आईपणाचा उदोउदो...
मे मासाचा दुसरा रविवार आला की आम्हां लेकरांच्या पोटात मायेचा गोळा उठून आम्ही आई आई करीत टाहो फोडतो. जगभर मदर्स डे साजरा होत असतो अन् आम्ही भारतीय कार्टे आईचा उदो उदो करून घेतो...
मातेविना सृष्टी नाही, ममतेबिगर दृष्टी नाही हे खरे असले तरी अपत्यप्रेमाची वृष्टी कशी करायची तिचे तीच जाणे. आमच्या बापाला ते जमलं तर नाहीच, आम्ही बाप झाल्यावर आम्हालाही जमत नाही. रडणारं पोट्टं आम्ही डोईवर घेऊन गावभर फिरवलं तरी शांत होत नाही. परंतु 'ओ रे बाळा' अशी मंजुळ वात्सल्यमयी मातृसाद कानी पडली की बाळोबा तिच्याकडे झेप घेऊन खिदळणार हे जन्मापासून ठरलेले. आम्हा करंट्या बापूसांना ना तसली कोमल हाक मारता येत, ना तसला वात्सल्याचा उमाळा येत. त्यामुळेच की काय तिला पोरगं चिकटलं की आम्हाला तिच्या 'आई'पणाचा हेवा वाटू लागतो.('बाई'पणाचा नव्हे, हे शौकिनांनी ध्यानात घ्यावे.)
असा हेवा व्यक्त झाल्यावर बापपणाचा दावाही तोकडा वाटू लागतो. अशा वेळी खास मैत्रिणीँबद्दलसुद्धा प्रेमाऐवजी मत्सर उफाळून का येतो ते न कळे! खरोखर आई मग ती कालची असो की उद्याची वंदनीय असते, स्पृहणीय असते. तिचा योग्य तो आदर राखणं, तिच्यायोगे आपण दुनिया पाहू शकलो याचं जागतं भान ठेऊन तिच्या आईपणाचा उदो उदो करणं आपलं कर्तव्यच आहे.
तेव्हा मातृदिनाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा झालेल्या मातांना, होऊ पाहणाऱ्या आयांना अन् उद्याच्या भावी जननीँना सुद्धा दिल्याच पाहिजेत...
मातृदिनानिमित्त...
गाभा:
प्रतिक्रिया
8 May 2010 - 10:58 am | उग्रसेन
*आई असते जन्माची शिदोरी ती कधी सरतही नाही आणि पुरतही नाही. - फ.मु. शिदे
*ज्याला आय नाय त्याला काय नाय - दादा कोंडके.
(दादा कोंडके जव्हा काँग्रेस पक्षात व्हते तव्हा काँग्रेस पक्षाबद्दल अस्सं बोल्ले होते)
सा-या मायमाऊलींना मह्याबी मातादिनाच्या शुभेच्छा.
बाबुराव :)
10 May 2010 - 3:42 am | खादाड_बोका
खरच ....आईविना भिकारी स्वामी तिन्ही जगाचा.
मा तुझे सलाम.....