पुण्य

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in काथ्याकूट
13 May 2010 - 10:10 am
गाभा: 

एका ग्रंथाचे भाषांतर करताना पुण्य या शब्दावर अडकलोय.
पुण्य या शब्दाला इंग्रजीत प्रतिशब्द कोणाला सुचतोय का.
पुण्य हा शब्द आपण ज्या अर्थाने वापरतो त्या अर्थाला जवळ जाणारा शब्द व्हर्च्यू हा शब्द आहे. पण तो चपखल बसत नाही. वर्च्यू ची पुण्याप्रमाणे साठवण होत नाही. . गेल्या जन्मीचे पुण्य ही संकल्पना कशी मांडायची?
भाषा ही संस्कृती चा दर्पण असतो.
अभ्यासूनी जाणकारानी कृपया मार्गदर्शन करावे.

प्रतिक्रिया

विंजिनेर's picture

13 May 2010 - 10:14 am | विंजिनेर

मराठी/संस्कृतातला कर्म (karma) हा चालेल का बघा. प्रचलित शब्द आहे इंग्रजीत

विजुभाऊ's picture

13 May 2010 - 10:21 am | विजुभाऊ

कर्म आणि पुण्य यांची गल्लत होतेय....
कर्म हे चांगले आणि वाईट असे दोन्ही असते व्यापक अर्थाने बोलायचे तर
पुण्य हे चांगलेच असते
ते साठवले जाते , कमवले जाते, खर्च जाते , त्याच्यावर उदक सोडून ते दुसर्‍याला देता येते
पुण्याचा बॅलन्स मांडला जातो
कोणीतरी त्याचा हिशेब ठेवतो
ते तुमच्या कर्मानुसार कमी जास्त होउ शकते.
कर्माचा पुण्य या शब्दाशी हाच संबन्ध आहे.
पण कर्म म्हणजे पुण्य नव्हे

झिन्ग's picture

13 May 2010 - 10:36 am | झिन्ग

virtue, good, goodness, morality, righteousness - depends on where you use it

निस्का's picture

13 May 2010 - 10:39 am | निस्का

'Good karma ' याच अर्थाने वापरलेला पाहिलंय. उदा. Having enjoyed the wide world of heavenly sense pleasures they go to the mortal world upon exhaustion of their good Karma (or Punya).
Virtue हा शब्दकोशाप्रमाणे योग्य आहे, पण good karma ज्यास्त प्रचलित आहे.

नितिन थत्ते's picture

13 May 2010 - 11:02 am | नितिन थत्ते

गुड डीड म्हणता येईल.
बॅलन्स इन गुड डीड अकाउंट वगैरे....

तसा Punnya हा इंग्रजी शब्द पण चालेल (तळटीपेसह).

नितिन थत्ते

विजुभाऊ's picture

13 May 2010 - 11:32 am | विजुभाऊ

तसा Punnya हा इंग्रजी शब्द पण चालेल (तळटीपेसह).

तळटीप इंग्रजीत द्यावी लागेल ना....... तिथे काय लिहिणार
good dees are accumulated in one account...it can be debited or credited............ credit what goes out.debit what comes in.........
Balance in this account can be carried forward in your other birth also...
मातय कै च्या कैच......
वाचणारा फेफ्र येऊन पडेल... त्याची या जन्मातली गुड डीड्स आपल्या अकाउन्ट मधून राइट ऑफ होतील..;)

नाना बेरके's picture

13 May 2010 - 1:33 pm | नाना बेरके

Balance in this account can be carried forward in your other birth also... हे सुध्दा अगदी . . .

सर्वपित्री अमावस्येबाबतीत,
". . . . . . .ऑल फादर्स डे . . ." इति पु.ल. - सारखं झालं.

चांदनी आयी ID उडाने. ., सुझे ना कोई मंजील.
नाना बेरके

प्रदीप's picture

13 May 2010 - 1:39 pm | प्रदीप

नाही, पण 'accrued goodwill' हे कसे वाटते?

संजा's picture

13 May 2010 - 1:44 pm | संजा

गेल्या जन्मीचे पुण्य ही संकल्पना कशी मांडायची?

Back Life Favour

संजा.

स्पंदना's picture

13 May 2010 - 2:40 pm | स्पंदना

विजु भाउ तुम्हि "पुण्य " हा शब्द अहे तस्साच वापरा. तुम्हि विन्ग्रजी भाषेला नविन शब्द द्याल. खाली खुलासा द्या. अहो "गुरु"" अवतार" हे आपलेच तर शब्द आहेत. आणि एक नविन भर कुणी तरी घालायचीच ना तुम्ही घाला!! आम्हि अभिमानान सान्गु "आमच्या विजुभाउ नी हा शब्द इन्ग्रजीला दिला.

शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.

टारझन's picture

13 May 2010 - 2:45 pm | टारझन

पुण्य म्हणजे सीन का काय तरी आसतं बॉ
=)) =))

कानडाऊ योगेशु's picture

13 May 2010 - 3:41 pm | कानडाऊ योगेशु

पाप = sin
म्हणुन
पुण्य = unsin. :?
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

टारझन's picture

14 May 2010 - 1:06 pm | टारझन

पाप = sin
असेल तर,
पुण्य = cos

विषय संपला ,

- कायखाऊ नाष्टेशु

तिमा's picture

13 May 2010 - 3:05 pm | तिमा

पुणेकरांना विचारा, त्यांनी ते अगदी हिशोबीपणाने साठवलेले असते आणि त्यामुळेच ते दर जन्मात पुण्यात अवतरतात अशी त्यांची खात्री असते.
बाकी गुड कर्म वा पुण्य हेच पर्याय पटतात.

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

विजुभाऊ's picture

13 May 2010 - 3:37 pm | विजुभाऊ

Punya हे असे इंग्रजीत लिहिल्यामुळे " पुण्य "
या शब्दात सामावलेल्या
१) पुण्य साठवले जाते. कर्मानुसार आनि वर्णानुसार याचे दर वेगळे असतात
२) पुण्य खर्च होते
३) पुण्य मागील जन्मात जमा झाले असल्यास प्रॉव्हिडन्ट फन्डाप्रमाणे या जन्मात वापरता येते. ( हे इफेक्ट रीट्रोस्पेक्टीव्ह असतात)
४) तुम्ही जेवढे पुण्य जमा केले आहे ते संपपर्यन्त अप्सरांचे नाच-गाणे वगैरे स्वर्गात उपभोगता येते.
५) तुम्ही तुमचे पुण्य इतराना बिनव्याजी देऊ शकता.
६) इतरांच्या कर्मानुसार ( पुरोहीताने यजमानाने सांगितल्यानुसार ) आपल्या खात्यात पुण्य जमा होऊ शकते
७) पुण्य मिळवण्याच्या प्रत्येकाच्या पॉलीसीज वेगळ्या असू शकतात.
८) अहिंसेने तसेच हिंसेने पुण्य संचय करता येऊ शकतो
९) स्वतः पिऊन अथवा इतराना पाजूनही पुण्य पदरी पाडता येऊ शकते
१०) तुम्ही स्वर्गात असाल आणि तुमचे पुण्य संपले तर प्रीपेड कनेक्षनप्रमाणे तुमची सर्वीस तेथेच टर्मिनेट होते आणि तुम्हाला डायरेक्ट इतर लोकात हाकलले जाते.
११) पापाची आणि पुण्याची अकौन्ट्स स्वतन्त्र आणि वेगवेगळी असतात. एकातून दुसर्‍यात वजावट किंवा राईटॉफ ( जे व्ही) मिळू शकत नाही.
या सार्‍या कॉन्सेप्ट्सचा खुलासा होऊ शकेल का ?

सुखदा राव's picture

14 May 2010 - 12:41 pm | सुखदा राव

storage of merits of previous births or purification aquired by virtuous deeds of previous births or reward for merits of previous births

आळश्यांचा राजा's picture

22 May 2010 - 11:39 am | आळश्यांचा राजा

`पुण्य' साठी `मेरिट' हा शब्द इतरत्र वाचनात आलेला आहे.

आळश्यांचा राजा

बिपिन कार्यकर्ते's picture

22 May 2010 - 12:27 pm | बिपिन कार्यकर्ते

हेच लिहायला आलो होतो. अध्यात्मावरील नेक इंग्रजी ग्रंथांमधून मेरिट हाच शब्द आहे. तुम्ही फारतर 'कार्मिक मेरिट' किंवा 'अ‍ॅक्रूड कार्मिक मेरिट' असा शब्द वापरा.

बिपिन कार्यकर्ते

मी ऋचा's picture

14 May 2010 - 1:24 pm | मी ऋचा

अरे पण इंग्रज लोकांमधे पुनर्जन्म ही कन्सेप्टच नाहीए.त्यामुळे पुण्याची एवढी गहन
संकल्पना त्यंना एका शब्दात कळणे कठीण आहे!! त्यामुळे पुण्यं हाच शब्द वापरुन खाली तळटीप म्हणुन भग्वद्गीता अख्खी टाका ( जे. कृश्णमुर्तिंचि इन्ग्रजीत अवेलेबल
आहे. ;) )

मी ॠचा

र॑गुनी र॑गात सार्‍या र॑ग माझा वेगळा !!

sagarparadkar's picture

14 May 2010 - 6:43 pm | sagarparadkar

मला वाटते पुण्य म्हणजे:

"eternal account in which plus points are credited for good deeds and hefty lumpsome amounts of points are debited for sins committed"

The books are maintained by Chitragupta (for Hindus) and Saint Peter (for Christians, correct me if I'm wrong) :) :)