसे घेतात. त्या सेवेपासून आपल्याला किती समाधान मिळते हे ग्राहक ठरवतात. आणि भरायला लागलेल्या पैशाच्या तुलनेत समाधान कमी असेल तर ते ती वस्तू/सेवा विकत घेत नाहीत. असे बहुतांश लोक वस्तू/सेवा विकत घेईनासे झाले तर अशा विक्रेत्यांना किंमती कमी करणे भाग पडते आणि अशा पध्दतीने सर्व वस्तू/सेवा यांच्या किंमती ठरविल्या जातात. जोपर्यंत ५० हजार फी देणारे विद्यार्थी अशा क्लासेसना मिळत आहेत तोपर्यंत फी कमी होणार नाही.

एक आक्षेप म्हणजे असे क्लासेस विद्यार्थ्यांचा 'दर्जा' लक्षात न घेता सर्वांना या परीक्षा द्यायला प्रवृत्त करतात. मी स्वतःच्या उदाहरणावरून सांगतो की मला शाळेत कधीही ९६% मार्क मिळाले नाहीत.इंजिनियरींगला असताना अनेक विषयांमध्ये मी अगदी काठावर पास झालो आहे. कोणत्या विषयात कधी गचकलो नाही हेच नशीब. तरीही माझ्यासारख्या विद्यार्थी आज आय.आय.एम अहमदाबाद या भारतातील व्यवस्थापन क्षेत्रात प्रथम क्रमांकावर असलेल्या संस्थेत कसा काय? स्वतःकडे उगीचच मोठेपणा न घेता सांगतो की याचे कारण माझी जबरदस्त महत्वाकांक्षा आणि मी घेतलेले कष्ट यात आहे. आता माझी शाळा आणि इंजिनियरींगमधली गुणपत्रिका बघून माझा दर्जा कोणी क्लासवाल्याने काढला असता तर मात्र मी त्याला लाथाबुक्क्याने बदडायला कमी केले नसते. तेव्हा सांगायचा मुद्दा म्हणजे महत्वाकांक्षा, कष्ट आणि अर्थातच नशीबाची साथ या जोरावर सामान्य विद्यार्थीही अशा आघाडीच्या संस्थांमध्ये जाऊ शकतो. तेव्हा 'दर्जा' हा मुद्दा माझ्यालेखी तरी बाद आहे.

सर्व विक्रेते आपल्याकडील वस्तू/सेवेची जाहिरात करतात. तशीच जाहिरात हे क्लासवालेही करतात कारण तो एक व्यवसाय आहे. आता अशा जाहिराती केल्यामुळे होत असलेल्या खर्चामुळे किंमती वाढतात का? नक्कीच. 'सितारोंका साबून' लक्सने आजपर्यंत जवळपास सगळ्या तारकांना आपल्या जाहिरातींमध्ये वापरले. 'ये दिल मांगे मोर' च्या जाहिरातींमध्ये सचिन तेंडुलकर, शाहरूख खान ही मंडळी होतीच. त्यांनी फुकटात काम नक्कीच केलेले नाही. त्यांना दिलेल्या मोबदल्याचा बोजा सामान्य ग्राहकांवर पडतो का? नक्कीच पडतो. पण हेच सर्व प्रकारच्या बिझनेसच्या बाबतीत तितकेच लागू आहे. त्याचप्रमाणे आजच्या घडीला मोठ्या बिझनेसमध्ये नोकरीला असलेले managers कामानिमित्त बाहेरगावी गेले तर ते लहानसहान धर्मशाळेत उतरत नाहीत तर ते पंचतारांकित hotel मध्ये उतरतात. अनेकदा 'क्लाएंट' बरोबरच्या मिटिंग्स अशाच hotel मध्ये असतात. अशांचा विमानप्रवास महागड्या बिझनेस क्लासने असतो. अशा गोष्टींसाठी केलेला खर्च शेवटी कोण करतो?तो बोजा पडतो सामान्य ग्राहकांवर. ही बाब सगळ्या प्रकारच्या व्यवसायांबाबत लागू पडते. मग क्लासेसवरच आक्षेप का?

आणखी एक आक्षेप म्हणजे की हे क्लासेस 'कृत्रिम गरज' तयार करतात. पण सगळेच बिझनेस अशी कृत्रिम गरज तयार करतात आणि पैसे मिळवतात. १५ वर्षांपूर्वी मोबाईल फोन नव्हते तरी लोक त्यांचे व्यवहार पार पाडतच होते ना? तेव्हा मोबाईल फोन ही गरज आहे का? टूथपेस्टचा वापर वाढायच्या आधी लोक दात घासायचे नाहीत का? तसे नक्कीच नाही. ते लिंबाच्या काड्या वापरत आज पेस्ट वापरतात. तेव्हा टूथपेस्ट ही पण गरज आहे का? त्या अर्थी केवळ अन्न, वस्त्र आणि निवारा या गरजा आहेत. त्यातही अन्न हीच मूलभूत गरज आहे. इतर दोन गरजा तरी गुहेत राहत असलेल्या आदिमानवाला कुठे होत्या? तरी तो राहतच होता ना? तेव्हा सांगायचा मुद्दा म्हणजे सगळ्या प्रकारचे बिझनेस अशा कृत्रिम गरजा तयार करूनच पुढे जात असतात.

असे क्लासेस भरमसाठ फी घेतात का? घेतातच. मुंबईत चेंबूर या ठिकाणी ८० रूपयांपासून आलू पराठे आणि इतर पराठे विकणारे एक दुकान आहे. पराठ्यासारख्या गोष्टीला हा भरमसाठ रेट नाही का? आहेच ना. पण परत मागणी-पुरवठ्याचे गणित लक्षात घेतले तर हे दुकान एवढा भरमसाठे रेट कसा लावू शकते हे लक्षात येते.

तर मग प्रश्न कधी उभा राहतो? जेव्हा शिक्षणक्षेत्रात काम करत असलेल्याला अनेकदा कोणी 'बिझनेस' मानायला तयार होत नाही. जर शिक्षण हे निरपेक्ष वृत्तीने स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊनच दिले गेले पाहिजे असा आग्रह असेल तर मात्र असा बिझनेस करणारे क्लास आणि इतर बिझनेस यांच्यात फरक केला जातो. आय्.आय्.एम मध्ये येण्यापूर्वी मी अमेरिकेतही विद्यार्थी होतो. तिथल्या प्राध्यापकांनी संशोधनाला दिलेले योगदान मोठे असते हे सांगायलाच नको. तरीही अनेकदा हे प्राध्यापक भरपूर पैसे राखून असतात. आता अशा प्राध्यापकांनी पैसे कमाविणे गैर वाटत असेल तर मात्र त्याला काही इलाज नाही.

या क्लासच्या बाबतीत बहुतांशी अर्थशास्त्रातील competitive market लागू पडते. जर कोणा क्लासने दर्जेदार प्रशिक्षण दिले नाही तर त्याची वर्षभरात वाट लागू शकते.

सांगायचा मुद्दा म्हणजे हे क्लाससुध्दा एक 'बिझनेस' आहेत हे लक्षात घेतले तर असे सगळे प्रश्न उभे राहणार नाहीत.

विल्यम जेफरसन क्लिंटन

समंजस's picture

21 May 2010 - 1:47 pm | समंजस

सहमत.
मुद्दे पटलेत :)

(आपली गरज कशी भागेल हे ज्याचे त्याने ठरवावे. खिसा बघून, डोकं वापरण्याची क्षमता बघून, कष्ट करण्याची तयारी बघून)

भडकमकर मास्तर's picture

21 May 2010 - 2:12 pm | भडकमकर मास्तर

आजचा विनायकाच लेख विचार करण्याजोगा वाटला...
एक आक्षेप म्हणजे असे क्लासेस विद्यार्थ्यांचा 'दर्जा' लक्षात न घेता सर्वांना या परीक्षा द्यायला प्रवृत्त करतात.
आणि या विषयावरचे क्लिंटन यांचे मतही पटले...

_____________________________
श्याम, आजची पीढी अशी आहे का रे?हे असे चित्र का रंगवायचे? आणि असेल तर बदलायला नको का रे श्याम?

विनायक पाचलग's picture

21 May 2010 - 2:32 pm | विनायक पाचलग

क्लिंटन तुझ्या एकुण एक मुद्द्याशी सहमत आहे .....
आताशा मी क्लासेसला बिझनेस मानु लागलो आहे ,पण त्यांनी बिझनेस ची तरी इथिक्स पाळावीत अशी अपेक्षा आहे ...ते होत नाही ..
आणि क्लासेस ची कोल्हापुरातील फी मिनिमम ९० हजार आहे ...त्याच्याहुन जास्त पुण्यात..

स्वतःकडे उगीचच मोठेपणा न घेता सांगतो की याचे कारण माझी जबरदस्त महत्वाकांक्षा आणि मी घेतलेले कष्ट यात आहे.

याबाबतीत तरी २००% सहमत..
मी जो माझ्या गुणांचा उल्ल्लेख केला आहे ,तो आत्मप्रौढी आहे असे वाटु शकते .पण ते तसे नाही आहे .कारण हे गुण इथल्या सगळ्याना माहित आहेत..आणि त्याच्या प्रत्यक्ष आयुष्यात फारसा उपयोग नसतो हे अनुभवाने समजलेले आहे .फक्त दोन शिक्षण पद्धतीतला फरक प्रखरपणे जाणवावा म्हणुन ते वाक्य लिहिले आहे.
मात्र स्पष्ट आणि खरे सांगयचे अजुनही शिक्षण हा बिझनेस आहे हे लोकाना मान्य होत नाही आहे ,( ज्याप्रमाणे भक्ती ,श्रद्धा हासुद्धा बिझनेस अ‍ॅसेट आहे हे लोकाना समजलेले नाही.) मात्र त्याना स्वतःला मात्र प्रॉफिट हवा आहे..
आणि या घोळाचा फायदा उठवला जात आहे .
त्यामुळे हा बिझनेस आहे , हे लोकाना सांगणे हा या लेखाचा एक हेतु आहे..
@वेताळ - या बाजारात कमीत कमी गुरफटीन असा एक क्लास मी निवडला होता ( एक्सीड नावाचा) आणि या सगळ्या गोष्टीत न आडकता माझ्या मनाप्रमाणे वागत गेलो .माझ्या क्लास मध्ये ही हा बाजार झाला शेवटी शेवटी ,आणि त्याचा खुप मोठा तोटाही मला झाला ..
पण तो भाग अलहिदा..
आता ,मी पेपर दिला आहे ,आणि दोरी वरच्याच्या हातात आहे ,त्यामुळे निकाल काहीही लागला तरी चालेल..
फक्त त्याने माझ्या विचारात फरक पडेल की काय अशी शंका वाटल्याने गडबडीत लेख लिहिला ,नाहीतर एम पी एस सी व इतर परिक्षातही हे असेच काहीसे चालु आहे ,त्यावर लिहायचे होते..
( मास्तर ,चेष्टा आवरा हो...( श्याम ..श्याम ..))

विनायक पाचलग
वाँट टु टॉक

मिहिर's picture

21 May 2010 - 10:58 pm | मिहिर

क्लासेस ची कोल्हापुरातील फी मिनिमम ९० हजार आहे
आकडा वाढवतोस होय रे? माझ्या माहितीप्रमाणे आपल्या बॅचला कमाल फी ७५ हजार होती. आता काही क्लासनी १.५ लाखाची स्पेशल बॅच काढली आहे. पण मिनिमम फी ९० हजार म्हणणे जरा अतीच होते.

फटू's picture

21 May 2010 - 11:08 pm | फटू

मी या प्रतिसादाला मोठा प्रतिसाद देण्याआधीच "घरचा आहेर" आला. :)

- फटू

७५ हजार फी भरुन तु क्लास करायचा व आय आय टी जायचे अन बाकीच्यानी काय माशा मारायच्या काय?

14 तास काम करून पैसे कमवणारे यंत्र का एक उत्तम माणूस या दोन पर्यायापैकी जेंव्हा आपल्या पाल्याबद्दल माणूस या पर्यायावर प्रत्येक पालक क्लिक करेल, तेंव्हा सगळचं चांगल होईल.

आता तुझ्याबद्दल घरच्याच्या काय अपेक्षा आहेत ह्याबद्दल एकदा साधना मासिकात लिही रे.
वेताळ

विनायक पाचलग's picture

22 May 2010 - 8:25 am | विनायक पाचलग

तु गेल्या वर्षीचे आकडे बोलत आहेस रे ...
यावर्षीचे आकडे बघ....
निदान कोणाला तरी फोन लाऊन विचार...
@वेताळ -मी ७५ हजार दिलेले नाहीत,बाकी मी लावलेल्या क्लासबद्दल वरती लिहिले आहेच ,पण आधिक माहितीसाठी खरडवही आहेच..
आणि आई वडीलांच्या अपेक्षा ..
तर त्यांनी त्या आजपर्यंत माझ्यावर लादलेल्या नाहीत आणि पुढे लादतील असे वाटत नाही...
@फटु- अहो ,तो प्रतिसाद मी अत्यंत गडबडीत दिला होता हो, हा थोडासा खळखळाट जास्त आहे हे मान्य ....
राहिता राहिला जाणिवेचा भाग ,क्लास निवडताना असे काही असते हे अगदी थोड्याफार प्रमाणावर कळाले होते,म्हणुन तेव्हा जरा विचार केला होता. पण पाण्यात पडल्यानंतर लक्षात आले की पाणी फारच खोल आहे .(आणी मी या सगळ्यातुन अलिप्त नव्हतो असे मी आधीच वर म्हटले आहे )

विनायक पाचलग
वाँट टु टॉक

मिहिर's picture

22 May 2010 - 10:13 pm | मिहिर

फी वाढल्या असल्या तरी मिनिमम ९० हजार म्हणण्याइतक्या नक्कीच नाही. मी तुला ८० हजारच्या आत फी असणारे २-३ तरी क्लास सांगू शकतो.

पक्या's picture

22 May 2010 - 10:55 pm | पक्या

>>आपल्या बॅचला कमाल फी ७५ हजार होती. आता काही क्लासनी १.५ लाखाची स्पेशल बॅच काढली आहे. पण मिनिमम फी ९० हजार म्हणणे जरा अतीच होते.
अहो ९०००० काय आणि ८००००, ७५००० काय , ही काय फी झाली का? या अशा क्लासेसचे अतिच प्रस्थ माजले आहे सध्या.

- जय महाराष्ट्र , जय मराठी !

टारझन's picture

22 May 2010 - 11:06 pm | टारझन

अहो ९०००० काय आणि ८००००, ७५००० काय , ही काय फी झाली का? या अशा क्लासेसचे अतिच प्रस्थ माजले आहे सध्या.

जाऊ नका ना !!! विषय संपला!! क्लासवाले काय रोज खरडवहीत येऊन "प्लिज ९०हजार भरा आणि क्लास ला या " म्हणुन मागे लागतात काय ?

बाकी एवढे पैसे भरुन क्लासला जाणार्‍यांची प्रतिभा आगाधंच समजली पाहिजे, नाही का ?

- तुक्या

पक्या's picture

22 May 2010 - 11:10 pm | पक्या

मग तेच तर म्हणतोय ना मी. क्लास हवेतच कशाला एवढ्या फीया भरून.
- बावधन

जय महाराष्ट्र , जय मराठी !

मनिष's picture

22 May 2010 - 11:40 pm | मनिष

१०वी च्या मार्कांवर फी बदलते का?

माझ्या ओळखीच्या एकाला १० वीत ९९.८% पडलेत!!! पण ते मार्च आणि ऑक्टोबर मिळून. मार्चात ४७.८ मिळाले, पण बिचारा मराठीत गचकला, पुढे भाषेची चांगली 'साधना' करून मग ५२% स्कोर केले. तर असे एकूण ९९.८% मिळालेत त्याला १० वीत, आणि आता आय. आय. टी. त जाईन म्हणतोय. किती फी पडेल क्लास ची?

(खुद से बातें करते रहना : च्यायला, ९६% मार्कात चांगले दोघे पास होतील १०वीत. आज भारतात साधारण ४६.७३२% [99.8% statistics are made up on the spot] मुलं-मुली १०वीत नापास होतात. असे असतांना, एकट्यानेच ९६% मिळवणे ही मार्कांची केवढी उधळपट्टी? केवढा स्वार्थीपणा? 'साधना' सारख्या दर्जेदार समाजवादी मासिकात लिहिणार्‍यांकडून तरी ही अपेक्षा नव्हती! :()

फटू's picture

21 May 2010 - 11:05 pm | फटू

लेख लिहिण्यासाठी तू या विषयाचा बारकाईने अभ्यास केला आहेस हे जाणवतं. लेखामधून या सार्‍यामुळे तूझी होणारी घालमेलही जाणवते. पण तरीही लेखाला प्रतिसाद न देता तुझ्या या प्रतिसादाला प्रतिसाद देतोय....

कारण,

आताशा मी क्लासेसला बिझनेस मानु लागलो आहे ,पण त्यांनी बिझनेस ची तरी इथिक्स पाळावीत अशी अपेक्षा आहे...

या वाक्याला मराठी वाक्य म्हणायचं की ईंग्रजी? क्लास, बिझनेस आणि इथिक्स या ईंग्रजी शब्दांना सहज, सोपे असे पर्यायी मराठी शब्द आहेत. अगदी क्लास हा नेहमीच्या वापरात रुळलेला शब्द सोडला तरीही बिझनेस आणि इथिक्स हे शब्द खटकतात. असो.

मी जो माझ्या गुणांचा उल्ल्लेख केला आहे ,तो आत्मप्रौढी आहे असे वाटु शकते .पण ते तसे नाही आहे .कारण हे गुण इथल्या सगळ्याना माहित आहेत..आणि त्याच्या प्रत्यक्ष आयुष्यात फारसा उपयोग नसतो हे अनुभवाने समजलेले आहे .फक्त दोन शिक्षण पद्धतीतला फरक प्रखरपणे जाणवावा म्हणुन ते वाक्य लिहिले आहे.
का कोण जाणे परंतू ही वाक्ये वाचली आणि "उथळ पाण्याला खळखळाट फार" ही म्हण आठवली.

या बाजारात कमीत कमी गुरफटीन असा एक क्लास मी निवडला होता ( एक्सीड नावाचा) आणि या सगळ्या गोष्टीत न आडकता माझ्या मनाप्रमाणे वागत गेलो .माझ्या क्लास मध्ये ही हा बाजार झाला शेवटी शेवटी ,आणि त्याचा खुप मोठा तोटाही मला झाला.
घ्या... एव्हढं चांगलं विश्लेषण केलंस पण तूही तेच केलं आहेस जे दुनिया करतेय. आता असं म्हणू नको की जे माझ्या बाबतीत झालं ते वगैरे वगैरे. बाजारात कमीत कमी गुरफटीन असा एक क्लास मी निवडला होता तुझं हे वाक्य अगदी स्पष्ट सांगतं की त्या शिकवणी वर्गाला जाण्यापुर्वीच तुला या सार्‍या गोष्टींची जाणिव होती. लोकांना शिक्षणाचा बाजार समजावण्याआधी मी माझं "आयायटी" करून घेतो. असंच ना ;)

आता ,मी पेपर दिला आहे ,आणि दोरी वरच्याच्या हातात आहे ,त्यामुळे निकाल काहीही लागला तरी चालेल..
बापरे... अवघड आहे... ईथे वरच्या संबंध कुठे येतो? मला नाही वाटत त्याच्याकडे जेईईच्या अडीच लाख (किंवा पाच लाख... जो काही आकडा आहे तो) उत्तरपत्रिका नजरेखालून घालण्याएव्हढा वेळ असेल. :P

...फक्त त्याने माझ्या विचारात फरक पडेल की काय अशी शंका वाटल्याने गडबडीत लेख लिहिला.
विमान फारच वरुन गेलं ब्वॉ...

असो. पुन्हा एकदा लिहावंसं वाटतं की लेख अगदी वस्तूस्थितीवर प्रकाश टाकणारा आहे. लेखाचा मुद्दा जरी "आयायटी" हा असला तरी मांडलेले मुद्दे सर्व प्रकारच्या शिकवणी वर्गांना लागू होतात.

- फटू

समंजस's picture

21 May 2010 - 1:46 pm | समंजस

+१

विनायक प्रभू's picture

21 May 2010 - 1:59 pm | विनायक प्रभू

कायच कळ्ळे नाही.

स्वप्निल..'s picture

22 May 2010 - 8:50 am | स्वप्निल..

हेच म्हणतो :)

संजा's picture

21 May 2010 - 4:41 pm | संजा

खुप छान आणि विचारपुर्वक लिहिलेला लेख. विनायक राव तुम्ही वयाने लहान असलात तरी तुमची प्रतीभा अफाट आहे. तुमच्यावर होणारी टीका ही केवळ व्यक्तीगत ईर्षेपायीच होते आहे यात शंका नाहि. तरी तीकडे दुर्लक्श करुन असेच लिहित रहा. पुलेशु.

संजा

टारझन's picture

21 May 2010 - 5:34 pm | टारझन

>>> विनायक राव तुम्ही वयाने लहान असलात तरी तुमची प्रतीभा अफाट आहे.
अगदी !! विणायकरावांच्या प्रतिभेचे काहीही लिमिट नाही हो ... अगदी बरोबर

>>>तुमच्यावर होणारी टीका ही केवळ व्यक्तीगत ईर्षेपायीच होते आहे यात शंका नाहि.
=)) =)) =)) =)) =)) जबरदस्त सत्यवचन :)

- (गांजा प्रेमी) मुंजा
माझी सदर प्रतिक्रिया मिसळपाव वर छापुन आली आहे.

सुचेल तसं's picture

21 May 2010 - 5:40 pm | सुचेल तसं

:))

---------------------------------------------
भूत/पिशाच्च/हडळींनो - वाटते का हो तुम्हांस स्वतःची भिती , मध्यरात्री?

संजा's picture

21 May 2010 - 8:19 pm | संजा

टारझन राव मी यात हसण्यासारखे काय लीहीले आहे ते सांगीतले तर बरे होईल.
टीका करण्याआधी विनायकचे साधना मधले लेख वाचा म्हणजे तुम्हाला त्याच्या प्रतिभेचे प्र्त्यंतर येईल.

संत ज्ञानेश्वरांनाही अशीच टिका सहन करावी लागली होती याचा विसर पडू देउ नका.

संजा

टारझन's picture

21 May 2010 - 10:18 pm | टारझन

टारझन राव मी यात हसण्यासारखे काय लीहीले आहे ते सांगीतले तर बरे होईल.

=)) =)) =))
=)) =))
=))

टीका करण्याआधी विनायकचे साधना मधले लेख वाचा म्हणजे तुम्हाला त्याच्या प्रतिभेचे प्र्त्यंतर येईल.

=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=))

संत ज्ञानेश्वरांनाही अशीच टिका सहन करावी लागली होती याचा विसर पडू देउ नका.

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=))

अवांतर :
१. येथे टिका केल्याचे दाखवुन द्यावे.
२. "प्र्त्यंतर" हा शब्द काळजाला भिडला.
३. कोदारुपी ज्ञाणेश्वर पाहुन आज डोळे पाणावले.

- (ज्ञानेश्वरांवर टिका करणारा) विसोबा खेचर

तुम्ही त्यांचे मिसळपाव वरचे लेख वाचा म्हणजे तुम्हाला त्यांच्या अगाध प्रतिभेचे प्र्त्यंतर येईल

संजा's picture

21 May 2010 - 10:55 pm | संजा

>>>१. येथे टिका केल्याचे दाखवुन द्यावे.
हसून लोळल्याच्या स्मायली ह्या टीका कींवा चेष्टा करण्यासाठीच नाहीत काय?

>>>२. "प्र्त्यंतर" हा शब्द काळजाला भिडला.
तो शब्द प्रत्यंतर असा आहे.

>>>३. कोदारुपी ज्ञाणेश्वर पाहुन आज डोळे पाणावले.

टिका करणे ही खुप सोपी गोष्ट आहे. तरी तूमचे डोळे पाणावलेले वाचुन बरे वाटले.

>>>तुम्ही त्यांचे मिसळपाव वरचे लेख वाचा म्हणजे तुम्हाला त्यांच्या अगाध प्रतिभेचे प्र्त्यंतर येईल
मी त्याचे साधना व मिसळपाव वरील सर्व लेख वाचले आहेत व त्यामूळेच मी विनायक चा जबरदस्त फॅन आहे. त्यांच्या अगाध प्रतिभेचे प्रत्यंतर (शब्द सुधारला आहे) मला आधीच आलेले आहे. भविष्यात तो 'मोठा' होईल याची मला खात्री आहे.

संजा.

टारझन's picture

21 May 2010 - 11:04 pm | टारझन

हसून लोळल्याच्या स्मायली ह्या टीका कींवा चेष्टा करण्यासाठीच नाहीत काय?

अच्छा , मी हसण्या आधीच तुम्ही ते ओळखुन "टिका इर्ष्येतुन वगैरे होते" लिहीलं होतं तर .. =)) जबरदस्त आहात :)

तो शब्द प्रत्यंतर असा आहे.

=)) खुलाश्याबद्दल धण्यवाद ... तो शब्द तरीसुद्धा काळजाला भिडला !!

मी त्याचे साधना व मिसळपाव वरील सर्व लेख वाचले आहेत व त्यामूळेच मी विनायक चा जबरदस्त फॅन आहे.

न विचारता केलेल्या खुलाश्याबद्दल धन्यवाद. तुम्ही फॅन असा किंवा कुलर असा किंवा गीझर असा , आम्ही काय करावं अशी अपेक्षा आहे ?

त्यांच्या अगाध प्रतिभेचे प्रत्यंतर (शब्द सुधारला आहे) मला आधीच आलेले आहे.

वा वा वा ! बहुत अच्छे .. बहुत अच्छे ... बरं मग ? अगाध महिम्यावर एखादी पंचारती वगैरे ?

भविष्यात तो 'मोठा' होईल याची मला खात्री आहे.

आम्ही कुठे म्हंटलं कोदाला बॉन्साय केलाय म्हणुन ?

बाकी तुमच्या द ग्रेट मोठ्या फॅण्सधारी ज्ञाणेश्वरांना खुप खुप खुप जाहिरात का हो करावी लागतेय ? ;)

-(ज्ञानेश्वरांचा प्रमोटर) निंजा

संजा's picture

21 May 2010 - 11:16 pm | संजा

>>>तुम्ही फॅन असा किंवा कुलर असा किंवा गीझर असा
खुपच छान विनोद. खूप हसायला आले.

>>>अगाध महिम्यावर एखादी पंचारती वगैरे
नक्कीच. तसे त्याचे कर्तुत्वच आहे.

>>>आम्ही कुठे म्हंटलं कोदाला बॉन्साय केलाय म्हणुन
>>>बाकी तुमच्या द ग्रेट मोठ्या फॅण्सधारी ज्ञाणेश्वरांना खुप खुप खुप जाहिरात का हो करावी लागतेय

तुमच्याही डोक्यावरना चेंडु जातो तर. =))

संजा

टारझन's picture

21 May 2010 - 11:26 pm | टारझन

खुपच छान विनोद. खूप हसायला आले.

आहो , विनोद कुठे केला ? सिरियसली लिहीलं ते ? जिथे विनोद करतो तिथे नको ते खुलासे देत बसता , आणि साध्या वाक्यांना विनोद म्हणता? कमाल आहे बॉ .. असो .. ज्ञानेश्वरांच्या फॅन्स चा महिमा अगाध आहे :)

नक्कीच. तसे त्याचे कर्तुत्वच आहे.

यौंद्या , वाट पाहातोय :) बाकी मी सुद्धा झायद खाण चा जब्बरदस्त फॅण आहे .. आणि पर्‍या तर "राहुल रॉय" साठी एकदम वेडा आहे वेडा :) त्यामुळे तुम्हीच आमचे स्फुर्तीस्थाण आहात :)

तुमच्याही डोक्यावरना चेंडु जातो तर.

क्या बात ! क्या बात !! क्या बात !!!

-("वरना" चेंडु वेल लेफ्ट) मांजा

मिसळभोक्ता's picture

22 May 2010 - 1:27 am | मिसळभोक्ता

कोदाने वडवाग्नी चेतवला आहे, आणि टार्‍या मुक्ताई बनून त्याच्या पाठीवर भुट्टे शेकते आहे, असा प्रसंग डोळ्यापुढे उभा राहिला.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

फटू's picture

22 May 2010 - 8:54 am | फटू

मिभोकाका, कल्पनाविलास एकदम भारी...

आम्हाला तर एकदम ताटीच्या अभंगांची आठवण झाली

लेखक पावन मनाचा | साही प्रतिसाद जनाचा ||
जाणते रागें झाले वन्ही । "संजा" सुखें व्हावें पाणी ||
प्रतिसाद शस्त्रें झालें क्लेश । घ्यावा नव्या लेखाचा ध्यास ||
मिपा "प्ल्याटफार्म" "नेट" द्वारा । लेख पाडा कोज्ञानेश्वरा ॥

- फटू

Pain's picture

27 May 2010 - 2:35 am | Pain

भविष्यात तो 'मोठा' होईल याची मला खात्री आहे.

आम्ही कुठे म्हंटलं कोदाला बॉन्साय केलाय म्हणुन ?

=)) =)) =))

फटू's picture

21 May 2010 - 11:25 pm | फटू

ज्ञानेश्वरांवर नितांत श्रद्धा असल्यामुळे दुचाकीच्या पुढे "इंद्रायणी" असं रंगवून घेतलंय. विचार करतोय, मागच्या बाजूला कुठेतरी "पंचगंगा" असं लिहून घ्यावं काय. ह. घ्या. :)

... एकदम ज्ञानेश्वरांचं उदाहरण देणं जरा अती होतंय...

- फटू

बाळकराम's picture

22 May 2010 - 2:01 am | बाळकराम

बाळ संजा आणि कोदा,

तुम्हाला शेंबूड काढायची तरी अक्कल आहे का? अरे कुठे संत ज्ञानेश्वर आणि कुठे हे बेणं? बाळ विनायक, तू तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे, उगीच नापास बिपास होशील आणि आई-बापाला डोकेदुखी करशील!
संपादक महाशय, हा छपरी प्रकार कधी थांबणार आहे?

बाळकराम

संजा's picture

22 May 2010 - 8:22 pm | संजा

नावातच 'बाळ' असणार्‍याने दुसर्‍यांना बाळ म्हणावे यातच सर्व आले.
ज्ञान आणि वय यांचा संबंध लावायचा झाला तर अगदी तुम्हालाही तुम्हाला शेंबूड काढायची तरी अक्कल असेलच असे नाही.

वाद वाढवुन छपरी प्रकार करु नये इतकी अक्कल असेल तरी खुप.

संजा

बाळकराम's picture

23 May 2010 - 2:08 pm | बाळकराम

प्रिय बेअक्कल संजा,

ज्यातलं आपल्याला कळत नाही तिथे तोंड खुपसू नये हे बहुतेक तुला क्लास मध्ये शिकवलेलं दिसत नाही! अरे "बाळ" आणि "बाळकराम" मध्ये फरक आहे गांजा...आपलं- संजा! तो काय आहे ते सांगून तुझ्या चिमुकल्या मेंदूला मी शीण देऊ इच्छित नाही! तू आपलं दूध पी बरं!

अरे तुझं वजन किती, पगार किती, उंची किती, अक्कल किती आणि बोलतोयस किती!!

(बाकी तुला छ्टाकभर जरी अक्कल असती तर तुला हे असे जोडे खावे लागले नसते)

"बाळ"कराम

संजा's picture

24 May 2010 - 3:49 pm | संजा

>>>प्रिय बेअक्कल संजा,
आमची दखल घेतल्याबद्दल धन्यवाद.
>>>ज्यातलं आपल्याला कळत नाही तिथे तोंड खुपसू नये हे बहुतेक तुला क्लास मध्ये शिकवलेलं दिसत नाही

आमचे मास्तर म्हणतात जे माहित नाही ते माहित करुन घ्यावे हे तुम्हाला माहित आहे का नाही ते मला माहित नाही.

>>>अरे "बाळ" आणि "बाळकराम" मध्ये फरक आहे
अस का. बर बर.
>>> काय आहे ते सांगून तुझ्या चिमुकल्या मेंदूला मी शीण देऊ इच्छित नाही!
आपली मर्जी.
>>>अरे तुझं वजन किती, पगार किती, उंची किती, अक्कल किती आणि बोलतोयस किती!!

काहीतरी जळतय. करपल्याचा वास येतोय.

(बाकी तुला छ्टाकभर जरी अक्कल असती तर तुला हे असे जोडे खावे लागले नसते)
तुम्ही मारले आणि आम्ही खाल्ले ? बर बर. छाती फुगवा बर जरा.

"बाळ" हराम (संजा)

धन्य झालो... =)) =)) =)) =)) =)) =))

- फटू

हेरंब's picture

21 May 2010 - 7:36 pm | हेरंब

क्लासेससाठी जेवढे पैसे घालतात तेवढे धंद्यात घालून मुलाला आवडीच्या धंद्यात जाण्यास प्रवृत्त करावे. पैसाच हवा असेल तर हा पर्याय जास्त चांगला. त्याशिवाय करिअरच्या असंख्य शाखा उपलब्ध आहेत आता, फक्त योग्य मार्गदर्शन हवे.

मुक्तसुनीत's picture

21 May 2010 - 10:31 pm | मुक्तसुनीत

लेख आवडला.
ट्यूशन क्लासेस चे प्रस्थ माजल्याच्या घटना १९८० च्या दशकापासून ऐकत आलेलो आहेच. मात्र त्याचे आजकाल बनलेले व्यापक स्वरूप , त्यातले कंगोरे या लेखामुळे चांगले कळले.

मदनबाण's picture

21 May 2010 - 10:48 pm | मदनबाण

ह्म्म्म...
आजची शिक्षण पद्धती म्हणजे विद्यार्थींनी भरपुर डेटा डोक्यात जमा करायचा आणि परिक्षेची घंटा वाजली की पेपरवर तो डेटा ओकुन वर्गाबाहेर पडायचे...
हे सर्व वाचुन हा quote आठवला :---
I was born intelligent but education ruined me !!!
Mark Twain
लेख आवडला...

मदनबाण.....

Hi IQ doesn't guarantee Happiness & Success in Life.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 May 2010 - 10:53 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विनायक, लेखन आवडले. अजून लिहित राहा....!

-दिलीप बिरुटे

राजेश घासकडवी's picture

21 May 2010 - 11:18 pm | राजेश घासकडवी

घटकाभर धरून चालू की आयायटीतलं शिक्षण म्हणजे एक शिक्का आहे, आणि तो असणं लाभदायक आहे. तो मिळवून देण्यासाठी कुठचाही गैर मार्ग न वापरता, मेहेनत करून घेण्यासाठी पैसे आकारले तर केवळ आकडे मोठे (?) आहेत म्हणून 'बाजारीकरण' (वाईट अर्थाने) कसं झालं?

तसंच हे काही हजार कोटीचे आकडे कुठून आले? ७५% व सरासरी ~५०००० हा तुमच्या मनचा अंदाज आहे का?

ही परिस्थिती बदलण्यासाठी "महत्वाची पावले स्वत:च आयआयटी उचलु शकतात. या परीक्षासंदर्भात ते स्वतःच मार्गदर्शन करु शकतात. " हे करण्याची गरज कळली नाही.

एकंदरीत साप म्हणून दोरी बडवण्याचा प्रकार वाटला. सनसनाटीकरणाची कला या लेखात चांगली साधली आहे...

विनायक पाचलग's picture

22 May 2010 - 8:35 am | विनायक पाचलग

हा मनाचा अंदाज नाही हो...
या संदर्भात काही अधिकृत आकडेवारी महाजालावर उपलब्ध आहे,
आणि काही वृत्तपत्रात ५००० कोटी उलाढाल आहे असे सांगितलेले आहे ( सर्वेक्षण करुन)
@टारझन- मिहिर्‍याचा बाण लागलाच नाही मला( संदर्भ वरचा प्रतिसाद)
@मोडक काका - आपल्या मुद्द्यांना सविस्तर उत्तर द्यावे लागेल, थोड्याच वेळात देईन..
बाकी साधनात प्रकाशन हे स्पष्टीकरण थोडेच आहे ,आपण सारेच आपला एखादा लेख दुसरीकडचा असेल तर तो इथे देताना त्याबद्दल लिहितोच ना ,तसे लिहिले आहे .
बाकी यात विनोद काय आहे हे समजले नाही ..असो....
@ मनिष - माझा मेल आय डी vinayak{at}rangakarmi.com हा आहे ..
मी स्वतः एकही प्रतिसाद न देता वरच्या प्रतिसादामुळे तु सिरियसली प्रतिसाद देत नाहीस हे वाचुन वाईट वाटले ,कारण ही कोणतीही मुक्ताफळे मी उधळलेली नाहीत..
विनायक

विनायक पाचलग
वाँट टु टॉक

श्रावण मोडक's picture

21 May 2010 - 11:28 pm | श्रावण मोडक

नेमके लिहायचे काय आहे? काही कळले नाही.

या सगळयांचे परिणाम विद्यार्थी भोगतात . बर्‍याच विद्यार्थ्यांना आपण फसलोय , हे योग्यवेळी लक्षात येते. पण, त्यानंतर वाट बदलणे तितकेसे सोपे नसते.

योग्यवेळी लक्षात येते असेही म्हणता, पण वाट बदलणे तितकेसे सोपे नसते असेही म्हणता. म्हणजे काय? जरा आमच्या सामान्य स्तरावर येऊन स्पष्ट करा.

पहिल्यांदा मला स्वत: ला माझ्या विचारांशी प्रामाणिक राहता यावं म्हणून माझ्या निकालाआधी हे खरडलं आहे.

आयायटी किंवा आयायेम जिथं कुठं प्रवेश मिळेल तो नाकारणार आहात का? विचारांशी प्रामाणिक राहणं म्हणजे काय?
आता असे बरेच विश्लेषण करता येईल. पण थांबतो.
'साधना'मध्ये प्रकाशित आहे होय! बरं. तुमच्या या लेखातून लिहिण्याची धडपड दिसतीये. पण जरा बैठक जमवा छानपैकी आणि मग लिहित चला. 'साधना'त प्रकाशित वगैरे स्पष्टीकरणं करण्याची वेळ येणार नाही आणि तिथल्या विनोदांची इथे पुनरावृत्ती केल्याचा ठपकाही येणार नाही. कारण 'साधना'त फक्त हाच लेख प्रसिद्ध झाला आहे असं नाहीये. इतरही असेल ना!

टारझन's picture

21 May 2010 - 11:36 pm | टारझन

'साधना'मध्ये प्रकाशित आहे होय! बरं. तुमच्या या लेखातून लिहिण्याची धडपड दिसतीये. पण जरा बैठक जमवा छानपैकी आणि मग लिहित चला. 'साधना'त प्रकाशित वगैरे स्पष्टीकरणं करण्याची वेळ येणार नाही आणि तिथल्या विनोदांची इथे पुनरावृत्ती केल्याचा ठपकाही येणार नाही. कारण 'साधना'त फक्त हाच लेख प्रसिद्ध झाला आहे असं नाहीये. इतरही असेल ना!

हेच्च्च्च !!!

बाकी वर मिहिर रावांनी णेमका बाण मारलाय ;) त्या शितावरुन भाताची परिक्षा करता यावी ;)

-- (देशद्रोही फेम कमाल खानचा जब्बरदस्त फॅन) गंजा

मनिष's picture

22 May 2010 - 1:16 am | मनिष

मी सिरीयसली प्रतिसाद लिहीणार होतो, पण मग "ज्ञानेश्वर", "अगाध प्रतिभा" अशी मुक्ताफळं वाचली आणि वाचाच बसली. जाऊ दे!!!!

@विनायक - तरीही राहवत नाही म्हणून सांगतो - मधे "शोभा भागवत" यांचा "यश म्हणजे काय" हा लेख मेल मधून फिरत होता, तो नक्की वाच. हवा असेल तर मला मेल आय-डी दे, मी पाठवतो.

- मनिष

सबा फैलाती है गुलशन की महक,
फुलों को हमने इतराते नही देखा|

(स्वरचित. मग? माझीही प्रतिभा अगाध आहेच! कोई शक?)

तु-का-राम? मी-पण-राम! ;)

मिहिर's picture

22 May 2010 - 10:39 pm | मिहिर

ह्या क्लासेसनी म्हणे विनायकच्या लोकप्रियतेचा फायदा घेतला होता म्हणे. अकरावीच्या सुरवातीला क्लास कसा आहे पाहण्यासाठी तो सगळ्या क्लासमध्ये १-२ दिवस जाऊन बसला होता. तेव्हा विनायकच्या लोकप्रियतेचा फायदा घेत विनायक आमच्या क्लासला येतो अशी जाहीरात या क्लासनी सुरू केली होती म्हणे.
मी त्यावेळी विनायकला नुकताच ओळखू लागलो होतो. त्याची लोकप्रियता पाहून आम्ही थक्क झालो होतो बुवा.

मनिष's picture

22 May 2010 - 10:42 pm | मनिष

=))
कोणीतरी म्हटलेय ना इथे, इर्षा हो ही सगळी!

टारझन's picture

22 May 2010 - 10:46 pm | टारझन

लेका ... आता खुद्द ज्ञाणेश्वरांना क्लास ची गरज पडली , आणि ज्ञानेश्वर आपल्या क्लास मधे येऊन बसले तर क्लासवाले अ‍ॅड करणार नाहीत तर नवल ;)

बाकी "लोकप्रियता" जबरदस्तंच हो,शंकाच नाही , गांजा सारखी लोकं फॅन म्हणजे .. हॅहॅहॅ ;)

विनायक पाचलग's picture

22 May 2010 - 11:19 pm | विनायक पाचलग

फुटलो...
ठार वेडा झालो..............
LOL

विनायक पाचलग
वाँट टु टॉक

ज्ञानदा कुलकर्णी's picture

25 May 2010 - 10:06 pm | ज्ञानदा कुलकर्णी

विनायक लेख छानच लिहिला आहे स्वानुभवावरुन बोलतो आहेस...