गाभा:
माझी चिऊ दीड दोन वर्षाची होती तेंव्हा काही violent म्हणजे tom and Jerry , काही जपानी कार्टून , कृष्णा, छोटा भीम वगैरे असे बघायची...कार्टून असल्याने आधी काही वाटले नाही...पण टीवी वरचा violence पाहून तीपण वस्तू फेकणे, चावणे, डोक्यात काहीतरी मारणे असले चालू झाले..काही कळेचना...मग लक्षात आलं कि हा सगळा टीव्ही चा परिणाम....मग तिला फक्त PBS किड्सचेच प्रोग्राम दाखवायला लागले..इतर मारामारी च्यानेल बंद....tom jerry नाही...nick वरचे कार्टून नाही...तिच्याबरोबर "अश मालनाले लोक वेले अश्तात, अश नाई कालायच्य " वगैरे सांगून सांगून थोडा फरक पडला...teenage मुलांना सुद्धा violence असलेले video games खेळू द्यायचे कि नाही हा प्रश्न आहे....कश्या पद्धतीने समजवायचे....अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन अपेक्षित आहे...
प्रतिक्रिया
12 May 2010 - 5:13 am | स्वाती२
दिड दोन वर्षांच्या मुलांना टी. व्ही. बघू देऊ नये. त्या पेक्षा लेगो ब्लॉक्स, चित्र असलेली पुस्तके द्यावीत.३ वर्षाच्या मुलालाही १ तासापेक्षा जास्त टि.व्ही. बघू देऊ नये. अगदी PBS असले तरीही. माझा मुलगा टीनेजर आहे आणि आमच्या कडे व्हिडिओ गेम्स, केबल वगैरे प्रकार नाहित. स्कूल नाईटला टि.व्ही. नसतो. विकेंडचा टिव्ही देखिल लिमिट मधे.
12 May 2010 - 7:13 am | अविनाशकुलकर्णी
इतके विपरीत परीणाम होत नाहित...थोडी मोठी झाली कि त्यातली व्यर्थता पटते..आमची मुले असे प्रो बघायचे..पण आक्रमक झाली नाहित..व्यर्थ भिति बाळगु नका.
12 May 2010 - 7:55 am | नितिन थत्ते
सहमत आहे.
याचा टीव्हीशीच संबंध नाही.
आम्ही पुस्तकातलीच चित्रे पाहून धनुष्यबाणाने (हिरकुटाच्या) खेळायचो. आणि गदेने (ताक घुसळायच्या रवीने) मांड्या फोडायचो. तलवारीने (फूटपट्टीने)मुंडके छाटायचो.
नितिन थत्ते
12 May 2010 - 8:18 am | शिल्पा ब
धन्यवाद #:S ...
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
12 May 2010 - 8:32 am | स्पंदना
:)) :)) :)) थत्ते साहेब!!!!
मी सान्गु का शिल्पा तुला लहाण वयात त्यन्ची ऑब्झरवेशन,इमॅजिनेशन,आणि इमिटेशन या गोश्टीन्ची ताकद फार मोठी असते. मी समजु शकते आपल्याला बॅक अप नसल्याने सारा वेळ मुलान्च्यात रहाव लागत आणि टि. व्ही. चा वापर आपण थोडा वेळ आपल्या ला मिळावा म्हणुन करतो.
थोडे दिवस काढ आणि आपल्याकडे गिरवायच्या पाट्या मिळतात अजुन त्या आणुन दे! मुल रमतातहि अक्षर ही छान होत,आणि एव्हढ गिरवल तर आई पप्पी देणार वगैरे(खाउ ची आमिष टाळ) करुन बघ.
शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
12 May 2010 - 10:28 am | नितिन थत्ते
~X(
दीड वर्षाच्या मुलीला अक्षरे गिरवायला?
(मीच येतो डोक्यात काय काय मारायला......)
नितिन थत्ते
13 May 2010 - 8:14 am | स्पंदना
अहो थत्ते साहेब गिरवायची म्हणजे काढायची नाहीत काही. अक्षर कोरलेली प्लास्टीक ची एक स्लेट मिळते. मुल खेळ म्हणुन त्यातुन पेन्सील फिरवत रहातात. जरा अजुबाजुच्या भिन्ती खराब होतात पण टी. व्ही. पेक्षा बर. तीचा प्रश्न काही फक्त मुलाशीच सम्बन्धीत नाही आहे. माहेर सासर पासुन लाम्ब आम्ही आधीच एकट्या असतो. आणि लहान मुलान्च्या बरोबर तर घरची काम आणि त्यान्च मनोरन्जन ही दुहेरी कसरत करावी लागते. शेजारीही कुणी तसे मुलान्शी जास्त बोलत नाहीत, जसे भारतात बोलतात्.एकट्यावर या सार या जबाबदार् या म्हणजे अगदी तारेवरची कसरत होते.
शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
15 May 2010 - 10:31 am | नितिन थत्ते
तुमचा प्रॉब्लेम मान्यच आहे हो.
"फळाची अपेक्षा न धरता" ;) अक्षरे गिरवायची पाटी द्यायला पण हरकत नाही.
नितिन थत्ते
12 May 2010 - 9:25 am | टारझन
हॅहॅहॅ... आम्ही छोट्या टारझनलसाठी डायरेक्ट डब्लुडब्लुएफ पासुन सुरूवात करू म्हणतोय =))
- (ट्रिपल एच) टारझन
12 May 2010 - 11:28 am | शिल्पा ब
=)) =)) =))
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
12 May 2010 - 1:55 pm | llपुण्याचे पेशवेll
आयला आत्तापासूनच छोट्या टारझनची तयारी?
:)
असूदे अर्थात. पुढच्या गोष्टींचा विचार करून आत्तापासून योग्य कृती करणार्याला दूरदृष्टी असलेला म्हणतात.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Phoenix
12 May 2010 - 10:30 am | शानबा५१२
GTA 4 किंवा GTA San Andreas खेळुन बघा आणि नंतर Tom And Jerry बघा.
ह्याच्याने काय होईल माहीती नाही.(कदाचीत Tom And Jerry बद्दलच मत बदलेल)
पण मुलांना ईसापनीतीच्या गोष्टी सांगण चांगल असत.
आता तुमची मुलगी तेवढी मोठी आहे का ते कळायला ते माहीती नाही पण आता पासुनच सुरवात करायला हरकत नाही.
टी.व्ही हे काही एकच साधन नसत मुलांसाठी त्याच्या बुद्धीला चालना द्यायचे, खुप प्रकार/पद्धती आहेत.त्या वापरुन आपण मुलांना tv पासुन कायमच दुर करु शकतो,आता उदाहरण मागाल तर drawing आणि तत्सम,creativity वाढते.
शकुंतला देवी ह्यांचे "make your child maths(?) genius" हे पुस्तक छान आहे(?).मी नाही बघितल पण त्यांची सर्वच पुस्तक छान असतात.
12 May 2010 - 11:16 am | सारिका
Tom And Jerry ? violent ? आहे मला असे वाट्त नाहि :-) तुमची मुलगी लहान असेल त्यामुले तिला समझत नसेल . अविनाश कुलकर्णी च्या reply var सहमत आहे.
12 May 2010 - 11:27 am | शिल्पा ब
violent म्हणजे ते एकमेकांना मारतात...bomb फोडतात...गोळ्या घालतात..डोक्यावर वस्तू मारतात...इ. violence आहे...लहान मुलांना कळत नाही हे खरे नाही ते...सारखं सांगावं लागतं हे खोट आहे...टीव्ही आहे......माझा अनुभव...आणि माझी मुलगी विचारायची " ते का मारामारी करतायत ?"...
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
12 May 2010 - 12:17 pm | नाना बेरके
हॅहॅहॅ... आम्ही छोट्या टारझनलसाठी डायरेक्ट डब्लुडब्लुएफ पासुन सुरूवात करू म्हणतोय
- हे मला फाल्फाल आवदलं टालझनअंकल . .
चांदनी आयी ID उडाने. ., सुझे ना कोई मंजील.
नाना बेरके
12 May 2010 - 12:25 pm | अरुंधती
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट! शिल्पा, तुझी मुलगी दिवसातून कार्टून किती वेळ पाहाते हेही महत्त्वाचे आहे. माझ्या ओळखीत अशीही काही मुले आहेत जी त्यांना मुभा दिली तर दिवसभर कार्टून्स पाहतात.... अगदी दात घासण्यापासून ते जेवण्यापर्यंत, सर्व वेळेला त्यांना कार्टून्स बघायला हवी असतात. ती त्याच दुनियेत रमतात. त्यांच्या मित्र मैत्रिणींशीही त्याच विषयांवर गप्पा मारतात किंवा त्या कार्टूनवरून कल्पना घेऊन खेळतात. तुझी चिंता अगदी रास्त आहे. त्यामुळे आपली मुले टीव्हीवर नक्की काय बघत आहेत ह्याबद्दल जागरूक राहणे चांगलेच!
डोरेमॉन, बॉब द बिल्डर, हाईडी, एल्मोज वर्ल्ड वगैरे कार्टून्स त्यातल्या त्यात बरी!
मी असं ऐकलं आहे की चिंटू ही आता कार्टून फिल्म रूपात येत आहे.
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
12 May 2010 - 1:02 pm | दत्ता काळे
ह्याविषयीचे अभ्यास करून नोंदविलेले मत :
माझ्या मुलाच्या शाळेने ( अक्षर नंदन, पुणे ) पालकांसाठी एक सभा आयोजित केली होती. त्यामध्ये पालकांच्या दृष्टीने नेहमीच चिंतेचा वाटणारा हा विषय मांडला होता. त्यासाठी शाळेने एफ्.टी. आय. आय. मध्ये मोठ्या हुद्यावर काम केलेल्या एका रिटायर्ड व्यक्तीला बोलाविले होते. त्याने संपूर्ण महाराष्ट्राचे विभागवार - प. महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण -भाग पाडून, तिथे जाऊन व्यक्तिगत पातळीवर सर्वेक्षण केलेले होते. आणि त्याने त्याचे सादरीकरण ह्या सभेत केले. त्याच्या अभ्यासानुसार लहान मुले टि.व्ही. बघून मुले कुठल्याही गोष्टी शिकत नाहीत, ते जे काही बघत असतात ते अगदी तात्कालीक स्वरुपाचे असते, त्याचा त्यांच्या मनावर फार काही परीणाम होत नाही. (पण हे महाराष्ट्रातले ( पक्षी : भारतातले ) आहे, त्यामुळे अभ्यासलेल्या गटांची मानसिकता हि भारतातल्या मुलांची आहे.)
उलट असे समजले जाते कि, मुले आईवडीलांच्याच गोष्टींचे अनुकरण करत असतात. त्यामुळे आपण हिंसक, हट्टी असू तर मुले तशी होतील.
12 May 2010 - 5:49 pm | सुखदा राव
टी वी बघनार्या मुलान्चा १ अनुभव आला अलिकडेच. १ मुलगा म्हनाला 'आता मी अतिरेकी होतो. तुम्ही साधी मानस व्हा. आणि मी गोल्या मारल्या की मरा.' हे ऐकुन १ आई बाहेर आली अन म्हनाली ' हे असे खेल खेलन्यापेक्षा आत चला अन कार्टून बघा बर सरळ.' आता बोला.
12 May 2010 - 5:58 pm | बारक्या_पहीलवान
| दीड वर्षाच्या मुलीला अक्षरे गिरवायला?
| (मीच येतो डोक्यात काय काय मारायला......)
चावले सगळे 'ब' ला....
हॅहॅहॅ... सगळे प्रतिसाद वाचुन हसुन वाट ....
सर्वे लेख वाचुन झालेवर पहिले टारझन ची प्रतिक्रेया वाचतो.
- तारक्या पहीलेवाच.
12 May 2010 - 10:20 pm | शिल्पा ब
यापेक्षा एक वेगळेच...मी आठवीत होते तेवा चोली के पीछे हे गाणं जोरात होतं....केव्हाही कुठेही वाजत असायचं...आम्ही माझ्या काकाकडे गेलो होतो..त्याचा मुलगा त्यावेळी ४-५ वर्षाचा असेल...टीव्ही वर गाणं लागलं आणि घरात काकू, आई, आम्ही लहान मुलं असल्याने च्यानल बदललं....तेव्हड्यात हे कार्ट माझ्याजवळ आलं आणि विचारलं "ए , चोली के पीछे काय असतं गं ?"...काय सांगणार कपाळ ....सगळ्यांनी सोयीस्कर दुर्लक्ष केलं..
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
13 May 2010 - 1:18 am | शुचि
थोडीशी हिंसा ही जमलीच पाहीजे. उद्या आपल्या मुलाला कोणी मारायला आलं तर आपल्या मुलानी त्या दुसर्या मुलाच्या झिंज्या उपटल्याच पाहीजे.
मी लहानपणी सुद्धा बावळट होतेच. एका मुलानी मला खेळण्यातली पिस्तूल दाखवली होती माझी जाम तंतरली होती. :(
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
14 May 2010 - 8:49 pm | chipatakhdumdum
आपल्या मुलाला....आपल्या मुलानी
एका मुलानी ..
या आणि अशा शुध्धलेखनाच्या चुका कृपया करु नका अशी नम्र विनंती.
चांगल लिहीता, पण अशा वेळी दाताखाली खडा येतो आणि मजा जाते.
17 May 2010 - 9:16 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
"शुध्धलेखनाच्या" या शब्दातही चूक आहे, हा शब्द शुद्धलेखन असा लिहीतात!
मराठी संस्थळावर रोमन लिपीतला आयडी पाहून डोळ्यासमोर अंधारी येते आणि वाचता येत नाही.
अदिती
13 May 2010 - 1:49 am | भडकमकर मास्तर
माझी आतेभावंडे (ती दोघे नऊ वर्षे आणि ५ वर्षे वयाची असताना )मे महिन्याच्या सुट्टीत सलग १० तास सर्व प्रकारची कार्टून्स पाहताना पाहिलेली आहेत...आज त्या दिवसाला १३ वर्षे झाली... दोघेही हुशार आहेत , प्रचंड अभ्यासबिभ्यास करतात आणि भरपूर मार्क पाडतात..आणि हिंसक बनली नाहीत ... ;)
अवांतर : या धाग्याच्या प्रत्येक प्रतिसादातून इतके विविध निष्कर्ष निघताना पाहून मज्जा वाटली...
अतिअवांतर : माझ्या प्रतिसादाचा निष्कर्ष : शालांत परीक्षांमध्ये उज्ज्वल यश मिळवून हुशार बिशार असा शिक्का बसवून घेण्यासाठी बालपणी किमान दहा तास रोज कार्टून नेटवर्क पाहिले पाहिजे...
_____________________________
श्याम, आजची पीढी अशी आहे का रे?हे असे चित्र का रंगवायचे? आणि असेल तर बदलायला नको का रे श्याम?
15 May 2010 - 10:19 am | मनीषा
कार्टून चॅनेल मुळे मुलसुद्धा मारामारी/आरडाओरडा करतात हे फारसे खरं नाहीये ..
पण टि. व्ही . , व्हिडिओ गेम्स, कॉम्प्युटर याच्या (अतिरेकी) वापरामुळे अनेक दुष्परिणाम होतात. हे लहान मुलांप्रमाणे मोठ्या व्यक्तिंना सुद्धा लागू होते..
चित्रकला, वाचन, पाठांतर, मैदानी खेळ इ. चांगले छंद जोपासले जात नाहीत. कुटंबातील व्यक्तींचा एकमेकांशी संवाद कमी होतो, किंवा अजिबात होत नाही.
सतत टि.व्हि. पाहिल्याने मुलांच्या आभ्यासावर आणि आरोग्यावर सुद्धा परिणाम होतो.
(ह्ल्लीच्या सांस - बहू सिरियल्स मुळे घरातील भांडणे तसेच कट कारस्थाने आणि विवाहबाह्य संबध इ. ला प्रोत्साहन मिळतं असं तुम्हाला वाटतं का ? )