राम राम मंडळी. अधिक मास मंजी तीन वर्षामधून एकदा जास्तीचा म्हैना येतो. तेरावा म्हैना. त्यो अधिक मासाचा महिना . या म्हैन्यात देव धर्म-पूजा अर्चा सत्यनारायण असे लय परंपरा पाळल्या जातात. नदीला जावून आंगूळ कराची. या म्हैन्यात पून्य पदरात पाडून घ्याची नुस्ती धावपळ सुरु राहती. पर याच्यात काय नवल नाय. सध्या मजा हाय त्या जावई लोकायची. या म्हैन्यात जावयाला बोलून पुरण पोळ्याचा सैपाक करुन जेवू घालायची परंपरा पडली हाये. जावयाला कपडे, टोपी-टावेल आन सासर्याची जशी परिस्थिती आस्सन तस्सं या म्हैन्यात मानपान केल्या जातो. जेवणात धोंडा नावाचा एक मोदकासारखा आयटम बनिल्या जातो. त्याच्यामधी कोणी कोणी सासरे सोन्याची अंगठी बिंगठी देतेत. कोणी जावयाची मस्करी कराची म्हून मीठ, मीर्चीचा बूकटा टाकून ठोते. धोंड्याच्या म्हैन्यात जावयाला दान केल्याने पुण्य मिळते अशी श्रद्धा हाय.
या वाढत्या म्हैन्यास शास्तरकारायनी अशुद्ध म्हैना म्हणेल हाये. लग्न, मुंजी, असे शुभ कार्य करू नये. या काळात व्रत दान धर्म कराचे. अधिक महिना आला मंजी वर्षात एक म्हैन्याचा खर्चबी वाढतो. म्हून तर दुष्काळात तेरावा महिना असे म्हणतात.
अडाणी लोकं. जग कुठं चाल्लं. अशा गोष्टीसाठी येळ कसा मिळतो. ही सारी थोतांडी हायीत. याच्यामुळे आपली मागासलेली म्हून इमेज बनती. कृपया अशा गोष्टीवर या धाग्यात टैम पास करू नये. ते सारे सोडून लिव्हा. सार्या जावयांना या निमित्त आवाहन करण्यात येते की येत्या बुधवारलोक आपापल्या सासर्याकडे गोडधोड जेवण करुन येणे. कपडे लत्ते, सोने नाणे, भेटवस्तू दिल्या तर नाकारु नये. सास-यांनीबी पून्य घ्याची संधी सोडू नये. अशी गोडधोड खावून कपडे लत्ते घेऊन आलेल्या जावयाची आपल्याला नम्र इनंती. तव्हा सासर्याकडं जाणार का नाय तेवढ मातर इथं लिव्हा. :)
प्रतिक्रिया
8 May 2010 - 10:33 am | नावातकायआहे
बाबुराव,
सास-याकड गेलो तर तीथ परतीच टिकत भेट्त न्हाय म्हंतात..
धोंडाचा म्हैना काय धोंडाच आयुक्श म्हना...
सास-यानी त्याच्या घरात्लि काढुन गळ्यात मार्लीया न्हव..
किर्कोळ नुस्कान भरपाई म्हनुन जावयाचा मान दुसरा काय नाय
धोंडुराव
8 May 2010 - 10:43 am | उग्रसेन
>>>सास-यानी त्याच्या घरात्लि काढुन गळ्यात मार्लीया न्हव..
किर्कोळ नुस्कान भरपाई म्हनुन जावयाचा मान दुसरा काय नाय
लंबर एक हान्ला भाऊ. :)
बाबुराव :)
8 May 2010 - 10:51 am | नितिन थत्ते
आपुन सासर्याले लुटाय आधिक म्हैणा वग्रे काय पहात नाय. कायम लुटित आसतु.
नितिन थत्ते
8 May 2010 - 11:02 am | उग्रसेन
:)
8 May 2010 - 10:55 am | राजेश घासकडवी
मस्त लिहिलंय...नावातकायआहेंचा प्रतिसाद पण लय भारी.
आमचे सासरे कऱ्हाडे आहेत. अजून मी जिवंत आहे हे नशीब समजतो. तेव्हा धोंड्यात भलतंच काही घालून मिळालं तर... म्हणून मी घाबरतो जायला.
8 May 2010 - 11:03 am | उग्रसेन
च्यामारी जावयाच्या एक एक तर्हा वाचाला मिळू राह्यल्या भो. :)
बाबुराव :)
8 May 2010 - 11:14 am | झकासराव
चुलत सासतेबुवानी पुरणपोळ्या, आमरस खाउ घातला.
आता सासरे बुवांच आमंत्रण पेंडींग आहे. :)
8 May 2010 - 11:37 am | तिमा
आमच्या सासूबाय अनरसे पाठवायच्या बगा अधिक मैन्याला. आत्तशे ईसरायला लागल्यात् , आटवन् करुन द्यावी का नाय याच इचारात पडलो हाय बगा! कारन् पाटिवले तर त्वांडात दात उरले हायेत कुटं ?
em>हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
8 May 2010 - 11:45 am | उग्रसेन
अनारशे दान केल्यावर अनारशावर खसखसाचे जेवढे टीपके राहतेत
तेव्हढे वर्ष माणूस सुखात राहतो अशी काय तरी गोष्ट हाये.
सासूबायला नरम अनारशे पाटवा म्हणा. :)
बाबुराव :)
8 May 2010 - 3:57 pm | सुधीर१३७
येतो जाऊन, बघतो काय मिळतं ते...................
काय बाबुराव.........
आन आलो कि परत येक धोंडा द्येतो................
काय................ ;)
8 May 2010 - 4:24 pm | भडकमकर मास्तर
मला वाटलं कोणाच्या आय्डीबद्दल काहीतरी आहे की काय ...
8 May 2010 - 5:40 pm | ईन्टरफेल
थु...........आशा जावायावर फुकाच खायला! अन..फुकाच ल्यायला!.. X( ......कष्ट करुन मौज माजा करा म्हनाव! मुलिचे लग्न केलेल्या बापाला विचारा!..........डोक्यात धोंडा नाय आख्खा दगुडच हानल! X( लग्नाच्या येळेस काय कंबरड मोडतय!ते तेलाच म्हाईत! बाकि मुलगि देऊन पुन्य न्हाय केल का तेन? न्हाय तर आसेच खईस र्हायले आस्ते हे जावई लोक........................... :)) एक शेतिऊपयोगि मानुस न मिळाल्यामिळे शेति करित नसलेला शेतकरि...........जगाला-ताप नव्हे जगताप
8 May 2010 - 6:18 pm | उग्रसेन
मुलीचं लग्न जमावं म्हून सग्यासोयर्यात हिंडणार बापाचं दुक आम्हालाबी
ठाव हाय. पर म्हून जावयावर थू बी कराची गोष्ट काय पटली नाय बा.
तुमी नका जाऊ बा धोंडा खाला. तुम्ही आपलं शेती करा मुकाट्यानं :)
यंदा आमचा कांदा काय पोसला नाय. कांद्याच्या वावरात गवत लै झालं व्हतं. :(
बाबुराव :)
8 May 2010 - 7:39 pm | JAGOMOHANPYARE
आमचा सासरा आमच्याचसाठी दहावा ग्रह आहे... आता त्यो काय देनार? :(
9 May 2010 - 1:57 am | शुचि
होय होय अधिक मासाला "पुरुषोत्तम मास" म्हणतात. हा शुभ असतो.
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
10 May 2010 - 8:17 am | स्पंदना
अधिवेषण भरवल की राव तुम्ही जावयान्च!!
सास-यानी त्याच्या घरात्लि काढुन गळ्यात मार्लीया न्हव..
किर्कोळ नुस्कान भरपाई म्हनुन जावयाचा मान दुसरा काय नाय
आईग्ग!!
सासूबायला नरम अनारशे पाटवा म्हणा.
नरम अनारसे चीकटतील ना दातान्ना? कुरकुरीतच बरे लागतात.
शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
10 May 2010 - 10:05 am | उग्रसेन
घर जावयाचं सोडून द्या. पर काही मानी जावई राहतेत.
ज्यायनी कधी सासर्याकडं किर्कोळ कारणामुळं पाय नाय ठोला.
ह्यो सण एक निमित्तबी हाय रिलेशन किलेर कराला. नाय का ? :)
बाबुराव :)
10 May 2010 - 10:32 am | सातबारा
दर तीन वर्षांनी येणारा जावायपोळा. आमचा दरवेळी दोनदा होतो, कारण दोन दोन सासुरवाड्या. ( गैरसमज नसावा. एक सख्खी सासुरवाडी, एक आते सासुरवाडी.) गेल्या शनीवारी सख्ख्या सासुबाईंकडे तर काल आतेसासुबाईंकडे पोळा साजरा झाला. ( आपल्याला काय ? बैलावानी, रस खा म्हन्लं, खाल्ला, पोळ्या खा म्हन्लं, खाल्ल्या !)
---------------------
हे शेतकर्यांचे राज्य व्हावे.
21 May 2010 - 7:47 pm | उग्रसेन
काथ्याकुटात भाग घेतलेल्या समस्त जावयाचे आन वाचकाचे आभार.
आता भेट तीन वर्षानी पुढल्या धोंड्याला.
बाबुराव :)
17 Apr 2024 - 8:18 pm | अहिरावण
बाबुराव ! या वर्षी आहे का हो धोंड्याचा महिना?