(अगाध प्रतिभा???)

मनिष's picture
मनिष in काथ्याकूट
22 May 2010 - 1:36 am
गाभा: 

माझ्या माहितीप्रमाणे आपल्या राष्ट्रपतींचे (महिला असल्या तरी राष्ट्रपतीच म्हणतात ना रे? तसे "पती" चा स्त्रीलिंगी शब्द माहित आहे, पण....असो) नाव "प्रतिभा पाटील" किंवा "पाटील प्रतिभा" (शासकिय फॉर्म प्रमाणे आडनाव आधी) आहे ना? आता कुठेतरी "अगाध प्रतिभा" असे काहितरी वाचले. कोण बरं ह्या? काही माहिती असल्यास कृपया इथेच कळवावे.

मला नीटसे आठवत नाही (मी खूप लहान होतो तेंव्हा, कदाचित १२वीत असेन), पण मला वाटते की "अगाध प्रतिभा" ह्या माझ्या जवळच्या नातलग आहेत. त्या गेल्यापासून मला फार मानसिक धक्का बसलाय...काही धड लिहिता येत नाही. माझी सृजनशीलता पार उन्हाळ्यातल्या तलावाप्रमाणे आटून गेली आहे, मन कलेशिवाय, निर्मितीशिवाय शुष्क झाले आहे. (शिवाय माझ्यावर जालिंदरबाबांची कृपाही नाही, कसे झरावे शब्द आता लेखणीतून? कसे टंकावे लेख ह्या कळफलकातून?:(). कदाचित माझ्या भयानक प्रसिद्धीलोलूप स्वभावाला कंटाळून त्या मला टाळत असतील. पण असो! बदलीन.

काहिही करून "अगाध प्रतिभा" शी गाठ घालून द्या, मी तुम्हाला फडतरेची मिसळ खायला घालेन. माझ्या भावनांची कदर करा, आणि कृपया आपापले प्रतिसाद इथे अवश्य लिहा.

आपला अभागी,
( "अगाध प्रतिभा" ह्यांचा) भयानक नातलग

प्रतिक्रिया

Pain's picture

22 May 2010 - 1:40 am | Pain

???

मनिष's picture

22 May 2010 - 1:47 am | मनिष

जाऊ द्या!!!

(अवांतर : इथे 'टवाळकी' किंवा 'उपहास' हा विभाग पाहिजे राव!)

टारझन's picture

22 May 2010 - 2:38 am | टारझन

आरारारारा ... "अगाध प्रतिभा" चा पार बाजार उठवलास की रं
=)) =)) =)) =))

मणिष बाबा .. तुम्ही एक दिवस णक्की णक्की मोठे होणार बघा !! तुम्ही तर तुकाराम आहात तुकाराम !! ज्ञानेश्वरांना फुल्ल फाईट आहे !! मनमुराद ... मनमुराद हसलो ,,,,

=)) =)) =)) =))

- (अगाध फॅन) ख्वाजा

संजा's picture

22 May 2010 - 9:28 pm | संजा

बाजार उठवला का मांडीयेला ?

पॉयझन (संजा)

Nile's picture

22 May 2010 - 2:59 am | Nile

अहो मग क्लास लावा ना! प्रतिभाच काय तिचे नातलग पण भेटतील. ;)

-Nile

प्रकाश घाटपांडे's picture

22 May 2010 - 7:52 am | प्रकाश घाटपांडे

आम्हाला अगाध लीला माहित आहेत. परमेश्वराची जवळची नातेवाईक आहेत. अनेक श्रद्धाळू लोकात तिची उठबस असते.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

स्वप्निल..'s picture

22 May 2010 - 9:28 am | स्वप्निल..

=))

फटू's picture

22 May 2010 - 9:35 am | फटू

पण जाऊ द्या हो राव... ते आपल्यासारख्या मुळा मुठा नद्यांचं पाणी पिणार्‍यांना नाही जमायचं... त्यासाठी "पंच गंगांचं" पवित्र पाणी प्यावं लागतं :)

- फटू

लेखक पावन मनाचा | साही प्रतिसाद जनाचा ||
जाणते रागें झाले वन्ही । "संजा" सुखें व्हावें पाणी ||
प्रतिसाद शस्त्रें झालें क्लेश । घ्यावा नव्या लेखाचा ध्यास ||
मिपा "प्ल्याटफार्म" "नेट" द्वारा । लेख पाडा कोज्ञानेश्वरा ||

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 May 2010 - 9:47 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रतिभा म्हणजे काय असते ? इथे प्रतिभा सापडेल असे वाटते. :)

पण प्रत्येकाकडे प्रतिभा असते. काहींची प्रतिभा दिसते काहींची दिसत नाही.
तेव्हा थोडा शोध घ्या म्हणजे 'प्रतिभा' सापडेल..! :)

-दिलीप बिरुटे

परिकथेतील राजकुमार's picture

22 May 2010 - 12:54 pm | परिकथेतील राजकुमार

=)) =)) =)) =)) =))

=)) =)) =)) =))

=)) =)) =))

=)) =))

=))

=)) =))

=)) =)) =))

=)) =)) =)) =))

=)) =)) =)) =)) =))

=))

=))

=))

=))

=))

=))

अज्ञानेश्वराचा बाजार उठवला की लेका पार तु !

काय राव ? मी इकडे "आजार वाढियेला" लिहित होतो तोवर तुझी इकडे खरड आली. मग अर्ध्यात सोडुन दिला बघ आजार ;)

बाकी माझा लेख मी फारच रोचक आणी अभ्यासु असा लिहिला होता. मी कायमच प्रगल्भ आणी वाचकप्रिय लिहित आलो आहे.

मी जो माझ्या गुणांचा उल्ल्लेख केला आहे ,तो आत्मप्रौढी आहे असे वाटु शकते .पण ते तसे नाही आहे .कारण हे गुण इथल्या सगळ्याना माहित आहेत..

स्वतःकडे उगीचच मोठेपणा न घेता सांगतो की याचे कारण माझी जबरदस्त महत्वाकांक्षा आणि मी घेतलेले कष्ट यात आहे.

©º°¨¨°º© भयानक पाठलाग ©º°¨¨°º©
आमचे राज्य

मनिष's picture

22 May 2010 - 1:03 pm | मनिष

आजार मंगता हैच!
मी मुक्ताई टारझन ह्यांच्या वतिने अभंगाचे काही जमले तर पाहतो!