आजचे बलुतेदार

कोंबडी's picture
कोंबडी in काथ्याकूट
18 May 2010 - 10:47 pm
गाभा: 

तुमचा पेशा तुम्हाला आवडतो का? त्यात थोडंफार वेगळेपण आहे का? तुम्हाला त्याबद्दल लिहायला आवडेल का? मग माझ्या पुस्तक प्रकल्पात सहभागी होण्याचा विचार करा.

बाजारात उपलब्ध असलेली बहुतेक "करीअर गाइडस" ही व्यवसायाची निवड, कॉलेजांच्या याद्या, परीक्शांची वेळापत्रके, फी, आणि फॊर्म्स यात अडकलेली दिसतात. मुलाखत देण्यांबाबत सल्लेही असतात. मात्र एकदा एखादा व्यवसाय निवडल्यावर त्यातील आयुष्य कसं असतं याबद्दल माहिती अभावानेच आढळते.

या पुस्तकात वेगवेगळ्या ३०-३५ क्षेत्रांतील व्यावसायिक आपापले अनुभव सांगणार आहेत. त्यात त्यांच्या पेशांचं गुणगान नसलं तरच नवल, पण त्याबरोबरच त्यांची आव्हाने, त्यांना करायला लागणार्या तडजोडी, आणि कदाचित फ्र्स्ट्रेशन्सही असतील. "माझं करियर" पेक्शा "माझ्या दृष्टीकोनातून माझा पेशा" असं त्याचं स्वरूप असेल. वाचकवर्ग असेल दहावी-बारावी-कॉलेजच्या पुढची-मागची मुलं, त्यांचे पालक, आणि पेशांच्या/लेखांच्या वैविध्यामुळे सर्वसामान्य चोखंदळ वाचकही. मराठी आव्रुती पुण्यातील एक अग्रगण्य प्रकाशन संस्था करणार आहे, तर इंग्रजी आव्रुत्तीसाठीही प्रकाशक तयार आहे. आतापर्यंत खालील पेशांचा सहभाग नक्की झाला आहे, आणि त्यांची लिखाणंही पूर्ण होत आली आहेत:

रेडियो जॉकी, टेक्निकल रायटर, कंपनी सेक्रेटरी, जेमॉलॉजिस्ट, चाइल्ड सायकॉलॉजिस्ट, शेफ, भाषांतरकार/अनुवादक, एन्वायर्न्मेंटल प्लॅनर, पशुवैद्य, इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी लॉयर, साउंड रेकॉर्डिस्ट, सेल्स मॅनेजर, अ‍ॅनिमेटर, टीवी कलाकार, एम पी एस सी ऑफिसर, एंटर्टेन्मेंट जर्नालिस्ट, स्पोर्ट्स ट्रेनर, "टीच फॉर इंडिया" फेलो, क्लिअरिंग आणि फोरवर्डिंग एजंट, टूर लीडर, मर्चंट नेवीमन

निवडीसाठी काही ढोबळ निकष लावले आहेतः
- साधासुधा डॉक्टर, इंजिनीयर, आयटीवाला नको (म्हणजे मी स्वतःही बाहेर)
- पेशा अगदीच "रेअर" नसावा, पण "हटके" असल्यास बरं
- त्या त्या क्षेत्रांमध्ये उत्तुंग कामगिरी वगैरे केलेली असण्याची अट नाही
- शक्यतो भारतातच कारकीर्द हवी आहे
- पुस्तकाच्या रॉयल्टीची सर्व रक्कम एका संस्थेला अर्पण होणार असल्याने, कुठल्याही आर्थिक मोबदल्याच्या अपेक्षा नसावी

सविस्तर माहितीसाठी मला खालील ईपत्त्त्यावर थेट संपर्क करा: एम एम अंडरस्कोअर जोशी अ‍ॅट हॉटमेल डॉट कॉम

तुमच्या ओळखीतल्या एखाद्याची/एखादीचा आठवण झाली तरी त्या व्यक्तीशी माझ्याशी गाठ घालून द्या.

धन्यवाद!

- कोंबडी

प्रतिक्रिया

टारझन's picture

18 May 2010 - 10:49 pm | टारझन

- साधासुधा डॉक्टर, इंजिनीयर, आयटीवाला नको (म्हणजे मी स्वतःही बाहेर)
चला आम्ही बी बाहेर... पण छाण उपक्रम आहे हा ... आणि प्रॅक्टिकली इंप्लिमेंट होउ शकतोय म्हणुन अजुनंच भारी ...

शुभेच्छा

- फायटर कोंबडा

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 May 2010 - 10:54 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

तुमचा पेशा तुम्हाला आवडतो का?

होय!

त्यात थोडंफार वेगळेपण आहे का?

"तार्‍यांमधे" असताना असं वाटतं!

तुम्हाला त्याबद्दल लिहायला आवडेल का?

डेडलाईनवर अवलंबून आहे.

उत्तम उपक्रम आणि टार्‍या म्हणतो आहे त्याप्रमाणे प्रत्यक्षात येण्याची शक्यता बरीच जास्त दिसत आहे म्हणून जास्तच आनंद आहे.

अदिती दुर्बीटणे

विकास's picture

18 May 2010 - 10:56 pm | विकास

मस्त प्रकल्प!

या प्रकल्पाला मनःपूर्वक शुभेच्छा! डॉक्टर-इंजिनियर वगैरे नको ही कल्पना देखील खूपच छान तसेच किमान बर्‍यापैकी भारतातील कारकीर्द असणे ही अट देखील योग्यच आहे.

लष्कराच्या भाकर्‍या भाजणे हा पेशा असू शकतो का? तसे असले तर आमची कुठेही शाखा आहे. ;)

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

शिल्पा ब's picture

18 May 2010 - 11:08 pm | शिल्पा ब

मी भारतात असताना १५ दिवस private detective च काम केलं, १५ दिवस हाटेलात, झालच तर १५ दिवस भारतीय विद्यार्थी सेनेत, १५ दिवस लहान मुलांच्यासाठी play doh बनवणाऱ्या कंपनीत..सध्या इतकंच आठवतंय :D ;)

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

छोटा डॉन's picture

18 May 2010 - 11:21 pm | छोटा डॉन

>>तुमचा पेशा तुम्हाला आवडतो का?
हो, भयंकर आवडतो.
अनेक पर्याय उपलब्ध असताना हौसेने निवडलेला हा पेशा आहे ...

>>त्यात थोडंफार वेगळेपण आहे का?
प्रचंड, भरपुर, अगणित ...
अर्थात वरुन जरी ते भारताच्या सर्वसामान्य पदविधारकांच्या दॄष्टीने 'जनरल' असले तरी खरी परिस्थ्ती वेगळी आहे. डिटेलमध्ये लिहता येईल.

>>तुम्हाला त्याबद्दल लिहायला आवडेल का?
नक्कीच , मात्र 'लगेच हवे' असे वेळेचे कठोर बंधन पाळने बहुदा अवघड जाईल.
मात्र लिहायला नक्की आवडेल.
पण कशात लिहायचे आहे ? मराठी की इंग्रजी ?
मराठीत लिहणे फार त्रासाचे काम आहे कारण काही वैज्ञानिक व्याख्यांना पर्यायी सोपे मराठी शब्द मला माहित नाही आहेत.

>>- साधासुधा डॉक्टर, इंजिनीयर, आयटीवाला नको (म्हणजे मी स्वतःही बाहेर)
तसे म्हटले तर मी "बाहेर".
मात्र नवे तंत्रज्ञान की जे सध्या भारतात फारच कमी वापरले जाते पण सध्याच्या औद्योगिक बदलांमुळे ज्याला पुढे भरपुर स्कोप असेल असे आम्हाला वाटते.
कारण काम वेगळे आहे, नविन आहे आणि रोचक तर नक्कीच आहे.

>> - पेशा अगदीच "रेअर" नसावा, पण "हटके" असल्यास बरं
+१, वर दिले आहे.

>>- त्या त्या क्षेत्रांमध्ये उत्तुंग कामगिरी वगैरे केलेली असण्याची अट नाही
छे छे, आम्ही आत्ता सुरवात केली आहे ;)

>> - शक्यतो भारतातच कारकीर्द हवी आहे
भारतातली म्हणजे "भारतासाठीच" असे अपेक्षित आहे का ?
तसे असल्यास आम्ही 'बाहेर' ... :(

>>- पुस्तकाच्या रॉयल्टीची सर्व रक्कम एका संस्थेला अर्पण होणार असल्याने, कुठल्याही आर्थिक मोबदल्याच्या अपेक्षा नसावी
त्याची अपेक्षा नाहीच !

छान आणि स्तुत्य उपक्रम.
अधिक अपडेट्सची वाट पहातो आहे :)
------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

विजुभाऊ's picture

19 May 2010 - 12:29 pm | विजुभाऊ

>>तुमचा पेशा तुम्हाला आवडतो का?
हो, आवडतो.
अनेक पर्याय उपलब्ध असताना हौसेने निवडलेला हा पेशा आहे .
यात मला लोकांच्या मनोवृत्ती बदलण्याचा अनुभव मिलतो

>>त्यात थोडंफार वेगळेपण आहे का?
फार वेगळेपणा आहे. तुम्हाला केवळ तुमच्या स्वतःच्या स्कील्स चेच नव्हे तर क्लायन्टच्या व्यवसायाचे चौफेर ज्ञान लागेते

>>तुम्हाला त्याबद्दल लिहायला आवडेल का?
आवडेल. प्रोजे़क्ट वर आलेले लोकांचे अनुभव शेअर करायला आवडेल
मात्र लिहायला नक्की आवडेल.
पण कशात लिहायचे आहे ? मराठी की इंग्रजी ?
दोन्ही भाषांत लिहू शकेन
>>- साधासुधा डॉक्टर, इंजिनीयर, आयटीवाला नको (म्हणजे मी स्वतःही बाहेर)
मी शिक्षणाने इंजिनीअर आहे. पण मला मशीन किंवा डिझाईन्स वर काम करावे लागत नाही. मात्र इंजीनीअरिंग च्या ज्ञानामुळे मला क्लायन्ट्स च्या गरजा री॑क्वायरमेन्ट्स लवकर समजू शकतात.
आयटीवाला याचा नक्की अर्थ काय?
प्रोग्रामर , कॅड कॅम करणारा , कॉल सेंटरसाठी काम करणारा, गेम्स बनवणारा अ‍ॅनिमेटर ,फिल्म एडीटर की कॉम्प्युटर वापरून टाईपसेटिंग करणारा ?
आजकाल असा कोणताच व्यवसाय राहिलेला नाहिय्ये की ज्यात कॉम्प्यूटरचा उपयोग केला जात नाही. ( अगदी क्रिकेट मध्ये सुद्धा ... लान्स क्लूसनर कॉम्प्यूटर वापरायचा)
>> - पेशा अगदीच "रेअर" नसावा, पण "हटके" असल्यास बरं
रेअर नाही अगदीच हटके सुद्धा नाहिय्ये पण सर्वसामान्यदेखील नाहिय्ये.
>>- त्या त्या क्षेत्रांमध्ये उत्तुंग कामगिरी वगैरे केलेली असण्याची अट
उत्तुंग्.म्हणजे नक्की काय...... त्या क्षेत्रातले ज्ञान आहे. अनुभव आहे
>> - शक्यतो भारतातच कारकीर्द हवी आहे
अजूनतरी बहुतेक क्लायन्ट्स भारतातलेच आहेत. बाय द वे भारतीय क्लायन्ट्स हाताळणे हा एक वेगळाच अनुभव असतो. त्यांची मानसीकता वेगळीच असते
>>- पुस्तकाच्या रॉयल्टीची सर्व रक्कम एका संस्थेला अर्पण होणार असल्याने, कुठल्याही आर्थिक मोबदल्याच्या अपेक्षा नसावी
नाहिय्ये. पण स्तुत्य उपक्रम...

शुचि's picture

18 May 2010 - 11:38 pm | शुचि

चांगला उपक्रम आहे. शुभेच्छा.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

चित्रा's picture

19 May 2010 - 12:50 am | चित्रा

प्रकल्प छानच आहे, आणि देखणेच पुस्तक निघेल याची खात्री आहे.

भारतातील शैक्षणिक क्षेत्रातील काही लोकांचा समावेश करीत असाल असे गृहित धरते. टीच फॉर इंडिया फेलो शिक्षणक्षेत्रातीलच व्यक्ती असावी असे धरते.

टिउ's picture

19 May 2010 - 1:13 am | टिउ

शुभेच्छा!

बाकी काही प्रतिसाद वाचुन (खरं तर एकच) आम्हाला 'एक न धड भाराभार चिंध्या' ही म्हण आठवली...

(आरंभशूर) टिउ

शिल्पा ब's picture

19 May 2010 - 2:55 am | शिल्पा ब

अरे हो...अजून काही राहिलेच....एका sales कंपनीत १५ दिवस, एका event management कंपनीत १५ दिवस, अजूनही आठवले कि सांगेन... आणि काही प्रतिसाद वाचून (खर तर एकच ) म्हण आठवली...कोणाला कशाचं आणि बोडकीला केसाचं =)) =)) =)) =))

(सगळ्यांचा शेवट करणारी )चिऊ

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

विजुभाऊ's picture

19 May 2010 - 12:31 pm | विजुभाऊ

कोणाला कशाचं आणि बोडकीला केसाचं
कृपया असांसदीय शब्द वापरू नयेत ही विनन्ती.

स्वाती२'s picture

19 May 2010 - 3:35 am | स्वाती२

चांगला प्रकल्प! हार्दीक शुभेच्छा!

sagarparadkar's picture

19 May 2010 - 3:36 pm | sagarparadkar

>> -- पुस्तकाच्या रॉयल्टीची सर्व रक्कम एका संस्थेला अर्पण होणार असल्याने, कुठल्याही आर्थिक मोबदल्याच्या अपेक्षा नसावी
मी पुणेकर असल्याने मला पहिला प्रश्न हाच पडला की ती संस्था कोणती? पदाधिकारी कोण व लाभार्थी कोण?

कि वरील सर्वकाही एकच व्यक्ति असणार आहे? =))
:))

चित्रा's picture

19 May 2010 - 5:58 pm | चित्रा

ताकही फुंकून पिता आहात हे चांगले आहे, पण कोंबडी (मनोज जोशी) या सदस्यांना मी गेली १५ हून अधिक वर्षे नेहमीच्या जगात ओळखते. ते आमचे मित्र असल्याने मी एवढे सांगू शकते की ते आणि त्यांच्या पत्नी हे दोघे गेली अनेक वर्षे विविध सामाजिक क्षेत्रांत स्वतःचा वेळ आणि पैसा खर्च करून अनेक कामे करीत आहेत. कोणी या कामात सहाय्य केले तर त्यांनी ज्या मोबदल्यावर पाणी सोडले आहे असा पैसा कुठच्यातरी योग्य सामाजिक कामावरच खर्च होईल, याची मला खात्री आहे. इथे त्यांनी ते नाव न देण्याची कारणे त्यांची व्यक्तिगत असू शकतील, पण मी असे समजते की अजून ते निश्चित होत नसावे. किंवा काही प्रकल्प उभा राहत असेल, ज्याची माहिती ते आत्ता देऊ इच्छित नसावे. पण तुम्हाला कोंबडी यांना अधिक सहाय्य देण्याची इच्छा असूनही संस्थेचे नाव आणि कामाचे स्वरूप जाणून घ्यायचे घेतल्याशिवाय मदतीची तयारी नसल्यास कोंबडी यांच्याशी थेट संपर्क करावा.

अर्थात हे जर काही भरीव सहाय्य देण्यासारखे असले तरच कोंबडी यांना उत्तर देण्यास भरीला पाडावे, नाहीतर कटावे, असेच मुंबईकर पद्धतीने म्हणते. कृपया ह. घेणे. :)

मिसळभोक्ता's picture

20 May 2010 - 5:41 am | मिसळभोक्ता

कोंबडी आणि चिमणी हे आमचे मनोगतापासूनचे मित्र आहेत.

त्यांना पूर्णपणे सहाय्य करावे, ही सर्वांना विनंती.

आमची नोकरी ही "साधेसुधे इंजिनेर" ह्या क्याटेगरीत मोडत असल्याने, आम्ही मदत करू शकत नाही, ह्याबद्दल खेद होतो.

आमचे सगळे मित्रही साले साधेसुधेच इंजिनेर आहेत. नाहीतर त्यांना कळवले असते. नाही म्हणायला एक पाणीखात्यात आहेत, पण ते वरती कव्हर्ड आहेत.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

प्रमोद्_पुणे's picture

19 May 2010 - 4:29 pm | प्रमोद्_पुणे

छान प्रकल्प.. कंपनी सेक्रेटरी आणि IPR Lawyer ने काय सांगितले आहे ते वाचायला नक्किच आवडेल. शुभेच्छा!!

कोंबडी's picture

19 May 2010 - 7:55 pm | कोंबडी

आतापर्यंतच्या सर्व प्रतिक्रियांसाठी धन्यवाद. वर सांगितलेला एक मुद्दा पुन्हा अधोरेखित करतो - तुम्ही स्वतः निकषांमुळे बाद झालात तरी तुमच्या ओळखीत "लिहू शकणारा/री" व्यावसायिक असेल तर जरूर भेट घालून द्या. इथे विरोप पाठवण्याऐवजी एम एम अंडरस्कोअर जोशी अ‍ॅट हॉटमेल डॉट कॉम वर संपर्क साधलात तर भ्र.ध्व. द्वारे शंकांचं/प्रश्नांचं लवकर निराकरण करता येईल.

रॉयल्टीची रक्कम पाबळच्या विज्ञान आश्रमास जाणार आहे (चित्रा, माझ्यावतीने बॅटिंग केल्याबद्दल थँक्स):

http://video.google.com/videoplay?docid=-7244987184341990763#

http://www.vigyanashram.com/

टुकुल's picture

19 May 2010 - 9:21 pm | टुकुल

खरोखर छान उपक्रम, विचार करुन बघतो माझ्या ओळखीत कुणी तुमच्या निवडीच्या निकषात बसतो का. मि स्वतः आयटी हमाल त्यामुळे बाद.
तुमच्या या उपक्रमाबद्द्ल पुढे काय काय झाले आणी पुस्तक तर नक्की वाचायला आवडेल.

--टुकुल

नंदन's picture

20 May 2010 - 8:00 am | नंदन

उपक्रम. काही परिचितांना ह्याबद्दल विचारणा केली आहे.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

महेश हतोळकर's picture

20 May 2010 - 9:34 am | महेश हतोळकर

मी स्वतः आयटी हमाल असल्यामुळे बाद. पण दोन जण महितीत आहेत त्यांच्याशी बोलतो आणि संपर्क साधतो. (पण दोघेही उपरोक्त यादीत बसत नाहीत. एक वैद्यकीय सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ आणि एक पक्षीतज्ञ)

सुखदा राव's picture

20 May 2010 - 10:44 am | सुखदा राव

मी सी. ए. आहे. स्वताची प्रक्टीस आहे. रेअरपण नाही आणि हटकेपण. त्यातून नवीन सुरू केलेला व्यवसाय त्यामुळे अनुभवही नाही. पण हा व्यवसाय चान्गलाय. याची माहिती मुलाना नसते. मी कदाचित नाही मदत करू शकणार पण कोणाच्या तरी मदतीने हा व्यवसायही पुस्तकात घेतला तर आनन्द वाटेल.