गाभा:
>>>विद्रोही संमेलना निमित्त : ब्राह्मणांना झोडपा किती ही .. ते पुढेच जात राहतील. (इंद्रराज सारखे अनेक अपवाद सन्माननीय)<<<
चक्रमवेताळचा वरील शिर्षक असलेला लेख, "प्रवेश प्रतिबंधीत" म्हणून वाचता येत नाही. मिपावर लॉगईन केलेल्या सगळ्यांनाच वाचता येणार नाही असे वाटले होते. ३० एप्रील ला प्रसिद्ध झाल्यापासून, लगेच दोन प्रतिसादानंतरच हा लेख् दिसत नाहीये. मग आज पर्यंत त्यावर २३ प्रतिसाद कसे आले?
मिपावर काही सदस्यांना स्पेशल एन्ट्री सुविधा आहेत का? आतापर्यंत असा समज होता की "प्रवेश प्रतिबंधीत" हे सगळ्यांनाच लागू आहे?
ईतरांना असा अनुभव आला की माझ्याच अकौन्ट मधे किंवा संगणकात काही लोच्या आहे?
प्रतिक्रिया
1 May 2010 - 6:00 pm | ईन्टरफेल
हो आम्हास्नि "प्रवेश प्रतिबंधीत" आसा संदेस आला बहुतेक तो लेख खरोखर प्रतिबंधित केला आसावा????????? ~X( मिपावर काही सदस्यांना स्पेशल एन्ट्री आसावि??????? ~X( एक शेतिऊपयोगि मानुस न मिळाल्यामिळे शेति करित नसलेला शेतकरि...........जगाला-ताप नव्हे जगताप
1 May 2010 - 6:28 pm | chipatakhdumdum
केवळ ' प्रवेश प्रतिबंधित ' अस लिहीलेल नाही. त्यापुढे ' तुम्हाला या पानाशी पोहचण्याची मुभा नाही. ' अस लिहीलेल आहे. त्यातला ' तुम्हाला ' हा शब्द महत्वाचा. all are equal, but some are more equal than others.
1 May 2010 - 7:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
संपादकांनी वादग्रस्त धाग्याची नोंद घेईपर्यंत किंवा तो धागा अप्रकाशित करेपर्यंत तिथे काही प्रतिसाद आले असावेत. त्यानंतर तो धागा अप्रकाशित करण्यात आला. त्यामुळे मालक,तंत्रज्ञ,आणि संपादक सोडून इतर सर्व मिपा सदस्यांना त्या धाग्यावर 'प्रवेश प्रतिबंधीत' किंवा ' तुम्हाला या पानाशी पोहचण्याची मुभा नाही, असा संदेश दिसतो. त्यात काहीही गौडबंगाल नाही, नसते. खुलासा संपला.
-दिलीप बिरुटे
[मिपा-संपादक ]
1 May 2010 - 8:17 pm | अरुण मनोहर
प्रत्यक्षात असे झाले नाही.
३० तारखेला जेव्हा मी त्या लेखाचा मथळा पाहीला, तेव्हा त्यावर २ प्रतिसाद असे लीस्ट मधे होते. उघडायला गेलो तर "प्रवेश प्रतिबंधीत." त्यानंतर ३० एप्रील ते १ मे रात्र पय्रंत, २ चे २३ प्रतिसाद झ्हले. अधून मधून मी तो धागा उघडायचा प्रय्त्न करत होतो तेव्हाही "प्रवेश प्रतिबंधीत."
मग २ पासून २३ प्रतिसाद देणारे वाचक कसे तो वाचू शकले?
समजा २ प्रयंत प्रतिसाद आले, मग तो धागा उडवला असेल. मग, २ चे २३ कसे झाले? म्हणजेच काही लोकांनी धागा उडवल्यानंतर पण वाचला?
1 May 2010 - 8:22 pm | टारझन
हाहाहा =)) मला तर सगळे धागे दिसत्यात बॉ ... आपण तर संपादक पण नाही आहोत ;)
-(स्पेषल एंट्रि पास धारक) टारझन
1 May 2010 - 8:30 pm | अरुण मनोहर
मला वाटते तुम्ही टारेक्स किरणांचा चष्मा लावला असेल.
(धाग्याच्या मागे काय? धाग्याच्या मागे काय?)
1 May 2010 - 9:35 pm | इन्द्र्राज पवार
श्री. अरुण जी >> श्री. चक्रम वेताळ यांच्या त्या लेखात तसेच शीर्षकात माझ्या नावाचा स्पष्ट उल्लेख (चांगल्या अर्थाने....) असल्यामुळे साहजिकच माझे लक्ष तिकडे वेधले गेले....आणि लेख वाचल्यानंतर जरी श्री. वेताळ यांची भाषा थोडीशी जहाल वाटली तरी, किमान मिपा सदस्यांत असंतोष तथा एकमेकाविषयी कोणत्याही प्रकारच कडवटपणे येणे अत्यंत चुकीचे वाटल्यामुळे कित्येक सदस्यांनी तत्काळ संपादकांना विनंती करून तो धागा संस्थळावरून काढून टाकण्याविषयी सुचविले. या शिवाय मी स्वत: देखील लेखातील काही बाबी विषयी मत प्रदर्शित करून "विद्रोही संमेलने" भरवून मराठा तसेच बहुजन समाज नेमके काय साध्य करीत आहे हा विचार मांडला होता.... जो तिथे प्रकट झाला होता. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे (माझ्यासह)२३ प्रतिक्रिया आल्या होत्या....ज्या मी वाचल्या होत्या.... एखादी दुसरी सोडली तरी जवळपास ९५% सदस्यांनी येथील सौहार्दाचे वातावरण अजिबात बिघडू नये हीच भूमिका मांडली, जी संपादक मंडळाला स्वीकारण्या योग्य वाटली.... व त्यानुसार तत्काळ कार्यवाही झाली.... विषयावर अंतिम पडदा टाकून किमान आपल्यापुरता तरी "तो" विषय संपला.
आता राहता राहिला तुम्हाला आलेला "प्रवेश प्रतिबंधित" संदेश. असा संदेश तुम्हाला नाही तर खुद्द मला देखील आला होता....दुस-या प्रतिक्रीयाच्यावेळी...! पण कृपया, सदरची बाब ही केवळ तांत्रिक अडचणी संबधातील असल्याने आपण आता तिला अकारण महत्व देऊ नये ही विनंती. शेवटी "मिसळपाव" ची वाटचाल महत्वाची असून अशा नेट अडचणी ह्या जवळपास प्रत्येक संस्थळाना (इंग्लिशसह...) येत राहतातच. असो.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
2 May 2010 - 3:08 am | अरुण मनोहर
पवारजी धन्यवाद.
"तांत्रिक अडचणी " हे मात्र मस्तच. (मला "मस्टच" म्हणायचे होते. ;)
>>>पण कृपया, सदरची बाब ही केवळ तांत्रिक अडचणी संबधातील असल्याने आपण आता तिला अकारण महत्व देऊ नये ही विनंती. <<<
"पोलीटीकल आजारपण", "तांत्रिक अडचणी".... पुढे काही बोलायलाच नको. :SS
1 May 2010 - 10:00 pm | वेताळ
जरी श्री. वेताळ यांची भाषा थोडीशी जहाल वाटली :(
तो लेख माझा नव्हे. चक्रम वेताळशी आमचे काही देणे घेणे नाही. O:)
वेताळ
1 May 2010 - 11:04 pm | इन्द्र्राज पवार
नाही... मी पहिल्याच ओळीत "तो" लेख "चक्रम वेताळ" यांचा असल्याचे सूचीत केले आहे. मराठी लिखाणाची ही एक पध्दत आहे की, दुस-या तिस-या वेळेस तेच नाव ओघात येणार असेल तर पूर्ण नावातील प्रथम उल्लेख सहसा टाळला जातो... जसे समजा मी "श्री. व्यंकटेश माडगूळकर" यांच्याविषयी काही लिहीत असेन तर सुरुवातील एकदा त्यांचे पूर्ण नाव टंकित झाल्यानंतर पुढे प्रत्येक वेळी मी केवळ "माडगूळकर" इतकाच उल्लेख करेन. अशावेळी वाचक सदरचे नाव हे "ग.दि.माडगुळकर" असे समजुन वाचत नाही. हाच नियम इथेही असल्याने गैरसमजुतीचा प्रश्न उद्भवणार नाही.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
3 May 2010 - 5:10 am | नितिन थत्ते
दोन शक्यता.
१. ज्यावेळी तुम्ही २ प्रतिसादानंतर लेख उघडू पहात होतात. 'त्याचवेळी' मूळ लेखक लेखात काही संपादन करीत असेल तर इतर सदस्यांना तो लेख अनुपलब्ध असेल.
२. Some are more equal than others.
नितिन थत्ते