णमस्कार्स लोक्स ,
अंतिम वाचक वाचन करार (End Reader Reading Agreement) :-
खालील लेखात देवादिकांचे संदर्भ आहेत , अर्थात आम्ही नास्तिक असल्याने ती पात्रे आम्हाला इतर कोणत्याही कथेतल्या पात्रांप्रमाणे आहेत. तेंव्हा आस्तिक लोकांच्या भावना "उगाचंच" दुखावल्या जाण्याचा संभव आहे , एक तर त्यांनी "म्यॅच्युरिटीने" काम घ्यावे , किंवा आत्ताच "स्वगृह" वर क्लिक करावे. बाकीच्यांनी लुफ्त लुटावा.
"चाराणे कमी" एवढ्या करतांच , की पात्रांनी जर 'चाराणे" वापरले असते , तर बरीच हिंसा/नुकसान टाळता आलं असतं , तसंच त्यांचं वागणं "सेंसिबल" होऊ शकलं असतं
आमचा मित्र परिवार एकं तर डॉक्टर नाही तर इंजिनियर ह्यातलांच , त्यामुळे सगळे कसे हाडाचे नास्तिक. पण आमचे पालक डबल हाडाचे आस्तिक. कोणाच्या तरी घरी , कधीतरी असाच देवदेव विषय चालु होता , त्या रात्री आम्ही "नाईटवॉक" ला गेलो .. तेंव्हा सुचलेले काही विचार , किंवा ग्रंथपुराणातले बग्ज म्हणा नां ? तर ह्या बज्ग वर जेंव्हा आम्ही विचार मंथन केलं , टेक्निकल अॅनॅलिसीस करण्याचा प्रयत्न केला , तेंव्हा आम्हाला गडबडाट लोळण्याशिवाय काहीही रिझल्ट्स हाती लागले नाहीत .
पौराणिक संदर्भ : लक्ष्मणाने "लक्ष्मणरेखा" आखुन स्वतःचं कर्तव्य चोख पार पाडलं होतं , पण सितेने लाईन क्रॉस केल्याने रावण तिला पळवुन घेऊन जाऊ शकला .
अॅनॅलिसिस : लक्ष्मणाला भुमितीच्या क्लास ला जाण्याची सक्त गरज होती. कारण भाऊ ने एक लाईन मारली होती, जिला "लक्ष्मणरेषा" असे म्हणतात. आता लक्ष्मणरेषेची लांबी जास्तित जास्त किती असेल ? तर उंबरठ्या एवढी , चला मोघम माप घेऊन त्याच्या डबल गृहीत धरू , तरीही रावण (ज्याला बुद्धीचं आणि शक्तीचं वरदाण होतं , असा पौराणिक दावा आहे) एवढा मुर्ख होता , की त्याला उगीचंच वेषांतर करुन स्वतःच्या पावरचं असं पाण्चट प्रदर्शण करण्याची गरज नव्हती. तो त्या लाईणच्या दुसर्या बाजुनं येऊ शकला असता, गेलाबाजार मागल्या दारानं किंवा खिडकीतुन आत येणं रावणासारख्याला सहज शक्य होतं , लक्ष्मणाने काही फुटांची लाईन मारली होती , पृथ्वीला "लक्ष्मणपरिघ" नव्हता मारला . तरीही रावणाने वेषांतर पॉवर वापरली . आता सितेच्या बुद्धीचं कौतुक मी काय करावं ? लक्ष्मणाने रिक्वायरमेंट अॅनॅलिसीस ठिक केलं नव्हतं , त्याने 'फक्त रावण किंवा राक्षस" ह्या इनपुट साठी एक्सेप्शन हँडल केलं असतं तर चालु शकलं असतं , त्याने कोडींग मधे टाईमपास केला , आणि फक्त सितेला रेषा क्रॉस करणे अलाव्ह केलं , गेला बाजार त्याने वर्तुळ जरी आखला असता , आणि पुर्ण पर्णकुटी त्यात कव्हर केली असती तर ठिक होतं.
समरी : अलिखीत नियमांचं त्या काळी पालन केल्या जात होतं (कोणालाही स्वतःचं एक्स्ट्रा डोकं चालवण्याची मुभा नव्हती) , जर लक्ष्मणाने सिता रक्षणासाठी रेषा मारली होती , तर सिता पळवायची तर त्या लाईनला क्रॉस करुनंच , एवढी प्रामाणिकता पाळणारा रावण , नैतिकते मधे का मार खाऊन गेला ?
पौराणिक संदर्भ : जेंव्हा रामाचे दुत सिता शोधार्थ चहुदिशेला गेले , त्यात हनुमानाला सितेचा शोध लागला , सिता बहुतेक हनुमानाला ओळखत नव्हती , म्हणुन श्रीरामांचं एखादं सिग्नेचर टोकण असणं जरुरी होतं त्यासाठी तो रामनिशानी घ्यायला परत आला. रामाने सितेला स्वतः मुक्त करण्याची इच्छा दाखवली आणि हनुमानाला तिला घेऊन येण्यास मज्जाव केला. मुक्त केल्यावरही सितेला अग्निपरिक्षा अर्थात प्यॉरिटी टेस्ट द्यावी लागली.
अॅनॅलिसीस : इतर वेळी संयमाचं काम दाखवणारा , युद्ध टाळावं म्हणुन प्रयत्न करणारे श्रीराम , इथे हनुमानाकरवी (कडवी नव्हे) सितेला सोडवु शकला नसता काय ? हजारो लाखो (सर्व आकडे ऐकिव माहिती च्या आधारे) वानर्स आणि राक्षस , ज्यांचा ह्या युद्धाशी काही एक संबंध नव्हता ,त्या णिष्पाप जिवांना स्वतःच्या स्वार्थास वेठीस धरलं होतं. (युद्धात मेलेल्यांना मुक्ति मिळते, हा हस्यास्पद प्रतिवाद आहे ) येथुन श्रीरामांनी जो स्वार्थ महत्वाचा असण्याचं उदाहरण दाखवलं आहेत , त्याला आता पॉझिटिव्ह फॅक्टर म्हणुन इन्क्लुड केलेलं नाही . रामानं सितेला शेवटी भल्या मोठ्या नुकसानानंतर सोडवलं सुद्धा , पण त्यातही त्याने स्वतः सितेवर विष्वास दाखवलेला नाही, ह्यावरुनंच बायको वर अविश्वास दाखवण्याची परंपरा रुढ झाली असावी.
समरी : रामाने सरळ घास खाण्या ऐवजी , करोडोंचं आयुष्य पणाला लावण्याचा निर्णय घेतला , तरीही राम आज देव कसा ?
पौराणिक संदर्भ : आकाशवाणी १०१.० मेगाहर्ड्झ वर "मथुरा डेअरी सकाळच्या बातम्या" मधे सांगितलेल्या वृत्तानुसार देवकीचा आठवा पुत्र कंसाचा वध करणार होता.
अॅनॅलिसीस : कंसा एवढा सर्व बुद्धिमाण प्राणी मी आज तागायत कोणत्याही सिरीयल मधे पाहिला नव्हता. पण त्याआधी, ( कंसाचं आपल्या बहिणी बरोबर अतिशय छाण होतं , पण आकाशवाणी मुळे तो त्या पोरांचा दुष्मण झाला होता. असो, विधाताच स्क्रिप्ट रायटर असल्यावर तो वाटेल ते लिहु शकतो.) आकाशवाणी झाली तेंव्हा देवकी-वसुदेवाचा नुकताच विवाह झाला होता. आता ह्या हुषार कंसाने काय करावं ? ह्याला ही सरळ घास खायची आवड नसावी. आकाशवाणीमधली कंडीशण ऐकुनही पठ्ठ्यानं देवकी-वसुदेवाला "एकत्र" राहु दिलं लोकंहो , किती हुशारपणा ? देवकी आणि वसुदेवाचंही कौतुक करावं तेवढं थोडंच ... जेल मधल्या वातावरणात सुद्धा त्यांच्या इच्छा जागृक होत्या , ह्याचं सुद्धा आम्हाला आश्चर्यं वाटुन गेलं . जेलंवर चोविस तास पहारा होता, आणि सैनिक त्यांना ऑल टाईम पाहु शकत होते , तरीही त्यांची हिंम्मत होऊ शकली. असो. ज्याची त्याची आवड,ज्याची त्याची सवड.
१.कंसाला दोघांना वेगवेगळ्या सेल्स मधे ठेवता येउ शकलं असतं का ?
२. आठ पोरांच्या खुणाचं पाप घेण्यापेक्षा एकट्या देवकीचा खुण सोयिस्कर ठरु शकला असता का ? आणि उगाच आठ वर्ष स्वतःच्या डोक्याची आणि झोपेची मंडई तो थोपवु शकला असता का ?
३. फॅमिली प्लानिंग तेंव्हा होतं की नाही ? हा संदिग्ध मुद्दा असल्याने कंसाला ह्या उपायाबद्दल बेनेफिट ऑफ डाऊट दिला आहे.
समरी : ह्यातुन निष्कर्ष काढणे आमच्या बुद्धीपलिकडे आहे. कंसंच जाणो तो एवढा हुशारपणे का वागला.
पौराणिक संदर्भ : कौरवांनी पांडवांवर अनेकदा कुरघोड्या केल्या , त्यांना पाण्यात पाहिलं , छल कपट वगैर केलं , आणि म्हणुन पांडवांकडुन ते धर्मयुद्धात हारले. आणि अनेक चमत्कार्स.
अॅनॅलिसिस : महाभारत हा पुर्ण ड्रामा होता, आणि त्यातली प्रत्येक पात्रे व्यासमुनींनी लिहीलेल्या स्क्रिप्ट प्रमाणे वागत-बोलत होती. इतर वेळी संयमाचा सल्ला देणारा श्रीकृष्ण , युद्धात मात्र एकदम पलटुन गेला , पांडवांना प्रत्येक वेळेस प्रत्येक मोहोरा टिपतांना छल - आणि कपटाचाच सहारा घ्यावा लागला . आता कृष्णाचेच नियम वेळेनुसार बदलल्याचं सत्य समोर येतं तेंव्हा अशा वेळेनुसार (कारण नसतांना) बदलणार्या श्रीकृष्णाला देवाचा दर्जा का ? जर आधीपासुन चालणार्या कपटांना मुकाट्याने सहन केलं नसतं आणि तेंव्हा उगाच *डु धोरण स्विकारलं नसतं तर महाभारत वाचवता येऊ शकलं असतं का ? पर्यायानं पुण्हा अनेक निरपराध माणसं , घोडे , हत्ती वाचवता आली असती का ? जुगार (पक्षी: द्युत) खेळल्याने माणुस कसा देशोधडीला लागतो , हा एवढा साधा सिद्धांत मांडण्यासाठी एवढा मोठा ड्रामा घडवुन आणनं पटत नाही. बाणांचं इंटेग्रेशन (म्हणजे एकाचे शेकडो बाण होणे) फिजीक्स च्या कोणत्याही नियमात नं बसणारे आहे (तशा एन गोष्टी आहेत हा भाग अलहिदा).
समरी : महाभारत ही एका सिरीयल ची स्क्रिप्ट आहे , सगळं कसं पुर्व नियोजीत आहे , आणि त्यात मुर्खपणाचा कळस गाठलेला आहे.
अजुन काही मजेशिर आणि रोचक गोष्टी मी ग्रंथ , मालिका , इत्यादी माध्यमांतुन आपण पाहातो.
पुराणातली (विशिष्ठ) लोकं कधीही कुठेही (ढिष्ष करुन) प्रकट/गायब होत होती. मालिकांमधे दाखवल्यानुसार हे लोक , दरवाज्यात प्रकट होत , आणि मग आत येत. उदा. कोणत्यातरी राजाचा दरबार भरलाय , नारदमुणी बरोबर दरवाजात (ढिष्ष करुन) प्रकट होतात. आहो चालायचा त्रास घ्यायचं काय बरं कारण ? व्हा की कुठेही प्रकत (लोकांची अंतःपुरं सोडुन),
इंद्र हा त्या काळचा सर्वांत पिडीत देव/व्यक्ति होता , त्यानं कधीच स्वर्गावर एकाधिकार शाही दाखवली नाही , सदा न कदा बिचारा ह्याच विवंचनेत , उद्या मी स्वर्गात असेन की नसेन ? आणि काही झालं की , उठले सगळे देव न निघाले (ज्याचा कार्यक्रम असेल त्या) मोठ्या देवांकडे , म्हण्जे जर ओम नम:शिवाय सुरु असेल तर नेहमी शंकराचा सहारा घेतला जातो , विष्णुचा असेल तर विष्णुचाच धावा लेका जातो , गेलाबाजार "जै गंगा मैय्या" चालु होतं तेंव्हा इंद्राने त्या बिचार्या गरिब गंगेकडेही ३% ने मदत मागणे सोडले नाही. तर असा हा ना-लायक इंद्र , स्वर्गावर राज्य करण्याच्या लायकीचाच नव्हता असं माझं प्रामाणिक मत आहे. :)
असो .. सांगण्यासारखे अनगिणत किस्से आहेत , पण लिहीण्याला मर्यादा आहेत. वर सांगुणही ज्या आस्तिक लोकांनी लेख वाचला आणि त्यांच्या भावणा दुखावल्या गेल्या तर त्या लोकांची माफी मागतो :)
सर्व मते वैयक्तिक , त्यात मतांतरे असु शकतील ;)
कमिंग सुण : कधी तरी ह्या "राशीभविष्यावर" लिहीण्याचा माणस आहे.
प्रतिक्रिया
15 May 2010 - 7:06 pm | ऋषिकेश
विनोद आधी ऐकलेले असल्याने नेहमीची मजा आली नाहि
सपष्ट मताबद्दल राग नसावा
ऋषिकेश
------------------
इथे दुसर्यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
15 May 2010 - 7:49 pm | टारझन
>> सपष्ट मताबद्दल राग नसावा
छे छे .. राग कसला भौ ?उलट आपल्या झालेल्या अपेक्षाभंगाबद्दल दिलगीर आहे ;)
@जैपालबाबा : हौ भौ .. सरस्वती-ब्रम्हा च्या "निर्मळ पिता-पुत्री" नात्याबद्दल आम्ही "भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास" मधे वाचलं आहे ;) पण त्यात ब्रम्हाची चुक आहे की नाही ? हा संदिद्घता आहे .. "नलपॉईंटरएक्सेप्शन" आलं हो त्याला =))
- टरपाल
15 May 2010 - 8:19 pm | खालिद
आज जम्या नही
बहुतेक रामायण, महाभारत यांची काल्पनिकता, सत्यता इ.इ. चा चावून चोथा झाल्यामुळे कदाचित असेल.
राशीभविष्य आणि नाडीभविष्य हे सध्ध्या हॉट टॉपिक असल्यामुळे त्यासाठी पु.ले.शु.
15 May 2010 - 7:09 pm | अनिल हटेला
चाराणे कमी ऐवजी पावली कमी कसं वाटतये ? ;)
असो.....
ही & ही पणाची किमान मर्यादा असलेला लेख !! :)
(ही ही ही )
बैलोबा चायनीजकर !!!उर्फ..
АНИЛ ХАТЕЛА :D
15 May 2010 - 7:42 pm | jaypal
आयल!!! तु काय आणि कस लिहीशील ? काही नेम नाही......
मझ्या कडुन थोडी भर....
१ महाराष्ट्रात (तेही सहकुटुंब बर का?) अलेला पहीला पर प्रांतीय कोण ?................... बोलो सियावर रामचंद्र की जय.
२. स्त्री लंपट (सेक्स मॅनीयाकच) देवराज इंद्र तर मला नेहमी अमिर बाप की बिघडी हुइ औलादच वाटत आली आहे. साला वेग वेगळी रुप घेऊन फसवुन स्त्रीया भोगायचा त्याला राजेपण बहाल केल. त्याचा तो अप्सरांचा दरबार (डान्सबार) व सगळे देव सुरापानात (दारू ढोसण्यात) मग्न आणि मग आसुरांचे आक्रमण. मग वाचवा वाचवा म्हणुन बापाचे पाय धरणे ई.
अवांतर = ब्रम्हदेव आणि सरस्वती यांच्या विषयी पण थोडा आभ्यास चालु ठेव.
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
15 May 2010 - 8:02 pm | नितिन थत्ते
हा हा हा.
आता आमचा पयल्या ष्टोरीचा अॅणालिसिस ऐका.
अंतिम वाचक वाचन करार मूळ लेखातल्याप्रमाणे.
टार्या म्हणतो तसे मागच्या दाराने येता आले असते हे खरे. पण राम & कं वनवासात झोपडीत रहात होती हे विसरून चालणार नाही. झोपडीत रहात असल्याने आत 'सोय' नसणार हे उघड आहे. त्यामुळे मागच्या बाजूने रावणाने कितीही प्रयत्न केला तरी त्या मागच्या बाजूच्या 'राड्या'मधून दारापर्यंत पोचणे शक्य नव्हते. आणि रावणाने स्लमडॉग पाहिला नसल्याने आपल्याला हवे ते मिळवण्यासाठी त्या राड्याची परवा करायची नसते हे उदाहरण त्याच्यापुढे नव्हते. त्यामुळे त्याला पुढच्या बाजूणेच येणे भाग होते.
लाईन क्रॉस करायची नाही हा नियम रावणाने पाळला हे खरे नाही. 'तेव्हाच्या टेक्नॉलॉजी'प्रमाणे लक्ष्मणाने एक खास घाण वासाचे औषध (गुडनाईट सारखे) त्या लायनीवर मारले होते. त्याचा वास फक्त रावणाला येई. त्यामुळे तो लांब उभा राहून भिक्षा मागत होता.
आता राहिला प्रश्न सीतेला लंकेतून घेऊन येण्याचा. तर रावणाने सीतेला पळवली होती लग्न करण्यासाठी. त्यामुळे गुलामांना सांगावे तसे अशोकवन दिवसातून दोनदा झाडणे वगैरे कामे त्याने सीतेला सांगितली नाहीत. त्यामुळे नुसते बसून बसून सीतेचे वजन कै च्या कै वाढले होते.
सीता सापडल्याचे हनुमानाने सांगताच रामाने " मग तिला घेऊन का नाही आलास?" असे विचारले होते. तेव्हा कामगार मॅणेजरला देतात तसेच उत्तर हनुमानाने दिले. "तुम्ही मला फक्त पत्ता काढायला सांगितले होते. तसे पण तुम्ही साहेब असाल पण सायबाच्या बायकोला उचलून आणणे माझ्या जॉब डिस्क्रिप्शनमधे नाही. जमायचं नाही. बायको तुमची आहे. तुमचं तुम्ही काय ते बघा".
मग रामाने सुग्रीवाबरोबर लेबर कॉण्ट्रॅक्ट केले आणि लढायला सेना मिळवली वगैरे.
बाकीची अॅनालिसिस नंतर.
नितिन थत्ते
15 May 2010 - 8:18 pm | टारझन
>> त्यामुळे मागच्या बाजूने रावणाने कितीही प्रयत्न केला तरी त्या मागच्या बाजूच्या 'राड्या'मधून दारापर्यंत पोचणे शक्य नव्हते.
=)) खरं आहे , ह्यावर विचार केला होता , आहो .. पण रावण हे सगळं मुक्ती साठी करत होता , ज्या प्रभु श्रीरामांच्या आणि सितेच्या चरणस्पर्षाची धुळ लागण्याने मुक्ति मिळते असे दाखले आहेत ,त्यात "राडा" मधे एक डुबकी मारली तर "नखशिखांत" मुक्ति नसती का मिळाली ? :)
वेडा रे वेडा .. रावण वेडा ...
15 May 2010 - 8:20 pm | सहज
एक महाबोधी म्हणून गेला आहे की माणसाची उत्क्रांती अद्याप पूर्ण झाली नाही या "माझ्या" सिद्धांताला रोजच अश्या कशा न कशा कथांमुळे बळ मिळते.
;-)
जाताजाता - जाहीरात
16 May 2010 - 12:48 am | शुचि
ए बाबा लक्ष्मणानी रेषा आखली .... रेषा इन्फायनाइट लांब असते. त्याने रेषाखंड नाही आखला.
______
त्या काळी कारागृहांना प्रायव्हसी असायची रे बाबा. कंसाला बहीणीला मारायचं नव्हतं. पिरीअड. ओव्हर कन्फिडन्स मधी गेला त्यो.
_________________
अरे रावण हनुमानाच्या हातून मेला नसता ना पण. त्याला आदल्या जन्मी वर होता की पुढ्च्या जन्मी विष्णूच्या हाती मृत्यू येइल का काहीतरी. मग हनुमानाने कितीही पराक्रम गाजवला असता तरी कशी सीता सुटली असती ?
__________
महाभारताची उदाहरणं नीट दे प्लीज.
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
16 May 2010 - 3:34 am | पक्या
ग्रंथांचा अभ्यास थोडा कमी पडला असे दिसतंय.
लक्ष्मणाने पूर्ण झोपडीभोवती रेषा आखली होती.(पुढून मागून) आता त्याला रेषा का म्हणतात ते माहिती नाही.. समोरून पाहिल्यास रेषाच दिसणार म्हणून असेल कदाचित.
हनुमानाने सितेला अशोक वनातून परत रामाकडे आणण्याची तयारी दर्शवली होती. पण सीतेने त्यास नकार दिला. रावणाने पकडलेल्या इतर अनेक स्त्रियांची सुटका झालेली तिला हवी होती शिवाय रावणाला रामच मारू शकत होता.
बाकी वर मांडलेले सर्वच मुद्दे खोडता येण्यासारखे आहेत पण आता घाईत असल्याने बाकी प्रतिसाद नंतर.
जय महाराष्ट्र , जय मराठी !
16 May 2010 - 7:14 am | तिमा
भट्टी जमली नाही , त्यामुळे 'टारझनचा सिनेमा बघायला गेलो आणि 'झिंबो कम्स् टु टाऊन' बघावा लागला , अशी स्थिती झाली.
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
16 May 2010 - 9:46 am | टारझन
=)) =)) =))
अपेक्षाभंगा बद्दल सॉरी शक्तिमान !!
बाकी , पक्या बाबा , मुद्दे जरुर खोडा राव ... त्यावर आम्हालाही खुडलब्बर फिरवायला आवडेल ... वेळ काढुन मुद्दे खोडुन काढणे ... प्लिज :)
आम्ही अरुण गोवील चं रामायण पाहिलं .. त्यात लक्ष्मणाने एक रेघ मारली होती , जशी आपण गल्ली क्रिकेट मधे पिच आखताना मारतो ना, तशी :)
16 May 2010 - 10:03 am | विकास
पक्याप्रमाणे अजून मुद्दे खोडता येऊ शकतात. एकदा का देवांना कथेची पात्रे म्हणले की त्यात अॅनॅलिसिस कसले करायचे हा एक वेगळाच मुद्दा ;) पण ह्या लेखाशी इमान राखून त्या संदर्भातच प्रतिसाद देतो. केवळ विरंगुळा म्हणून घ्यावात ही विनंती :-)
सर्वप्रथम: एखादे संकेतस्थळ निर्माण होते. मात्र संकेतस्थळकर्ता अदृश्य राहून त्या संसृष्टीत (हा नवीनच शब्द आहे, आत्ता झाला मला!) राग-लोभ-यापासून सर्व भावना निर्माण होतात, मैत्री तयार होते, शत्रू दिसू लागतात पण संस्थळकर्ता कधीच दिसत नाही. फक्त त्याचा अदृश्य हात कधीतरी दिसू शकतो. जर असा संस्थळकर्ता न दिसताही आपण त्याचे अस्तित्व मानतो तर मग देवाचे अस्तित्व का मानायचे नाही? :?
बाकी रामायणातील कथा-अॅनॅलिसिस वाचताना मला एकदम मच्छिंद्र कांबळींचे "राम तुझी सीता माऊली" हे वगनाट्य आठवले. एकदम सॉलीड होते.
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
16 May 2010 - 10:28 am | टारझन
हा हा हा .. आहो संकेतस्थळ चालु असल्याचे प्रॅक्टिकल पुरावे असतात (ते चालु आहे हे फक्त दिसतंच नाही ), संकेतस्थळ कर्त्याला आम्ही चार वेळेला भेटुन आलो ... :)
बाकी देव माणण्यावर आहे :) आणि संकेतस्थळ वेबसर्वरवर आहे :)
मच्छिंद्र कांबळींच्या रामायण अॅणॅलिसिस बद्दल बिल्कुल कल्पणा नव्हती ... :) पहायला हवे.
"आत्मा" हा अजुन एक मनोरंजक विषय आहे =)) =))
- परमात्मा
16 May 2010 - 11:01 am | Manoj Katwe
ह्या वरून एक कथा आठवली, एकदा एक शिष्य गुरुन्ना देव असण्याचा पुरावा मागतो, गुरु म्हणतात की सांगेन कधीतरी.
पुढे कधीतरी ते एकदा एक धरण बघतात, गुरु म्हणतात, बघ ते आपोआप तयार झालेला धरण बघ, शिष्य म्हणतो की ते आपोआप तयार झालेले नहीं, ते मनुष्याच्या अथःक प्रयत्नातून तयार झालेले आहे. मग पुढे गुरु त्याला एक यन्त्र दाख्वीतात, व म्हणतात की ते बघ आपोआप तयार झालेले यन्त्र यावर शिष्य म्हणतो ते यन्त्र आपोआप तयार झालेले नहीं, ते मनुष्याच्या अथःक प्रयत्नातून तयार झालेले आहे. मग गुरु त्याला सांगतात की आता स्वताला बघ की तू आपोआप तयार झालेल आहेस. तुसे सर्व अवयव डोळे, नाक कान हाथ, पाय हे सर्व आपोआप तयार झालेले आहे. शिष्याकडे उत्तर नव्हते.
16 May 2010 - 11:12 am | टारझन
>> स्वताला बघ की तू आपोआप तयार झालेल आहेस. तुसे सर्व अवयव डोळे, नाक कान हाथ, पाय हे सर्व आपोआप तयार झालेले आहे.
=)) =)) =)) =)) अ जेन्युअन जोक :) शिष्याने जेनेटिक एंजिनियरिंग ला अॅड्मिशन घ्यावे , जीवशास्त्राचा अभ्यास करावा .. :) डिएनए वगैरे काय असते ते गुगल करुन समजुन घ्यावे , उगा गुरु म्हणतो म्हणुन काहीही मानु नये
16 May 2010 - 12:07 pm | Manoj Katwe
आहो टारू भाऊ मला सुद्धा हेच म्हणायचे होते की हे सगले एवढे अवघड देवा शिवाय कोण करू शकणार आहे. गूगल करून आपण माहिती घेऊ शकतो, पण तयार करने अजुन तरी आपल्या हातात आहे का ? (आणि जरी भविष्यत् ते आपल्या हातात आले तर मृत्यु ला जिंकने शक्य आहे का ?) (आणि जरी मृत्युला आपन जिंकले तरी आपण स्वताला देव म्हणून घेऊ शकतो का ?)
मान्य आहे की जरा विषयांतर होत आहे पण सर्व मुद्दे शेवटी इथेच येउन थांबतात
16 May 2010 - 11:09 am | Manoj Katwe
देव आहे हे म्हानन्या पेक्षा देव नाही हे म्हणे जरा जास्त जबाबदारीचे आहे. मला प्रथम हे समजू दे की देव नहीं म्हानानार्यन्नी देव किती व कुठे शोधला?. आपन सध्या समुद्राच्या तलाशी सुद्धा कही शोधू शकत अणि, बाकि ब्रम्हांड वगेरे तर अजुन पुढील ५००/१००० वर्ष तर सोडूनच दया.
आणि आपण जितके शोधू त्याच्या पेक्षा १००० पट शोधने बाकि असेल नेहमीच.
16 May 2010 - 10:34 am | ज्ञानेश...
अ क्रिटीक इज वन हू नोज प्राईस ऑफ एव्हरीथिंग बट व्हॅल्यू ऑफ नथिंग इत्यादि आठवले.
'राशीभविष्य' धागा पुरेशा तयारीने काढलेला असावा, ही अपेक्षा.
16 May 2010 - 10:49 am | Manoj Katwe
आपला लेख वाचून आवडला.
आहो टारू भाऊ, तुमचा आउट ऑफ़ बॉक्स विचार पाहून डोक्याचा बॉक्स पार फुटुन गेला.
पण एक विचार डोक्यात येउन गेला, राम, कृष्ण हे खरतर आपल्या सारखी मानसेच होती, त्यांना देवत्व बहल केले ते आपणच. पण
आपण चूका शोधू लागलो म्हणजे प्रगतिचे खरे लक्षण आहे.
त्या काळात मोबाइल, इन्टरनेट , विमान, helicopters आदि साधने नव्हती तरी सुद्धा त्यांनी जो निकराने लढा दिला तो खरेच वाखनन्याजोगा आहे.
भले ही हजार चूका असतील आपल्या इतिहासात, पण आपण त्यातून काहीतरी चांगलेच शोधावे. चूका ह्या प्रत्येकाने कधीनाकधी केलेल्याच असतात.
16 May 2010 - 10:56 am | टारझन
>> त्या काळात मोबाइल, इन्टरनेट , विमान, helicopters आदि साधने नव्हती तरी सुद्धा त्यांनी जो निकराने लढा दिला तो खरेच वाखनन्याजोगा आहे.
क्या मजाक कर रेले मिया ...
मोबाईल : आहो .. टेलेपथी वगैरे होती त्या काळात .. इकडं मनात बोललं की तिकडं ऐकू जाई ... नो टेरिफ प्लान्स , नो ट्राफिक प्रॉब्लेम .. , आत्ता टेलिपथी स्पेक्ट्रम बंद आहे
इंटरनेट : हा हा हा .. ते विरंगुळ्यासाठी अजुन बरेच प्रकार होते , जे आत्ता नाहीत
विमान /चॉपर : हाहा , पुष्पक वगैरे चं अधुनिक तंत्रज्ञान अजुन आपण शोधु शकलेलो नाही , तेंव्हा पब्लिक विना पंखाचा उडु शकायचं ... एवढंच काय .. आपल्याला स्वप्नवत वाटणारं "टेलेपोर्टिंग" अर्थात ढिश्श करुन प्रकट / गायब होणं , आणि त्रिलोकात कुठेही पोचणं ... :) कोण जास्त अॅड्वाण्स होतं ... तुम्हीच सांगा ...
16 May 2010 - 12:39 pm | Dipankar
:) :) :)
अहो टार्येंद्र आता तुम्ही बग रहित टारायण, महाटारत टुराण लिव्हा की,
आम्ही वाजंत्री कृतिपेक्षा तोंड वाजवणे योग्य समजतो