मागच्या महिन्यात माझा एक मित्र काही परदेशी पाहुण्यांना अमृतसर दाखवायला घेऊन गेला होता. त्याने जे पाहीलीले सांगीतले, त्याचा खोलवर विचार केला तर एक राष्ट्र म्हणून आपले काय स्थान आणि भवितव्य आहे असा मोठा प्रश्न मनात येतो. आणि त्याचे उत्तर काही आशावादी येत नाही.
सुवर्णमंदिराजवळ एक शिखांचे संग्रहालय आहे. तिथे भिंद्रनवालेचे मोठे चित्र लावले आहे. त्यावर मथळा आहे "१९८४ साली शहीद झालेले"
हे पाहून परदेशी पाहुण्यांनी विचारले, "१९८४ साली भारताची कुठल्या देशाशी लढाई झाली होती? आणि त्यात ह्या गृहस्थांची कामगीरी काय होती?"
ह्याला माझ्या मित्राकडे उत्तर नव्हते.
आपल्या माहितीनुसार (मतानुसार)
* हा वरील अनुभव आपण ऐकला किंवा पाहिला आहे का? (मला माझी ऐकीव माहीती पडताळून पहायची आहे, कारण ती खरी म्हणून स्विकारणे मला कठीण जात आहे.)
* भारतात शहीद ची अधीकृत व्याख्या काय? भारतीय सैन्याने १९८४ साली केलेल्या कारवाईत मारलेल्या ह्या माणसाला ह्या व्याक्खेनुसार शहीद म्हणता येईल का?
* असे लाजीरवाणे प्रद्रर्शन काढून टाकण्यासाठी कोणी राजकीय पक्षांनी कारवाई केली नाही का? भाजपा चे ह्यावर काय म्हणणे आहे?
* ज्या पक्षाचे नेते स्वतः एक आदरणीय शिख आहेत, त्या पक्षाचे सरकार अशा प्रदर्शनाला मान्यता कशी देते?
प्रतिक्रिया
6 May 2010 - 9:14 am | उग्रसेन
चालायचंच मनोहर काका.
शिवाजी महाराजायला लुटारु म्हणले व्हते इतिहासात कोणीतरी.
सांगाचा मुद्दा देखनेका नजरिया पे वो बाते डिपेंड होती है. :)
बाबुराव :)
6 May 2010 - 9:44 am | अरुण मनोहर
नजरीया माय फुट.
तर मग कोणाच्या नजरीयाने कसाब देखील क्रांतीकारी ठरेल, आणि (जेव्हा केव्हा फाशी जाईल) हुतात्मा ठरेल? आणि आपण ते "चालायचच" म्हणून चालवून घेणार?
6 May 2010 - 9:20 am | बिपिन कार्यकर्ते
खालिस्तान चळवळीत मारल्या गेलेल्या बर्याचशा लोकांना हुतात्मा स्मजणारे खूप शीख आहेत अजूनही.
बिपिन कार्यकर्ते
6 May 2010 - 10:05 am | चिरोटा
वर म्हंटल्याप्रमाणे खलिस्तान चळवळीला पाठिंबा देणारे शीख बरेच होते.(अजुनही असतील्).अमेरिकेत काही गुरुद्वारांमध्ये स्वतंत्र खलिस्तानची पत्रके अजुनही वाटली जातात.
लाजीरवाणे आहे हे खरेच पण बर्याच शीखांचा सॉफ्ट कॉर्नर असेल तर कोणता राजकिय पक्ष पायावर दगड मारुन घेइल?
भेंडी
P = NP
6 May 2010 - 10:10 am | नितिन थत्ते
नजरियाबाबत चर्चा पूर्वी पण झालेली आहे. कुंपणाच्या कोणत्या बाजूस उभे आहोत वगैरे. त्यामुळे एकाला दहशतवादी वाटणारा दुसर्या बाजूस उभा असणार्याला शहीद वाटू शकतो.
आता ज्या पक्षाचे नेते आदरणीय शीख आहेत त्या पक्षाचे त्या पंथाशी आपुलकीचे संबंध नाहीत. उलट त्या पक्षाच्या सदस्यांवर शीख लोकांच्या कत्तली केल्याचे आरोप/गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे मतांच्या राजकारणासाठी हे चालवले जात आहे हे (नेहमीप्रमाणे) म्हणायला या बाबतीत तरी वाव नाही.
*उलट असा आरोप नेहमी करणार्या देशभक्तांच्या पक्षाचेच गेली कैक वर्षे त्यांना शहीद समजणार्या राजकीय पक्षांशी साटेलोटे/युती/समझोता आहे.
नितिन थत्ते
6 May 2010 - 10:37 am | अरुण मनोहर
आपण लिहीले आहे- "कुंपणाच्या कोणत्या बाजूस उभे आहोत वगैरे..."
प्रश्न हा आहे की आपण स्वतः (म्हणजे ह्या बाबत विचार करणारा प्रत्येक जण) कुठे उभा आहे. मी विचारले होते- "भारतात शहीद ची व्याख्या काय आहे" ह्यात कुंपण ऑलरेडी डिफाईन्ड आहे.
कुंपणाच्या बाहेरचे आणि कुंपणावर बसलेले ह्यांची फीकीर आपण का करायची?
6 May 2010 - 2:39 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
"भारतात शहीद ची व्याख्या काय आहे" हा प्रश्न संदिग्ध आहे.
(भारतीय) शीख आणि (भारतीय) हिंदू दोन्ही भारतीयच आहेत. त्यामुळे भारतात शीख आणि हिंदू समानच आहेत. घटनेने दिलेलं स्वातंत्र्य वापरून काही लोक भिंद्रनवालेंना हुतात्मा समजतात तर समजू देत. हेच स्वातंत्र्य वापरून आपण त्याला विरोध करू शकतो.
सुवर्णमंदीराजवळचं संग्रहालय जर सरकारी मालमत्ता असेल तर मात्र वेगळा विचार केला जावा.
अदिती
6 May 2010 - 2:43 pm | नितिन थत्ते
ओक्के
नितिन थत्ते
6 May 2010 - 12:13 pm | चिंतातुर जंतू
फिकीर का करायची ते कळण्यासाठी एक उदाहरणः आपल्या भारताच्या कुंपणात मणिपूर येत असेलच. तेथे जनतेवर जे अत्याचार वर्षानुवर्षे चालले आहेत, त्यामुळे अनेक सर्वसामान्य माणसांच्या मनात भारतीय सरकार आणि पोलिसांविषयी तिरस्कार आणि घृणा आहे. आपण त्याची फिकीर केली नाही, म्हणून तिरस्कार व घृणा वाढत गेली. थोडक्यात, आपण या गोष्टींची फिकीर केली, तर कदाचित कुंपणावरचे आणि कुंपणाबाहेरचे 'आत' येऊ शकतील. आणि मग त्यांचे 'शहीद' ते आपले 'दहशतवादी' ही विसंगती राहणार नाही. म्हणून फिकीर करायची.
- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
6 May 2010 - 1:04 pm | स्पंदना
कोण कुठुन कशी भर घालत असतात याला तर काही बन्धनच नाही.
माझी एक ख्रीश्चन मैत्रीण म्हणे "अग शीख काही हिन्दु नाहित. आमचे फादर सान्गतात शीख हा एक भु भाग( कॉन्टीनन्ट) होता. तो म्हणे ड्रीफ्ट होत भारताला येउन चिकटला. म्हणुन त्यान्ना वेगळ मानल पाहिजे" म्हणजे जेव्हढी जमतील तेव्हढी शकल करायला कोण कोण हातभार लावते आहे पहा.
शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
6 May 2010 - 2:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तुमची मैत्रीण हुशाऽऽर आहे.
आमचा नमस्कार सांगा त्यांना. :)
-दिलीप बिरुटे
6 May 2010 - 2:34 pm | चिरोटा
त्या फादरचा नंबर द्या.एक मित्र geologist आहे.त्याच्या ताब्यात देवूया या फादरला.
भेंडी
P = NP
6 May 2010 - 3:21 pm | इन्द्र्राज पवार
सुवर्णमंदिराजवळ एक शिखांचे संग्रहालय आहे. तिथे भिंद्रनवालेचे मोठे चित्र लावले आहे. त्यावर मथळा आहे "१९८४ साली शहीद झालेले"....
मी स्वत: अमृतसरच्या सुवर्णमंदिरात गेलो आहे (मित्रासमवेत २००७ मध्ये).... पण त्यावेळी अशा प्रकारचे शिखांचे संग्रहालय त्या परिसरात असेल याची जाणीव काही त्यावेळी झाली नाही... कारण एक तर रात्र होत आली होती आणि अमृतसरहून लागलीच कपूरथळ्याच्या रस्त्याला आम्हाला लागायचे होते. पण एक बाब नक्की आहे कि, त्या परिसरात (किंवा बहुतांशी पंजाब मध्ये "शिखांची" अशी खास संग्रहालये आहेत, जिला सत्तेवर असणा-या सर्वच राजकीय पक्षांचा "सक्रीय" आशीर्वाद/पाठींबा असतोच असतो. एस.जी.पी.कमिटीचा अशा प्रकारच्या हालचालीवर खूपच प्रभाव आहे (ही देखील एक प्रकारची दहशतच म्हणा...!) आणि सरकारला आवडो/नावडो त्यांना जर भिंद्रनवाले याला असे "शहीदत्व" दिले असेलेले स्वीकृत असेल तर तेथे कोणाची मात्र चालत नाही.....अगदी मनमोहन सिंग यांचीदेखील.
भिंद्रनवाले यांच्याबद्दल तिथे (विशेषत: अमृतसर, फिरोझपूर, बटाला, कपुरथळा या भागात चुकूनसुद्धा ......होय, चुकूनसुद्धा....कुणी उलटे/विरुद्ध बोलत नाही.....मग बोलणारी व्यक्ती शहरी असो वा ग्रामीण भागातील.... आम्ही महाराष्ट्रातून आलो असल्याचे समजल्यावरून या विषयावर निदान ते संवाद तरी साधत होते..... इतरांच्या समवेत ही शक्यता नाही.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
6 May 2010 - 6:04 pm | जयंत कुलकर्णी
भिंद्रनवाले शहीद तर जनरल वैद्य कोण ?
जयंत कुलकर्णी.
त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून !
www.omarkhayyaminmarathi.wordpress.com
6 May 2010 - 8:31 pm | तिमा
शहीद याचा अर्थ नक्कीच देशासाठी प्राण अर्पण करणारा, पण शिखांना फार गुर्मी आहे व ती ते वेळोवेळी दाखवून देत असतात.
आणि हल्ली तर राजकीय पक्षांनी तर ह्या सर्व शब्दांचा खेळच मांडलेला आहे.
शहीद म्हटल्यावर शौर्य गाजवून लढताना देशासाठी प्राण अर्पण करणारा असा अर्थ अभिप्रेत असताना शौर्य गाजवायची संधीच न मिळता त्याआधीच अतिरेक्यांकडून मेलेल्यांनाही शहीद म्हणू लागले आहेत.
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
6 May 2010 - 9:20 pm | इन्द्र्राज पवार
"....राजकीय पक्षांनी तर ह्या सर्व शब्दांचा खेळच मांडलेला आहे....."
राजकीयच नव्हे तर अन्य क्षेत्रेही अशा "स्वस्ताई" ला सोकावलेली आहेत.
एक दोन चित्रपटात काम केले की झाला "अभिनयसम्राट"
एक दोन गाणी रेकॉर्ड झाली की उपजली "प्रतीलता"
एक दोन शतके ठोकली की झाला "दुसरा सचिन"
मुन्शिपाल्टीत एका वॉर्डातुन आला निवडुन की झाला "लोकनेता"
"शिक्षण महर्षीं"ना तर आपुल्या प्रिय महाराष्ट्रात पूरच आलेला आहे.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
6 May 2010 - 9:38 pm | विकास
वरची प्रतिक्रीया एकदम आवडली!
बाकी या विषयासंदर्भात: शिखांच्या महत्वाच्या धर्मस्थळापैकी एक असलेल्या दिल्लीतील बांग्लासाहीब गुरूद्वारात मी दर्शनाला गेलो होतो. मूळ मंदीरात दर्शन झाल्यावर माझ्या ड्रायव्हर/वाटाड्याने मला त्याखाली असलेल्या छायाचित्रांच्या मुझियम मधे नेले. तेथे भिन्द्रनवाले, सतवंतसिंग आणि बेअंतसिंग या सर्वांचे फोटो लावले होते. भिन्द्रनवाल्यांच्या फोटोकडे बघत त्याने मोठ्या भावुकतेने सांगितले की हे ब्लूस्टार मधे मारले गेले असे सरकार आणि आम जनतेला वाटते... पण खरे कुणालाच माहीत नाही!
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
6 May 2010 - 10:05 pm | क्लिंटन
माझा चुलत भाऊ काही वर्षे लुधियानामध्ये वास्तव्याला होता.त्याच्या वडिलांनी (माझ्या काकांनी) सांगितलेला एक किस्सा सांगतो. माझे काका निवृत्त झाले असल्याने मधूनमधून लुधियानाला जात असत. सुवर्णमंदिराच्या बराच मोठा एक गुरूद्वारा तरण तारण मध्ये आहे तो त्यांनी बघितला होता. तिकडे शीख धर्माच्या इतिहासाचे एक छोटेखानी संग्रहालय आहे. त्यात दहा गुरू आणि शीख धर्माच्या इतिहासातील महत्वाच्या टप्प्यांचा उल्लेख केला आहे. अर्थातच ’ऑपरेशन ब्लू स्टार’ हा त्यांच्या इतिहासातील महत्वाचा टप्पा आहेच.त्याविषयी पण तिथे माहिती आहे. आणि त्यानंतर झालेल्या इंदिराजींच्या हत्येचाही उल्लेख आहे. आणि इंदिरा हत्येचा उल्लेख ’जैसा किया वैसा पाया’ या शब्दात केला आहे. ही गोष्ट १९९५ ची. अजूनही हे शब्द तिथे आहेत का याची कल्पना नाही.
भाजपचे यावर म्हणणे काय याची कल्पना नाही.पण भाजपचा मित्रपक्ष अकाली दलाची भूमिका मात्र संशयास्पद आहे असे म्हणायला मात्र नक्कीच जागा आहे. याची कारणे
१. १९९२ मध्ये अरूण कुमार वैद्यांचे मारेकरी जिंदा आणि सुखाला फासावर लटकवले तेव्हा त्याचा अकाली नेते प्रकाशसिंह बादल, गुरचरण सिंह तोहरा आणि सुरजीत सिंह बर्नाला यांनी निषेध केला होता. अगदी शेवटच्या क्षणी राष्ट्रपतींची भेट घेऊन फाशी टाळावी अशी मागणी त्यांनी राष्ट्रपतींना केल्याचे वाचल्याचे आठवते. इतकेच नाही तर हे नेते जिंदा आणि सुखाच्या भोगविधीसाठी (दहावे) पुण्यालाही आले होते.
अवांतर: १९९६ पूर्वी भाजप-अकाली दल युती नव्हती. किंबहुना १९९६ च्या लोकसभा निवडणुका या दोन पक्षांनी एकमेकांविरोधात लढवल्या होत्या. पण वाजपेयींचे १३ दिवसांचे सरकार स्थापन झाल्यानंतर त्या सरकारला अकाली दल या पूर्वी युती नसलेल्या एकमेव पक्षाने पाठिंबा दिला होता. त्या काळात मी भाजपचा कट्टर समर्थक होतो आणि भाजपने अशा पक्षाचा पाठिंबा घेतलाच का असा प्रश्न मला तेव्हा पडला होता.
२. अकाल तख्ताने २००३ मध्ये भिंद्रनवालेला अधिकृतरित्या हुतात्मा म्हणून जाहिर केले. त्याप्रसंगी प्रकाशसिंह बादल समर्थक आणि शिरोमणी गुरूद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष अनुपस्थित होते.पण भिंद्रनवालेला संतत्व देण्याविरोधात अकाली दलाने काही ठोस भूमिका घेतली आहे असे ऐकिवात नाही. त्याचप्रमाणे शिरोमणी गुरूद्वारा प्रबंधक समितीच्या संकेतस्थळावर ६ जानेवारी १९८९ रोजी सतवंत सिंह आणि केहार सिंह ’हुतात्मा’ झाले असे लिहिले आहे. त्यावरही अकाली दलाची भूमिका काय हे स्पष्ट नाही.
३. शिरोमणी गुरूद्वारा प्रबंधक समितीचे सचिव मनजीत सिंह कलकत्ता यांनी शीख धर्मासाठी हुतात्मा झालेल्यांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा सन्मान करणे हे समितीचे कर्त्यव्य आहे असे म्हटले आणि त्याचवेळी सतवंत सिंहच्या मातोश्रींचा सत्कार केला. त्यावर बादल गटाची भूमिका काय हे पण स्पष्ट नाही.
४. अकाली दलात वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे गट होते. कधी हे गट एकत्र होते तर कधी विरोधात. अशाच एका गटाचे नेते सिमरनजीत सिंह मान यांनी सतवंत सिंहच्या आईचा सत्कार केला त्याप्रसंगी बोलताना म्हटले की शिरोमाणी गुरूद्वारा प्रबंधक समितीने बियंत सिंह (इंदिराजींवर सर्वप्रथम गोळ्या याने झाडल्या) आणि दिलावर सिंह (पंजाबचे मुख्यमंत्री बियंत सिंह यांचे मारेकरी) यांच्या कुटुंबियांचाही सत्कार करावा असे म्हटले . सिमरनजीत सिंह मान यांच्या गटाशी भाजपचे कधीच घेणेदेणे नव्हते तेव्हा मान यांनी केलेल्या कृत्यांबद्दल भाजपला दोष नक्कीच देता येणार नाही. पण मान यांनी असे म्हटल्याबद्दल बादल यांनी त्यांचा निषेध मात्र केला नाही.
असो. भिंद्रनवाले आणि कंपनीला पंजाबमध्ये मानणारे लोक आहेत हे स्पष्टच आहे. मुद्दामून सुवर्णमंदिरातील किंवा इतर ठिकाणी भिंद्रनवाले आणि इंदिराजींच्या मारेकऱ्यांना हुतात्मा ठरवणारी वचने काढून पंजाबात परत हिंसाचार उफाळून यायला योग्य परिस्थिती निर्माण होऊ नये या कारणासाठी असेल कदाचित पण भाजप काय किंवा कॉंग्रेस काय त्याविरूध्द काही भूमिका घेताना दिसत नाहीत.
विल्यम जेफरसन क्लिंटन
7 May 2010 - 1:04 am | इन्द्र्राज पवार
".....मुद्दामून सुवर्णमंदिरातील किंवा इतर ठिकाणी भिंद्रनवाले आणि इंदिराजींच्या मारेकऱ्यांना हुतात्मा ठरवणारी वचने काढून पंजाबात परत हिंसाचार उफाळून यायला योग्य परिस्थिती निर्माण होऊ नये या कारणासाठी असेल कदाचित पण भाजप काय किंवा कॉंग्रेस काय त्याविरूध्द काही भूमिका घेताना दिसत नाहीत."
कटु असेल पण प्राप्त परिस्थितीत हीच "पॉलिसी", सत्ताधारी काय आणि विरोधी काय, दोघांनीही हतबलतेने स्विकारली आहे.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
7 May 2010 - 1:37 am | अरुंधती
इथं असंच चालतं भाऊ!
देशाविरुध्द युध्द पुकारणारे शहीद ठरतात. आणि इंदिरा गांधींच्या हत्येनंतर मोठ्या प्रमाणात शिखांची कत्तल घडवून आणणारे राजकारणीही सी बी आय ची ''क्लीन चीट'' घेऊन उजळ माथ्याने मानाची पदे भूषवितात!!!
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/