ओपन माईंड ठेवायला कुणाचीच हरकत नसते पण
थोडीशी समर्थनात्मक वाक्ये वाचून ओक यांचा मोठाच गोंधळ उडाला असण्याची शक्यता
राष्ट्रीय विज्ञान-तंत्रज्ञान दिनानिमित्त... वरुण यंत्र - यज्ञ तंत्राचा जाहीर निषेध
हा धागा टाकून मी वाट पहात होतो तेच नेमके झाले.
तेथे प्रतिसाद फार खाली गेले होते म्हणून नवा टाकत आहे.
ज्योतिष किंवा भविष्य अशा शब्दांचा नुसता संदर्भ आला की ओपन माईंडवाल्यांना अनुभव घ्यायला का अवघड जावे हा त्यांनी विचार करण्यासारखा आहे.
चिकित्सा थिअरी मान्य करण्याचे निकष कसे ठरवावे वगैरे याचा विचार करावा लागतो.
नाडी ग्रंथांच्या बाबत निकष कसे ठरवावेत, काय असावेत याची चर्चा जरूर करावी पण आधी अनुभव तर घ्याल. त्यालाच जर कोणी नाकारत असेल तर मग निकष कसे ठरवणार, मिपावर काहींनी नाडीग्रंथांचा आस्वाद घ्यायचे ठरवले असल्याचे म्हटले गेले पण ते अपेक्षेप्रमाणे बोलघेवडे ठरले.
फतेहपुर सीक्री सहल धाग्याने मी ते हळूवारपणे दर्शवले होते.
नाडी ग्रंथाच्या चिकित्सेसाठी मिपावरील आपणासारख्या अनेकांनी विविध टिपण्यातून व माझ्या अन्य घाग्यातून "चिकित्सा थिअरी मान्य करण्याचे निकष " माहित असून त्याकडे जाणीवपुर्वक टाळले जाते हे लक्षात येते.
आपल्या सोईसाठी इथे मी आधी उल्लेख केलेला महत्वाचा निकष पुन्हा नमूद करतो - नाडीग्रंथांच्या ताडपट्टीत व्यक्तीचे नाव कोरुन येते का? येत असेल तर ते कसे? याचा शोध घेणे-
आता यात भविष्य वा ज्योतिष याचा संदर्भ आला कुठे? हा तर निखळ तमिळभाषेचा -लिपीचा शोध आहे.
मी माझ्याबाजूने केलेल्या अभ्यासाचा पुरावा सादर केला. तो मिपावरील काहींनी वाचून सत्य असल्याचा निर्वाळा दिल्याचे आपणास आठवत असेल.
त्याकडे दुर्लक्षकरून मिपाचे लोक आम्ही विचारतो त्या प्रश्नांची उत्तरे ओक देत नाहीत-टाळतात असा कांगावा करतात.
मी आत्ताच नमूद करतो की - जसा पुर्वी मला अंनिसवादी लोकांनी केलेल्या बहाण्याचा अनुभव आला त्याप्रमाणे - काही मिपाकर नाडीग्रंथांचा अनुभव मी म्हणतो म्हणून घेतीलही. पण ते अशासाठी की नंतर म्हणायला की ओकांचा आग्रह होता म्हणून त्यांच्या समाधानासाठी अनुभव घेतला. अन्यथा आम्हाला तो घ्यायची गरज नव्हती. आम्ही आधीच मानतो की नाडी-वाडी सर्व थोतांड आहे.
मात्र कोवूर,बी प्रेमानंद आदी दिग्गजांपासून ते मा श्री रिसबुड, प्रकाश घाटपांडे, दाभोळकर, शाम मानव आदी ज्या सर्वांनी छातीठोकून नाडीग्रंथांना थोतांड ठरवले त्यातल्या एकानेही नाडी पट्टीचा, त्यातील भाषेचा-लिपीचा, व्यक्तीच्या नावांचा पुरावा सादर करून काही म्हणणे मांडले असेल तर ते त्यांनी सादर करावेत. मी माझ्यापरीने ते पुरावे सादर केलेले आहेत. शिवाय त्यातच आपल्याकडून माहिती काढून तीच आपल्याला सांगितली जाते या आरोपाची शहानिशा आपोआप होते. बर त्यांनी नाही केले तर मिपाकरांनी करावेत.त्यांना तर कोणी आडवले नाही ना?
प्रतिक्रिया
12 May 2010 - 11:25 pm | टारझन
ह्या नाडीचा उपयोग कोणाचं बुडलेलं वर काढायला होतो का ?
-(णाडिविष्वासु) बशीकांत कप
13 May 2010 - 12:26 am | कवितानागेश
अहो,
खरोखरच अभ्यास केला तर बोम्बाबोम्ब कशी करायला मिळेल?
दुसर्याला 'मुर्ख' ठरवल्याशिवाय स्वत।ला शहाणे ठरवता येत णाही!
============
माउ
13 May 2010 - 10:55 am | मृगनयनी
"विजय भटकरां" सारख्या ज्येष्ठ शास्त्रज्ञाने स्वत: नाडी-ज्योतिषाद्वारे स्वतःची "पट्टी" तपासलेली आहे.
व नाडी-ज्योतिषा'मध्ये कसलीही फसवेगिरी नसल्याचा निर्वाळा'ही दिलेला आहे.
______________
मला स्वतःला "अगस्ति-कौशिक-पट्टी" आणि "अत्रि-जीव-नाडी" यांचा फायदा झालेला आहे.
नाडी-ज्योतिषा'मुळे मिळालेल्या बहुमूल्य सल्ल्यांमुळे माझे अनेक संकंटांपासून रक्षण झालेले आहे.
:)
______________
प्राचीन ऋषी-मुनींच्या ग्रंथसम्पदेतील "नाडी-ज्योतिष" हा एक अमोल ठेवा आहे. आपण सर्वांनी त्याचा उचित लाभ घ्यावा!
:)
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
13 May 2010 - 9:21 pm | टिउ
भटकरांनी निर्वाळा दिला हा नाडी-ज्योतिष खरं असण्याचा पुरावा कसा काय असु शकतो हे समजलं नाही!
हे म्हणजे आपले पंतप्रधान, राष्ट्रपती सत्यसाईबाबांचे भक्त आहेत म्हणजे सत्यसाईबाबा खरंच ईश्वराचा अवतार असावेत असं म्हणण्यासारखंच आहे...
13 May 2010 - 9:10 pm | खादाड_बोका
ओकसाहेब, मृगनयनी ...
कसाबची नाडी पट्टी शोधा व त्याचे अचुक भविष्य सांगा... 8}
जर ते बरोबर ठरले तर ईथे अमेरिकेत मी नाडीची फुकट जाहीरात करेल..... :W
नाही तर कोणाची नाडी कुठे व केव्हा सोडायची ते ठरवा.... 8}
आम्ही वरात घेवुन यायला केव्हाही तयार आहोत.. X(
नाडी फक्त बांधण्या पुर्ताच ठीक....
13 May 2010 - 9:11 pm | llपुण्याचे पेशवेll
हम्म. पण कसाबची नाडी शोधायला निषाणी डावा अंगठा लागेल ना! तो कोण मिळवून दील?
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Phoenix
14 May 2010 - 4:37 pm | परिकथेतील राजकुमार
आपण अमेरीकेत असता हे कळवल्याबद्दल धन्यवाद.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
13 May 2010 - 11:51 pm | शिल्पा ब
जगात इतके लोक आहेत...प्रत्येकाची नाडी वेगळी का? आणि नवीन नवीन बाळे येतात त्यांच्या नाड्यांचे काय? ह्या नाड्या बनविनार्याना लोकसंख्येचा अंदाज होता का म्हणजे अमुक इतक्या नाड्या तयार करायला....
mind ची उघडझाप होत असलेली (इल्यास्टिकवाली) शिल्पा
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
13 May 2010 - 11:56 pm | टारझन
>>> आणि नवीन नवीन बाळे येतात त्यांच्या नाड्यांचे काय? ह्या नाड्या बनविनार्याना लोकसंख्येचा अंदाज होता का म्हणजे अमुक इतक्या नाड्या तयार करायला....
=)) =)) =)) =)) how funny , Oh my god ... i just fall on the floor .... I am laughing like a super idiot (which is the fact) ... लै भारी शिल्पा
~ झुबैदा
मै भांडकुदळी, भांडु अकेली , कोई येडी हुं मै ...
14 May 2010 - 9:37 am | Dipankar
एक शक्यता आई-बापाची नाडी मुलाच्या नाडीला जन्म देत असेल
त्यामुळे
लोक्संख्या = नाडीसंख्या
:)) :)) :))
आम्ही वाजंत्री कृतिपेक्षा तोंड वाजवणे योग्य समजतो